Thursday, 31 January 2019

bypoll result राजस्थान विधानसभेत काँग्रेसची सेंच्युरी; रणदीप सुरजेवाला यांचा जिंदमधून दारूण पराभव

ramgarh bypoll: रामगड जिंकले; राजस्थान विधानसभेत काँग्रेसची सेंच्युरी


राजस्थानमधील रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शाफिया झुबेर बहुमतानं विजयी झाल्या आहेत. या विजयासह राजस्थान विधानसभेत काँग्रेसने जागांची सेंच्युरी मारली आहे. काही महिन्यांपूर्वी रकबर खान झुंडबळी प्रकरणामुळे रामगड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला होता. रामगड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या दहा निवडणुकांमध्ये एकदाही काँग्रेस येथे पराभूत झालेली नाही. यंदा भाजपचे सुखवंत सिन्हा आणि बीएसपीचे जगतसिंह या दोघांनीही काँग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी जोरदार प्रचार केला होता. असे असताना देखील शाफिया झुबेर यांना ८३ हजारहून अधिक मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या सुखवंत सिंग यांना ७१ हजार मते मिळाली. रामगडची पोटनिवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची होती. या पोटनिवडणुकीकडं राजस्थान सरकारची पहिली परीक्षा म्हणूनही पाहिले जात होते. तसेच राजस्थानात लोकसभा निवडणुकांआधी ही शेवटची पोटनिवडणूक होती. यामुळंच या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हे निकाल आश्वासक असून लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी येथील बसपा उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने येथील निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली होती. दरम्यान, राजस्थानमधील निकालांमध्ये पक्षाला एक जागा कमी मिळाल्याने रामगडची पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार शाफिया जुबेर यांना 83 हजार 311 मते मिळवून विजयी झाल्या, तर भाजपा उमेदवार सुखवंत सिंह यांना 71 हजार 83 मते मिळाली.  

हरियाणातील जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ

जिंदमधून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा पराभव झाला असून जिंद मतदारसंघात जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) दिग्विजय चौटाला आणि भाजपचे कृष्ण मिड्‌ढा यांच्यात अटीतटीची लढत झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार कृष्ण मिड्‌ढा हे विजयी झाले आहेत.सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी 12 हजार 935 मतांनी विजय मिळवला आहे. कृष्णलाल मिढ्डा यांना 5 हजार 566 मते मिळाली.  जननायक जनता पार्टीचे दिग्विजय सिंह चौटाला 37 हजार 631 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. तर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना 22 हजार 740 मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जिंद विधानसभेची निवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने येथून हरिचंद मिढ्ढा यांचे पुत्र कृष्णलाल मिढ्ढा यांना उमेदवारी दिल्ली होती. तर काँग्रेसने राज्यातील दिग्गज नेते रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरवण्याची खेळी केली होती. तर नव्याने उदयास आलेल्या जननायक जनता पार्टीने दिग्विजय सिंह चौटाला उमेदवारी दिली होती. विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात आतापर्यंत भाजपाला विजय मिळवला आला नव्हता. अखेर आज भाजपाने या मतदारसंघात भाजपाने आपले खाते उघडले आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.