भुगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०१९
सौ.निकिता सणस भुगावच्या सरपंचपदी बिनविरोध
भुगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी निवडून द्यावयाच्या सरपंच पदासह १४ जागांच्या व्यतिरिक्त ऊर्वरित उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र माघार घेतल्याने सर्व १३ सदस्य व सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झालेली आहे. प्रथमच थेट जनतेतून महीला सर्वसाधारण करीता राखीव असलेल्या भुगावच्या सरपंचपदी सौ.निकिता सणस यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच ५ वॉर्ड/प्रभागांमधून एकूण १३ सदस्यांची निवड देखील बिनविरोध करण्यात आलेली आहे.
बाह्य स्थलांतरितांच्या आक्रमणामुळे गावपण दिवसेंदिवस हिरावत जात असून मूळ गावकऱ्यांची जमिन विक्रीतील फसगत याचे वीरागत चित्रण करणा-या विचाराच्या मुळशी पॅटर्नला थारा न देण्याचा अभिनव निर्णय भुगाव ग्रामस्थांनी घेउन स्थलांतरितांच्या विरोधात गाव एकवटले आणि भुगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध केली. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय बुजुर्ग जेष्ठांनी घेऊन नव्या पिढीला विश्वासात घेतले. ग्रामस्थांनी सर्व घटकांना सामावून बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केली. त्यामुळे भुगाव मधून जनतेतून थेट सरपंचपदी प्रथमच महिलेला बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळाला आहे. महीला सर्वसाधारण करीता राखीव असलेल्या भुगावच्या सरपंचपदी सौ.निकिता सणस यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तसेच ५ वॉर्ड/प्रभागांमधून एकूण १३ सदस्यांची निवड देखील बिनविरोध करण्यात आलेली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भूगावामध्ये पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनल व ग्रामविकास विकास पॅनल अशा दोन पॅनलद्वारे प्रारंभी निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत इच्छूकांनी दिले होते. परंतु निवडणूकीतील अवाढव्य खर्च टाळण्यासाठी तसेच निवडणूकीत परस्परविरोधी मतप्रदर्शन करून पार्ट्यांमध्ये हात धुवून घेणारे आणि नाहक भांडणतंटा निर्माण करून वादविवादाला प्रोत्साहन करणाऱ्या दृष्ट प्रवृतींना विरोध करण्यासाठी बुजुर्ग जेष्ठांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा अभिनव निर्णय घेतला. तसेच भुगाव परिसरात मोठ्याप्रमाणात वसाहत वाढत असून मोठ्या गृहप्रकल्प झाले आहेत त्यामध्ये स्थलांतरितांचे प्रमाण जास्त आहे. निवडणुकीत स्थलांतरितांवर नाहक खर्च कशासाठी करावा तसेच आपले गावपण व ग्रामस्थांचे राजकीय महत्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व गावकरी एकवटून हा निर्णय घेतला असल्याचे समजते. बिनविरोध निवडीमुळे हात ओले करणारांचा मात्र हिरमुड झालेला आहे. भुगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करणेची मुदत 4 ते 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत होती तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 11 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली. उमेदवारी मागे घेण्याची आज अखेरची दिनांक 13 फेब्रुवारी 2019 होती. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडून द्यावयाच्या १३ जागांच्या व्यतिरिक्त ऊर्वरित उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र माघार घेतल्याने मतदान होणार नाही त्यामुळे बिनविरोध निवड झालेली आहे. सदरील बिविरोध निवडीचे निकालाची राजपत्रात प्रसिद्धी 27 फेब्रुवारी 2019 पर्यंत करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत भुगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-

भुगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०१९
ग्रामपंचायत भुगावच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-
वॉर्ड क्र.1


वॉर्ड क्र.2



वॉर्ड क्र.3



वॉर्ड क्र.4



वॉर्ड क्र.5


=======================================
भुगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०१९
ग्रामपंचायत भुगावच्या सरपंचपद निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-
सौ.मंगल सोपान फाळके (सर्वसाधारण महीला)सौ.वैशाली मनोहर सणस (सर्वसाधारण महीला)
सौ.सुवर्णा संजय चोंधे (सर्वसाधारण महीला)
सौ.मनीषा प्रदीप शेडगे (सर्वसाधारण महीला)
सौ.चंदा सुभाष सणस (सर्वसाधारण महीला)
ग्रामपंचायत भुगावच्या सदस्यपद निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-
वॉर्ड क्र.1
जितेंद्र जमनादास इंगवले (ओबीसी)सौ.शिल्पा रामदास चोंधे (सर्वसाधारण)
हरिभाऊ सुरेश शेडगे (ओबीसी)
सौ.वैशाली मनोहर सणस (सर्वसाधारण)
कुमार बाळासाहेब शेडगे (ओबीसी)
वॉर्ड क्र.2
विकास बाजीराव मिरगे (सर्वसाधारण)सौ.दिपाली ज्ञानेश्वर गावडे (सर्वसाधारण)
सौ.सारीका सचिन तांगडे (सर्वसाधारण)
हनुमंत बबन सणस (सर्वसाधारण)
सौ.चंदा सुभाष सणस (ओबीसी)
वॉर्ड क्र.3
अमर अंकुश शेडगे (ओबीसी)सौ.नीलम निलेश गावडे (सर्वसाधारण)
सौ.सुमन दिलीप सुर्वे (सर्वसाधारण)
कालिदास विठ्ठल शेडगे (ओबीसी)
अभिजित अंकुश शेडगे (ओबीसी)
प्रशांत प्रकाश शेडगे (ओबीसी)
सौ.अर्चना रोहीदास सुर्वे (सर्वसाधारण)
सौ.मनीषा प्रदीप शेडगे (सर्वसाधारण)
वॉर्ड क्र.4
संकेत मधुकर कांबळे (एससी)बाळासाहेब लहू शेडगे (सर्वसाधारण)
सुमन दिलीप सुर्वे (सर्वसाधारण)
प्रशांत प्रकाश शेडगे (सर्वसाधारण)
राकेश हिरामण कांबळे (एससी)
कैलास बबन कांबळे (एससी)
स्वाती दिनेश साळुंके (सर्वसाधारण)
पार्वती एकनाथ शेडगे (सर्वसाधारण)
सोनाली बाळासो शेडगे (सर्वसाधारण)
शीला दिपक करंजावणे (सर्वसाधारण)
नीलम निलेश गावडे (सर्वसाधारण)
वॉर्ड क्र.5
योगेश वसंत चोंधे (सर्वसाधारण)हर्षा गणेश चोंधे (ओबीसी)
विक्रम गुलाब चोंधे (सर्वसाधारण)
प्रदीप निवृत्ती चोंधे (सर्वसाधारण)
सुवर्णा संजय चोंधे (ओबीसी)
चंद्रकांत बबन चोंधे (सर्वसाधारण)
सतीश बबन चोंधे (सर्वसाधारण)
नितीन विश्वनाथ चोंधे (सर्वसाधारण)
सुनिता विठ्ठल चोंधे (ओबीसी)
विठ्ठल शिवराम चोंधे (सर्वसाधारण)
--------------------------------------------------------------------
पुणे जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींसह राज्यातील २६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून २४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक असलेल्या पुणे विभागातील ग्रामपंचायतींची संख्या ७२ असून त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. माहे मार्च 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 264 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला होता.
पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक असलेल्या २२ ग्रामपंचायत तालुका निहाय गावे पुढीलप्रमाणे-
निवडणूक कार्यक्रम







POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\================================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.