संभाव्य छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची याचिकाकर्त्याची मागणी
VVPAT व्हीव्हीपीएटी मशिनमधील दोष, उणिवा आणि संभाव्य छेडछाडीच्या घटना कशाप्रकारे होऊ शकतात याबाबत जनहीत याचिकाकर्ते प्रशांत यादव यांचा व्हिडीओ -
EVM इव्हीएम मशीनवर वारंवार शंका उपस्थित होत असल्याने मतदानयंत्रावरील विश्वासाहार्य निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने VVPAT वोटर वेरीफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्र आणले मात्र VVPAT यंत्रच सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. VVPAT यंत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मतदान प्रक्रीयेत सहज छेडछाडीच्या घटना होऊ शकतात हे तांत्रिकदृष्ट्या प्रश्न उपस्थित करूनही निवडणूक आयोग उपाययोजना करीत नाही, हतबल झालेल्या मतदाराने अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. VVPAT यंत्रातच बेबनाव होऊ शकतो आणि संभाव्य छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची याचिकाकर्त्यानी मागणी करणारी जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकाकर्त्याच्या मागणीवर म्हणणे सादर करण्यासाठी निवडणुक आयोगाला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. येत्या शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. EVM इव्हीएम मशीन व VVPAT वोटर वेरीफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) यंत्र प्रक्रियेवर शंका घेण्यास वाव राहणार नाही तर मग निवडणुक आयोगाकडून याचिकाकर्त्याच्या शंका उपस्थित करणाऱ्या मागणी निवेदनाला कोणताही प्रतिसाद न देता केराची टोपली का दाखवली आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशांत उदय यादव रा.चारकोप, कांदिवली (प.) मुंबई यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली असून पहिली सुनावणी नुकतीच 1 फेब्रुवारीला झाली. मतदान निवडणूक प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या VVPAT व्हीव्हीपीएटी (वोटर वेरीफिएबल पेपर ओडिट ट्रायल) मशिनमधील दोष, उणिवा आणि संभाव्य छेडछाडीच्या घटना कशाप्रकारे होऊ शकतात हे याचिकाकर्ते प्रशांत यादव यांनी न्यायालयाच्या तांत्रिकदृष्ट्या निदर्शनास आणून दिल्या आहेत सदरील उपस्थित केलेले म्हणणे सुनावणी दरम्यान न्यायालयाने मान्य केले असून याबाबत म्हणणे मांडण्यासाठी भारतीय निवडणुक आयोगास नोटीस बजावण्यात आलेली आहे. निर्दोषपणे मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी मतदान यंत्र सुरक्षित असणे आवश्यक आहे. याचिकाकर्ताने मुख्य न्यायाधीश नरेश पाटिल आणि न्यायमूर्ति एन एम जामदार यांच्या खंडपीठाच्या यंत्रातील दोष व संभाव्य छेडछाड कशाप्रकारे होऊ शकते हे निदर्शनास आणून दिले. 1.VVPAT व्हीव्हीपीएटी निर्माण करताना यंत्रात सॉफ्टवेयर मध्ये गडबड होऊ शकते. 2. संबधित निवडणूक अधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष चिन्ह सॉफ्टवेयर मध्ये सेटिंग करताना गडबड होऊ शकते. या सह अनेक अशा स्वरुपात तांत्रिकदृष्ट्या शंका याचिकाकर्ते यादव यांनी उपस्थित केल्या आहेत. शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी होणारया सुनावणी दरम्यान संभाव्य छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात याव्यात असे देखील याचिकाकर्त्याला न्यायालयाने सांगितले आहे. आधीच EVM इव्हीएम मशीनवर वारंवार शंका उपस्थित होऊन अविश्वासहार्य वातावरण असून आता VVPAT व्हीव्हीपीएटी मशीनवर शंका उपस्थित केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.