Wednesday 16 January 2019

विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पीआरओचा अज्ञानपणाचा कळस!

व्हॉट्सअ‍ॅप बंद आणि आणीबाणीचा आरोप


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्याचे व्हॉट्सअॅप अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच विरोधी पक्षनेत्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या फोनवर बंदी आणत आणीबाणीच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे अशी हास्यास्पद टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांच्या अज्ञानामुळे घडल्याचे निदर्शनास आले आहे. व्हॉट्सअॅप कंपनीच्या व्यवसायिक पॉलिसी आहेत संदेशवहन करताना ठराविक मर्यादा ओलांडली तर संबधित फोनवरून अशा प्रकारे संदेश पाठवण्यावर काही तास अथवा काही दिवस निर्बंध घालण्यात येतात. व्हॉट्सअॅप कंपनीची नियमावली लहान मुलांपासून जेष्ठांना ज्ञात आहे मात्र एखाद्या मोठ्या नेत्याकडे मीडिया मॅनेजमेंट व स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला माहिती नसावी हा अज्ञानपणाचा कळसच आहे. व्हॉट्सअॅप कंपनीच्या व्यवसायिक पॉलिसीमध्ये ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त संदेश पाठवल्याने संगणक प्रणालीद्वारे निर्बंध घातले जातात. प्रत्येक सोशल मिडिया माध्यमांच्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत. ही एक सामान्य क्रीया आहे याचे राजकीय भांडवल करून विरोधीपक्ष नेत्यावर आणीबाणी लादल्याची भावना जनसामान्यांना करून देणे गैर आहे. सरकारवर आरोप करण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत असे पोरकटपणाचे आरोप केवळ पीआरओच्या अज्ञानामुळे झाल्याने राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. अमर्याद संदेश पाठवण्याची प्रणाली विकसत असून संबधितानी अशा सेवा पुरविणाऱ्या संस्थांशी संवाद साधणे अपेक्षित आहे. दरम्यान जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी हे गेल्या 13 वर्षांपासून मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात. सध्या ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' या यात्रेचं मीडिया मॅनेजमेंट करत आहेत. बुधवारी संध्याकाळी अचानक माझं व्हॉट्सअॅप बंद झाले. जेव्हा मी नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्या फोन क्रमांकावर व्हॉट्सअॅप वापरण्यावर बंदी आणण्यात आल्याचा मेसेज आला अशी माहिती प्रशांत जोशी यांनी दिल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. या संभांमधून ते राज्य सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मुंडेंच्या या सभांचे वार्तांकन सोशल मीडियातून तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी करीत आहेत. परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये या सभांचे वार्तांकन काही मिनिटांतच लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात. तसेच राज्यातील माध्यमांना संपर्क करण्याचं कामही तेच करतात. मात्र, अचानक त्यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर काही तासांसाठी बॅन करण्यात आला होता. प्रशांत जोशी यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर बॅन केल्याचा दावा स्वत: धनंजय मुंडे यांनी केला होता. विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणे, त्यांचा नंबर बॅन करणे, त्यांच्या फोनवर बंदी आणणे, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखेच असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला होता. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.