Wednesday 20 February 2019

#pune gram panchayat election 2019 पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर;२४ मार्चला मतदान

557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी मतदान;सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही मतदान


राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 13 मार्च 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल. पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींसह राज्यातील ५५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून २४ मार्चला मतदान घेण्यात येणार आहे. जाहीर झालेल्या पुणे विभागातील ग्रामपंचायतींची संख्या ७५ असून त्यामध्ये सर्वाधिक सातारा जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. तर थेट सरपंच रिक्त पदावरील निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर केला असून पुणे जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायतींसह राज्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. माहे एप्रिल 2019 ते जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकांकरीता प्रत्यक्ष निवडणुकांसाठी संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 3, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1, जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6, उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
================================================

निवडणूक कार्यक्रम

         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे             : 5 ते 9 मार्च 2019
         नामनिर्देशनपत्रांची छाननी                 : 11 मार्च 2019
         उमेदवारी मागे घेणे                           : 13 मार्च 2019 पर्यंत
        निवडणूक‍ चिन्ह वाटप                      : 13 मार्च 2019
         मतदान                                           : 24 मार्च 2019
         मतमोजणी                                      : 25 मार्च 2019
         निकालाची राजपत्रात प्रसिद्धी             : 28 मार्च 2019 पर्यंत







POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.