Friday 22 February 2019

maval lok sabha election 2019 होर्डिंग्जच्या माध्यमातून आजोबांना नातवाचे आर्जव! साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार स्पष्ट करूनही पार्थ पवार निवडणूक लढविण्यावर ठाम!



"मी नाही तर कोणीच नाही" भाजप पदाधिकारी आमदाराचा हेका! 

वारंवार स्पष्ट करूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हार मानण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत 4 वेळा स्पष्ट केले आहे की, पार्थ पवार व रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. तरीही पार्थ पवार यांना कसा अनुकूल मतदार संघ आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न अनेकदा होत आहे. नातू पार्थ पवार आपले आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होर्डिंग्जच्या माध्यमातून आर्जव करीत आहेत की, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! 
"मी नाही तर कोणीच नाही" भाजप पदाधिकारी आमदाराचा हेका!
"मी नाही तर कोणीच नाही" असा विचारांची मनाशी गाठ बांधलेले भाजप आमदार पराभवाचे उट्‌टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार नसेल तर येथील दुसरे कोणीही स्थानिक उमेदवार नसावेत, माझ्याशिवाय कोणीही खासदार या भागातील होऊ नये असा विचार पक्का करून विरोधासाठी काय पण करण्याची इर्षा या भाजप पदाधिकारी आमदाराने बाळगली असून शिवसेनेचे विद्यमान खासदार पुन्हा उमेदवार असतील तर बाहेरील उमेदवाराला मदत करून पराभवाचे उट्‌टे काढण्याचा चंग बांधला आहे. बाहेरील उमेदवार दुसरा तिसरा कोणीही नसून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांचे नातू आहेत. कारण पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील तर अंतर्गत मदतीचे आश्वासन दिले असल्याचा दावा स्थानिक युवा कार्यकर्ते करीत आहेत. भाजप-सेना युती झाल्यामुळे भाजप इच्छूक उमेदवाराच्या अशा मावळल्या असून मुख्यमंत्री यांना नगरसेवकांच्या माध्यमातून भाजपला मतदारसंघ कसा अनुकूल आहे हे निवेदनाद्वारे सांगूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने आता आशा सोडावी लागली आहे. त्यामुळे "मी नाही तर कोणीच नाही" असा विचारांची मनाशी गाठ बांधलेले भाजप आमदार पराभवाचे उट्‌टे काढण्याच्या मनस्थितीत आहेत. या परिस्थितीचा लाभ उठवण्याची तयारी त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. वारंवार स्पष्ट करूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हार मानण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत 4 वेळा स्पष्ट केले आहे की, पार्थ पवार व रोहित पवार लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. तरीही पार्थ पवार यांना कसा अनुकूल मतदार संघ आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न अनेकदा होत आहे. नातू पार्थ पवार आपले आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना होर्डिंग्जच्या माध्यमातून आर्जव करीत आहेत की, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! 
मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा चंग पार्थ पवार यांनी बांधला आहे. मुंबईतील एका कंपनीला जाहिरात व अनुषंगिक काम करण्यासाठी नियुक्त केलेले आहे. गेली काही दिवस त्यांचे राजकीय प्रमोशन केले जात आहे. नुकत्याच लोणी काळभोर येथील कार्यक्रमात अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यापैकी कुणीही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट केले होते. लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने विश्व राजबाग येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 19) पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने लोकसभा निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पवार यांनी अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यापैकी कोणीही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगून स्पष्ट केले होते. गेल्या कांही महिन्यापासून पार्थ पवार यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाना हजेरी लावून लोकसभेसाठी आपणही इच्छुक असल्याचे दाखवून देण्यास सुरुवात केली होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच अजितदादा, पार्थ पवार किंवा रोहित पवार निवडणुक लढविणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र हार मानण्याची कदाचित तयारी पार्थ पवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची नसावी त्यामुळे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रात, साहेब कार्यकर्त्यांची करू नका निराशा! पार्थ दादा आहे आमची उद्याची आशा! जाणीव झाली आता बदल हवा! चेहरा नवा पार्थ पवार हवा! अशा आशयाचे फलक सर्वत्र झळकत आहेत यामुळे आजोबांच्या स्पष्टीकरणाला कार्यकर्ते व पार्थ पवार यांचे समर्थक किमत देत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा केल्याचा परिणाम आगामी काळातच दिसेल हे मात्र नक्की! मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ याला येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा असून  ‘हल्लीची पिढी स्वत:चे निर्णय स्वत:च घेते’ असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. मावळ लोकसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या कोणत्याही एका पक्षाच्या प्रभावाखाली नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) या प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व असलेला मतदारसंघ आहे. विरोधकांच्या मत विभाजनामुळेच मागील दोन टर्म शिवसेनेला यश मिळाले आहे. 2014 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर लोकसभा लढविली होती. आताही त्यांचे समर्थक त्यांनी लोकसभा लढवावी, म्हणून प्रयत्नशील आहेत.

श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा.....!

नशीब व श्रद्धा यावर विश्वास असलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा फळफळणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. युती झाल्याने खासदार व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. भाजप -सेना युती झाली नाही तर निवडणूक लढवण्यास अनुत्सुक असलेले श्रीरंग बारणे यांना युती झाली तरीही निवडणूक सुकर होईल असे वाटत असले तरी काही समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विजयाचा मार्ग कठीण वाटत आहे. भाजपच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकार्यांची साथ मिळणे कठीण आहे. गेल्या वेळी श्रीरंग बारणे यांना साथ दिलेल्या बहुतांश मान्यवरांनी त्यांच्या पासून फारकत घेतलेली आहे. शिवसेनेच्या निष्ठावंतांना अनेक पदावरून दूर करून निष्क्रिय समर्थकांना पदे मिळवून दिली असल्याचा रोष शिवसैनिकांमध्ये आहे. भाजपकडून स्थानिक पातळीचा विरोध, पक्षांतर्गत विरोध, केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा रोष यावर केवळ नशिबाने मात होईल असा अंधविश्वास बाळगून आहेत. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे नशीब पुन्हा फळफळणार! 
दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ आहे.
पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा
भाजप तीन, राष्ट्रवादी एक , शिवसेनेचे दोन असे विधानसभा आमदार बलाबल आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.