महा-ई-सेवा केंद्रांवर सरकारचा भरोसा नाही!;एमकेसीएल कंपनीकडे ‘महालाभार्थी’ वेबपोर्टल सेवेची जबाबदारी
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एमकेसीएल कंपनीकडे ‘महालाभार्थी’ वेबपोर्टल सेवेची जबाबदारी दिलेली असल्याने महा-ई-सेवा केंद्रांवर सरकारचा भरोसा नसल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व एमकेसीएल MS-CIT सहाय्य केंद्रांमध्ये ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लाभार्थी होण्यासाठी वैवाहिक, जात, धर्मासह वैयक्तीक माहिती देणे अनिवार्य केले आहे. तसेच लाभार्थीने आपला मतदारसंघ कोणता आहे याची देखील निवड करणे क्रमप्राप्त असून सुमारे 74 प्रश्नांचा नागरिक माहिती ऑनलाईन अर्ज भरणे अनिवार्य आहे. लाभार्थीचा मतदारसंघ कोणता आहे हे देखील सरकारला या महा-लाभार्थीच्या माध्यमातून समजणार असल्याने निवडणुकांना सामोरे जाताना सरकारला लाभार्थींपर्यंत सहज पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान प्रती नागरिक जास्तीत जास्त ७०/- रुपये शुल्क घेण्यात येणार असून यामध्ये त्या व्यक्तीने नागरिकांची नोंदणी करणे, त्यांची संपूर्ण माहिती वेबपोर्टल वर भरणे, भरलेल्या माहितीवरून मिळणाऱ्या संक्षिप्त माहितीचे प्रिंट-आउट काढून देणे अपेक्षित आहे. तसेच प्रिंट हवे असल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्याचा अधिकार सर्व एमकेसीएल MS-CIT सहाय्य केंद्रांना देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी "महा-लाभार्थी" स्वतंत्र पोर्टलची निर्मिती एमकेसीएलच्या माध्यमातून राज्य सरकारने केली असून लाभार्थी होण्यासाठी वैवाहिक, जात, धर्मासह वैयक्तीक माहिती देणे अनिवार्य केले आहे. तसेच लाभार्थीने आपला मतदारसंघ कोणता आहे याची देखील निवड करणे क्रमप्राप्त असून सुमारे 74 प्रश्नांचा नागरिक माहिती ऑनलाईन अर्ज उपलब्ध केलेला आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर शासनाच्या विविध योजनांसाठी लाभार्थींची पात्र/अपात्रता "महा लाभार्थी" पोर्टलच भरलेल्या माहितीच्या आधारे आपोआप तांत्रिकदृष्ट्या ठरवणार आहे. अपात्रतेची करणे तत्काळ दिसणार आहेत यामुळे त्रुटी स्पष्ट होतील व एका पेक्षा अनेक वेळा लाभ घेण्यापासून मज्जाव होणार आहे. लाभार्थीचा मतदारसंघ कोणता आहे हे देखील सरकारला या महा-लाभार्थीच्या माध्यमातून समजणार असल्याने निवडणुकांना सामोरे जाताना सरकारला लाभार्थींपर्यंत सहज पोहोचणे शक्य होणार आहे. "महा-लाभार्थी" स्वतंत्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मोबाईल फोन वरील ओटीपीद्वारे अधिकृत निर्माण होत असलेला वापरकर्त्यांना आयडी देखील मोबाईल फोन क्रमांक असून त्यापुढे ०१ असे जोडले आहे. या पद्धतीने 'महालाभार्थी' वर नोंदणी करणाऱ्या नागरिकांची वैयक्तीक माहिती व संपर्क क्रमांक सहज राजकीयदृष्ट्या फायद्यासाठी वापरली जाऊ शकणार आहे. यामुळे माहितीचा दुरुपयोग मुद्दा आज-उद्या चर्चेला येऊ शकतो. दरम्यान एमकेसीएल कंपनीकडे ‘महालाभार्थी’ वेबपोर्टल सेवेची जबाबदारी दिल्याने महा-ई-सेवा केंद्रांवर सरकारचा भरोसा राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. सर्व एमकेसीएल MS-CIT सहाय्य केंद्रांमध्ये ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याकरिता शुल्क आकारणी किती असावी याची माहिती ‘महालाभार्थी’ संकेतस्थळावर दिलेली आहे. आतापर्यंत 'महालाभार्थी' वर २ लाख नागरिकांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली. एमकेसीएलच्या चॅनल पार्टनर नेटवर्कमध्ये त्यांच्या ५०००पेक्षा अधिक अधिकृत अध्ययनकेंद्रांचा (ALCs) समावेश आहे. पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या महानगरीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम अशा सर्व प्रदेशांमध्ये असलेले लहान आणि मध्यम स्वरूपाचे माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योजक तसेच शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे या अधिकृत अध्ययनकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. चॅनल पार्टनर्समध्ये महाराष्ट्रातील प्रादेशिक केंद्रे (RLCs),महाराष्ट्रातील स्थानिक केंद्रे (LLCs) Learning Centres ,अधिकृत अध्ययनकेंद्रे (ALCs),प्रशिक्षण प्रदाते (Training Providers), यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील स्थानिक केंद्रे (LLCs) यांच्या व MS-CIT सहाय्य केंद्रांच्या माध्यमातून एमकेसीएलने ‘महालाभार्थी’ वेबपोर्टलची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्रातील कंम्प्यूटर प्रशिक्षित व्यक्ती आपल्याला सेवा देण्यासाठी स्वत:चा बहुमूल्य वेळ देईल तसेच संगणक आणि इंटरनेट चा खर्च करेल. त्यासाठी आपण त्यांना प्रती नागरिक जास्तीत जास्त ७०/- देवू शकता. यामध्ये त्या व्यक्तीने नागरिकांची नोंदणी करणे, त्यांची संपूर्ण माहिती वेबपोर्टल वर भरणे, भरलेल्या माहितीवरून मिळणाऱ्या संक्षिप्त माहितीचे प्रिंट-आउट काढून देणे अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळी आपण संगणक प्रशिक्षित व्यक्तींकडून ही सेवा घ्याल, त्या त्या वेळी आपण त्यांना हे सेवाशुल्क देवू शकता. याव्यतिरिक्त जर आपणास इतर प्रिंट-आउटस हव्या असतील जसे की, शासकीय निर्णय, विहित नमुना अर्ज इत्यादी तर संबंधित व्यक्तीला आपण प्रती प्रिंट १/- ते ५/- देवू शकता असेही या संकेतस्थळावर म्हंटले आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना-
पशुसंवर्धन विभाग
मराठवाडा पॅकेजच्या
धर्तीवर २० शेळ्या + २ बोकड असा शेळी गट वाटप करणे
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- इ- कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनविण्याकरित�� गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी
अनुदान वाटप
राज्यातील
गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम
राबविणे ( राज्य योजनांतर्गत योजना )
जिल्हा वार्षिक
योजना- अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे
जिल्हा वार्षिक
योजना-एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम (सर्वसाधारण योजना)
नाविन्यपुर्ण योजना
- अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी १० शेळया/मेंढया +१ बोकड/नर मेंढा या
प्रमाणे लाभार्थींना शेळी /मेंढी गट वाटप करणे
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- ब- सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप
विद्युतचलित कडबाकुट्टी
यंत्राचे वापराकरीता अनुदान.
जिल्हा वार्षिक
योजना - वैरण बियाणे व ठोंबे वितरण.
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- ड- मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान
वाटप
जिल्हा वार्षिक
योजना - अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 10 शेळया व 1 बोकड गट वाटप योजना
राष्ट्रीय पशुधन
अभियानांतर्गत पशुधन विमा योजना
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- क- मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
अनुदान वाटप
जिल्हा वार्षिक
योजना- (अनुसूचित जातीच्या लाभार्थींना ०२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना
नाविन्यपूर्ण योजना-
1000 मांसल पक्षी
संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
नाविन्यपुर्ण योजना-
दुधाळ संकरित गाई/म्हशींचा गट वाटप करणे
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- अ- पायाभूत सोयीसुविधेसह २० मेंढ्या + १ मेंढानर असा मेंढी गट वाटप
राजे यशवंतराव होळकर
महामेष योजना- फ- पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी अनुदान वाटप
यवतमाळ जिल्ह्यात
शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (सामान्य योजना)
यवतमाळ जिल्ह्यात
शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (आदिवासी उपयोजना / TSP)
यवतमाळ जिल्ह्यात
शेतकऱ्यांचे क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी उत्तेजन (ओ.टी.एस.पी.)
यवतमाळ जिल्ह्यात
शेळी प्रजननासाठी उत्तम प्रतीचा बोकड वाटप (ZP Cess)
अल्पसंख्यांक विकास
विभाग
विद्यार्थिनींसाठी
वसतीगृह (केंद्र व राज्य)
मदरशांमध्ये
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी योजना
मौलाना आझाद मोफत
शिकवणी व संबंध योजना
मेरीट कम मिन्स
शिष्यवृत्ती
पढो परदेस- शैक्षणिक
कर्जावरील व्याज सवलत योजना
शैक्षणिक कर्ज
योजना- अल्पसंख्यांक
उच्च व व्यावसायिक
शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
उर्दू शाळेत मराठी
भाषा शिकवणी वर्ग योजना
डॉ. झाकीर हुसेन
मदरसा आधुनिकीकरण योजना
अल्पसंख्याक
समुदायाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि संबंधित इतर योजना
राजीव गांधी
शैक्षणिक कर्ज योजना
पोलिस भरतीपूर्व
प्रशिक्षण योजना
मुलींसाठी मौलाना
आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती
पोस्ट- मॅट्रिक
शिष्यवृत्ती
प्री - मॅट्रिक
शिष्यवृत्ती
राष्ट्रीय
अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ - पत-२ सूक्ष्म वित्तसहाय्य योजना
परिवहन विभाग
लोकशाहीर आण्णाभाऊ
साठे पुरस्कारार्थी व त्यांचे साथीदार यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
राज्य परिवहन
महामंडळाची अहिल्याबाई होळकर योजना
क्षय रोगी वैदयकीय
उपचारासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासभाडयात 50 टक्के सवलत
महाराष्ट्र
राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ
नागरीकांना रा.प. महामंडळाच्या साधी व निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 50 टक्के सवलत.
राज्य शासनाने
पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी योजना
कर्क रोगी वैदयकीय
उपचारासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवास भाडयात सवलत
माजी विधानमंडळ
सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत योजना
अंध अपंग व्यक्ती
यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
रेस्क्यु होम मधील
मुलांना वर्षातुन एकदा सहलीकरिता राज्य परिवहन महामंडळाची योजना
श्री. विठ्ठल
रुक्मिणी मंदीर पंढरपुर येथे आषाढी व कार्तीकी एकादशीच्या दिवशी प्रथम पुजेचा मान
मिळणा-या वारकरी दांपत्यास रा.प. महामंडळाच्या बसमधुन वर्षभर मोफत प्रवास सवलत
योजना
शासन अधिस्विकृतिधारक
पत्रकार (8000 कि.मी. प्रवासभाडे
) यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
आजी विधानमंडळ सदस्य
व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत योजना.
अंध अपंग व्यक्ती व
त्यांचे साथीदार यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
राज्य परिवहन
महामंडळाकडून स्वातंत्र्य सैनिकांना प्रवास भाडयात सवलत
कुष्ठ रोगी वैदयकीय
उपचारासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 75 टक्के प्रवास भाडयात सवलत
आदिवासी पुरस्कार
प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
डॉ बाबासाहेब
आंबेडकर समाजभुषण पुरस्कार (दलितमित्र प्ररस्कार) प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक
साथीदार यांसाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
विदयार्थ्याना मोठया
सुट्टीत मुळ गावी जाणे येणे/परिक्षेला जाणे येणे/ शैक्षणीक कॅम्पला जाणे येणे/
आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची योजना
राज्य परिवहन
महामंडळाची विदयार्थी मासिक पास योजना
अर्जुन द्रोणाचार्य ,
दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार
प्राप्त खेळाडुंना वार्षिक रुपये 500/- मुल्यापर्यंत प्रवास सवलत योजना
अपंग गुणवंत कामगार
पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना रा.प. महामंडळाच्या साधी व
निमआराम बसेसमध्ये प्रवासभाडयात 100 टक्के सवलत योजना
उच्च व तंत्र शिक्षण
विभाग
केंद्रशासन पुरस्कृत
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
केंद्रीय लोकसेवा
आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील
अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती योजना
गुणवान
विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.
राज्य शासनाची
दक्षिणा अधिछात्रवृत्ती
अहिंदी भाषीक
राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी हिंदी शिष्यवृत्ती.
केंद्रशासन पुरस्कृत
अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना.
राज्य शासनाची खुली
गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (वरिष्ठ महाविद्यालयीन)
राज्य शिक्षण शुल्क
प्रतिपूर्ती योजना
एकलव्य आर्थिक
सहाय्य योजना
सेंट्रल सेक्टर
शिष्यवृत्ती योजना
जवाहरलाल नेहरु
विद्यापीठ शिष्यवृत्ती
शासकीय संशोधन
अधिछात्रवृत्ती
शासकीय विद्यानिकेतन
शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची
इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या (कला,वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) राज्यातील अल्पसंख्यांक
विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना
कृषी विभाग
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
गोपीनाथ मुंडे
शेतकरी अपघात विमा योजना
बागायती रोपमळयाची
स्थापना व बळकटीकरण करणे (सर्वसाधारण) (जिल्हास्तर) (कलमे / रोपे निर्मितीसाठी
अर्थसहाय्य)
पुर्नरचित हवामान
आधारित पीकविमा योजना सन 2016-17
राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अभियान सन 2016-17
बळीराजा चेतना
अभियानर्तंगत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण(एम.बी.बी.एस.)
करीता आर्थिक मदत
विशेष घटक योजना
राकृवियो अंतर्गत
कापूस विकास योजना
राज्यातील ऊस
पिकांखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणे
राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अभियान 2015-16
राकृवियो अंतर्गत
हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे हिरवा चारा निर्मिती
केळी पिकावरील करपा
(सिगाटोका) रोग नियंत्रण कार्यक्रम
बागायती रोपमळयाची
स्थापना व बळकटीकरण करणे (आदिवासी) ( जिल्हास्तर)
राष्ट्रीय शाश्वत
शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका योजना
राकृवियो अंतर्गत
१००% अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरण
राज्याच्या कृषि
विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणाकरिता सहाय्य (आत्मा)
राष्ट्रीय शाश्वत
शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास
प्रधानमंत्री पीक विमा
योजना (PMFBY)
नारळ पिक विमा योजना
कोरडवाहू शेती
अभियान
पिकांवरील कीड रोग
सर्वेक्षण, व्यवस्थापन व सल्ला
प्रकल्प (क्रॉपसॅप)
कृषि यांत्रिकीकरण
उपअभियान
राष्ट्रीय गळीतधान्य
व तेलताड अभियान
राअसुअ अंतर्गत ऊस
विकास कार्यक्रम
बळीराजा चेतना
अभियानर्तंगत शेतकरी पाल्य(मुले/मुली) यांना स्पर्धा परीक्षेकरीता मदत
बळीराजा चेतना
अभियानर्तंगत कर्करोगग्रस्त शेतक-यांना मदत
शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम- बळीराजा चेतना अभियान
राज्य पुरस्कृत
जैविक खत उत्पादन युनिट उभारणीसाठी अर्थसहाय्य योजना
राकृवियो अंतर्गत ऊस
विकास कार्यक्रम
प्रधानमंत्री कृषि
सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना
बळीराजा चेतना
अभियानाअंतर्गत शेतक-यांच्या मृत जनावरांकरीता मदत
मनरेगाअंतर्गत
वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेतकयांच्या शेताच्या
बांधावर व पडीक शेत जमीनीवर फळझाड लागवड कार्यक्रम
राष्ट्रीय शाश्वत
शेती अभियान अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना (सेंद्रीयशेती )
राष्ट्रीय शाश्वत
शेती अभियानतर्गत मृद आरोग्य पत्रिका योजना
राअसुअ अंतर्गत
कापूस विकास योजना
जिल्हा नियोजन विकास
मंडळ पुरस्कृत पिक संरक्षण योजना (डीपीडीसी)
आदिवासी कुटुंबाच्या
परसबागेत फळझाडे व भाजीपाला पिके लागवड योजना
पडकई विकास
कार्यक्रम
नारळ विकास मंडळ
पुरस्कृत नारळ विकास योजना
मराठवाडा व
विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसायाकरिता मासळी विक्रीसाठी
फिरते वाहन उपलब्ध करून देणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर 3 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर 5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर 7.5 एच पी इलेक्ट्रीक मोटर पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर डिझेल इंजीन पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर पेट्रोस्टार्ट डिझेल इंजीन पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७५ % अनुदानावर पिव्हीसी पाइप (१० नग) पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर एच.डी.पी.ई पाईप (१० नग) पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर नॅपसॅक स्प्रे पंप(आऊट साईड चेंबर) पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर पॉवर स्प्रे पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७० % अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७५ % अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड स्प्रे पंप पुरविणे
यवतमाळ जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत ७५ % अनुदानावर ताडपत्री पुरविणे
गृहनिर्माण विभाग
प्रधानमंत्री आवास
योजना (शहरी)
महाराष्ट्र बांधकाम
कामगार आवास योजना
शालेय शिक्षण व
क्रीडा विभाग
मा. पंतप्रधान व मा.
मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या
आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत द्यावयाच्या शैक्षणिक सवलती.
पूर्व
माध्यमिक/माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती.
राष्ट्रीय आर्थिक
दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)
राष्ट्रीय भारतीय
सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्या
माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर
कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण
कनिष्ठ
महाविद्यालयातील विद्यार्थ्याना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
आदिवासी
विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
माध्यमिक शाळेतील
मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.३०००/- प्रोत्साहनपर भत्ता योजना
स्वातंत्र्य
सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती
ज्यांचे किंवा
ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,00,000 पेक्षा अधिक नाही. अशा इ.11वी व 12 वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्याना फी माफी (योजनेतर योजना)
मेट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजना
इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण योजना
आर्थिकदृष्टया
मागासवर्गीय विद्यार्थ्याना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
अध्यापक
विद्यालयामधील महिलांसाठी 30 टक्के आरक्षण व मोफत शिक्षण योजना
राजीव गांधी
विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण योजना
टंचाईग्रस्त भागातील
विदयार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतीपूर्ती योजना
प्राथमिक
शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण
संस्कृत शिक्षण
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या
सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभाग
इ. ९ वी व इ. १० वी
च्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
प्रशिक्षण योजना
राष्ट्रीय कुटुंब
लाभ योजना
राज्यातील १००
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण
देण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
इयत्ता १० वी व १२
वी च्या परिक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती
प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार
शैक्षणिक कर्ज
योजना- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य चर्मकारांसाठी
अनु जातीच्या आणि
नवबौध्द उमेदवारांना सैनिक व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण
राज्य शासनाची
मॅट्रिकपूर्व शिक्षण फी परीक्षा फी प्रतीपुर्ती योजना
मुला/मुलींसाठी
शासकीय वसतिगृह सुरू करणे
विशेष मागास
प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सवलती.
शासकीय संस्थांमधून
अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण योजना
अस्वच्छ व्यवसायात
काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती
इ. ५ वी ते १० वी
च्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
इंदिरा गांधी विधवा
अनुदान योजना
विभागीय स्तरावर
१००० विदयार्थी क्षमतेची मागासवर्गीय मुला मुलीकरीता शासकीय वसतिगृहे
इंदिरा गांधी
वृद्धापकाळ अनुदान योजना
इ.८वी ते १० वी
मध्ये शिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या मुलींना सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना.
अनुसूचित जाती व
नवबौध्द मुला मुलीसाठी विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था
माध्यमिक शाळेत शिकत
असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
सैनिकी शाळेत शिक्षण
घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना
इतर मागासवर्ग
विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
अनुसुचित जातीच्या
मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
इंदिरा गांधी
राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
विजाभज
विद्यार्थ्यांना राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती.
सैनिक शाळेतील
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना
अनुसूचित जाती व
नवबौध्द मुला मुलीकरीता तालुका स्तरावर १०० शासकीय निवासी शाळा सुरू करणे
मागेल त्याला
व्यावसायिक प्रशिक्षण योजना
विजाभज प्रवर्गाच्या
विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
शालांत परिक्षोत्तर
( मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी वाहन चालक प्रशिक्षण
योजना
मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क योजना
भारत सरकार
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना
शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थांमधून विजाभज व विमाप्र प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक
प्रशिक्षण देण्याची योजना (मागेल त्याला प्रशिक्षण).
औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
व्यावसायिक
पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना तसेच वसतिगृहाच्या
बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
औद्योगिक प्रशिक्षण
संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन योजना
विमुक्त जाती भटक्या
जमाती आश्रमशाळा योजना
श्रावणबाळ सेवा
राज्य निवृत्तीवेतन योजना
स्वयंसेवी
संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा/ कार्यशाळां मधून अपंगांचे शिक्षण व
प्रशिक्षण
शैक्षणिक कर्ज
योजना- विद्यार्थ्यांसाठी
कर्मवीर दादासाहेब
गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
राष्ट्रीय वयोश्री
योजना
वैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी व्यावसायिक पाठयक्रम असणा-या
महाविद्यालयात शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना
राजर्षि छत्रपती
शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना
व्यावसायिक
पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन
योजना
माध्यमिक शाळेत शिकत
असलेल्या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
प्रदान करणे.
राज्य शासनाची
मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रतीपुर्ती योजना
राजर्षि छत्रपती
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ. ११ वी १२ वी)
विमुक्त जाती भटक्या
जमाती विद्यार्थ्यांसाठी निवासी कनिष्ठ महाविद्यालयांची योजना
मागासवर्गीय मुला
मुलीचे शासकीय वसतिगृह योजना
अनुसूचित जाती व
नवबौद्ध घटकांतील बेरोजगार युवकांसाठी मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना
आम आदमी विमा योजना
इयत्ता ५ वी ते ७ वी
मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सावित्रीबाई फुले
शिष्यवृत्ती योजना.
साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार- व्यक्ती आणि संस्थांसाठी
पद्मश्री कर्मवीर
दादासाहेब गायकवाड पुरस्कार- व्यक्ती आणि संस्थांसाठी
संत रोहिदास
पुरस्कार- व्यक्ती आणि संस्थांसाठी
राष्ट्रपिता महात्मा
गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार- व्यक्ती आणि संस्थांसाठी
संजय गांधी निराधार
योजना
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर समाजभूषण पुरस्कार- व्यक्ती आणि संस्थांसाठी
इयत्ता १० वी च्या
परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.१२
वी मध्ये शिक्षण घेणा-या विजाभज / विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी
छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.
इतर मागासवर्ग
प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी अदा करणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना १००% अनुदानावर
पी.व्ही.सी. पाईप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना ९०% अनुदानावर
तुषार सिंचन पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना १००% अनुदानावर
एचडिपीई पाईप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना ९०% अनुदानावर सब
मर्शीबल मोटार पंप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय महिलांना ९०%
सुट्टीवर शिलाई मशीन पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीयांच्या घरावरील गवती छपरे बदलून
९० % अनुदानावर टिनपत्रे पूरविणे.
यवतमाळ जिल्ह्यातील
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता आटा चक्की करीता (3% सेस)
यवतमाळ जिल्ह्यातील
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता कांडपयंत्र करीता (3% सेस)
यवतमाळ जिल्ह्यातील
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता झेरॉक्स मशिन करीता (3% सेस)
यवतमाळ जिल्ह्यात १३
वने योजनेमधुन राबविण्यात येणार्या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर
ताडपत्री पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात
वने योजनेमधुन राबविण्यात येणार्या योजनेकरिता जंगल भागातील शेतक-याना ९० %
अनुदानावर एचडिपीई पाईप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात १३
योजनेमधुन राबविण्यात येणार्या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर पीव्हीसी
पाईप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात १३
वने योजनेमधुन राबविण्यात येणार्या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर
सबमर्शीबल मोटारपंप पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात १३
वने योजनेमधुन राबविण्यात येणार्या जंगल भागातील शेतक-याना ९० % अनुदानावर ऑईल
इंजिन पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना ९०% अनुदानावर
ताडपत्री पुरविणे.
यवतमाळ जिल्ह्यात २०
% सेस योजनेमधुन राबविण्यात येणार्या मागासवर्गीय शेतकर्यांना १००% अनुदानावर
ऑईल इंजिन पुरविणे
आदिवासी विकास विभाग
शबरी आदिवासी घरकुल
योजना
आदिवासी शेतक-यांना
विजपंप / तेलपंप पुरवठा करणे.
सुवर्ण महोत्सवी
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
एल्डरली केअर स्कील
डेव्हलपमेंट विथ प्लेसमेंट योजना
अनुसूचित जमाती व
इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ व सुधारित नियम
२०१२ (वैयक्तिक)
वन विभाग
संयुक्त वन व्यवस्थापन
समितीच्या सदस्यांना / ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस / स्वयंपाक गॅस
पुरवठा/ दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन
देण्याबाबतची योजना
वन्यप्राण्यांपासून
मनुष्य हानी, पशुधन हानी, शेतपिकांचे, फळझाडांचे नुकसान झाल्यास संबंधितांस नुकसार
भरपाई देण्याबाबत
डॉ. शामाप्रसाद
मुखर्जी जन-वन विकास योजना
सामान्य प्रशासन
विभाग
देशांतर्गत
सुरक्षासंबंधी मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक
मदत
सशस्त्र दलातील नोकर
भरतीसाठी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र
महाराष्ट्र राज्याचे
अधिवासी असलेल्या दुसऱ्या जागतिक महायुध्दातील माजी सैनिक/त्यांच्या विधवा यांना
निवृत्तीवेतन
शौर्यासाठी
पारितोषिके
छात्रपूर्व
प्रशिक्षण योजना
पॅराप्लेजिक
रिहॅबीलीटेशन सेंटर, खडकी, पुणे या चॅरिटेबल संस्थेस आर्थिक मदत देण्याबाबत.
क्वीन मेरी
तंत्रशाळेस सहाय्यक योजना
मुख्यमंत्री सहायता
निधी - वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्य
मुख्यमंत्री सुकर्मी
पुरस्कार योजना
पत्रकार सुधाकर
डोईफोडे यांच्या नावे अग्रलेखनासंदर्भात पुरस्कार
स्वच्छ महाराष्ट्र
जनजागृती पुरस्कार
सोशल मिडियातील
पत्रकारितेकरीता पुरस्कार
विधी व न्याय विभाग
धर्मादाय रुग्णालयात
/ वैद्यकीय केंद्रात निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोफत व सवलतीच्या दराने
वैद्यकीय उपचार देणेबाबत योजना.
मत्स्यव्यवसाय विभाग
मच्छिमार युवकांना
प्रशिक्षण अ) सागरी मत्स्यव्यवसाय ६ महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम
मच्छिमारांना डिझेल
तेलावरील मुल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
मासेमारी करताना
अपघाती मृत्यू झाल्यास मच्छिमारांच्या वारसांना दयावयाचे अर्थसहाय्य.
मासेमारी साधनांचे
खरेदीवर अर्थसहाय्य
राज्यातील
मच्छिमारांना अपघात गट विमा योजना
मत्स्यबीज
केंद्रांची स्थापना
मच्छिमार युवकांना
प्रशिक्षण ब) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम (लघु प्रशिक्षण
कार्यक्रम)
बिगर यांत्रिक
नौकांना बाह्य व आंतर इंजिन बसविण्यासाठी अर्थसहाय्य - ५० टक्के केंद्र पुरस्कृत
मच्छिमारांचे
विकासाकरिता डिझेल तेलावर सवलत - १०० टक्के केंद्र पुरस्कृत
मच्छिमार नौकांचे
यांत्रिकीकरण व नौकांमध्ये सुधारणा - रा.स.वि.नि. पुरस्कृत योजना
सहकार विभाग
अनुसुचित
जाती/नवबौध्द शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे भाग खरेदीसाठी अनुदान व
बिनव्याजी कर्ज योजना
छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७
उर्जा विभाग
आदिवासी
उपाययोजनेअंतर्गत विद्युत विकास क्षेत्रामधे महावितरण कंपनी मार्फत राबविणाऱ्या
योजना. (जिल्हास्तर)
प्रधानमंत्री उज्वला
योजना (PMUY)
राज्यातील
यंत्रमागधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
विदर्भ व मराठवाडा
विभागातील कृषीपंपाचा अनुशेष दूर करण्याबाबत महावितरण कंपनीस सहाय्यक अनुदान.
प्रधानमंत्री सहज
बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना)
राज्यातील
कृषीपंपधारक ग्राहकांना वीज दरात सवलत
विशेष घटक
योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीला पदपथावरील दिव्यासाठी, विहिरीवरील कृषीपंप व घरगुती दिवे लावण्यासाठी
वीज जोडणी
महिला व बाल विकास
विभाग
सुकन्या समृद्धी
योजना
मनोधैर्य योजना
प्रधानमंत्री
मातृत्व वंदना योजना (PMMVY)
माझी कन्या
भाग्यश्री सुधारित योजना
शुभमंगल सामुहिक /
नोंदणीकृत विवाह योजना
पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर पुरस्कार
यवतमाळ जिल्ह्याच्या
ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देणे अंतर्गत ब्युटी
पार्लरचे प्रशिक्षण देणे
यवतमाळ जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना MS- CIT प्रशिक्षण देणे
यवतमाळ जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील ५ ते १२ वी मध्ये मुलींना मोफत लेडीज सायकल DBT व्दारे देणे
यवतमाळ जिल्ह्याच्या
ग्रामिण भागातील मुलींना व महिलांना ९०% अनुदानावर शिलाई मशिन योजनेचा लाभ DBT
व्दारे देणे
कौशल्य विकास व
उद्योजकता विभाग
आदिवासी
उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण केंद्र.
अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
करिअर विषयक साहित्य,
अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
रोजगार मेळावे योजना
व्यवसाय मार्गदर्शन
व समुपदेशन केंद्र योजना
रोजगार प्रोत्साहन
कार्यक्रम
शिल्प कारागीर
प्रशिक्षण योजना
अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ- गट प्रकल्प कर्ज योजना
केंद्र शासनाची
शिकाऊ उमेदवारी योजना
प्रमोद महाजन कौशल्य
व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)
अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ- गट कर्ज व्याज परतावा योजना
बेरोजगारांच्या
सहकारी सेवा संस्था
महसूल विभाग
अंगावर वीज पडणे'
या राज्याच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत
पावलेल्या अथवा अपंग झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत
सन २०१८-१९ च्या
खरीप हंगाम trigger-२ लागू झालेल्या आणि
दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांसाठी विविध उपाययोजना आणि सवलती
ग्राम विकास विभाग
दीनदयाल उपाध्याय
ग्रामीण कौशल्य योजना
प्रधानमंत्री
ग्रामीण आवास योजना -सगळ्यांसाठी घरे (ग्रामीण) (PMAY-G)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
औरंगाबाद विभागातील
व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी)
शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना
अन्नपूर्णा योजना
राष्ट्रीय
अन्नसुरक्षा अधिनियम, 2013
वित्त विभाग
प्रधानमंत्री
सुरक्षा विमा योजना (PMSBY)
प्रधानमंत्री जीवन
ज्योती विमा योजना (PMJJBY)
अटल पेंशन योजना (APY)
प्रधानमंत्री जन धन
योजना (PMJDY)
मुद्रा बँक योजना
राज्य शासकीय /
निमशासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना
मृद व जलसंधारण
विभाग
गतिमान पाणलोट विकास
कार्यक्रम
उद्योग विभाग
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती ) उद्योजकांसाठी विशेष
सामुहिक प्रोत्साहन योजना.
भा. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर एससी / एसटी उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत निवासी
व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
नियोजन विभाग
महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र (केंद्र पुरस्कृत)
मागेल त्याला शेततळे
रोजगार हमी योजनेशी
निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम
मुख्यमंत्री फेलोशिप
कार्यक्रम
महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, महाराष्ट्र (मनरेगा)
पर्यटन विभाग
राज्यातील
लोककलावंतांना अनुदान पॅकेज योजना
महाराष्ट्र
राज्यातील वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना
भारतरत्न पं. भीमसेन
जोशी युवा शिष्यवृत्ती योजना
पाणीपुरवठा व
स्वच्छता विभाग
स्वच्छ भारत मिशन
(ग्रामीण)
सार्वजनिक आरोग्य
विभाग
महात्मा ज्योतिबा
फुले जीवनदायी आरोग्य योजना
आयुषमान भारत-
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
डॉ. आनंदीबाई जोशी
गौरव पुरस्कार योजना
कामगार विभाग
महाराष्ट्र इमारत व
इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र कामगारांना सुरक्षा संच
महाराष्ट्र इमारत व
इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी ओळखपत्र
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत स्त्री कामगारास किंवा नोंदीत पुरुष कामगाराच्या पत्नीस प्रसूतीसाठी
अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत स्त्री कामगारास किंवा नोंदीत पुरुष कामगाराच्या पत्नीस प्रसूतीसाठी
अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहनात्मक
शैक्षणिक अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य
एका मुलीच्या
जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या इमारत व इतर बांधकाम नोंदीत
कामगाराच्या मुलीच्या नावे मुदत बंद ठेव
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी त्याच्या नामनिर्देशित वारसास
अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नी अथवा विधुर स्त्रीस अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास एकरकमी
अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवी शिक्षणासाठी
शैक्षणिक अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना अथवा पत्नीस वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी
शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना शासनमान्य पदविका आणि पदव्युत्तर पदविकेसाठी
शैक्षणिक अर्थसहाय्य
विमा संरक्षण
नसलेल्या इमारत व इतर बांधकाम नोंदीत कामगारास ७५% किंवा त्याहून जास्त अपंगत्व
आल्यास अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगार व त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ वैद्यकीय सहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना MS-CIT कोर्स च्या भरलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांना त्यांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी आर्थिक
अनुदान
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच वाटप
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांना व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारांसाठी अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त / आवश्यक अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास आर्थिक सहाय्य
इमारत व इतर बांधकाम
नोंदीत कामगारांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना
मानव संसाधन विकास
विभाग
कस्तुरबा गांधी
बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)
पणन विभाग
रेशीम शेती व उद्योग
विकास प्रचार व प्रसिद्धी योजना (महारेशीम अभियान)
नगर विकास विभाग
महानगरपालिका
क्षेत्रामध्ये केवळ महिलासाठी “तेजस्विनी बस” योजना
नोंदणी केल्यानंतरच्या प्रक्रियेचे खालील प्रमाणे विविध टप्पे-
१. महालाभार्थी पोर्टल वर लॉगीन करणे: ‘महालाभार्थी’ पोर्टलवर ‘नागरिकांचे लॉगीन’ यावर क्लिक करून सर्वप्रथम लॉगीन करावे. यावेळी नोंदणीच्या वेळी मिळालेल्या लॉगीन आयडी आणि पासवर्ड चा वापर करावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर काळजी करू नका तो पुन्हा मिळविण्याची सुविधा सुद्धा तेथे उपलब्ध आहे.
२. स्वत:ची प्राथमिक माहिती भरणे: यशस्वीरीत्या लॉगीन केल्यानंतर मुख्य पानावर उजव्या बाजूला ‘स्वत:ची माहिती भरा’ असे दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आपल्यासमोर ‘प्राथमिक माहिती’ चे पेज येईल. शासनाच्या बहुतांश योजनांची पात्रता ज्या माहितीवरून ठरते अशी माहिती येथे विचारली आहे. नागरिकांनी ही माहिती काळजीपूर्वक भरावी. येथे नागरिक आपला आधार क्रमांक भरू शकतात जो की ऐच्छिक असेल.
३. शैक्षणिक माहिती भरणे: त्यानंतर नागरिकांनी स्वत: च्या शिक्षणासंदर्भात माहिती येथे भरायची आहे. नागरिक जर विद्यार्थी असेल तर संपूर्ण शैक्षणिक माहिती भरली जाईल याची काळजी घ्यावी कारण त्यावरूनच बऱ्याच शैक्षणिक योजनांची पात्रता ठरणार आहे.
४. विविध सरकारी योजनातून अनेक प्रकारचे जे लाभ मिळतात ते चित्ररूप पद्धतीने तसेच लिखित स्वरुपात बघणे: नागरिकांना पोर्टलवर ‘ माझ्या गरजा / मी कोण’ असे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही पर्याय चित्ररूपात दाखविले जातील, जसे की, घर, अर्थसहाय्य, खते, बियाणे, रोजगार, शेततळे, विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण इत्यादि गरजा दिसतील. किंवा 'भूमिका निवडा' या बटणावर क्लिक करून नागरिक आपण कोण आहोत हे निवडू शकतील जसे की, शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, इत्यादी. येथे नागरिक एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकतात. नागरिकांनी निवडलेल्या गरजा अथवा भूमिकांच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांमध्ये मिळणाऱ्या लाभांची माहिती चित्रमय स्वरूपात पोर्टलवर चित्ररुपात दिसेल.
५. इच्छुक असलेल्या लाभांसाठी पात्रता जाणून घेणे: पोर्टलवर ‘माझे लाभ’ यावर क्लिक केले असता निवडलेल्या भूमिकांनुसार विविध योजना त्यांच्या विभागाप्रमाणे आपल्या समोर येतील. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला काय लाभ मिळू शकतील हे लिहिलेले आहे. त्याच्या चित्रावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित योजनेचा थोडक्यात तपशील मिळेल. येथे आपल्याला योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील अर्ज तसेच अधिक माहितीसाठी शासकीय निर्णय डाऊनलोड करण्याचीही सुविधा आहे, विविध विभागांकडून ते जसजसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे येथे वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. ज्या योजनांच्या लाभांसाठी आपण इच्छुक असाल त्या लाभांखाली आपणास टिक (✔) करावी लागेल. ज्यावर आपण अशी (✘) खूण केली असेल त्या लाभांसाठी आपण इच्छुक नाही असे समजले जाईल व त्या लाभांशी निगडीत योजना आपणास पुढील टप्प्यामध्ये दाखवण्यात येणार नाहीत. योजनांचे लाभ शोधण्यासाठी येथे डाव्या बाजूला विशेष सोय आहे, तेथून आपण विभागाप्रमाणे किंवा लाभाच्या प्रकारानुसार योजना पाहू शकता.
६. इच्छुक लाभांकरिता संभाव्य पात्रता ठरविणे: योजनांसाठीची आपली संभाव्य पात्रता ठरविण्यासाठी पोर्टलवर गरजेनुसार अजून थोडी माहिती भरावी लागते. परंतु जर आपण संपूर्ण माहिती सुरवातीलाच व्यवस्थित भरली असेल तर याची फारशी गरज पडत नाही. त्यानंतर पोर्टल आपणासाठी संभाव्य अशा पात्र योजनांची निवड करेल. आवश्यक तेथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, ज्याची आपणास होय किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायची आहेत.
७. संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांची सर्व माहिती बघणे: सर्व माहिती भरल्यावर व आवश्यक तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपणास संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजना, त्यामध्ये मिळणारे लाभ, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्या योजनांसाठी कुठे संपर्क करायचा इत्यादी माहिती संक्षिप्त स्वरुपात आपणास मिळेल.
८. मिळालेल्या माहितीची प्रिंट-आउट घेणे: शेवटी नागरिकास संभाव्य पात्रता सिद्ध झालेल्या योजनांच्या व्यक्तिअनुरुप स्वरूपातील माहितीची संक्षिप्त प्रिंट-आउट मिळेल. त्यामध्ये योजनेचे नाव, त्यामध्ये मिळणारे लाभ, ते लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे आणि कुणाला भेटावे याचा तपशील असेल. या प्रिंट-आउटचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांचे नागरिकाच्या नावाचा उल्लेख असलेले एक पत्र दिलेले आहे. नागरिक संभाव्य पात्र असलेल्या योजनांसाठी जेव्हा शासकीय विभागांना अर्ज करतील, तेव्हा ते माननीय मुख्यमंत्री यांचे हे पत्र सोबत जोडू शकतात. याला एक संदर्भ क्रमांक दिलेला असून त्याच्या सहाय्याने आपल्याला संबंधित योजनांचे त्या त्या विभागांकडून लाभ मिळविण्यात काही अडचण आल्यास पाठपुरावा करण्यास मदत होईल.
९.संभाव्य पात्र ठरलेल्या योजनांसाठी अर्ज करणे: आपण ज्या योजनांसाठी संभाव्य पात्र ठरलेले आहात अशा संबंधित योजनांच्या खाली आपणास ‘अर्ज करा’ असा पर्याय असेल, त्यावर क्लिक केल्यास, नागरिकांनी वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे महालाभार्थी वेबपोर्टल स्वत: नागरिकांचा विहित नमुन्यातील अर्ज भरून देईल. अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये आवश्यक असलेल्या ज्या माहितीची नोंद वेबपोर्टलवर नाही ती माहिती नागरिक तेथेच ऑनलाईन भरतील. अशा रीतीने नागरिकांचा विहित नमुन्यातील भरलेला अर्ज संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे जमा होईल. अर्ज केल्यानंतर नागरिकांना संबंधित योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेबपोर्टलवरच अपलोड करण्याची सोय केलेली आहे. यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांना योजनेचे लाभ मिळवून देणे सोपे जाईल. सध्या ज्या योजनांसाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे अशा निवडक योजनांसाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या योजनांसाठी स्वतंत्र वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो अशा योजनांसाठी ‘अर्ज करा’ वर क्लिक केल्यास आपणास संबंधित वेबसाईटशी जोडून दिले जाईल.
https://www.mahalabharthi.in/mr- महालाभार्थी - वेब पोर्टल विषयी
- महालाभार्थी – नोंदणी आणि लॉगीन कसे करावे?
- महालाभार्थी – प्राथमिक माहिती भरणे
- महालाभार्थी – शैक्षणिक माहिती भरणे
- महालाभार्थी – आपली भूमिका आणि त्यानुसार योजनांच्या लाभांची निवड
- महालाभार्थी – पात्रता पडताळणीसाठी आवश्यक माहिती भरणे
- महालाभार्थी – आपण संभाव्य पात्र असलेल्या योजनांचे लाभ
- महालाभार्थी – अतिरिक्त माहिती भरणे आणि अद्ययावत करणे
- महालाभार्थी – पासवर्ड पुन्हा मिळविणे
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.