Sunday 13 January 2019

election commission निवडणूक आयोगाला निर्धारित तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास अपयश

अंतिम मतदार यादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध होणार



आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला निर्धारित तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास अपयश आले असून दरवर्षी अंतिम मतदार यादी ३ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्याची परंपरा या वर्षी खंडित झाली आहे. निवडणुका जाहीर होण्यास केवळ ५० दिवस राहिले आहेत. राजकीय पक्षांना व लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांना पूर्व तयारी करण्यासाठी अंतिम मतदार यादीची आवश्यकता असते. मात्र निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास विलंब लावल्याने मतदारांशी संवाद साधणे व नियोजन करणे जिकरीचे होणार आहे. दरम्यान अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.  

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास विलंब कारणे--

[?]  केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन (ईव्हीएम) पुरवठा/प्रक्रिया
[?]  व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्र पुरवठा/प्रशिक्षण/प्रबोधनात्मक कार्यक्रम
[?]  अंतिम मतदार यादी तयारीला विलंब 
[?]  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी छपाई व अनुषंगिक निविदा प्रक्रियेत घोळ/अनियमितता
[?]   मोठ्याप्रमाणात दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळने व नव्या मतदारांची नोंद प्रक्रियेत दिरंगाई

निवडणूक आयोगाने 1 जानेवारी २०१९ च्या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम निर्धारित केला होता त्यानुसार अंतिम मतदार यादी ३ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती परंतु अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र ही मुदत वाढविली असून ३१ जानेवारी पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊ शकते. मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला होता त्यानुसार 'बीएलओे'कडून घरोघरी भेटी देणे १५ मे ते २० जून २०१८ पर्यत तर प्रारुप मतदार यादी तयार करणे ३१ ऑगस्ट २०१८ आणि प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे एक सप्टेंबर २०१८ यासेच दावे, हरकती स्वीकारणे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ नोंद घेण्यात येणार होती तर सदरील दावे, हरकती निकालात काढणे ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत निकालात काढून अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती मात्र दरवर्षी प्रसिद्ध करण्याची परंपरा या वर्षी खंडित झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेतर्फे घेण्यात आलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष अभियानानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही मतदार यादी १ सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार याद्यांमध्ये एक जानेवारी २०१९पर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक शाखेने वेळोवेळी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविल्या. त्यानुसार प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली होती. सध्याच्या मतदार यादीमध्ये एक जानेवारी २०१८ ला वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, काही मतदारांची नोंदणी झाली नसल्यास त्यांची नोंद होणार आहे. त्याचबरोबर एक जानेवारी २०१९ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या युवा मतदारांची नावे समाविष्ट केली जाणार आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत ओळखपत्रे दिली जाण्याचे नियोजन होते. त्यांची नावे यादीत घेतानाच दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ती अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवीन इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन (ईव्हीएम) सर्व जिल्हाधिकारी यांना पुरवल्या आहेत तसेच आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत (ईव्हीएम) व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर केला जाणार आहे. त्याची माहिती मतदारांना देण्यासाठी सर्व जिल्ह्यात ४ जानेवारीपासून ४५ दिवस जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37

=============0===========0==========0==========

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.