Thursday, 17 January 2019

Election Commission of India launches Voter Awareness Forums(VAFs) across the country मतदार जागृतीसाठी जिल्हा संपर्क केंद्र स्थापन ; टोल फ्री क्रमांकावर मिळणार सुविधा

मतदार जागृतीसाठी जिल्हा संपर्क केंद्र स्थापन ; टोल फ्री क्रमांकावर मिळणार सुविधा


मतदारांच्या निवडणूकविषयक माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 'जिल्हा संपर्क केंद्र' सुरू झाले असून, १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना माहिती दिली जाणार आहे; तसेच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जागृतीसाठी 'मतदार जागृती मंच' स्थापन करण्यात आले आहे. या मंचाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 'मंचाद्वारे निवडणूकविषयक जनजागृती केली जाणार आहे. त्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या www.nvsp.in, http://ecisveep.nic.in, ceo.maharashtra.gov.in आणि National Grievance Service Portal या लिंकबाबत मंचमध्ये माहिती देण्यात येणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन याविषयीही माहिती दिली जाणार आहे. असे निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा संपर्क केंद्रातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना निवडणूक विषयक माहिती दिली जाणार आहे. लँडलाइनवरून १९५०, तर मोबाइलवरून ०२०-१९५० या क्रमांकावरून संपर्क साधता येणार आहे. सध्या जिओ कंपनीव्यतिरिक्त अन्य सर्व मोबाइल कंपन्यांच्या नंबरवरून संपर्क साधता येणार आहे.

नियुक्त्यांसाठी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी एकच सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. औरंगाबाद येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी हे सॉफ्टवेअर तयार केले असून, राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांसाठी या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये संबंधित सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २७ परिशिष्टांमध्ये माहिती भरावी लागणार आहे.

निवडणूक साक्षरतेसाठी निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना

राज्यामध्ये निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक घटकांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब (ELC) स्थापन करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले असून या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावर निवडणूक साक्षरता राज्य समिती गठित करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सामान्य नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत साक्षरतेसाठी संभाव्य मतदार, नवीन मतदार, निवडणूक पाठशाळा व मतदार जागरुकता मंच स्थापन करण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. संभाव्य मतदार स्तरावर नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. या क्लबमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सदस्य म्हणून समावेश असणार असून विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची कार्यकारी समिती स्थापन करुन निवडणूक साक्षरता क्लब चालविण्यात येणार आहे.नवीन मतदार स्तरावर महाविद्यालय, विद्यापीठांच्या आवारात विद्यार्थ्यांचा समावेश असलेले निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये निवडणुकीचा अनुभव असलेल्या शिक्षकांना सहभागी करुन घेण्यात येणार असून त्यांच्याद्वारा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक साक्षरता क्लबचा संयोजक कॅम्पस प्रतिनिधी असेल व तो नोडल व्यक्तींना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यास मदत करेल. निवडणूक साक्षरता क्लब चालविण्यासाठी प्राधान्याने राज्यशास्त्र विभागातील एक किंवा दोन शिक्षक नोडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून काम पाहतील.औपचारिक शिक्षण संस्थेचा भाग नसलेल्या सामाजिक घटकातील तरुणांसाठी मतदार केंद्रनिहाय निवडणूक साक्षरता गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या गटांना मतदार केंद्राच्या नावाने निवडणूक पाठशाळा म्हणून संबोधण्यात येईल. निवडणूक पाठशाळेचा नोडल अधिकारी म्हणून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) काम पाहणार आहे. तसेच शासकीय विभाग, शासकीय संस्था, स्वायत्त, निमसरकारी आणि अशासकीय आणि खासगी क्षेत्रात मतदार जागरुकता मंच सुरू करण्यात येणार आहेत. या घटकातील सर्व कर्मचारी संबंधित मतदार जागरुकता मंचाचे सभासद होऊ शकतील. मतदार जागरुकता मंचासाठी संबंधित नोडल अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम करणार आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========


--------------------------------------------------------------------------------

Voter Awareness Forums(VAFs) 


Voter Awareness Forum(VAF) was launched by Election Commission of India in New Delhi, by the Chief Electoral Officers in the State capital and by District Election Officers in the Districts today. Addressing the Nodal Officers from 44 Ministries, Government of India, and representatives from Confederation of Indian Industry (CII) and Federation of Indian Chambers of Commerce & Industry (FICCI) at Pravasi Bhartiya Kendra, New Delhi today, the Commission exhorted them to immediately set up VAFs and facilitate enrolment of all employees and officials on the electoral roll. Chief Election Commissioner Shri Sunil Arora said that the founding fathers of the Constitution had an instinctive faith in the citizenry of country and therefore gifted Universal Adult Franchise to the Indian populace while other democracies took years before extending this right to all its citizens. It is therefore our collective responsibility to value and preserve this right and in this endeavour Voter Awareness Forums have a crucial role to play. He asked the Nodal Officers to commit themselves to the aims of the VAFs which is to promote informed and ethical electoral participation, first step of which is registration. Election Commissioner Shri. Ashok Lavasa said thousands of unnamed and faceless Government officials undertake the task of preserving the electoral process, in different capacities and roles. Hailing the Officers as “Ambassadors of Democracy”, Shri Lavasa said that as Nodal Officers, now they are invested with the additional responsibility of educating colleagues and staff in their work place and ensuring that all the members of their Ministry and Departments are familiar with the electoral procedure right from enrolment to the casting of ballot. Earlier, speaking on the occasion, Senior Deputy Election Commissioner, briefed all present about the ‘Voter Verification and Information’ drive that the Commission is taking up and asked VAF to facilitate members to check their names and details on Electoral Roll through online NVSP portal of ECI and the Voter Helpline No 1950. The half-day briefing was conducted to familarise the Officers from various Ministries and Federations with the concept of Voter Awareness Forum and to brief them about their role as Nodal Officers of the VAFs. Similar briefing sessions are being held across the country by the Chief Electoral Officers and District Election Officers across the country where nodal officers of Departments, Non-Govt Departments, CSOs, Corporate and Media Houses in the State and District were briefed respectively.Voter Awareness Forums are informal Forums for generating awareness around electoral process through activities like discussions, quizzes, competitions and other engaging activities. All employees of the Organisation are expected to become members of the VAF with the Head of the Organisation acting as the Chair. VAF is part of the Electoral Literacy Club programme of ECI. Launched on the 8th National Voters Day, 25th January 2018, the ELC programme envisages setting up of Electoral Literacy Club in every educational institution and Chunav Pathshala at every booth to cover those outside the formal education system.  Around 2.11 Lakh ELCs have already been established across the country in the first year of the launch of the programme.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========


--------------------------------------------------------------------------------

भारत निर्वाचन आयोग ने मतदाता जागरूकता मंच का शुभारंभ किया

भारत निर्वाचन आयोग ने 16 जनवरी 2019 को नई दिल्ली में मतदाता जागरूकता मंच (वोटर एवरनेस फोरम्स) का शुभारंभ किया. यह मंच विभिन्न गतिविधियों के माध्यम से मतदाता पंजीकरण, मतदान कैसे करें, कहां पर चुनावी चर्चा करें आदि की जागरूकता पैदा करने का अनौपचारिक मंच है.
उद्देश्य:भारत निर्वाचन आयोग का उद्देश्य मतदाताओं को जागरूक कर मतदाता शिक्षा को सुविधाजनक बनाना है.
मुख्य तथ्य:
•   मतदाता जागरूकता मंच सरकारी विभागों, सरकारी और गैर सरकारी संगठनों के साथ-साथ कारपोरेट्स में मतदाता जागरूकता कार्यक्रम आयोजित करेगा.
•   निर्वाचन आयोग के 'स्वीप' कार्यक्रम के तहत शिक्षण संस्थानों में मतदाता साक्षरता क्लब और बूथ स्तर पर चुनाव पाठशालाएं बनाई गई हैं.
•   यह मंच मतदाता पहचान पत्र बनाना, मतदान करना व मतदान में प्रयुक्त होने वाली ईवीएम व वीवीपैट के विषय में संपूर्ण जानकारी देगा.
•   चुनाव आयोग ने निर्वाचन प्रक्रिया के प्रति मतदाताओं को जागरुक बनाने के लिये सरकार के मंत्रालयों, विभागों और अन्य गैरसरकारी संगठनों को मददगार बनाने की पहल की है.
•   राज्यों में भी यह प्रक्रिया शुरु करते हुये सत्र मुख्य निर्वाचन अधिकारियों और जिला निर्वाचन अधिकारियों के माध्यम से मतदाता जागरूकता मंच का गठन होगा.
•   इनमें राज्य और जिलों में सरकारी और गैर सरकारी विभागों के नोडल अधिकारियों, सीएसओ, कार्पोरेट और मीडिया को इस कवायद से अवगत कराया जायेगा.
•   फोरम में संगठन के सभी अधिकारियों से इसके सदस्य बनने और संस्था के प्रमुख को फोरम का अध्यक्ष बनाये जाने का प्रावधान किया गया है.
निर्वाचक साक्षरता क्लब (ईएलसी) कार्यक्रम का हिस्सा:- उल्लेखनीय है कि मतदाता जागरूकता मंच को आयोग के निर्वाचक साक्षरता कार्यक्रम के तहत शुरु किया गया है. यह पहल गत वर्ष 25 जनवरी को 8वें राष्ट्रीय मतदाता दिवस के अवसर पर शुरु किये गये निर्वाचक साक्षरता क्लब (ईएलसी) कार्यक्रम का हिस्सा है.ईएलसी में शिक्षण संस्थानों तथा प्रत्येक मतदान केन्द्र पर चुनाव पाठशाला में निर्वाचक साक्षरता क्लब बनाना है. जिससे औपचारिक शिक्षा प्रणाली के बाहर के लोगों को निर्वाचन जागरुकता के दायरे में लाया जा सके.
पृष्ठभूमि:पिछले एक साल में पूरे देश में लगभग 2.11 लाख ईएलसी स्थापित किए गये हैं. उल्लेखनीय है कि ईएलसी तथा चुनाव पाठशाला के तहत नौ से 12वीं कक्षा के लिए 4 घंटे की विभिन्न गतिविधियों के माध्यम से छात्रों को चुनाव के प्रति जागरुक बनाया जाता है.आयोग की ओर से बताया गया कि मतदाता जागरूकता मंच एक अनौपचारिक मंच है जो चुनाव प्रक्रिया के बारे में जागरूकता के लिए विचार-विमर्श, वाद विवाद प्रतियोगितायें तथा अन्य गतिविधियों के माध्यम से मतदाताओं को जागरूक किया जायेगा.
--------------------------------------------------------------------------------

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========


--------------------------------------------------------------------------------




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.