नामनिर्देशनपत्र / शपथपत्र /पक्षाचे जोडपत्र भरण्या करिता सूचना
(१) ज्या प्रभागातून निवडणूक लढवावयाची आहे त्या प्रभागाचा क्रमांक व जागा क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
(२) उमेदवार व प्रस्तावक यांचे नाव ज्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे त्या प्रभागाचा अनुक्रमांक व मतदार यादीचा भाग
क्रमांक व अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
(३) सर्व उमेदवारांनी, मग तो अपक्ष उमेदवार असो अथवा पक्षाचा पुरस्कृत उमेदवार असो, तीन चिन्हांची निवड करणे आवश्यक
आहे.
(४) बंधपत्रे / कजवरोखे/भाग यांचे मूल्य सूचीतील कंपन्याच्या बाबतीत शेअर बाजारामधील सध्याच्या बाजारभाव मूल्यानुसार व
सूचीबाह्य कंपन्याच्या बाबतीत पुस्तकी मूल्यानुसार देण्यात यावे.
(५) जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील देताना प्रत्येक बाबींचा तपशील स्वंतंत्रपणे द्यावा.
(६) अवलंबन म्हणजे उमेदवाराच्या मिळकतीवर अवलंबून असलेली व्यक्ती
(७) नामननर्देशनपत्रा सोबतच्या शपथपत्रामधील कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास अथवा रिक्त ठेवल्यास राज्य
निवडणूक आयोगाच्या क्रमांक-राननआ/नप-२०१५/प्र.क्र.५/का-६, नर्द.२७/०३/२०१५ अनुसार नामनिर्देशनपत्र नाकरण्यास पात्र
होऊ शकते. लागू नसलेल्या अथवा निरंक माहिती असलेल्या रकान्यामध्ये तसे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
(८) पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र-१ वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशी सूचना पाठविण्यास अधिकृत
केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधीकार्यांची शाईने अथवा बॉलपॉईंट पेनने स्वाक्षरी केलेली असावी.
(९) पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र-२ वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशी सूचना पाठविण्यास प्राधिकृत
केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधिकाऱयांची शाईने अथवा बॉलपॉईंट पेनने स्वाक्षरी केलेली असावी. तसेच सदर सूचनापत्र
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपयंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पोहोचवणे आवश्यक आहे.
कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. लागू नसल्यास अथवा निरंक असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क- चंद्रकांत भुजबळ , फोन- ९४२३२३५३३
Political Research and Analysis Bureau (PRAB)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.