श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे
भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या आहेत. भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी पोटे विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा 2100 मतांनी पराभव केला. भाजपाने 11 जागांवर विजय मिळविला तर आघाडीने 08जागांवर विजय मिळविला. आघाडीच्या संगिता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, सुनीता खेतमाळीस यांनी विजय मिळविला. प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपाच्या दिपाली औटी, संग्राम घोडके विजयी झाल्या आहेत. प्रभाग सातमधून आघाडीचे निसार बेपारी व सोनल घोडके यांनी विजय मिळविला आहे. प्रभाग सहामधून भाजपाच्या अशोक खेंडके, मनिषा लांडे यांनी विजय खेचून आणला आहे. नगरपालिकेसाठी काल ८४ टक्के मतदान झाले होते. २३ हजार ६०४ मतदारांपैकी १९ हजार ८५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी १९ जागांसाठी ७१ उमेदवार मैदानात होते. नगराध्यक्षपदासाठी शुभांगी पोटे, सुनीता शिंदे आणि सिराबजी कुरेशी या उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या.
निकाल : विजयी उमेदवार
श्रीगोंदा नगरपरिषद निकाल (एकूण जागा – 19) :
प्रभागनिहाय विजयी उमेदवार :

सतीश मखरे, आघाडी
राजभाऊ लोखंडे,आघाडी

गणेश भोस ,आघाडी
सुनीता खेतमाळीस,भाजप

दीपाली औटी ,भाजप
घोडेक संग्राम ,भाजप

मनोहर पोटे : आघाडी
वनिता क्षीरसागर,भाजप

शहाजी खेतमाळीस ,भाजप
मनिषा वाळ्के : भाजप

मनिषा लांडे : भाजप
अशोक खेंड़के : भाजप

निसार बेपारी : आघाडी
सोनाली घोडके : आघाडी

ज्योती खेडकर : भाजप
रमेश लढणे : भाजप

संतोष कोथिंबीरे : आघाडी
सीमा गोरे : आघाडी
छाया गोरे : भाजप
प्रभायनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : प्रभाग 1: 2 हजार 322 पैकी 2 हजार 050, प्रभाग 2 : 2 हजार 314 पैकी 2 हजार 024, प्रभाग 3 : 2 हजार 122 पैकी 1हजार 837, प्रभाग 4 : 2 हजार 319 पैकी 1 हजार 815, प्रभाग 5 : 2 हजार 628 पैकी 2 हजार 324, प्रभाग 6 : 2 हजार 870 पैकी 2हजार 292, प्रभाग 7 : 2 हजार 689 पैकी 2 हजार 223, प्रभाग 8 : 2 हजार 484 पैकी 2हजार 157, प्रभाग 9 : 3 हजार 766 पैकी 3 हजार 100 मतदान झाले.
अहमदनगरमधील श्रीगोंदा नगर परिषद
एकूण जागा 19 : भाजप विजयीभाजप : 11
काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8
नगराध्यक्ष : शुभांगी पोटे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.