Wednesday 11 January 2017

10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल

10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल






राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. तसंच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे.


जिल्हा परिषद पहिला टप्पा – (16 फेब्रुवारीला मतदान)
औरंगाबाद, जालना, परभणी,  हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,
जिल्हा परिषद दुसरा टप्पा – (21 फेब्रुवारीला मतदान)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली
जिल्हा परिषद : पहिला टप्पा
अर्ज करण्याची मुदत : 27 जानेवारी – 1 फेब्रुवारी
मतदान : 16 फेब्रुवारी
जिल्हा परिषद : दुसरा टप्पा
अर्ज करण्याची मुदत : 1 फेब्रुवारी – 6 फेब्रुवारी
मतदान : 21 फेब्रुवारी
मतमोजणी : 23 फेब्रुवारी
महापालिका 
अर्ज दाखल करण्याची मुदत : 3 फेब्रुवारी
अर्ज माघारी घेण्याची मुदत : 7 फेब्रुवारी
मतदान : 21 फेब्रुवारी
मतमोजणी : 23 फेब्रुवारी
नागपूर जिल्हा परिषद का वगळली ?
पारशिवनी आणि वानाडोंगरी हे जिल्हा परिषद मतदार संघ होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना नगरपरिषद, नगरपंचायत घोषित केले. या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. निवडणुकीला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना, असा सरकारी निर्णय घेता येत नाही, असं वाद याचिकाकर्त्याने केला. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतून वगळण्यात आली आहे.
निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

महापालिका : मतदान आणि निकालाची तारीख

महापालिकामतदानाची तारीखनिकालाची तारीख
मुंबई21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पुणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पिंपरी चिंचवड21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
ठाणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
 
उल्हासनगर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नाशिक21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नागपूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अकोला21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
 
अमरावती21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सोलापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी

जिल्हा परिषद : मतदान आणि निकालाची तारीख

जिल्हा परिषदमतदानाची तारीखनिकालाची तारीख
रायगड21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
रत्नागिरी21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सिंधुदुर्ग21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
पुणे21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सातारा21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सांगली21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
सोलापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
कोल्हापूर21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी

नाशिक21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
जळगाव16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अहमदनगर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
अमरावती21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
बुलडाणा16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
यवतमाळ16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
औरंगाबाद16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
जालना16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
परभणी16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
हिंगोली16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
बीड16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नांदेड16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
उस्मानाबाद16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी


लातूर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
नागपूर—–—–
वर्धा16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
चंद्रपूर16 फेब्रुवारी23 फेब्रुवारी
गडचिरोली16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी23 फेब्रुवारी



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.