Wednesday, 4 January 2017

पाच राज्यांत रणधुमाळी!; गोवा, पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी, उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांत मतदान

पाच राज्यांत रणधुमाळी!;  गोवा, पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी, उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांत मतदान


पाच राज्यांत रणधुमाळी!;
गोवा, पंजाबमध्ये ४ फेब्रुवारी, उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांत मतदान
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाबसह इतर राज्यांच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष
निवडणूक आयोगाने बुधवारी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 4 मार्चपासून या निवडणुकांना सुरुवात होत आहे. तर 11 मार्च रोजी एकाच दिवशी सर्व राज्यांची मतमोजणी पार पडणार आहे. यावेळी उत्तरप्रदेशमध्ये नेमकं कोण बाजी मारेल याची सर्वांना उत्सुकता असून लक्ष लागलं आहे.
पाचही राज्यांमधील एकूण 690 जागांसाठी निवडणूक होणार असून 16 कोटी मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावतील. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये ताबडतोब आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पाचही राज्यांमधअये विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरता येणार नाही. काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, उमेदवारावर पाणी, वीज किंवा कोणत्याही बिलाची थकबाकी नसावी,असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
उत्तराखंड, पंजाब, उत्तराखंडातील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. तर गोवा आणि मणिपूरमधील 20 लाख उमेदवारांना 20 हजार रुपयांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसंच राजकारण्यांच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांवर जाहिरातबाजी केली जात आहे का यावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांमध्ये फेब्रुवारीमध्ये मतदान होणार आहे. गोवा, पंजाबमध्ये 4 फेब्रुवारी तर उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान होत असून 4 मार्चला पहिला टप्पा (38 जागा) तर 8 मार्चला दुसरा टप्पा असणार आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पाच राज्यात 690 विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून, सुमारे 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार असून, सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार आहेत. शिवाय, त्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी माहिती पुस्तक देण्यात येणार आहेत
उत्तर प्रदेशमध्ये 403 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेश सात टप्प्यांमध्ये मतदान
पहिला टप्प्याचं मतदान 11 फेब्रुवारीला
दुसरा टप्प्याचं मतदान 15 फेब्रुवारीला
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 फेब्रुवारीला मतदान
चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारीला मतदान
पाचव्या टप्प्याचं मतदान 27 फेब्रुवारीला
सहाव्या टप्प्याचं मतदान 4 मार्चला
सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 08 मार्चला मतदान
निवडणूकांच्या तारखा-
गोवा, पंजाब - 4 फेब्रुवारी
उत्तराखंड - 15 फेब्रुवारी
मणिपूर - 4 व 8 मार्च मतदान (दोन टप्प्यात)
उत्तर प्रदेश- सात टप्प्यांमध्ये मतदान
गोवा निवडणूक : अर्ज भरण्याचा दिवस 11 जानेवारी, अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस 18 जानेवारी, पडताळणी 19 जानेवारी, 4 फेब्रुवारीला मतदान
उमेदवार जागा-
उत्तर प्रदेश- 403 जागा
पंजाब- 117 जागा
उत्तराखंड - 70
मणिपूर- 60
गोवा- 40
(एकूण 619 जागांपैकी 133 जागांवर अनुसुचित)
प्रमुख मुद्दे-
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारणार आहे.
महिलांसाठी विशेष मतदान केंद्र उभारणार
सर्व मतदारांना फोटो व्होटर स्लिप दिली जाणार
स्लिपवर मतदारांचे छायाचित्र असणार
पाचही राज्यात या क्षणापासून आचारसंहिता लागू
व्होटिंग मशिनवर उमेदवाराचा फोटो असणार
प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करता येणार नाही
प्रचारासाठी रात्री 10 नंतर लाऊडस्पीकरला बंदी, पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देखरेखीचे आदेश
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड- उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा - 28 लाख, तर गोवा आणि मणिपूर 20 लाख खर्च करता येणार
उमेदवारांना 20 हजारांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक
काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवणार
निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी
प्रचारासाठी टीव्ही चॅनेलला दिलेल्या जाहिराती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरल्या जातील
कोणत्या राज्यात किती तारखेला होणार मतदान -
- गोवा - 4 फेब्रुवारी (40 जागा)
- उत्तराखंड - 15 फेब्रुवारी (70 जागा)
- मणिपूर - 4 मार्च (पहिला टप्पा), 8 मार्च (दुसरा टप्पा) - (60 जागा)
- पंजाब - 4 फेब्रुवारी (117 जागा)
- उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान - पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी (73 जागा) , दुसरा टप्पा - 15 फेब्रुवारी (67 जागा). तिसरा टप्पा - 19 फेब्रुवारी (69 जागा), चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी (53 जागा), पाचवा टप्पा - 27 फेब्रुवारी (52 जागा), सहावा टप्पा - 4 मार्च (49 जागा), सातवा टप्पा - 8 मार्च (40 जागा). - (एकूण 403 जागा)
कोणत्या राज्यात किती जागा -
- गोवा - (40)
- उत्तराखंड - (70)
- मणिपूर - (60)
- पंजाब - (117)
- उत्तरप्रदेश - (403)
गोवा सरकाराचा पाठिंबा काढून घेणार - म.गो.पक्ष
गोवा विधानसभा निवडणूक येत्या 4 फेब्रुवारी रोजी होत असताना दुसरीकडे गोव्यातील सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या म.गो. पक्षाने गुरुवारी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे स्पष्ट केले. 2012 सालापासून म.गो. पक्ष सत्तेत आहे. भाजपाकडे काठावरील बहुमत आहे, त्यामुळे सरकारच्या स्थिरतेस धोका नाही. यामुळे म.गो. व भाजपाची युती तुटल्यात जमा आहे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.