हॅकर सय्यद शुजा विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार
भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला होता, असा दावा करून खळबळ उडवून देणारा कथित अमेरिकन सायबर तज्ज्ञ सय्यद शुजाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. लंडनमधील ईव्हीएम हॅकेथॉनने भारताच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण झाले आहे. या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सय्यद शुजाने चेहरा झाकून पत्रकार परिषद घेतली व अनेक धक्कादायक दावे केले. ईव्हीएम हॅक करता येते, भारतात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएममध्ये फेरफार केले. या हॅकिंगची माहिती असल्याने व बिंग फुटेल या भीतीने भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली. भाजपसोबतच अन्य काही राजकीय पक्षही ईव्हीएम हॅकिंगचा आधार घेत असतात, असा दावा करत शुजाने ईव्हीएम हॅकिंगचं प्रात्यक्षिकही दाखवलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने लगेचच पत्रक जारी करत ईव्हीएम हॅकिंगचा दावा फेटाळून लावला होता. भारतात मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत. या मशीन हॅक करणे केवळ अशक्य आहे, असे आयोगाने नमूद केले होते. त्यानंतर आता पुढचे पाऊल उचलत आयोगाने शुजाविरोधात कायदेशीर कारवाई करायचे ठरवले आहे. निवडणूक आयोगाने एक तक्रार अर्ज दिल्ली पोलिसांकडे सादर केला असून शुजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती त्यात केली आहे. ईव्हीएम डिझाइन टीमचा आपण भाग होतो आणि भारतात ज्या ईव्हीएमचा वापर होतो ते हॅक करता येतं, या शुजाच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसून त्याने पत्रकार परिषदेत जे दावे केले आहेत त्या सर्वाचीच सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आयोगाने तक्रार अर्जात केली आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या हत्येमागे ईव्हीएम घोटाळा! सायबर एक्सपर्टचा दावा!
सईद शूजा कोण आहे?
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण-
सईद शूजा याने केलेले काही महत्त्वाचे खुलासे -
माझ्या सहका-यालाही मारले-सईद शूजा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या कर्मचाऱ्याला या घोटाळ्याबाबत एप्रिल २०१४ मध्ये माहिती समजली होती. हैदराबाद येथे भाजपच्या नेत्याबरोबर मी आणि माझ्या सहकाऱ्याची बैठक होती. यावेळी आमच्यावर गोळीबार झाला. त्यात मी थोडक्यात बचावलो तर माझ्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाला जातीय रंग देण्यात आला.शुजा यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न :
प्रश्न : अमेरिका आणि काँगो या देशांत EVM कोणत्याही तक्रारींशिवाय कसे वापरले जात आहेत?
शुजा - मी अमेरिकेतील EVMचा अभ्यास केलेला नाही. तशी संधी मला मिळालेली नसल्याने मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. काँगोतील EVM बद्दल मला काही माहिती नाही.
प्रश्न : गेल्या वर्षी भारतीय निवडणूक आयोगाने EVM हॅक करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. तुम्ही ते आव्हान का स्वीकारलं नाही?
शुजा - मी अमेरिकेत आश्रय घेतला आहे. जर मी भारतात आलो असतो तर माझ्या सुरक्षेच्या काय शक्यता होत्या? जे हे आव्हान स्वीकारू इच्छित होते त्यांना मी पर्याय देऊ केला होता, पण त्यांनी माघार घेतली.
प्रश्न : तुम्ही आताच या विषयावर का बोलत आहात. आताच्या परिषदेतून काय साध्य होईल, असं तुम्हाला वाटतं?
शुजा - मी कशाचीही अपेक्षा करत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर काहीही होणार नाही. EVM राहणारच आहेत आणि जे सुरू आहे ते सुरूच राहणार, काहीही बदलणार नाही. सर्वांनी मतपत्रिकांची मागणी केली तरीही काही होणार नाही. कारण भाजपकडे मतं विकत घेता येतील इतका पैसा आहे. लोकांना काय हवं ते लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी निवडून न दिलेलं आणि अफरातफर करून सत्तेत आलेलं सरकार नंतर सगळ्याच गोष्टींत अफरातफर करतं आणि ते तसंच करत राहणार आणि त्याबद्दल कुणी काही करूही शकत नाही.
प्रश्न : तुमच्याकडे काय पर्याय आहे?
शुजा - छेडछाड करता येणार नाहीत, असे EVM भारतात आहेत. पण त्याचा वापर भारत करणार नाही. कसलीही छेडछाड करता येणार नाही अशा EVMचं डिझाईन मी दिलेलं आहे. किचकट रचना असलेलं हे मशिन वायरलेसपद्धतीने कनेक्ट होत नाही किंवा त्यातून कोणतंही ट्रान्समिशन करता येत नाही.
संयोजक पत्रकार खासदार कपिल सिब्बल यांचे मित्र
शुजा यांनी जे दावे केले आहेत त्याची पडताळणी करावी लागेल, त्यानंतरच यावर काही भाष्य करता येईल. असे काँग्रेस नेते आणि खासदार कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे. संयोजकांतील एक पत्रकार माझे मित्र आहेत. त्यांनीच मला आणि इतर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आंमत्रित केले होते. शुजा यांनी काय दावे केले आहेत ते आम्ही ऐकावेत अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणून पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. कपिल सिब्बल यांनी स्पष्टीकरण देत आपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. मला या पत्रकार परिषदेत बोलवण्यात आले त्यामुळे मी गेलो होतो असे उत्तर दिले आहे. कार्यक्रमाचे आयोजक आशिष रे यांना मी ओळखतो. त्यांनी मला इमेल करून या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. या प्रकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. हे प्रकरण निवडणुकांशी संबंधित आहे असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.
ईव्हीएम हॅकिंगचा आरोपाची चौकशी करा- खासदार सुप्रियाताई सुळे
ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टने केला. या दाव्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. तर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची भारतीय गुप्तचर यंत्रणा अर्थात रॉ कडून चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नसून सरकारने सीबीआयचे कंबरडे मोडल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सीबीआयवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची रॉ कडून चौकशी व्हावी, तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ईव्हीएम हॅकिंगची घटना धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाकडे अनेक वर्षांपासून आम्ही ईव्हीएम बंदीची मागणी करत आहे. अनेक विकसित देशात बॅलेटवर मतदान होतं, मग आपणच का ईव्हीएमचा आग्रह धरतोय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग ईव्हीएम हॅकिंगचा आरोप फेटाळून लावत असले तरी चौकशी झाली पाहिजे. मुंडे साहेब लोकनेते होते, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. तर येत्या निवडणुकीत मतदान हे मतपत्रिकेवर व्हावे, ईव्हीएमबाबत लोकशाहीला धक्का देणारा आरोप झाला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत रॉ कडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळें यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया देताना केली आहे.EVM HACKING: हॅकरची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजितच: भाजपा
भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात हॅकर सय्यद शुजा याने केलेल्या दाव्यानंतर काँग्रेस- भाजपात जुंपली आहे. हॅकरची पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती, आशीष रे हे काँग्रेसच्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ या दैनिकासाठी स्तंभलेखन करतात आणि त्यांनी काही स्तभांमधून राहुल गांधींचे भरभरुन कौतुक केले होते, याकडे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे. या पत्रकार परिषदेत कपिल सिब्बल काय करत होते, असा सवाल उपस्थित करत ही पत्रकार परिषद काँग्रेस आणि राहुल गांधी प्रायोजितच होती, असा आरोप भाजपाने केला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा दावा अमेरिकेत राजकीय आश्रय मागितलेला भारतीय हॅकर सय्यद शुजाने सोमवारी केला होता. ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा त्याने केला होता. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवासाठी काँग्रेस आत्तापासूनच कारणं शोधत आहेत. काँग्रेस पक्ष हा सुनियोजितपणे भारताचे संविधान आणि देशाच्या सर्वोच्च संस्थांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये देशात यूपीएची सत्ता होती, याकडेही रविशंकर प्रसाद यांनी लक्ष वेधले आहे.हॅकर हा शेवटी चोरच, सय्यद शुजावर विश्वास नाही
हॅकर सय्यद शुजाने केला असतानाच या वृत्तावर आता प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हॅकर हा शेवटी चोरच असतो, त्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले असून गेली साडेचार वर्षे हा हॅकर कुठे होता, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूसंदर्भात त्याने हे विधान केले होते. या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. या घडामोडी घडत असतानाच प्रकाश महाजन यांनी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांच्यावर श्रद्धा असणारे लाखो लोक आहे. शुजाच्या विधानांमध्ये किती तथ्य आहे, हा देखील प्रश्नच आहे’, असे प्रकाश महाजनांनी म्हटले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा थेट जनतेशी संबंध होता, प्रत्येक मतदारसंघाची त्यांना अचूक माहिती होती. त्यामुळे त्यांना ईव्हीएमची कधीही चिंता वाटली नसेल, असे त्यांनी म्हटले आहे. गैरमार्गाने युद्ध जिंकणे ही गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा नव्हती. त्यांचा मतदारांवर विश्वास होता. १९८५ मधील एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा फार कमी मतांनी पराभव झाला होता. त्या काळी मतपत्रिका होती. पण मुंडे यांनी मतदानाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवला आणि मोठ्या मनाने स्वत:चा पराभव स्वीकारला होता, अशी आठवणही प्रकाश महाजन यांनी सांगितली. गोपीनाथ मुंडे हे राजकारणातील शिखर गाठत असताना धनंजय मुंडे यांनीच त्यांच्यावर टीका केली होती. अशी टीका गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधकांनीही कधी केली नव्हती. आता तेच धनंजय मुंडे पुळका दाखवत आहेत. आता गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूवरुन राजकीय फायदा घेतला जात आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://bit.ly/2Vo7a37
=============0===========0==========0==========* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://bit.ly/2Vo7a37
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.