Tuesday 5 February 2019

parliament election 2019 लोकसभा निवडणुक प्रचाराची धूम;26 फेब्रुवारीला भाजपची दिवाळी! लाभार्थींच्या घरात दिवे लावणार तर भाजपच्या 'चाणक्य'नीतीवर मात करण्यासाठी शिवसेना प्रशांत किशोर यांची मदत घेणार

'मेरा परिवार भाजपा परिवार' अभियान ; कार्यकर्त्यांच्या घरावर स्टिकर आणि छतावर भाजपाचा झेंडा फडकावणार


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची जय्यत तयारी केली असून प्रचारास धुमधडाक्यात प्रारंभ करण्यासाठी 'मेरा परिवार भाजपा परिवार' अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपा 26 फेब्रुवारीला देशभरात दिवाळी साजरी करणार आहे. भाजपाकडून कमल ज्योती संकल्प उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या नागरीकांच्या घरात दिवे लावले जाणार आहेत. 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत अभियानाद्वारे भाजपालाच मतदान करा, असे आवाहनही यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक घराला भाजपाशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमाला कमल ज्योती संकल्प उत्सव असं नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या घरांमध्ये दिवे लावण्यात येतील. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना, जन-धन योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भाजपा 26 फेब्रुवारीला दिवे लावणार आहे. येत्या निवडणुकीत भाजपालाच मतदान करा, असं आवाहनही यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केले जाणार आहे.  याशिवाय भाजपा 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 'मेरा परिवार भाजपा परिवार' अभियान राबवणार आहे. या दरम्यान भाजपाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर भाजपाचे स्टिकर लावणार आहेत. याशिवाय घराच्या छतावर भाजपाचा झेंडाही लावण्यात येईल. 2 मार्चला दिल्ली भाजपाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 500 ते 1000 कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत असे वृत्त आहे. भाजपने निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे. 11 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत राज्यभरात कार्यक्रम होणार आहेत. राज्यात मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यासाठी प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे. दीनदयाळ उपाध्याय स्मृती दिनानिमित्त 'समर्पण दिवस'च्या माध्यमातून प्रचार मोहिम राबविण्यात येणार आहे.

भाजपची प्रचार रणनीती ?
11 फेब्रुवारी - 'समर्पण दिवस'
नमो अॅपच्या माध्यमातून भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी ते बूथ लेव्हल कार्यकर्त्यांपर्यंत पक्षासाठी किमान 50 रुपये आर्थिक योगदान करणे आवश्यक असेल. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः समर्पण करुन या मोहिमेचा शुभारंभ करतील. आर्थिक समर्पण करुन सर्वांनी याचं ट्वीट करायचं आहे.
12 फेब्रुवारी ते 2 मार्च - 'मेरा परिवार, भाजप परिवार'
भाजपच्या प्रत्येक सदस्याने घरावर भाजपचा झेंडा आणि स्टिकर लावायचा आहे. हॅशटॅग #MeraParivarBhajapaParivar या नावाने फेसबुक लाईव्ह आणि ट्वीट करायचं आहे. 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री भाजप कार्यालयावर आणि प्रदेशाध्यक्ष औरंगाबाद येथे झेंडा फडकावून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार.
26 फेब्रुवारी - 'कमल ज्योती संपर्क'
भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आणि सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरासमोर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत दीपप्रज्वलन करायचे आहे.
28 फेब्रुवारी - 'संघटन संवाद'
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील बूथ प्रमुखांशी नमो अॅपच्या माध्यमातून थेट संवाद साधणार.
3 मार्च - 'बाईक रॅली'
#BJPVijaySankalpRally या नावाने मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन. एकाच वेळी प्रत्येक बूथमधून किमान 5 बाईक घेऊन निघणार. भाजपचे झेंडे आणि मोदींचा मास्क घालून शहरात 30 ते 60 किमी तर ग्रामीण भागात 150 किमी रॅली काढली जाईल.
पुढील महिनाभर शासकीय जिल्हास्थानी बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी प्रमुख वक्त्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत समाजातील विविध घटकांशी संवाद साधतील.

भाजपच्या 'चाणक्य'नीतीवर मात करण्यासाठी शिवसेना प्रशांत किशोर यांची मदत घेणार


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'मातोश्री'वर घेण्यात आली. खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, हेमंत गोडसे, गजानन कीर्तीकरांसह अन्य खासदारही उपस्थित होते.  या बैठकीत शिवसेना भाजपा युतीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. युती झाली तर युतीच्या जागा वाटपाचे सूत्र २५-२३ असे समोर आले आहे. मात्र युती करण्याच्या मूडमध्ये सेना नेते नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ तर शिवसेनेने २२ जागांवर आपापले उमेदवार उभे केले होते. यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये 'छोटा भाऊ' कोण? आणि 'मोठा भाऊ' कोण? याबद्दल चर्चा रंगली होती. प्रशांत किशोर यांच्याकडे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा व रणनीतीवर बैठकीत खल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ही आक्रमक रणनीती आखल्याने युतीचे काय होणार, हा प्रश्न कायम आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर घवघवीत यश मिळवून दिले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश करत उपाध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र याबाबत थेट काही सांगण्यास नकार दिला. शिवसेना ही बाळासाहेबांच्या रणनीतीवर चालते आणि युतीसाठी शिवसेनेला कुणाही मध्यस्थाची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, असं असेल तर शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अचानक प्रशांत किशोर यांची गरज का पडली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.