Saturday 9 February 2019

लोकसभा निवडणूक-2019 भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब! सेना-भाजपचा फॉर्म्युला ठरला

दोन्ही पक्षांमध्ये 25-23चे सूत्र ; निवडणूक रणनीतीवर काम सुरु

सद्यस्थितीत भाजप व शिवसेना विद्यमान खासदार असलेले लोकसभा मतदारसंघ


सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी व मतविभाजन टाळण्यासाठी राज्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी अखेर युती करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून केवळ यासंदर्भातील घोषणा एनवेळी करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये 25-23चे सूत्र ठरले असून लोकसभा निवडणूकीवर रणनीतीचे काम सुरु केले आहे. शिवसेना सद्याच्या जागा पुन्हा जिंकणे व गेल्यावेळी पराभूत जागा यावेळी जिंकून आणणे याकरीता राजकीय सल्लागारांकडून रणनीती तयार केली जात आहे. राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेने पालघर जागा देखील मागितली होती पण भाजपने ही जागा आपल्यालाच हवी असल्याचे सांगितले होते. सध्या जे मतदारसंघ दोन्ही पक्षांकडे आहेत तेच मतदारसंघ कायम ठेवण्यात येणार आहेत. तर इतर जागांबाबत कुठल्या पक्षामध्ये जिंकण्याची ताकद आहे याचा विचार करण्यात आला आहे. युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ यापूर्वी अनेक दिवस सुरू राहिले होते. त्यात गेली चार वर्ष दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातच शिवसेनेने शेवटपर्यंत ताणून धरल्याने चर्चा सध्या पडद्याआडच सुरु होती. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये 25-23 चे सूत्र निश्चित झाले तरी बंडखोरी टाळण्यासाठी युतीची घोषणा अचानक वेळ पाहून करण्यात येणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 22 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. युती झाली तर त्याचा फायदा आणि युती नाही झाली तर त्याचा बसणारा फटका हा दोनही पक्षांना होणार आहे याची जाणीव झाल्याने दोन्ही पक्ष वास्तवाची जाणीव ठेवून सहमतीची भूमिका घेतली आहे. हमखास युती करण्याच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज झालेला पुण्यातील कार्यक्रमांत आम्ही गेल्यावेळी ज्या जागा जिंकल्या त्यापेक्षा जास्त जागा जिंकू असे वक्तव्य करून युती होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता. गेल्या वेळी म्हणजेच 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकांत 48 जागांपैकी भाजपने 26 तर, शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. यावेळी भाजप लोकसभेची एक ज्यादा जागा शिवसेनेला द्यायला तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला 25-23 असा असण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने सहयोगी मित्रपक्षांचे आपापल्या जागा निश्चितीवर निर्णय घ्यावा असे ठरले आहे त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेने देखील असाच फार्मुला वापरला आहे. त्यामुळे भाजप - शिवसेनेच्या मित्रपक्षांचे भवितव्य जागा वाटपात येणाऱ्या मतदारसंघावर अवलंबून राहणार आहे. मित्रपक्ष दुखावले तर त्या पक्षाचा प्रश्न राहणार आहे. युती मध्ये अडचण केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाला जास्त आहे. मात्र युती झाल्यास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्ष ज्यात लोकसभेच्या काही जागा लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युती झाली नाही तर नारायण राणे तसेच स्वाभिमानी पक्षाचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता होती. युतीला मदत होईल अशा ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे काही उमेदवार निवडणूक रिंगणात राहण्याची रणनीती ठरवली जात आहे. तसेच इतर मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीच्या बदल्यात विधानसभेच्या जागा वाढवून देण्यात येणार आहे. मात्र मित्रपक्षांची युतीवर शिक्कामोर्तब झाल्याने डोकेदुखी वाढणार आहे. मित्रपक्षांमध्ये आरपीआयचे व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राज्यमंत्री सदाशिव खोत लोकसभा निवडणुकीस इच्छुक आहेत. मात्र त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. पालघर, सातारा, भिवंडी, माढा, हातकणंगले, कोल्हापूर, बारामती, सातारा, हिंगोली, नांदेड, या जागांवर युतीचा तिढा होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या लातूर दौऱ्यातील शिवसेनेवर केलेल्या आक्रमक टिप्पणी नंतर आज पुण्यात शिवसेनेबाबत वक्तव्य टाळले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या बाबत मवाळ भूमिका घेतली आहे.

युती होणार की नाही म्हणून मित्रपक्षांची घालमेल!

शिवसेना भाजप यांच्यातील लोकसभा युतीबाबत नेमकी काय परिस्थिती आहे याचा अंदाज राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय यांच्यासारख्या मित्रपक्षांना तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाला येत नसल्याने लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागांसाठी काय रणनिती ठरवायची असा गहन प्रश्न या राजकीय पक्षांपुढे पडलेला आहे. युतीचा निर्णय लांबणीवर पडल्याने या सर्व राजकीय पक्षांचे भवितव्यही अधांतरीच आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा केव्हाही जाहीर होण्याची स्थिती असताना भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत मात्र फारशी हालचाल होताना दिसत नाही असे चित्र दर्शवले जात असल्याने तसेच या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांनी युतीबाबतच्या चर्चा अत्यंत गोपनीय ठेवल्या आहेत. यापूर्वी युतीबाबत प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडत, जागावाटपावरून बरेच वादंग निर्माण होत असे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्या महायुतीमध्ये सामील होणाऱ्या मित्रपक्षांना परिस्थितीचा सहजासहजी अंदाज येत होता. मात्र यावेळेला युतीबाबत कोठेही उघड चर्चा वा बैठका होत नसल्याने युतीमध्ये असलेल्या आरपीआयचा रामदास आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे, सदाशिव खोत यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष या सर्वजणांना लोकसभेच्या जागा त्यांना मिळणार आहेत की नाही, लोकसभेच्या जागा मिळणार नसतील तर त्या बदल्यात विधानसभेच्या जागा वाढवून कशा घ्यायच्या या सर्व गोष्टींवर निर्णय घेणे कठीण झाले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्षदेखील लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार आहे. मात्र शिवसेना-भाजप यांच्यातील युतीवर स्वाभिमानी पक्षाची मदार बऱ्यापैकी अवलंबून आहे. एकूणच शिवसेना भाजप युती लांबल्यामुळे या सर्वच राजकीय पक्षांना नेमकी काय भूमिका घ्यायची असा प्रश्न पडला आहे. त्यांना गाफील ठेऊन अचानक निर्णय झाल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीचे आश्वासन देऊन समजूत काढण्यावर भर दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातून मला ४५ खासदार निवडून द्या : शाह

उत्तर प्रदेशात आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा जिंकू पण ७२ होऊ देणार नाही. तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाआघाडीला लक्ष्य केले. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र - 48 जागा 

१. दिलीप कुमार गांधी, अहमदनगर, भाजपा
२. संजय शामराव धोत्रे, अकोला, भाजपा
३. आनंदराव आडसूळ, अमरावती, शिवसेना
४. चंद्रकांत खैरे, औरंगाबाद, शिवसेना
५. सुप्रिया सुळे, बारामती, एनसीपी
६. प्रितम मुंडे, बीड, भाजपा (पोटनिवडणूक)
७. मधुकरराव कुकडे, भंडारा-गोंदिया, राष्ट्रवादी (पोटनिवडणूक)
८. कपिल मोरेश्वर पाटील, भिवंडी, भाजपा
९. प्रतापराव जाधव, बुलढाणा, भाजपा
१0. हंसराज अहिर, चंद्रपुर, भाजपा
११. सुभाष भामरे, धुळे, भाजपा
१२. हरिशचंद्र चव्हाण, दिंडोरी, भाजपा
१३. अशोक नेते, गडचिरोली-चिमूर, भाजपा
१४. राजू शेट्टी, हातकणंगले, स्वाभिमानी शेतकरी संघटना
१५. राजीव सातव, हिंगोली, काँग्रेस
१६. ए.टी नाना पाटील, जळगांव, भाजपा
१७. दादा राव पाटील दानवे, जालना, भाजपा
१८. डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण, शिवसेना
१९. धनंजय भीमाराव महाडिक, कोल्हापूर, राष्ट्रवादी
२0. सुनील बळीराम गायकवाड़, लातूर, भाजपा
२१. विजयसिंह मोहिते-पाटील, माढा, राष्ट्रवादी
२२. श्रीरंग बारणे, मावळ, शिवसेना
२३. गोपाळ चिन्नाय शेट्टी, मुंबई उत्तर, भाजपा
२४. पूनम महाजन, मुंबई उत्तर मध्य, भाजपा
२५. किरीट सोमैया, मुंबई उत्तरपूर्व, भाजपा
२६. गजानन कीर्तिकर, मुंबई उत्तर-पश्चिम, शिवसेना
२७. अरविंद सावंत, मुंबई दक्षिण, शिवसेना
२८. राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण मध्य, शिवसेना
२९. नितिन गडकरी, नागपूर, भाजपा
३0. अशोक चव्हाण, नांदेड, काँग्रेस
३१. हीना गावित, नंदूरबार, भाजपा
३२. हेमंत गोडसे, नाशिक, शिवसेना
३३. रवींद्र गायकवाड़, उस्मानाबाद, शिवसेना
३४. राजेंद्र गावित, पालघर, भाजपा (पोटनिवडणूक)
३५. संजय जाधव, परभणी, शिवसेना
३६. अनिल शिरोळे, पुणे, भाजपा
३७. अनंत गीते, रायगड, शिवसेना
३८. कृपाल तुमाणे, रामटेक, शिवसेना
३९. विनायक राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, शिवसेना
४0. रक्षा खडसे, रावेर, भाजपा
४१. संजय काका पाटील, सांगली, भाजपा
४२. उदयनराजे भोसले, सातारा, राष्ट्रवादी
४३. सदाशिव लोखंडे, शिर्डी, शिवसेना
४४. शिवाजीराव अढळराव, शिरूर, शिवसेना
४५. शरद बनसोडे, सोलापूर, भाजपा
४६. राजन विचारे, ठाणे, शिवसेना
४७. रामदास तडस, वर्धा, शिवसेना
४८. भावना गवळी, यवतमाळ-वाशिम, शिवसेना

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
 मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
[?] CLICK HERE PAY NOW-   
   https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtratil-rajkaran/?ref=store

================================================


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.