Thursday, 23 December 2021

Election Reform Bill' निवडणूक सुधारणा विधेयक' : मतदार कार्ड (Voter Card) आता आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केल्यावर होणाऱ्या परिणामांचे "प्राब" कडून संशोधनात्मक विश्लेषण

Election Reform Bill' निवडणूक सुधारणा विधेयक' : मतदार कार्ड (Voter Card) आता आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केल्यावर होणाऱ्या परिणामांचे "प्राब" कडून संशोधनात्मक विश्लेषण

* दुबार मतदार यादीतून नष्ट होतील का?

* राजकारणावर काय परिणाम होईल?

* आधारकार्ड लिंक केल्यावर माहिती सुरक्षित राहील काय?

* गुप्त मतदान पद्धतीला सुधारणा मारक ठरेल का?

* मतदाराची मतदानाची गोपनीयता उघड होईल का?

* आधारकार्ड लिंक करताना मोबाईल क्र. व इमेल संकलनाचा आयोगाचा उद्देश ?

* सद्याच्या यादीतील मतदार संख्येत घट होईल का?

* दुबार/तिबार मतदार वगळले त्याचा मतदारसंघ निहाय परिणामकारकता?

* मतदारयादीचा सद्यस्थितीत खासगी कंपन्यांना डेटा सहज उपलब्ध होतो तो यापुढेही उपलब्ध होणार का?

* आधारकार्ड लिंक केल्यावर सताधारी पक्ष मतदारांचा मागोवा घेतील का?

* निवडणूक सुधारणा विधेयकाने लोकशाही धोक्यात येईल या विरोधकांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे का?

* मतदारकार्डला आधारकार्ड लिंक केल्यावर भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो काय?

* मतदारकार्डला आधारकार्ड लिंक केल्याचा सकारात्मक व नकारात्मक तुलनात्मक परिणाम काय असेल?

* सुधारित कायद्यान्वये आगामी ५ राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मतदारयादी अद्यावत होणार का?

* निवडणूक सुधारणा विधेयक कायद्याला आव्हान दिल्यास सर्वोच्च न्यायालयात टिकेल काय?

* सद्यस्थितीची मतदार यादी आणि मतदारकार्डला आधारकार्ड लिंक केल्यावर स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होतील? 

* आदि..........

वरील सर्व परिणामांचे "प्राब" कडून संशोधनात्मक विश्लेषण सशुल्क माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा- 
https://imjo.in/XpzMqn



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Wednesday, 22 December 2021

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणूक- १४ जागा बिनविरोध; उर्वरित जागांसाठी चुरस

आमदार अशोक पवार, प्रा.दिगंबर दुर्गाडे, पूजा बुट्टे पाटील, सुरेश अण्णा घुले, प्रकाश अप्पा म्हस्के यांचे पारडे जड

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune District Central Cooperative Bank Election)  पंचवार्षिक निवडणुकीत तीन मंत्र्यांसह १४ जणांची बिनविरोध निवड झालेली असून अधिकृत जाहीर होणे बाकी आहे. या तीन मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित सात जागांसाठी १४ जण निवडणूक रिंगणात असून हवेली मध्ये चुरशीची लढत होणार आहे. भाजपला केवळ तीन जागांवर उमेदवार देण्यात यश आले आहे. या सात जागांसाठी येत्या २ जानेवारीला निवडणूक होणार असून, ४ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील हवेली, मुळशी आणि शिरूर या तीन तालुक्यातील अ वर्ग मतदारसंघात आणि ड वर्ग मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे. याशिवाय क वर्ग व महिला राखीव मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. निवडणूक रिंगणात आमदार अशोक पवार (शिरूर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (हवेली), जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), आत्माराम कलाटे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके आदी प्रमुख उमेदवार उरले आहेत. दरम्यान उर्वरित सात जागांसाठी १४ जण निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये संबंधित गटातील मतदारांमध्ये आमदार अशोक पवार, दिगंबर दुर्गाडे, पूजा बुट्टे पाटील, सुरेश घुले, प्रकाश म्हस्के यांचा प्रभाव असल्याने या निवडणुकीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे. सर्वाधिक चुरस हवेली तालुक्यातील अ गटातील मानली जात आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी विकास नाना दांगट यांच्यात पक्षांतर्गत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी दोघांपैकी एकाची उमेदवारी निवड निश्चीत करणे टाळले होते. विकास नाना दांगट यांनी मिळालेली संधी मानून यश प्राप्त करून नेत्यांचा विश्वासास पात्र ठरण्याचा चंग बांधला आहे तर प्रकाश म्हस्के यांनि आपणच सर्वाधिक मतांनी विजयी होऊ असा आत्मविश्वास मतदारांना दर्शवत आहेत. तर पुरंदर मधून प्रा.दिगंबर दुर्गाडे सर यांची निवड देखील निश्चीत मानली जात आहे. या गटातील मतदारांमध्ये त्यांचा व पक्षाचा प्रभाव आहे. आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश अण्णा घुले यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. महिला गटातून पूजा बुट्टे पाटील यांचे पारडे जड असून त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याने त्यांचाही विजय निश्चीत समजला जात आहे. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. या जागांसाठी १६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सात डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यानंतर ८ डिसेंबरपासून अर्ज माघारी घेण्यास सुरवात झाली होती. बुधवारी (ता.२२) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. आज दिवसभरात ३४ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. बिनविरोध निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी तडजोडी झाल्या. इंदापूर तालुक्यातून भाजप पुरस्कृत आप्पासाहेब जगदाळे हेदेखील बिनविरोध निवडून आले. जुन्नर मध्ये अखेरच्या क्षणी रघुनाथ लेंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संजय काळे यांचा मार्ग मोकळा झाला. मावळमध्ये भोईरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन अर्ज अवैध ठरला होता परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी देखील माघार घेतल्यामुळे मावळमधून ज्ञानोबा दाभाडे हे बिनविरोध निवडून आले.
सलग आठव्यांदा रमेश थोरात बिनविरोध
जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात हे अ गटातून बिनविरोध निवडून येत सलग आठव्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. आज निर्धारित वेळेमध्ये भाजपचे अभिमन्यू गिरिमकर व राष्ट्रवादीचे अशोक खळदकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने थोरात यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले. थोरात हे १९८५ पासून म्हणजेच गेली ३७ वर्ष सतत या बँकेच्या संचालक पदावर थोरात कार्यरत आहे. गेली सलग पाच वर्ष बँकेचे अध्यक्ष आहेत. 
जिल्हा बँकेवर अप्पासाहेब जगदाळे बिनविरोध
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2021 -26 च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रतिष्ठेच्या इंदापूर ' अ ' मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांची चौथ्यांदा संचालकपदी बिनविरोध निवड झाली. आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अप्पासाहेब जगदाळे यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची पुन्हा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार 
उपमुख्यमंत्री अजित पवार- बारामती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, आमदार संग्राम थोपटे -भोर, रमेश थोरात -दौंड, अप्पासाहेब जगदाळे -इंदापूर ,संजय काळे -जुन्नर, आमदार दिलीप मोहिते- खेड, ज्ञानोबा (माऊली) दाभाडे- मावळ ,आमदार संजय जगताप -पुरंदर, रेवणनाथ दारवटकर- वेल्हे ब वर्ग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर, अनुसूचीत जाती जमाती प्रवीण शिंदे हवेली, इतर मागास प्रवर्ग संभाजी होळकर बारामती, भटक्या विमुक्त जाती जमाती दत्तात्रय येळे, बारामती यांचा समावेश आहे
अशी होणार लढत-  हवेली तालुका- प्रकाश म्हस्के विकास दांगट मुळशी तालुका- आत्माराम कलाटे ,सुनील चांदेरे शिरूर तालुका- आमदार अशोक पवार, आबासाहेब गव्हाणे क वर्ग बँका पतसंस्था- प्रदिप विद्याधर कंद ,सुरेश घुले, दिलीप मुरकुटे. ड वर्ग-  दादासाहेब फराटे दिगंबर दुर्गाडे. महिला- (दोन जागा) आशाताई बुचके, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-

अ वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 1305 जागा-13
1.आंबेगाव अ.क्र. 1 ते 59 (मतदारसंख्या-59)
2.बारामती अ.क्र. 59 ते 254 (मतदारसंख्या-171)
3.भोर- अ.क्र. 255 ते ३२९ (मतदारसंख्या-74)
4.दौंड- अ.क्र. ३३० ते ४४५ (मतदारसंख्या-115)
5.हवेली- अ.क्र. 456 ते ५८८ (मतदारसंख्या-132)
6.इंदापूर- अ.क्र. ५८९ ते ७७३ (मतदारसंख्या-184)
7.जुन्नर- अ.क्र. ७७४ ते ८५० (मतदारसंख्या-76)
8.खेड- अ.क्र. ८५१ ते ९५३ (मतदारसंख्या-102)
9.मावळ- अ.क्र. ९५४ ते १००८ (मतदारसंख्या-54)
10.मुळशी- अ.क्र. १००९ ते 1054 (मतदारसंख्या-45)
11.पुरंदर- अ.क्र. १०५५ ते ११४९ (मतदारसंख्या-94)
12.शिरूर- अ.क्र. ११५० ते १२८१ (मतदारसंख्या-131)
13.वेल्हा- अ.क्र. १२८२ ते १३०५  (मतदारसंख्या-23)
ब वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १३०६ ते १४१२)- 106
क वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १४१३ ते ३०१९) - 1606
ड वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 3985
ड वर्ग व्यक्ती सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. 1 ते १६६५) - 1665
एकूण 7005 + 1665 = 8670  मतदार आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-

मतदार संघ - 'अ ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ब ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'क ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - व्यक्ती सभासद यादी

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  


 

Friday, 17 December 2021

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका; ओबीसीच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून 18 जानेवारीला मतदान

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या होत्या; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राखीव जागांच्या खुल्या प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. 
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या खालीलप्रमाणे जागा आता खुल्या प्रवर्गातून निवडणार
·         भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- 23 (एकूण जागा 105)
·         भंडारा व गोंदियातील 15 पंचायत समित्या- 45 (एकूण जागा 210)
·         राज्यातील 106 नगरपंचायती- 344 (एकूण जागा 1,802)
·         महानगरपालिका पोटनिवडणुका- 1 (एकूण 4 जागा)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Friday, 3 December 2021

पुणे जिल्हा बँक निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवाराकडून तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज भरण्याची अक्कलहुशारी!

सहकारी संस्थांच्या सुधारित निवडणुक नियमांच्या त्रुटींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांकडून अफलातून शक्कल!  



सहकारी संस्थांच्या सुधारित निवडणुक नियमांच्या त्रुटींची पोलखोल काही उमेदवारांकडून होत असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाची निवडणूक जिंकण्यासाठी अफलातून शक्कल लढवली जात असल्याचे समोर आले आहे. एका इच्छूक उमेदवाराकडून तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज भरण्याची अक्कलहुशारी केली जात असून किती अर्ज भरावे यासाठी मर्यादा नसल्याचा गैरफायदा या उमेदवाराकडून घेतला जात असून त्यासाठी तब्बल एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून प्रत्येक तालुक्यात एक जागा आहे. या गटामध्ये तालुक्यात मतदारांची संख्या 23 ते 110 च्या दरम्यान आहे. 50 च्या मतदारसंख्या असलेले 2 तालुके आहेत तर 3 तालुके 100 संख्या मतदार असलेले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून प्रस्थापित उमेदवार हे प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळतील अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांच्याकडून सूचक म्हणून स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सह्या घेत आहेत. दोन उमेदवारांना एकानेच सूचक म्हणून सही दिल्यास त्यांचे उमेदवारी अर्ज बाद होतात. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरून सूचक अडकवून ठेवण्याचा प्रकार सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. नवीन सहकार कायद्याचा गैरफायदा घेत बहुतेक दिग्गज संचालकांनी अफलातून राजकारण सुरू केले आहे. सुधारित नियमानुसार एका उमेदवाराने किती अर्ज दाखल करावेत याचे बंधन नसल्याने प्रस्थापित उमेदवारांकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून यासाठी जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. यामुळे एकाच उमेदवाराने चक्क एकावन्न उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज भरता येतात; परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. त्याचा गैरवापर उमेदवार करू लागले आहेत. मतदान फिक्स करण्यासाठी देखील सही घेऊन मते मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याच्या समजातून हे कृत्य केले जात आहे. वास्तविकपणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व आहे मात्र पक्षांतर्गत गट-तटाचे राजकारण चुरशीचे आहे. पालकमंत्री अजितदादा यांचा शब्द अंतिम असला तरी मतदारांशी असलेला संबंध व जिंकण्याची खात्री दर्शवून देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे यामधूनच काही उमेदवार अफलातून शक्कल आजमावत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजप या निवडणुकीमध्ये निष्क्रिय आहे कारण प्रमुख पदाधिकारी जिल्हा बँक निवडणुकीसाठी निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत एकूण 21 संचालक पदासाठी निवडणूक होत आहे. अ. गट तालुका प्रतिनिधी, विकास सोसायटी या मतदारसंघातून १३ जागा तर ब. गट कृषी, पणन, प्रक्रिया संस्था प्रतिनिधी या मतदारसंघातून 1 जागा, क. गट नागरी सेवा व पतसंस्था या मतदारसंघातून 1 जागा,ड. गट पाणीपुरवठा, ग्राहक व इतर संस्था या मतदारसंघातून 1 जागा,अनु. जाती, जमाती, वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रतिनिधीसाठी प्रत्येकी 1 जागा प्रमाणे निवडणूक होत आहे. एकूण मतदारांचे 4 प्रमुख गट असून 1 व्यक्ती सभासद म्हणून गट आहे. पुणे जिल्हा बँक निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 8670 इतकी आहे. यामध्ये ड वर्ग व्यक्ती सभासद मतदारसंख्या - 1665 इतकी असून अ,ब,क,ड, गटातील मतदारसंख्या 7005 इतकी आहे. मतदार यादीत गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यातील देखील मतदारांचा समावेश आहे. तर मतदार यादीत जिल्ह्याबाहेरील सभासद संस्थेमध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ मर्या. या संस्थेचा देखील मतदार म्हणून यादीत समावेश आहे. 
विद्यमान मंत्र्यांसह आजी-माजी आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!
गेल्या तीन दिवसांत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्येकी चार अर्ज दाखल केले. पीडीसीसीच्या संचालक मंडळातील २१ जागांकरिता दोन जानेवारीला मतदान होणार आहे. तर, ता. ४ जानेवारीला मतमोजणी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्याची मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन दोन जानेवारीला मतदान होणार आहे, त्यासाठी बुधवार (ता. १ डिसेंबर) २५ उमेदवारी अर्ज आले होते. तर 2 डिसेंबर पर्यंत १३२ जणांनी ४३२ उमेदवारी अर्ज नेले होते. गेल्या चार दिवसांत आतापर्यंत ३४ जणांनी ६० अर्ज दाखल केले आहेत. पहिला अर्ज विद्यमान अध्यक्ष रमेशअप्पा थोरात यांनी दाखल केला. त्यांनीच काल तीन अर्ज सादर केले. तर, आज आणखी तीन अर्ज दाखल केले आहे, त्यामुळे त्यांच्या एकट्याची उमेदवारी अर्जसंख्या ही सात झाली आहे. त्यांनी ते सर्व अर्ज हे दौंड अ वर्ग मतदारसंघातून सादर केले आहेत. महिला प्रतिनिधी वैशाली नागवडे (दौंड) यांनी दोन आणि वंदना काळभोर (लोणी काळभोर, ता. हवेली), सरोजिनी मोकाशी (शिरूर), जयश्री खेडेकर यांनी उमेदवारी दाखल केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ वर्ग, बारामती तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. २ डिसेंबर) दाखल केले आहेत. तसेच आमदार अशोक पवार (शिरूर), सुनील चांदेरे (मुळशी), रणजित निंबाळकर (इंदापूर), रवींद्र काळे (शिरूर), भाऊसाहेब सपकळ (इंदापूर), दिलीप काळभोर, विकास दांगट, प्रकाश जगताप (हवेली), स्वप्नील गायकवाड (शिरूर) यांनी अ वर्गातून उमेदवारी अर्ज दिले आहेत. सतीश खोमणे, रामभाऊ टुले (वि.जा./भ.ज../वि.मा.प्र.), भालचंद्र जगताप, दादासाहेब फराटे (ड वर्ग), राजेंद्र कांचन (क वर्ग) हे आज उमेदवारी दाखल केलेले इतर उमेदवार आहेत. वीरधवल जगदाळे यांनी अ, क, ड अशा तीन वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केलेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सहा डिसेंबर आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात (तिसरा मजला, पीडीसीसी बॅंक रोड, पुणे) शासकीय सुट्ट्या वगळून अर्ज दाखल करता येईल.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील गट निहाय मतदारसंख्या-

अ वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 1305 जागा-13
1.आंबेगाव अ.क्र. 1 ते 59 (मतदारसंख्या-59)
2.बारामती अ.क्र. 59 ते 254 (मतदारसंख्या-171)
3.भोर- अ.क्र. 255 ते ३२९ (मतदारसंख्या-74)
4.दौंड- अ.क्र. ३३० ते ४४५ (मतदारसंख्या-115)
5.हवेली- अ.क्र. 456 ते ५८८ (मतदारसंख्या-132)
6.इंदापूर- अ.क्र. ५८९ ते ७७३ (मतदारसंख्या-184)
7.जुन्नर- अ.क्र. ७७४ ते ८५० (मतदारसंख्या-76)
8.खेड- अ.क्र. ८५१ ते ९५३ (मतदारसंख्या-102)
9.मावळ- अ.क्र. ९५४ ते १००८ (मतदारसंख्या-54)
10.मुळशी- अ.क्र. १००९ ते 1054 (मतदारसंख्या-45)
11.पुरंदर- अ.क्र. १०५५ ते ११४९ (मतदारसंख्या-94)
12.शिरूर- अ.क्र. ११५० ते १२८१ (मतदारसंख्या-131)
13.वेल्हा- अ.क्र. १२८२ ते १३०५  (मतदारसंख्या-23)
ब वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १३०६ ते १४१२)- 106
क वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. १४१३ ते ३०१९) - 1606
ड वर्ग सभासद एकूण मतदारसंख्या - 3985
ड वर्ग व्यक्ती सभासद एकूण मतदारसंख्या (अ.क्र. 1 ते १६६५) - 1665
एकूण 7005 + 1665 = 8670  मतदार आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुक सन २०२०-२०२५ अंतिम मतदार यादी-

मतदार संघ - 'अ ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ब ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'क ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - संस्था सभासद यादी
मतदार संघ - 'ड ' वर्ग - व्यक्ती सभासद यादी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत २१ पैकी सहा बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी सहा जण बिनविरोध झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोन मंत्र्यांसह, दोन आमदार आणि अन्य दोघा जणांचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेवर बिनविरोध झालेले दोन्ही मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर, दोन्ही आमदार कॉंग्रेसचे आहेत. भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांचा बिनविरोध झालेल्या दोन आमदारांमध्ये समावेश आहे. वेल्हे तालुक्यातील रेवणनाथ दारवटकर आणि मावळ तालुक्यातील माऊली दाभाडे हे अन्य दोघे जण बिनविरोध झाले आहेत. या निवडीमुळे दारवटकर हे सलग सातव्यांदा जिल्हा बॅंकेचे संचालक झाले आहेत. हे सर्वजण तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून जिल्हा बॅंकेवर निवडले गेले आहेत. जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागा आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी एक, याप्रमाणे १३ तालुक्यात मिळून तेरा जागा आहेत. याशिवाय ब, क आणि ड मतदारसंघातून प्रत्येकी एक, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, इतर मागास प्रवर्गातून एक, भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून एक आणि महिला प्रवर्गातून दोन जागा आहेत. यासाठी सध्या १५९ जण निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना येत्या २२ डिसेंबरपर्यंत माघारी घेता येणार आहे. या संचालक मंडळाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये बांधकाम राज्यमंत्री आणि विद्यमान संचालक दत्तात्रेय भरणे, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष रमेश थोरात, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, सविता दगडे, सतीश खोमणे, विश्‍वास देवकाते, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, शरद बुट्टे पाटील आदींचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निश्चित करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तर भाजपकडून उमेदवारांचे पॅनल ठरवण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पॅनमध्ये लढत होणार आहे. बँकेवर सोसायटी अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर काँग्रेसचे दोन संचालक आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि चुरस लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व गटांमध्ये उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले आहे. भाजपकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली. सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नसले तरी पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूकीतून निवृत्ती गवारी यांची माघार
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग मतदार संघातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) शिरुरमधून बँकेचे विद्यमान संचालक निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच निवृत्ती गवारे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस आय पुरस्कृत सहकार पॅनेलमध्ये आमदार अशोक पवार यांचे नाव शिरुरमधून अधिकृत उमेदवार म्हणून दोन दिवसांपुर्वी जाहिर केले आहे. त्यामुळे निवृत्ती गवारी यांच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार पवार यांच्या निवडणुकीचा पक्षांतर्गत मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल

अ वर्ग मतदार संघ
बारामती - अजित पवार (बिनविरोध)
आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील (बिनविरोध)
भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस- बिनविरोध)
पुरंदर- संजय जगताप (काँग्रेस-बिनविरोध)
वेल्हा - रेवणनाथ दारवटकर (बिनविरोध)
मावळ - ज्ञानोबा दाभाडे (बिनविरोध)
खेड - दिलीप मोहिते-पाटील
शिरूर- अशोक पवार
दौंड- रमेश थोरात 
जुन्नर- संजय काळे
मुळशी - सुनिल चांदेरे
इंदापूर- रणजित निंबाळकर
हवेली - मैत्रीपूर्ण लढत (ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के व विकास दांगट रिंगणात)
ब वर्ग मतदार संघ  : दत्तात्रय भरणे (इंदापूर)
क वर्ग मतदार संघ : सुलेश घुले (हवेली)
ड वर्ग मतदार संघ : दिगंबर दुर्गाडे (पुरंदर)
अनुसूचित जाती -जमाती: प्रविण शिंदे (हवेली) 
इतर मागासवर्गीय मतदार संघ  : संभाजी होळकर (बारामती)
विभक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघ  : दत्तात्रय येळे (बारामती)
महिला प्रतिनिधी-
1) पुजा बुट्टेपाटील (जुन्नर)
2) निर्मला जागडे (वेल्हा)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Saturday, 27 November 2021

राज्यातील 105 नगरपंचायतींसह भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी 21 डिसेंबरला मतदान

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी 21 डिसेंबरला मतदान

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; तसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू  होईल. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जि. प. आणि पं. स. ची नावे: भंडारा जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर. गोंदिया जिल्हा परिषद- त्यांतर्गतच्या पंचायत समित्या- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी.

राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

विविध 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या 18; तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यासाठी 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली, चंद्रपूर- पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा, गडचिरोली- एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड.
पोटनिवडणुकांसाठीही मतदान- विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. शिरोळ (6 अ), नागभीड (4 अ), जत (5 ब), सिल्लोड (12 अ), फुलंब्री (2 आणि 8), वानाडोंगरी ( 6 अ) आणि ढाणकी (12 आण 13) या नगरपरिषद/ नगरपंचायतींतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आज राज्य सहकारी निवडणू‍क प्राधिकरणाने जाहीर केला. या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोविड-19 परिस्थितीमुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून या निवडणुका 1 सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण एकूण 45 हजार 409 सहकारी संस्थांचा 6 टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे 4 हजार 362 व 12 हजार 729 अशा एकूण 17 हजार 91 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केलेले असून त्यामध्ये 18 हजार 310 कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा तर उर्वरित 8 हजार 828 सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूग्ध संस्था आदींचा समावेश आहे. प्राधिकरणाने राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी 16 बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या दोन 2022 या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत. दरम्यान गोंदीया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ठ असून त्यात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल होत्या. या अनुषंगाने न्यायालयाने कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश 18 नोव्हेंबर 2021 रोजी दिले. त्यानुसार आता प्राधिकरणाने निवडणुकीस पात्र 266 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सुरु केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून तिसऱ्या टप्प्यात 27 हजार 138 सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया घोषित केली आहे. या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूका मुदतीत पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूकीस पात्र संस्थांनी प्रारुप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधीत जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांचे संचलन, अधीक्षण व निर्देशन करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपवलेली आहे. यामध्ये 250 व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळण्यात आलेल्या आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

 

Wednesday, 24 November 2021

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुका जाहीर

चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान 

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी होईल. 
पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिका निहाय रिक्तपदे-
धुळे- 5ब,
अहमदनगर- 9क,
नांदेड वाघाळा- 13अ 
सांगली मिरज कुपवाड- 16अ.

-------------------------------

ग्रामपंचायतींमधील 7 हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल.
-------------------------------

113 नगरपंचायतींसाठीसह भंडारा व गोंदिया जि.प.साठी लवकरच निवडणुका

राज्यातील 113 नगरपंचायतींसह भंडारा व गोंदिया जि.प.साठी प्रारूप मतदार याद्या 

पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरपंचायत देहू व माळेगावसह राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या असून 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तर भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; तसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देखील लवकरच होणार असून कार्यक्रम केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे.  प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.
निवडणुका होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, मालेगाव, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. एकूण- 113.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================