पुणे महापालिका नवनिर्वाचित प्रभाग क्र. 42 मधील निवडणूक लांबणीवर
लोहगावकरांना दुहेरी मतदानाचा अधिकार!; पालिकेतही समाविष्ट आणि जिल्हा परिषदेतही मतदान
पुणे जिल्हा परिषदेच्या देहू- लोहगाव गटात मार्च मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार असून याकरीता राज्य निवडणूक आयोगाने मतदारयादीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे लोहगावकरांना दुहेरी मतदानाचा अधिकार प्राप्त होणार असून पुणे महापालिका नवनिर्वाचित प्रभाग क्र. 42 मध्येही लोहगाव समाविष्ट केल्याने भविष्यात मतदान करावे लागणार आहे तर पुढील महिन्यात जिल्हा परिषदेतही मतदान करण्याचा दुहेरी लाभ मिळणार असल्याचे आयोगाच्या जाहीर झालेला कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने येथील जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त जागेवर ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान पुणे महापालिका नवनिर्वाचित प्रभाग क्र. 42 मधील निवडणूक लांबणीवर पडली आहे. नवनिर्वाचित प्रभाग क्र. 42 मध्ये लोहगावचा समावेश असून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झालेली असताना राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद गटामध्ये पोट निवडणूक घेत असल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे महापालिकेतील समाविष्ट गावांचा भाग मिळून तयार केलेला नवनिर्वाचित प्रभाग क्र. 42 मधील निवडणूक लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर प्रभाग क्र. 42 मध्ये निवडणूक घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. समाविष्ट गावातील राजकारणाचा विपरीत परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ नये यासाठी निवडणूक लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. दरम्यान पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये लोहगावचा समावेश आहे निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना प्रक्रिया झालेली असताना देखील राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या जुन्या गट रचनेप्रमाणे पोट-निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे यासाठी निवडणूक पूर्वतयारीचे आदेश काढून मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम दिनांक 12/02/2019 रोजी जाहीर केलेला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांसाठी यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या गट क्र. ३५ देहू- लोहगाव चा समावेश आहे. देहू- लोहगाव या गटातून निवडून आलेल्या सदस्या मंगल नितीन जंगम (राष्ट्रवादी) यांचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने रिक्त झालेला जागेवर पोट निवडणूक होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेतील हवेली तालुक्यातील गट क्र 35 - देहू-लोहगाव अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रीमती जंगम मंगल नितीन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले होते. त्यांच्या विरुद्ध शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केली होती. पुणे जिल्हा परिषदेच्या गट क्र. ३५ देहू- लोहगाव मध्ये पुढील महिन्यात मतदान घेण्यात येणार असून मार्च महिन्याच्या दुसरया आठवड्यात पोट निवडणूक होणार आहे. यासाठी मतदार यादी दि. २७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मतदार केंद्र निहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\================================================
यापूर्वी प्रसिद्ध झालेले अनुषंगिक वृत्त ब्लॉग खालीलप्रमाणे-
WEDNESDAY, 9 AUGUST 2017
पुणे जिल्हा परिषद सदस्या जंगम यांचे जात प्रमाणपत्र रद्द
पुणे जिल्हा परिषद सदस्या जंगम यांचे जात प्रमाणपत्र रद्द
पुणे जिल्हा परिषदेतील हवेली तालुक्यातील गट क्र 35 - देहू-लोहगाव अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रीमती जंगम मंगल नितीन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले आहे.
त्यांचा विरुद्ध शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केली होती , खंडागळे यांची बाजू समिती समोर ऍड. अनिरुद्ध कांबळे यांनी मांडली.
------------------------------------------------
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
==========================================================
पुणे महापालिका समाविष्ट भागातील जिल्हा परिषद गट व गण रद्द होणार!
हवेली तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेचा 1 गट व पंचायत समितीचे गण 8 संपुष्टात येणार
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पुणे महापालिका समाविष्ट भागातील जिल्हा परिषद गट व गण रद्द होणार आहेत. हवेली तालुक्यातील काही गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला असून या समाविष्ट भागात नव्याने प्रभाग रचना करून निवडणूक घेण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत यामधील हवेली तालुक्यातील एकूण ८ गण संपुष्टात येणार आहेत. तर जिल्हा परिषदेचा 1 गट संपुष्टात येत आहे. ९ लोकप्रतिनिधीचे भवितव्य विस्तापित होणार आहे. आगामी काळात उर्वरित भाग घेतल्यास हवेली तालुक्याचे जिल्हा परिषद मधील वर्चस्व देखील संपुष्टात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेला पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग प्रारूप रचनेनुसार केवळ २ लोकप्रतिनिधीत्व करणार आहेत तर सध्या समाविष्ट भागातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ९ जण लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळात म्हणजेच २०२२ साली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गट व गण पुनर्रचना होईल. सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या भागातील नेतृत्व करीत असले तर महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार त्यांचे अधिकाराना कात्री लागणार आहे. सध्या हवेली पंचायत समिती सभापती- वैशाली महाडीक (राष्ट्रवादी काँग्रेस) उपसभापती- अजिंक्य घुले (राष्ट्रवादी काँग्रेस) म्हणून कार्यरत आहेत.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत ते खालीलप्रमाणे-
35 - देहू-लोहगाव (लोहगाव भाग पालिकेत)36 - वाघोली - आव्हाळवाडी (सध्या बदल नाही)
37 - पेरणे-वाडेबोल्हाई (सध्या बदल नाही)
38 - उरुळीकांचन-सोरतापवाडी (सध्या बदल नाही)
39 - थेऊर-लोणीकाळभोर (सध्या बदल नाही)
40 - फुरसुंगी-कदमवाकवस्ती (फुरसुंगी भाग पालिकेत)
41 - मांजरी बु.-शेवाळवाडी (सध्या बदल नाही)
42 - केशवनगर-साडेसतरानळी (केशवनगर व साडेसतरानळी भाग पालिकेत)
43 - उरुळीदेवाची-वडकी (उरुळीदेवाची भाग पालिकेत)
44 - आंबेगाव बु.-न-हे (आंबेगाव बु.भाग पालिकेत)
45 - धायरी - नांदेड (धायरी भाग पालिकेत)
46 - शिवणे-कोंढवे धावडे (शिवणे भाग पालिकेत)
47 - मांगडेवाडी - डोणजे (सध्या बदल नाही)
हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत यामधील गट क्र. ३५ मधील लोहगाव भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने लोहगाव गण संपुष्टात येत आहे. तर गट क्र. 40 मधील फुरसुंगी भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने फुरसुंगी गण संपुष्टात येत आहे. गट क्र. 42 मधील केशवनगर-साडेसतरानळी हा संपूर्ण भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने केशवनगर-साडेसतरानळी हा गट व त्यांतर्गत येणारे २ गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 43 मधील उरुळीदेवाची भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने उरुळीदेवाची हा गण संपुष्टात येत आहे. गट क्र. 44 मधील आंबेगाव बु. भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने आंबेगाव बु. हा गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 45 मधील धायरी भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने धायरी हा गण संपुष्टात येणार आहे. गट क्र. 46 मधील शिवणे भाग महापालिकेत समाविष्ठ होत असल्याने शिवणे हा गण संपुष्टात येणार आहे. अशाप्रकारे हवेली तालुक्यातील एकूण ८ गण संपुष्टात येणार आहेत. तर जिल्हा परिषदेचा 1 गट संपुष्टात येत आहे. ९ लोकप्रतिनिधीचे भवितव्य विस्तापित होणार आहे. आगामी काळात उर्वरित भाग घेतल्यास हवेली तालुक्याचे जिल्हा परिषद मधील वर्चस्व देखील संपुष्टात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेला पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग प्रारूप रचनेनुसार केवळ २ लोकप्रतिनिधीत्व करणार आहेत तर सध्या समाविष्ट भागातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ९ जन लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. आगामी काळात म्हणजेच २०२२ साली पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गट व गण पुनर्रचना होईल. सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या भागातील नेतृत्व करीत असले तर महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार त्यांचे अधिकाराना कात्री लागणार आहे. पुणे महापालिकेतील नवनिर्वाचित प्रभाग क्र ४२ म्हणून समाविष्ट भाग ओळखला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचना 20 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. प्रारूप रचनेनुसार केवळ २ व्यक्ती या भागात लोकप्रतिनिधीत्व करून ९ लोकप्रतिनिधीचे काम करणार आहेत. काम कसे होणार हे आगामी काळात त्यांच्या व प्रशासनाच्या कार्य कुशलतेवरून दिसून येईलच.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
अ.क्र. | तालुका | जिल्हा परिषद सदस्य संख्या | पंचायत समिती सदस्य संख्या | महसूली गावे | ग्रा. पं. ची संख्या | ग्रा. पं. सदस्य संख्या |
1 | आंबेगाव | 5 | 10 | 143 | 103 | 889 |
2 | बारामती | 7 | 14 | 117 | 100 | 990 |
3 | भोर | 4 | 8 | 195 | 155 | 986 |
4 | दौंड | 7 | 14 | 103 | 79 | 795 |
5 | हवेली | 10 | 20 | 108 | 101 | 995 |
6 | इंदापूर | 7 | 14 | 143 | 113 | 1048 |
7 | जुन्नर | 8 | 16 | 183 | 142 | 1246 |
8 | खेड | 7 | 14 | 188 | 163 | 1350 |
9 | मावळ | 5 | 10 | 187 | 103 | 845 |
10 | मुळशी | 3 | 6 | 144 | 95 | 742 |
11 | पुरंदर | 4 | 8 | 108 | 90 | 752 |
12 | शिरुर | 6 | 12 | 117 | 93 | 903 |
13 | वेल्हा | 2 | 4 | 130 | 70 | 619 |
एकुण | 75 | 150 | 1866 | 1407 | 12160 |
जिल्हा परिषद, पंचायत समिती-
फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या, या निवडणुकीसाठी गट-गणांच्या फेररचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता त्यात हवेलीतील त्या 34 गावांनाही गृहीत धरले होते. शासनाने ही गावे महापालिकेत घेण्यासंदर्भात अधिसूचना काढली असताना व जिल्हा परिषदेने गावे वगळली असताना आमच्या गावात निवडणूक कशी? असा सवाल हवेली तालुका नागरी कृती समितीने केला त्यावेळी केला होता व न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती. पुणे महापालिकेत हवेलीतील ही 34 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना शासनाने 30 मे -2014 रोजी काढली होती.
त्यानंतर या 34 गावांनी शासनाकडे महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे, याविषयी विनंती व मागणी केली मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. २०१७ मधील 9 सप्टेंबर रोजी प्रारूप गट-गण रचना जाहीर करण्यात आली यामध्ये या 34 गावांना गृहीत धरून हवेली तालुक्यात नव्याने गट निर्माण केले होते. पुणे जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण सध्या आहेत. २०११ प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात आलेला आहे. हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण आहेत. तसेच जुन्नरमध्ये सात गट (१४ गण), आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण), शिरूरमध्ये सात गट (१४ गण), खेडमध्ये सात गट (१४ गण), मावळमध्ये पाच गट (१० गण), मुळशीत तीन गट (सहा गण), दौंडमध्ये सहा गट (१२ गण), पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण), वेल्हा दोन गट (४ गण), भोर ३ गट (६ गण), बारामतीमध्ये सहा गट (१२ गण) व इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण सध्या आहेत.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
* जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण
* जिल्ह्याची लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार)- ३८ लाख ४७ हजार इतकी आहे.
* लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट.
* हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे गट - १३
* पंचायत समितीचे गण - २६ गण
* जुन्नर - सात गट (१४ गण)
* आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण)
* शिरूरमध्ये सात गट (१४ गण)
* खेडमध्ये सात गट (१४ गण)
* मावळमध्ये पाच गट (१० गण)
* मुळशीत तीन गट (सहा गण)
* दौंडमध्ये सहा गट (१२ गण)
* पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण)
* वेल्हा दोन गट (४ गण)
* भोर ३ गट (६ गण)
* बारामतीमध्ये सहा गट (१२ गण)
* इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण
* खेड व जुन्नर पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित
वरीलप्रमाणे पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती रचना सांख्यिकी माहिती आहे.
प्रभाग रचना-
२०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रभाग रचनेत गृहीत धरण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधीत्वाची संख्या कमी दर्शविण्यात आली आहे. या ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ असून अनुसूचित जातींची संख्या ३१,४७५ आहे तर अनुसूचित जमातींची संख्या ३५०१ नमूद केलेली आहे. मात्र या भागातील मतदारसंख्या काही भागात तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. मतदारसंख्या विचारात घेतल्यास नगरसेवक संख्या नगण्य असून ती इतर प्रभागांच्या तुलनेत १० ते १२ सदस्यांचाचे किमान ३ प्रभाग करणे अपेक्षित होते. पुणे महापालिकेच्या पूर्वीच्या प्रभाग रचनेत २०११ जनगणना मधील लोकसंख्या प्रमाण सरासरी ८० ते ८५ हजार असे एका प्रभागासाठी सर्वाधिक असे घेण्यात आले आहे. प्रभाग क्र ४२ प्रारूप रचना प्रसिद्ध करताना ११ समाविष्ट भागातील लोकसंख्या केवळ लोकसंख्या २,३९,४८३ आहे तर पूर्वीच्या सरासरीच्या प्रमाणत ३ प्रभाग 4 सदस्याचे निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र 1 प्रभाग निर्माण करून त्यामध्येही २ सदस्यांना मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येते हे या समाविष्ट भागातील नागरिकांवर अन्यायकारक आहे. विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्राप्रमाणे या प्रस्तावित प्रभागाची रचना व त्या तुलनेत मतदारसंख्या आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर २५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही हा सर्व परिसर आता एका प्रभागाखाली सामावला जाणार आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा मिळून एकच प्रभाग तयार होणार असल्याने येथून निवडून येणाऱ्या नगरसेवकांसमोर शहराच्या पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशा चारही दिशांच्या मतदारांशी संपर्क ठेवण्याचे कठीण आव्हान असणार आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभागाच्या प्रा-रूप रचनेवर नागरिकांना येत्या शुक्रवारपर्यंत (१२ ऑक्टोबर) हरकती-सूचना मांडता येणार आहेत. शुक्रवारपर्यंत दाखल होणाऱ्या सर्व हरकतींवर १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असून, त्यानंतर २० ऑक्टोबरला प्रभागाची रचना अंतिम केली जाणार आहे. ही प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आगामी काळात निवडणूक आयोगातर्फे येथील निवडणूक जाहीर केली जाणार आहे.भाग चारही दिशांना - उत्तर : लोहगाव (उर्वरित) पूर्व : मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री , दक्षिण : आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी, पश्चिम : शिवणे (उत्तमनगर) अशी आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी सदस्य
७ | हवेली | 35 - देहू-लोहगाव | अनुसूचित जाती | मा.श्रीमती.जंगम मंगल नितीन सदस्य, जिल्हा परिषद पुणे स.नं. 66, अवधूत बिल्डींग, पहारेवस्ती, लोहगांव, जि. पुणे | राष्ट्रवादी कॉग्रेस | ||
36 - वाघोली - आव्हाळवाडी | सर्वसाधारण | मा. श्री.कटके ज्ञानेश्वर पंढरीनाथ सदस्य, जिल्हा परिषद पुणे मु.पो.वाघोली, ता.हवेली, जि.पुणे | शिव सेना | ||||
37 - पेरणे-वाडेबोल्हाई | सर्वसाधारण स्त्री | मा.श्रीमती.कल्पना सुभाष जगताप सदस्य, जिल्हा परिषद पुणे मु.पो. आष्टापूर, ता. हवेली, जि.पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
38 - उरुळीकांचन-सोरतापवाडी | नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री | श्रीमती.कांचन किर्ती अमित सदस्य, जिल्हा परिषद पुणे उरुळीकांचन, ता. हवेली, जि. पुणे | राष्ट्रवादी कॉग्रेस | ||||
39 - थेऊर-लोणीकाळभोर | अनुसूचित जाती स्त्री | मा. श्रीमती.सुनंदा रघुनाथ शेलार सदस्य, जिल्हा परिषद पुणे मु.पो.लोणीकाळभोर ता.हवेली,जि.पुणे | अपक्ष | ||||
40 - फुरसुंगी-कदमवाकवस्ती | सर्वसाधारण स्त्री | मा.श्रीमती.कामठे अर्चना प्रविण सदस्य, जिल्हा परिषद पुणे चंद्रलोक, कामठेमळा, फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
41 - मांजरी बु.-शेवाळवाडी | नागरीकांचा मागास प्रवर्ग | मा. श्री.घुले दिलीप परशुराम सदस्य, जिल्हा परिषद पुणे वेताळवाडी, प्राथमिक शाळेजवळ, मांजरी बु ता.हवेली जि.पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
42 - केशवनगर-साडेसतरानळी | नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री | मा.श्रीमती.वंदना महादेव (डॉ.दादा) कोद्रे सदस्य, जिल्हा परिषद पुणे स.न. 41, केशवनगर, मुंढवा ता.हवेली जि.पुणे | भारतीय जनता पार्टी | ||||
43 - उरुळीदेवाची-वडकी | अनुसूचित जाती स्त्री | मा. श्रीमती.चौरे सुरेखा शैलेंद्र सभापती, समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद पुणे सिध्दार्थनगर, वडकी, ता. हवेली जि.पुणे | राष्ट्रवादी कॉग्रेस | ||||
44 - आंबेगाव बु.-न-हे | नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री | मा. श्रीमती.जयश्री सत्यवान भुमकर सदस्य, जिल्हा परिषद पुणे स.न. 2/2,केशन रुक्मीणी निवास, नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे | भारतीय जनता पार्टी | ||||
45 - धायरी - नांदेड | नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री | मा.श्रीमती.जयश्री बाबासाहेब पोकळे सदस्य, जिल्हा परिषद पुणे स.न. 11, कुंभार चावडी, मु. पो. धायरी, ता.हवेली जि. पुणे | भारतीय जनता पार्टी | ||||
46 - शिवणे-कोंढवेधावडे | सर्वसाधारण स्त्री | मा.श्रीमती.अनिता तुकाराम इंगळे सदस्य, जिल्हा परिषद पुणे मु.पो. शिवणे, इंगळे कॉलनी, ता. हवेली जि.पुणे | राष्ट्रवादी कॉग्रेस | ||||
47 - मांगडेवाडी - डोणजे | सर्वसाधारण स्त्री | मा.श्रीमती.पारगे पुजा नवनाथ सदस्य, जिल्हा परिषद पुणे अमृतनिवास, सिंहगड रोड, डोणजे, ता. हवेली, जि. पुणे | राष्ट्रवादी कॉग्रेस |
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
पुणे महापालिकेचा नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ अंतिम ; रचना व सदस्य संख्येबाबत सविस्तरपणे ब्लॉग पहा
विचित्र अंतिम प्रभाग रचना कायम; हरकतीनां केराची टोपली; डिसेंबरला निवडणूक होणार!
पुणे महापालिकेचा नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ ची अंतिम रचना जाहीर करण्यात आली असून २ सदस्य संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरीकांनी घेतलेल्या हरकती निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्या आहेत. यापूर्वी जाहीर केलेली विचित्र प्रारूप रचनाच अंतिम प्रभाग रचना कायम केलेली आहे. प्रभाग रचनेवर घेतलेल्या हरकतीनां केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान अहमदनगर व धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबर पुणे महापालिकेच्या नवनिर्वाचित प्रभाग क्र. ४२ मधील २ सदस्यीय प्रभागाची निवडणूक डिसेंबरला घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
प्रभाग रचना अखेर जैसे थे
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी निश्चित केलेला नवीन प्रभाग महापालिकेतील सर्वांत मोठा प्रभाग ठरणार आहे. लोहगाव ते धायरी आणि शिवणे ते फुरसुंगी दरम्यानचे सरासरी अंतर 25 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. भौगोलिक सलगता नसतानाही निवडणूक घेणं अपरिहार्य असल्याने ही रचना केली आहे. दरम्यान, या नवीन प्रभागाच्या प्रारूप रचनेवर नागरिकांनी 12 ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या होत्या त्यावर त्यावर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीना केराची टोपली दाखवली आहे. यामुळे समाविष्ट गावातील नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या अंतिम रचनेवर न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पालिकेचा हा 42 वा प्रभाग असणार असून त्याची लोकसंख्याही सर्वाधिक 2 लाख 39 हजार असून यामुळे नगरसेवकांची संख्या 164 होणार आहे. मागील वर्षी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर केला आहे. त्यानुसार, ही गावे शहराच्या चारही दिशांना असल्याने महापालिकेकडून त्यांचा संयुक्त प्रभाग करण्यात आला असून त्याला फुरसुंगी-लोहगाव असे नाव देण्यात आले आहे. शहरात सर्वत्र हा प्रभाग विखूरलेला असला तरी, प्रत्यक्षात त्याची सलगता नसल्याने प्रशासनाकडून या गावांच्या हद्दीनुसार, तो जाहीर केला असून त्यात उत्तरेला लोहगाव (उर्वरित) पूर्वेला मुंढवा (उर्वरित केशवनगर) व हडपसर (साडेसतरानळी), उरळी, फुरसुंगी व उंड्री तर दक्षिण दिशेला आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द व धायरी आणि पश्चिम दिशेला शिवणे (उत्तमनगर) ही गावे असणार आहेत.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store\
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.