Saturday, 2 February 2019

#Parbhani City Municipal Corpotation परभणी महानगरपालिका; राष्ट्रवादीमध्ये बंड;१३ नगरसेवकांचे राजीनामे

जिल्हाध्यक्ष आमदार दुर्राणी यांची मनमानी ; परभणीतील १३ नगरसेवकांचे राजीनामे


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी महानगरपालिकामध्ये मोठा धक्का बसला आहे. परभणी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे पक्षाकडे पाठवले आहे. ग्रामीण परभणीचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्वांनी राजीनामे पाठवले आहेत. परभणी महानगरपालिकाध्ये राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ नगरसेवकांनी आपले राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत. 
    परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले आहेत.परभणी महापालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले. त्यामुळे संतापलेल्या 13 नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बालासाहेब बुलबुले, चांद सुभाना जाकेर खान, अमरिका बेगम अब्दुल समद, विकास लंगोटे, संगिता दुधगावकर, अलीखान मोईन खान, वर्षा खिल्लारे, शेख फहेद शेख हमीद, आबेदाबी सय्यद अहेमद, अमोल पाथरीकर, शेख अलिया अंजूम, मो.गौस, नाजेमा बेगम शेख अब्दुल रहीम यांनी त्यांचे नगरसेवक पदाचे राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्याकडे दिले आहेत. अतिक इनामदार यांचा अर्ज भरण्याचा निर्णय बाबाजानी यांनी मनमानी करुन घेतला आहे. तसेच बाबाजानी हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर दखल देत आहेत. दाखल केलेला इनामदार यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणीही नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे नगरसेवक दाद मागणार आहेत. तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शहरात निर्माण झालेली ही मोठी बंडाळी राष्ट्रवादीसाठी हानिकारक ठरणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.