पुण्याचा कल भाजपकडे! पूर्णत: शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण : "प्राब'चे संचालक भुजबळ
पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणाला किती जागा मिळणार? सर्वांत मोठा पक्ष कोणता ठरेल? सत्तेवर कोण असेल? या प्रश्नांची उत्तरे एवढ्यात कदाचित कोणाकडेही नसतील; मात्र सध्याचा पुण्याचा "राजकीय मूड' काय म्हणून विचाराल तर, एका व्यापक मतदार सर्वेक्षणाने त्याला उत्तर दिले आहे. बहुसंख्य पुणेकर मतदारांचा कल भाजपकडे असल्याचे दिसून आले आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदारांची पसंती आहे. हा "मूड' कायम राहतो की मतदानापर्यंत बदलतो, हे दीड महिन्यातील राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेवर अवलंबून आहे.
केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर पॉलिटिकल रिसर्च अँड ऍनालिसिस ब्युरो (प्राब) या संस्थेने खास "सकाळ'साठी संपूर्ण शहरात व्यापक सर्वेक्षण केले. त्यातून सध्याची राजकीय कल-उकल झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा सत्ता हवी असेल, तर खूप कष्ट करण्याची गरज आहे असेच सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. भाजपला सध्या अनुकूल वातावरण दिसत असले तरी, येत्या दीड महिन्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार असल्याने ही अनुकूलता टिकवून ठेवणे मोठे आव्हान ठरणार आहे.
- पुणे महापालिकेच्या नव्या सर्व 41 प्रभागांमध्ये खुल्या आणि गोपनीय प्रश्नावलीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. प्रभागातील मतदारसंख्येच्या 5 टक्के मतदारांकडून खुल्या प्रश्नावलीद्वारे मत अजमावण्यात आले. पालिका निवडणुकीत मतदानास पात्र असलेल्या एकूण मतदारांची संख्या 24 लाख 88 हजार 570 आहे. त्यातील तब्बल 1 लाख 31 हजार 400 मतदारांची मते अजमावण्यात आली. पैकी खुल्या प्रश्नावलीद्वारे 1 लाख 24 हजार 434 मतदारांची मते अजमावण्यात आली, तर प्रभागातील सामाजिक, राजकीय व प्रभावशाली व्यक्ती, तसेच सामाजिक संस्था, पदाधिकारी आणि ज्यांच्या निर्णयाचा प्रभाव मोठ्या समुदायावर पडतो, असे पदाधिकारी अशा एकूण 6966 व्यक्तींची मते गोपनीय प्रश्नावलीद्वारे जाणून घेण्यात आली. हे प्रमाण अशा प्रभावी व्यक्तींच्या शहरातील एकूण संख्येच्या 70 ते 75 टक्के आहे. (म्हणजे थोडक्यात 100 प्रभावी लोकांपैकी 75 जणांची मते विचारात घेतली आहेत.)
- प्रत्येक प्रभागातील मतदारांकडून स्थानिक समस्या, तसेच इच्छुक उमेदवारांबाबत पसंतीक्रम जाणून घेण्यात आला. इच्छुक उमेदवारांच्या नकारात्मक आणि सकारात्मकतेबाबत निवडणुकीत होणारा परिणामही जाणून घेण्यात आला.
- निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांच्या शक्यतेवर अवलंबून मतदारांची मते अजमावण्यात आली. यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत भागानुसार, पक्षातील सामाजिक आरक्षणानुसार, तसेच पक्षांतर्गत वादाच्या शक्यतेवर यशस्वीतेचे प्रमाण घेण्यात आले. निवडणुकांवर सामाजिक समीकरणांचा होणारा परिणाम जाणून घेण्यात आला. त्यात मराठा क्रांती मूक मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, संविधान मोर्चा, तसेच विविध सामाजिक प्रमुख मागण्यांचा विचार करून त्यामुळे निर्माण झालेल्या मानसिकतेचा महापालिकेच्या निवडणुकीवर होणारा परिणामही जाणून घेण्यात आला.
- महापालिका निवडणुकीवर प्रभावशाली ठरतील, अशा केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांबाबत नागरिकांची मते अजमावण्यात आली. यामध्ये नोटाबंदी, बहुसदस्यीय पद्धत, विकास आराखडा, महापालिकेची हद्दवाढ, मराठा व मुस्लिम आरक्षण, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि इतर समाजांबाबत घेतलेले हितकारक निर्णय, मेट्रो प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्मार्ट सिटी, स्टार्ट अप आदी मुद्यांचा समावेश होता.
- महापालिकेच्या स्थानिक राजकारणाचा निवडणुकीत होणारा परिणाम, तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांनी वारंवार बदललेली भूमिका, पक्षांतर, तसेच स्थानिक प्रभागातील व्यक्तीनुसार आणि राजकीय पक्षांची पसंती अजमावण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, आमदार, खासदार, मतदारसंघनिहाय पदाधिकारी व पक्षांच्या शहराध्यक्षांची भूमिका, त्यांच्या सकारात्मक व नकारात्मकतेचा होणारा परिणाम जाणून घेण्यात आला.
- बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने कोणाला कोणत्या गटातून उमेदवारी मिळेल, यावर तेथील स्थानिक गणित अवलंबून आहे. प्रभागाची भौगोलिक स्थिती व्यापक असल्याने भागानुसार नागरिकांनी त्या त्या भागातील व्यक्तींना पसंती दर्शविली आहे.
तुमचा आवडता पक्ष...
"आपला आवडता पक्ष कोणता', असा प्रश्न पुण्याच्या मतदारांना विचारण्यात आला. त्यावर एकूण मतदारांपैकी 32.21 टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 21.18 टक्के मतदारांचा ओढा आहे. कॉंग्रेसला 16.47 टक्के मतदारांची पसंती असून, शिवसेनेला 15.43, एमआयएम आणि इतरांना 5.74 टक्के, मनसेला 4.27 टक्के, तर रिपब्लिकन पक्षाला 3.40 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात आढळून आली आहे.

रणनीती राबविण्यास उपयोग
जनमत सर्वेक्षणातून मतदारांचा कौल जाणून घेतल्यास त्याचा उपयोग राजकीय, धोरणात्मक रणनीती राबविण्यास होतो, असे सांगून प्राबचे संचालक चंद्रकांत भुजबळ म्हणाले,"" स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी व प्रश्न अचूकपणे जाणून घेतल्यास मतदारांचा कलदेखील स्पष्ट होतो. त्यामुळे ते प्रश्न या चाचणीत जाणून घेतले, तसेच प्रभागातील आणि एकूण शहरातील स्थानिक राजकारणावरील प्रभावशील व्यक्तींच्या प्रमाणातदेखील सर्वेक्षणाद्वारे त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एका मतदाराला एकाच वेळी चार जणांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला असून, त्याबाबत त्यांच्या उत्सुकता दिसून आली. चारपैकी दोघांना मत दिल्यावर उरलेल्या दोघांबाबत संभ्रमावस्था असल्याचेही आढळले.''

पूर्णत: शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण : "प्राब'चे संचालक भुजबळ (फोटो घ्यावा)
सर्वसाधारण प्रश्नावली भरून घेताना एकूण मतदारांच्या पाच टक्के नागरिकांची मते अजमावण्यात आली असून, हे सर्वेक्षण सध्याच्या शास्त्रीय पद्धतीने काटेकोरपणे केल्याने उच्च दर्जाचे आणि सत्यतेच्या जवळ जाणारे झाले आहे, असे प्रतिपादन "प्राब'चे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी केले. घरकाम करणाऱ्यांपासून, शिक्षक, टपाल, बॅंक कर्मचारी अशा रोज किमान 25 जणांशी संपर्क येणाऱ्यांशी संस्थेच्या यंत्रणेने संपर्क साधला. त्याचप्रमाणे ज्या घटकांचा स्थानिक पातळीवर परिणाम होऊ शकतो, अशा सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी यांचेही प्रतिनिधित्व सर्वेक्षणात घेतलेले आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. शहराचा कल ढोबळपणे जाणण्यासाठीच नव्हे, तर प्रत्येक प्रभागात अ, ब, क आणि ड मध्ये कोणत्या पक्षाची काय परिस्थिती राहील, याचा अंदाज घेण्यासाठीदेखील सूक्ष्मपणे सर्वेक्षण करण्यात आले, असेही भुजबळ यांनी सांगितले.

युवा मतदार निर्णायक
महापालिकेच्या निवडणुकीत यंदा युवक मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. यामुळे तरुणांच्या मतांवर येत्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल, असे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत यंदा युवक मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. यामुळे तरुणांच्या मतांवर येत्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल, असे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील २३ ते ४० या वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ३९.८० टक्के एवढी आहे. ४० ते ६० या वयोगटातील प्रौढ मतदारांची संख्या ३८.३८ टक्के एवढी, तर ६० वर्षांवरील मतदारांची संख्या १८.२२ टक्के एवढी आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणारा मतदार हा १८ ते २३ या वयोगटात मोडतो. त्या मतदारांची संख्या ३.६० टक्के एवढी आहे. हा नवीन मतदार ८९ हजार ६६९ आहे. २३ ते २४ वयोगटातील मतदार ९ लाख ९० हजार ४६८, ४० ते ६० या वयोगटातील मतदार ९ लाख ५५ हजार २१, तर साठीवरील मतदार ४ लाख ५३ हजार ४१२ आहेत. शनिवार-सदाशिव पेठ हा वृद्ध मतदारांचे प्रमाण सर्वाधिक असलेला प्रभाग ठरला असून, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी हा ‘सर्वांत तरुण प्रभाग’ झाला आहे. शनिवार-सदाशिव पेठ प्रभागातील साठ वर्षांवरील मतदारांची संख्या सर्वाधिक ३१.०३ टक्के असून, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी प्रभागात २३ ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ५३.०३ टक्के आहे.
पुण्यातील १८ ते ४० या वयोगटातील मतदारांचे एकूण मतदारसंख्येतील प्रमाण हे ४३.४० टक्के एवढे आहे. त्यामुळे तरुणवर्ग काय विचार करतो, त्यावर निवडणुकीची बरीचशी गणिते अवलंबून राहण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.