Saturday 2 February 2019

#voter list 2019 pune पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत वाढ ; हडपसर विधानसभा अग्रेसर; बारामती लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य तरूण मतदारांवर


शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार

पिंपरी विधानसभा मतदारसंघात 41 हजार मतदारांची घट


पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघांतील मतदारांची संख्या वाढली आहे. आता एकूण मतदारांची संख्या 73 लाख 69 हजार 141 झाली आहे. सार्वत्रिक निवडणुक 2014 मध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील मतदारसंख्या 69 लाख 37 हजार 245 होती. त्यामध्ये 4 लाख 91 हजार 346 मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवमतदार व स्थलांतरीत मतदानामुळे एकूण मतदारसंख्येत वाढ झाली असून या वाढलेल्या मतदारसंख्येमुळे लोकप्रतिनिधी धास्तावलेले आहेत. शहर भागातून उपनगरात स्थलांतरीत होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असून उपनगरातील विशेषत: हडपसर, कोथरूड, मावळ, पुरंदर, शिरूर, भोसरी, खडकवासला या मतदारसंघातील मतदारसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. त्यामध्ये सर्वाधिक मतदार संख्या हडपसर विधानसभा मतदार संघात वाढलेली असून ती 49 हजार 284 झाली आहे. तर सर्वाधिक कमी वाढ 5 हजार 573 पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ चिंचवड विधानसभा आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांच्या संख्येत घट झालेली आहे. या मतदारसंघात 41 हजार 92 इतकी घट झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे कमी करण्यात आल्याची राज्यभरातील ही पहिली घटना मानली जात आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील मतदारसंख्येत देखील घट झालेली दिसून येते. जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने वेळोवेळी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे लाखोंच्या संख्येने मतदार वाढले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दुबार आणि मयत नावे वगळून  नवीन यादी तयार करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, निवडणूक आयोग यांच्यातर्फे नवमतदारांसाठी नावनोंदणी अभियान राबविण्यात आले होते. नवीन मतदार व स्थलांतरीत मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक राजकीय गणितांवर निश्चित परिणाम होणार असून ते आगामी काळात दिसून येतीलच. पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये देखील तुलनेने मतदारसंख्येत वाढ झालेली दिसून येते. बारामती लोकसभा मतदारसंघात 2 लाख 65 हजार 854 मतदार संख्येत वाढ झाली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणूक 2014 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या 18 लाख 13 हजार 553 होती तर नुकतीच जाहिर केलेली अंतिम मतदारसंख्या 20 लाख 79 हजार 407 झालेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नव्याने 2 लाख 65 हजार 854 मतदारसंख्येत वाढ झालेली आहे. सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता ही अंतिम मतदारसंख्या निवडणूक आयोगाकडून गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या 18 लाख 35 हजार 835 होती तर नुकतीच जाहिर केलेली अंतिम मतदारसंख्या 20 लाख 25 हजार 645 झालेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात नव्याने 1 लाख 89 हजार 810 मतदारसंख्येत वाढ झालेली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या 18 लाख 24 हजार 112 होती तर नुकतीच जाहिर केलेली अंतिम मतदारसंख्या 21 लाख 12 हजार 782 झालेली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात नव्याने 2 लाख 88 हजार 670 मतदारसंख्येत वाढ झालेली आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक शिरूर लोकसभा मतदारसंघात नवमतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम दिसून येईल.
Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.