Friday, 8 February 2019

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर विचार करेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुगली! ...तर भाजप पराभूत करेल - पाटील

निवडणुकीला उभे राहिले तर पवार यांना भाजप पराभूत करेल - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 


शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खुलासा


माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर विचार करेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे तर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. दरम्यान निवडणुकीला उभे राहिले तर खासदार शरद पवार यांना भाजप पराभूत करेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आमची पक्षात्मक बांधणी मजबूत झाली असल्याने माढा मतदारसंघात शरद पवार उभा राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणाला लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागल्याचे जाणवू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान एका चॅनेलवर शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी ब्रेकिंग सुरू झाली. त्यावरून सोशल मीडियावर राजकीय चर्चेला उधाण आले. या बाबतची माहिती बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजताच त्यांनी बैठकीमधून बाहेर येत ‘शरद पवार हे निवडणूक लढवणार नाही’, असा खुलासा केला. यामुळे शरद पवार निवडणूक लढवणार नाही या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीवर मी विचार करेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची एक बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह माढ्यातील सध्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेसाठी काही मतदारसंघातील उमेदवारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी माढ्यातून शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून पुढे आली. माध्यमांमध्ये यावर वृत्त प्रसारित झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माढ्यामधून मी निवडणूक लढवावी, अशी पक्षातील सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे. त्यांनी ती माझ्याजवळ बोलून दाखवली आहे. खुद्द विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही अशी इच्छा व्यक्त केली आहे. पण मी यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांचे असे म्हणणे आहे की, तुमचे सर्व धोरणात्मक निर्णय आम्ही ऐकतो. आता आमची इच्छाही तुम्ही ऐकावी. मी यावर विचार करेन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातूनच शरद पवार निवडून आले होते. पण त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. यापुढे लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी त्यावेळी म्हटले होते. पण आता पुन्हा एकदा ते माढा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभामधून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे विधान केले होते. त्यावर पवार यांनी निवडणूक लढविण्यासाठी अजित दादांना शिरूरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. याठिकाणी पाच ते सहा प्रबळ उमेदवार आमच्याकडे आहेत असेही स्पष्ट केले. अण्णा हजारे यांच्या उपोषणाबाबत पवार यांना विचारले असता त्यांनी अण्णा हजारे यांचे उपोषण या विषयावर बोलणे, बातम्या वाचणे, पाहणे गेली 2 वर्षे सोडून दिले असल्याचे सांगितले.

निवडणुकीला उभे राहिले तर खासदार शरद पवार यांचा भाजपकडून पराभव अटळ- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना भाजप पराभूत करेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात आमची पक्षात्मक बांधणी मजबूत झाली असल्याने माढा मतदारसंघात शरद पवार उभा राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी ३,१४,४५९ मताधिक्य घेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र माढ्यातून जिंकून गेल्या नंतर शरद पवार यांनी मतदारसंघात कमीच फिरकने पसंत केले होते म्हणून त्यांच्यावर त्यावेळी प्रसार माध्यमातून टीका सुद्धा केली जात होती. याला देखील भाजप कडून प्रचाराचा स्थानिक मुद्दा केला जाऊ शकतो. त्याच प्रमाणे शरद पवार उभे राहिल्यास भाजपकडून ही तगडा उमेदवार या मतदारसंघात देण्यात येईल अशी शक्यता वाटत आहे. दरम्यान खासदार शरद पवार यांनी 2009 मध्ये माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवली होती. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती. येथे 2019 च्या लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा होती.

उमेदवारी दिली तर लोकसभा लढवणार : संजीवराजे नाईक-निंबाळकर

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ही निवडणूक ते लढवण्याची तयारी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेस आघाडीचा जो उमेदवार दिला जाईल. त्याचे सुद्धा काम केले जाईल. तसेच शरद पवार जो निर्णय देतील, त्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू, असं त्यांनी सांगितलं. माढा लोकसभा मतदार संघातून माजी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव निश्चित झाले आहे का?, या पत्रकारांच्या प्रश्नावर संजीवराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, अद्यापपर्यंत कुणाचेही नाव निश्चित झाले नाही मात्र शरद पवार जो उमेदवार देतील, त्याचे काम केले जाणार आहे. मागील निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात वेगळी परिस्थिती होती, मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्‍ट्रीय काँग्रेस एकत्रीत येवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे असे ते म्हणाले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW-   

====================================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.