Monday, 7 January 2019

केवळ मुस्लीम सभापती म्हणून नवनिर्वाचित भाजपा आमदाराचा शपथ घेण्यास नकार

तेलंगणाच्या एकमेव भाजपा आमदाराचा शपथ घेण्यास नकार


केवळ मुस्लीम सभापती म्हणून नवनिर्वाचित भाजपा आमदाराने शपथ घेण्यास नकार दिला आहे. एमआयएमचे पाच वेळचे आमदार मुमताज अहमद खान यांच्याकडून शपथ घेण्यास आक्षेप नोंदवला आहे. ज्या पक्षाला हिंदू संपवायचा आहे, अशा एमआयएमच्या हंगामी सभापतीकडून मी शपथ घेणार नाही, असे राजासिंह यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे तेलंगणा भाजपाचे वादग्रस्त नेते राजासिंह यांनी पुन्हा एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.एमआयएमचे नेते आणि तेलंगणा विधानसभेचे हंगामी सभापतींकडून त्यांनी शपथ घेण्यास नकार दिला आहे. हैदराबादच्या गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यातील एकमेव भाजपा आमदार राजासिंह यांनी एमआयएमचे पाच वेळचे आमदार मुमताज अहमद खान यांच्याकडून शपथ घेण्यास आक्षेप नोंदवला आहे. खान यांना शनिवारी रात्री हंगामी सभापती म्हणून निवडले गेले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे एमआयएमच्या हातातील खेळणे असल्याचा आरोप केला आहे. एमआयएमला हिंदूंना संपवायचे आहे, असे त्यांनी म्हटले. मी अशा हंगामी सभापतीकडून शपथ घेऊ इच्छित नाही, ज्यांच्या पक्षाला हिंदू संपवायचा आहे. ते कधी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणत नाहीत, असे राजासिंह यांनी म्हटले. विधानसभेचे पहिले अधिवेशन १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य मुमताज अहमद खान १६ जानेवारी रोजी हंगामी सभापती म्हणून शपथ घेतील. चारमिनार मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या खान यांना राज्यपाल ईएसएल नरसिंहन हे शपथ देतील. विधानसभेचे अधिवेशन २० जानेवारीपर्यंत चालेल.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://bit.ly/2Vo7a37

=============0===========0==========0==========

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.