Monday 30 January 2017

अनधिकृत बांधकामधारक उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपात्र

अनधिकृत बांधकामधारक उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपात्र



 आगामी महापालिका निवडणूक लढविण्या-या इच्छुकांना आता आणखी एका गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण आता आपत्य, जात प्रमाणपत्राबरोबरच अनर्हतामध्ये उमेदवार व त्यांच्या कुटुंबाच्या नावावर कोणते अनधिकृत बांधकाम नसेल तरच त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. त्यामुळे इथूनपुढे अनधिकृत बांधकामधारक उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीसाठी अपात्र ठरणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना अनामत रक्कम, आपत्य, जात या गोष्टी जशा महत्वाच्या होत्या. तसेच आता उमेदवारी अर्ज भरताना अनर्हतेमध्येच उमेदवार व त्याच्या कुटुंबियांच्या नावे अनधिकृत बांधकाम नाही अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसे प्रतिज्ञापत्र नसेल तर त्याचा अर्ज बाद करण्यात येणार आहे
 राज्यातील दहा महापालिकांची 2017 फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने इच्छुक उमेदवारांना काही नियम ठेवले आहेत. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामावरून नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अनधिकृत बांधकाम असणाऱ्यांना निवडणूकच लढविता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 
शहरात सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे महापालिकेतील निवडणूक विभागाचे अधिकारी सर्तक झाले आहेत. इच्छूक उमेदवाराने निवडणुकीच्या अर्जात स्वतःची स्वाक्षरी, आपल्याच प्रभागातील मतदार असणारा सूचक व अनुमोदक असावा, अनामत रक्कम भरलेली पावती, स्वतःच्या व कुंटूबातील व्यक्तीच्या नावावर अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नाही, असे प्रतिज्ञापत्र देणे, 12 सप्टेंबर 2001 नंतर झालेल्या अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक नसावी, इच्छुकांकडे शौचालय असावे तसे प्रतिज्ञा पत्र देणे गरजेचे आहे. 
तसेच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना अनामत रक्कम भरणे गरजेचे असते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी अडीच हजार तर सर्वसाधारण गटातील उमेदवारासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम आकारण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.