Thursday 31 January 2019

#Sillod Election औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान

सिल्लोड नगरपरिषदेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान


औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 27 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 फेबुवारी 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 5 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 9 व 10 फेब्रुवारी 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 13 फेब्रुवारी 2019 रोजी होईल. मतदान 27 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. 
दरम्यान सिल्लोड नगरपालिकेच्या स्थापनेपासूनच तिथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासाठी पुन्हा नगरपालिका ताब्यात घेणे तेवढे सोपे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगरपालिकेतील सत्तेच्या जोरावरच सत्तार यांची राजकीय कारकीर्द आतापर्यंत बहरत गेली. अगदी आघाडी सरकारच्या काळातील मंत्रीपदापर्यंत पोहचवण्यात देखील सिल्लोड नगरपालिकेतील निर्विवाद वर्चस्वाची मोठी भूमिका राहिली आहे.एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या जोरावर सत्तारांनी आतापर्यंत सिल्लोड नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली. पंचवीस वर्षातील दोनवेळा अनुक्रमे पत्नी आणि आता मुलगा यांना नगराध्यक्ष करत सत्ता घरातच ठेवण्यात त्यांना यश आले होते. परंतू, सत्तारांचे सत्ता केंद्र उध्दवस्त करण्यासाठी नगरपालिकेच्या आखाड्यात पहिल्यांदाच 'एमआयएम'ची एन्ट्री होणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात एक वेगळा प्रयोग सुरू केला आहे. तो कितपत यशस्वी होणार हे सिल्लोड नगरपालिकेच्या निवडणुकीतून स्पष्ट होईलच. जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाल्यानंतर सिल्लोड नगरपालिकेची हीच पहिली निवडणूक आहे. एस सी राखीव नगराध्यपदासाठी भाजपने उमेदवारांची चाचपणी केली असून वर्षभरापुर्वीच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक तायडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. आयात केलेल्या उमेदवाराला विरोध झाला तर मुळ भाजपचे विष्णू काटकर यांच्या गळ्यात देखील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ पडू शकते.कॉंग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक असलेल्या राजरत्न निकम यांचे एकमेव नाव सध्या नगराध्यक्षपदासाठी घेतले जात आहे. तर पुर्ण ताकदीनीशी मैदानात उतरलेल्या एमआयएमकडून प्रभाकर पारधे यांना नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवले जाण्याची शक्‍यता आहे. एकंदरित गेली पंचवीस वर्ष सिल्लोड नगरपालिकेची एकतर्फी होणारी निवडणूक यंदा मात्र कॉंग्रेस- भाजप- एमआयएम-वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि चुरशीची होणार आहे. 26 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा 27 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.