Saturday, 27 May 2017
Friday, 26 May 2017
नगपरिषद, नगरपंचायत व पंचायत समिती निवडणूक- मे 2017 निकाल
नगपरिषद, नगरपंचायत व पंचायत समिती निवडणूक- मे 2017 निकाल
Political Research and Analysis Bureau (PRAB)
Political Research and Analysis Bureau (PRAB)
महापालिका निवडणूक २०१७ निकाल; पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेस तर मालेगावात त्रिशंकू स्थिती
पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेस तर मालेगावात त्रिशंकू स्थिती
लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पनवेलमध्ये मात्र भाजपने बाजी मारली असून, तेथे केवळ दोन जागा मिळवणाऱ्या कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
या तिन्ही महापालिकांच्या एकूण 252 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 79 जागा पटकावत पहिला क्रमांक कायम ठेवला, तर कॉंग्रेसने 77 जागा जिंकत भाजप व इतर पक्षांना अचंबित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 22 जागा मिळाल्या असून, त्यात मालेगावच्या 20 जागांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर पनवेलमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला मात्र तीनही महापालिकांत पराभवाचा सामना करावा लागला.
अल्पसंख्याकबहुल भिवंडी व मालेगाव महानगरपालिका निवडणुकांत मतदारांनी कॉंग्रेसला झुकते माप दिल्याने राज्यातील नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांपैकी कॉंग्रेसने सर्वाधिक 47 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले, तर भाजपने 19 जागा जिंकत मुसंडी मारली आहे. शिवसेनेला बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. मालेगावमध्ये 84 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा कॉंग्रेसने, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 20 जागा, तर शिवसेनेने 13 जागा जिंकल्या आहेत. भाजपने नऊ जागा जिंकल्या आहेत. "एमआयएम'ला सात जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मालेगावचा महापौर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा होणार की, कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस "एमआयएम', जनता दलाची मदत घेणार याची उत्सुकता लागली आहे.
पनवेलमध्ये भाजपने 78 जागापैकी सर्वाधिक 51 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. शेतकरी कामगार पक्षाला केवळ 23 जागा मिळाल्या आहेत. या तीन महापालिकांच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या पाहता, भाजप 79 जागांसह पहिल्या, कॉंग्रेस 77 जागांसह दुसऱ्या आणि शिवसेना 25 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पालिकानिहाय स्थिती असे -
- भिवंडी-निजामपूर - एकूण जागा 90 - कॉंग्रेस-47, भाजप-19, शिवसेना-12, राष्ट्रवादी कॉंग्रेस-0
- मालेगाव - एकूण जागा - 84 - कॉंग्रेस-28, राष्ट्रवादी कॉंग्रेस-20, शिवसेना-13, भाजप-9, "एमआयएम'-7, जनता दल-6
- पनवेल - एकूण जागा - 78 - भाजप- 51, शेतकरी कामगार पक्ष-23, कॉंग्रेस-2, राष्ट्रवादी कॉंग्रेस-2, शिवसेना-0
राज्यनिहाय स्थिती असे (एकूण जागा व पक्ष)
- एकूण जागा : 252
- भाजप : 79
- कॉंग्रेस : 77
- शिवसेना : 25
- राष्ट्रवादी कॉंग्रेस : 22
- शेकाप : 23
- "एमआयएम' : 07
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) : 06
- रिपब्लिकन पक्ष : 04
- समाजवादी पक्ष : 02
- अपक्ष : 03
- कोणार्क आघाडी : 04
महापालिका निकाल
मालेगाव : 84 जागा
कॉंग्रेस : 28
राष्ट्रवादी : 20
शिवसेना : 13
भाजप : 09
एमआयएम : 07
जनता दल : 06
अपक्ष : 01
राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल युती एकत्रित 26 जागा + 1 पुरस्कृत
पनवेल : 78 जागा
भाजप : 51
शेकाप : 23
कॉंग्रेस : 02
राष्ट्रवादी : 02
शिवसेना/स्वाभिमानी : 00
मनसे : 00
शेकाप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडी
भिवंडी : 90 जागा
कॉंग्रेस : 47
भाजप : 19
शिवसेना : 12
अपक्ष/इतर : 10
समाजवादी पक्ष : 02
राष्ट्रवादी : 00
मालेगावात प्रयोग फसला
देशभरात गाजत असलेल्या तीन तलाकच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावात भाजपने एकूण 55 जागा लढविल्या. त्यामध्ये 29 उमेदवारांना त्यातही 16 मुस्लिम महिला उमेदवारांना त्यांनी रिंगणात उतरविले होते. दुसरीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अपूर्व हिरे, युवा नेते अद्वय हिरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, डॉ. नदीम शेख अशा बड्या नेत्यांची फौज पक्षाच्या विजयासाठी भाजपने कामाला लावली होती. मात्र पूर्व भागात भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी न झाल्याने तीन तलाकच्या मुद्यावर मुस्लिम मते मिळविण्याचा हा प्रयोग फसला. भाजपच्या बहुसंख्य उमेदवारांना 500 मतांचाही पल्लाही गाठता आला नाही.
हिशेब चुकता
शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा कॅम्प-संगमेश्वर, सोयगाव, नववसाहत व भायगाव परिसरातील करिश्मा निकालातून दिसला. शिवसेनेने फक्त 26 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात दोन जागांची भर पडली आहे. भाजपला रोखत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाची भुसे यांनी महापालिकेत परतफेड केली. मात्र भुसे यांचे शालक जयराज बच्छाव व शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने यांना पराभव पत्करावा लागला.
पालिकानिहाय तपशील
| ||||||||
महानगरपालिका
|
लोकसंख्या
|
मतदार
|
एकूण जागा
|
महिला राखीव
|
सर्वसाधारण
|
अनुसूचित जाती
|
अनुसूचित जमाती
|
नागरिकांचा मागास प्रवर्ग
|
पनवेल
|
5,09,901
|
4,25,453
|
78
|
39
|
49
|
6
|
2
|
21
|
भिवंडी-निजामपूर
|
7,09,665
|
4,79,253
|
90
|
45
|
62
|
3
|
1
|
24
|
मालेगाव
|
5,90,998
|
3,91,320
|
84
|
42
|
55
|
4
|
2
|
23
|
एकूण
|
18,10,564
|
12,96,026
|
252
|
126
|
166
|
13
|
5
|
68
|
महानगरपालिका निवडणुकांबाबत तपशील
| ||||||
महानगरपालिका
|
लोकसंख्या
|
मतदार
|
जागा
|
उमेदवार
|
मतदान केंद्रे
|
कर्मचारी
|
पनवेल
|
5,09,901
|
4,25,453
|
78
|
418
|
570
|
3,242
|
भिवंडी-निजामपूर
|
7,09,665
|
4,79,253
|
90
|
460
|
644
|
4,028
|
मालेगाव
|
5,90,998
|
3,91,320
|
84
|
373
|
516
|
3,425
|
एकूण
|
18,10,564
|
12,96,026
|
252
|
1,251
|
1,730
|
10,695
|
पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपचं कमळ उमललं. रायगड जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. मात्र शेकाप महाआघाडीची धुळदाण करत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याचं चित्र आहे. तसंच शिवसेनेने मोठा जोर लावल्यानंतरही शिवसेनेच्या पदरी निराशा पडली आहे.
पनवेल महापालिका : 78 जागा
मॅजिक फिगर : 40
पक्ष जागा
भाजप 51
शेकाप 23
काँग्रेस 02
राष्ट्रवादी 02
पनवेल महापालिकेचा विभायनिहाय निकाल
http://prabindia.blogspot.in/2017/05/blog-post_26.html
-------------------------------------------
भिवंडीच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे
भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथे शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले.
भिवंडी महापालिका : 90 जागा
मॅजिक फिगर : 46
पक्ष जागा
काँग्रेस 47
भाजप 19
शिवसेना 12
कोणार्क विकास आघाडी 04
समाजवादी पक्ष 02
आरपीआय 04
राष्ट्रवादी काँग्रेस 00
अपक्ष 02
विभायनिहाय निकाल
http://prabindia.blogspot.in/2017/05/blog-post_94.html
----------------------------------------------
मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर
मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटामध्ये छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे.काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला 26 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेला 13 जागांवर यश मिळालं. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत.
मालेगाव महापालिका : 84 जागा
मॅजिक फिगर : 43
पक्ष जागा
काँग्रेस 28
राष्ट्रवादी (20)+जनता दल (6) 26
शिवसेना 13
भाजप 09
एमआयएम 07
इतर 01
मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निहाय
http://prabindia.blogspot.in/2017/05/2017.html
-------------------------------------------------------
Political Research and Analysis Bureau (PRAB)
भिवंडी महापालिकेत काँग्रेसची सत्ता
भिवंडी महापालिकेत काँग्रेसची सत्ता
भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज केली आहे. कारण 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. तर समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले आहेत.
मुस्लीम मतदारांची काँग्रेसला साथभिवंडीत समाजवादी पक्ष, शिवसेनेची पीछेहाट
मुस्लीम मतदारांची साथ, उमेदवारी वाटप करताना होणारा गोंधळ टाळण्याचा झालेला प्रयत्न आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाची नाराजी याचा फायदा भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला झाला आहे. भाजपने जोर लावूनही गतवेळच्या तुलनेत जागा वाढल्या असल्या तरी सत्तेजवळ पोहचता आलेले नाही. शिवसेना आणि समाजवादी पक्षाची मात्र या निवडणुकीत पीछेहाट झाली आहे.भिवंडी हे अल्पसंख्याकबहुल शहर पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. बाबरी मशीद पडल्यावर मुस्लीम समाजात काँग्रेसबद्दलची नाराजी वाढत गेली. त्याचा फायदा समाजवादी पक्षाने उठविला. महापालिकेत समाजवादी पार्टीला मागे चांगले यश मिळाले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडीतून समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे निवडून आले होते. दोन मतदारसंघांतून निवडून आल्याने त्यांनी भिवंडीच्या जागेचा राजीनामा दिला होता. पुढे पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विजयी झाले होते.
यंदा महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोर लावला होता. स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. राज्यात भाजपच्या यशाचा आलेख लक्षात घेता, भिवंडीतही चमत्कार होणार, असे चित्र भाजपने रंगविले होते. पण मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही.
भिवंडी काँग्रेस गटातटात विभागली गेली आहे. निवडणुकीच्या आधी माजी मंत्री नसिम खान यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असता, स्थानिक नेत्यांनी खान यांना विरोध केला. त्यानंतर माजी आमदार मुझ्झफर हुसेन यांच्याकडे भिवंडीच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. मुझ्झफर हुसेन यांनी तिकीट वाटपात आपल्याला मुक्तवाव असावा, अशी भूमिका मांडली होती. सर्व गटांना बरोबर घेऊन निवडून येण्याची क्षमता यावर भर दिला. हिंदू-मुस्लीम संमिश्र प्रभागांमध्ये उमेदवार निवडताना दोन्ही समाजांना उमेदवारी देण्यात आली. भिवंडीतील अल्पसंख्याक समाजाने पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखविल्याची प्रतिक्रिया भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष गुरुनाथ टावरे यांनी व्यक्त केली.
देशात मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसने प्रचारात भर दिला होता. त्याचा काँग्रेसला चांगलाच फायदा झाला. मुस्लीम समाजाची मते काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीमध्ये विभागली जात असत. या वेळी मात्र मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला मतदान झाले. गेल्या वेळी १६ नगरसेवक असलेल्या समाजवादी पक्षाची घसरण होऊन केवळ दोनच नगरसेवक निवडून आले. यावरून अल्पसंख्याक समाजाने समाजवादी पक्षाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे संख्याबळ ८ वरून १९ वर गेले तर शिवसेनेचे संख्याबळ १६ वरून १२ वर घसरले आहे. हिंदूबहुल प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेतच लढत झाली आणि तेथे भाजपने शिवसेनेला मागे टाकले. गुजराती, मारवाडी, जैन समाजाच्या मतांबरोबरच मराठी मतांचे गणित जुळविण्यात भाजपला यश आले.
राहुल गांधी यांच्या खटल्याचा फायदा
रा. स्व. संघाच्या विरोधात भिवंडीतील जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सध्या सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत राहुल गांधी दोनदा भिवंडी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आले होते. भाजप किंवा रा. स्व. संघाच्या विरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचा काँग्रेसला भिवंडीत फायदा झाला आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल
काँग्रेस – 47 विजयी
भाजप – 19 विजयी
शिवसेना – 12 विजयी
कोणार्क – 4 विजयी
समाजवादी – 2 विजयी
आरपीआय – 4 विजयी
राष्ट्रवादी – 0
अपक्ष – 2
एकूण प्रभाग – ९० (चार उमेदवारांचे २१ आणि ३ उमेदवारांचे २ प्रभाग)
पक्षनिहाय उमेदवार :
काँग्रेस – ६५
भाजप + रिपाई – ५७
शिवसेना – ५५
समाजवादी पार्टी – ३६
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३३
कोणार्क विकास आघाडी – १६
भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट – १६
अपक्ष – १८०
एकूण उमेदवार – ४५८
-------------------------------------------------------------
२०१२ सालच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल
काँग्रेस – २६
समाजवादी पक्ष – १७
शिवसेना – १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ८
भाजपा – ८
कोणार्क विकास आघाडी – ६
रिपाई – २
पहिली अडीच वर्ष महापौर – प्रतिभा पाटील (कोणार्क विकास आघाडी) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठींब्याने) दुसरी अडीच वर्ष महापौर : तुषार चौधरी (शिवसेना) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्याने)
----------------------------------------------------------
भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल
प्रभाग नं 1
विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी
सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी
नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रभाग नं 2
अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस
मिसबा इमरान खान, काँग्रेस
इमरान वली मोहमद खान, काँग्रेस
अहमद सिद्दीकी, काँग्रेस
प्रभाग नं 3
शरद धुळे, आरपीआय
धनश्री पाटील, आरपीआय
रिहाना सिद्दीकी, आरपीआय
विकास निकम, आरपीआय
प्रभाग 4
अरशद अन्सारी, काँग्रेस
शबनम अन्सारी, काँग्रेस
अंझुम सिद्दीकी, काँग्रेस
अरुण राऊत, काँग्रेस
प्रभाग 5
मोमीन मलिक, काँग्रेस
जरीना अन्सारी, काँग्रेस
शमीम अन्सारी, काँग्रेस
फराज बहाउद्दीन, काँग्रेस
प्रभाग 6
सायली शेटे, काँग्रेस
रसिका राका, काँग्रेस
परवेज मोमीन, काँग्रेस
जावेद दलवी, काँग्रेस
प्रभाग नं 7
1. मोमीन साजेदा बानो इश्तियाक, काँग्रेस
2. राबिया मकबुल हसन खान, काँग्रेस
3. मोमीन सिराज ताहीर, काँग्रेस
4. अन्सारी मोहमद वसीम मोहमद हुसेन, काँग्रेस
प्रभाग नं 8
1. मोमीन तल्हा शरीफ हसन, काँग्रेस
2. शेख शकिरा बानो इम्तियाज अहमद, काँग्रेस
3. शेख समिना सोहेल (लव्वा), काँग्रेस
4. मोमीन शाफ अलताफ, काँग्रेस
प्रभाग नं 9
1. लाड प्रशांत अशोक, काँग्रेस
2. फरजाना इस्माईल मिर्ची, काँग्रेस
3. अन्सारी राबिया मोहमद शमीम, काँग्रेस
4. अन्सारी तफज्जुल हुसैन मकसूद हुसैन, काँग्रेस
प्रभाग नं. 10
1. अन्सारी जुबैर अहमद मो. फारुक, काँग्रेस
2. अन्सारी शिफा अशफाक, काँग्रेस
3. खान खशाफ अशरफ, काँग्रेस
4. खान आरिफ मोह हानिफ, काँग्रेस
प्रभाग नं. 11
1. स्वाती भगत, सपा
2. अन्सारी रेश्माबानो मो हलीम, काँग्रेस
3. अन्सारी अब्बास जलीला अहमद, सपा
4. अन्सारी नसरुल्ला नूर मोहम्मद, काँग्रेस
प्रभाग नं. 12
1. खान नादिया इरशाद, काँग्रेस
2. खान रजिया नासीर, काँग्रेस
3. अन्सारी साजीद हुसैन ताफजजुल्लहुसेन, काँग्रेस
4. अन्सारी मो हलीम मो हरुन, काँग्रेस
प्रभाग नं. 13
1. मनिषा दांडेकर, शिवसेना
2. संजय म्हात्रे, शिवसेना
3. अस्मिता नाईक, शिवसेना
4. बाळाराम चौधरी, शिवसेना
प्रभाग नं. 14
1. फिरोजा शेख, काँग्रेस
2. एच मोह याकुब अन्सारी, काँग्रेस
3. मिर्झा जाकीर, काँग्रेस
4. खान मातलुब, काँग्रेस
प्रभाग नं. 15
1. मदन नाईक, शिवसेना
2. खान सुग्रबी हाजी शाह, शिवसेना
3. गुलाब नाईक, शिवेसना
प्रभाग नं. 16
1. पद्मा कल्याडप, भाजप
2. क्षमा ठाकूर, अपक्ष
3. दिलीप कोठारी, भाजप
4. नित्यानंद नाडर, भाजप
प्रभाग नं 17
1. नंदनी गायकवाड, भाजप
2. मिना कल्याडप, भाजप
3. संतोष शेट्टी, भाजप
4. सुमित पाटील, भाजप
प्रभाग नं 18
1. कामिनी पाटील, भाजप
2. दर्शना गायकर, भाजप
3. सिद्दीकी शाहीन फरहान, भाजप
4. सुहास नकाते, भाजप
प्रभाग नं 19
1. अन्सारी शकील, काँग्रेस
2. खान उजमा हाशिम, काँग्रेस
3. अन्सारी नाजेमा मो. हदीस, काँग्रेस
4. खान मुक्तार अहमद मोहमद अली, काँग्रेस
प्रभाग नं 20
1. साखरबाई बगाडे, भाजप
2. वैशाली म्हात्रे, काँग्रेस
3. प्रकाश टावरे, भाजप
4. यशवंत टावरे, भाजप
प्रभाग नं 21
1. अशोक भोसले, शिवसेना
2. वंदना काटेकर, शिवसेना
3. अलका चौधरी, शिवसेना
4. मनोज मोतिराम, शिवसेना
प्रभाग नं 22
1. दीपाली पाटील, अपक्ष
2. तुषार चौधरी, शिवसेना
3. श्याम अग्रवाल, भाजप
प्रभाग नं 23
1. हरिश्चंद्र, भाजप
2. चौधरी अस्मिता राजेश, भाजप
3. पाटील योगिता महेश, भाजप
4. चौधरी हनुमान रामू, भाजप
प्रभाग नं 1
विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी
सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी
नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रभाग नं 2
अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस
मिसबा इमरान खान, काँग्रेस
इमरान वली मोहमद खान, काँग्रेस
अहमद सिद्दीकी, काँग्रेस
प्रभाग नं 3
शरद धुळे, आरपीआय
धनश्री पाटील, आरपीआय
रिहाना सिद्दीकी, आरपीआय
विकास निकम, आरपीआय
प्रभाग 4
अरशद अन्सारी, काँग्रेस
शबनम अन्सारी, काँग्रेस
अंझुम सिद्दीकी, काँग्रेस
अरुण राऊत, काँग्रेस
प्रभाग 5
मोमीन मलिक, काँग्रेस
जरीना अन्सारी, काँग्रेस
शमीम अन्सारी, काँग्रेस
फराज बहाउद्दीन, काँग्रेस
प्रभाग 6
सायली शेटे, काँग्रेस
रसिका राका, काँग्रेस
परवेज मोमीन, काँग्रेस
जावेद दलवी, काँग्रेस
प्रभाग नं 7
1. मोमीन साजेदा बानो इश्तियाक, काँग्रेस
2. राबिया मकबुल हसन खान, काँग्रेस
3. मोमीन सिराज ताहीर, काँग्रेस
4. अन्सारी मोहमद वसीम मोहमद हुसेन, काँग्रेस
प्रभाग नं 8
1. मोमीन तल्हा शरीफ हसन, काँग्रेस
2. शेख शकिरा बानो इम्तियाज अहमद, काँग्रेस
3. शेख समिना सोहेल (लव्वा), काँग्रेस
4. मोमीन शाफ अलताफ, काँग्रेस
प्रभाग नं 9
1. लाड प्रशांत अशोक, काँग्रेस
2. फरजाना इस्माईल मिर्ची, काँग्रेस
3. अन्सारी राबिया मोहमद शमीम, काँग्रेस
4. अन्सारी तफज्जुल हुसैन मकसूद हुसैन, काँग्रेस
प्रभाग नं. 10
1. अन्सारी जुबैर अहमद मो. फारुक, काँग्रेस
2. अन्सारी शिफा अशफाक, काँग्रेस
3. खान खशाफ अशरफ, काँग्रेस
4. खान आरिफ मोह हानिफ, काँग्रेस
प्रभाग नं. 11
1. स्वाती भगत, सपा
2. अन्सारी रेश्माबानो मो हलीम, काँग्रेस
3. अन्सारी अब्बास जलीला अहमद, सपा
4. अन्सारी नसरुल्ला नूर मोहम्मद, काँग्रेस
प्रभाग नं. 12
1. खान नादिया इरशाद, काँग्रेस
2. खान रजिया नासीर, काँग्रेस
3. अन्सारी साजीद हुसैन ताफजजुल्लहुसेन, काँग्रेस
4. अन्सारी मो हलीम मो हरुन, काँग्रेस
प्रभाग नं. 13
1. मनिषा दांडेकर, शिवसेना
2. संजय म्हात्रे, शिवसेना
3. अस्मिता नाईक, शिवसेना
4. बाळाराम चौधरी, शिवसेना
प्रभाग नं. 14
1. फिरोजा शेख, काँग्रेस
2. एच मोह याकुब अन्सारी, काँग्रेस
3. मिर्झा जाकीर, काँग्रेस
4. खान मातलुब, काँग्रेस
प्रभाग नं. 15
1. मदन नाईक, शिवसेना
2. खान सुग्रबी हाजी शाह, शिवसेना
3. गुलाब नाईक, शिवेसना
प्रभाग नं. 16
1. पद्मा कल्याडप, भाजप
2. क्षमा ठाकूर, अपक्ष
3. दिलीप कोठारी, भाजप
4. नित्यानंद नाडर, भाजप
प्रभाग नं 17
1. नंदनी गायकवाड, भाजप
2. मिना कल्याडप, भाजप
3. संतोष शेट्टी, भाजप
4. सुमित पाटील, भाजप
प्रभाग नं 18
1. कामिनी पाटील, भाजप
2. दर्शना गायकर, भाजप
3. सिद्दीकी शाहीन फरहान, भाजप
4. सुहास नकाते, भाजप
प्रभाग नं 19
1. अन्सारी शकील, काँग्रेस
2. खान उजमा हाशिम, काँग्रेस
3. अन्सारी नाजेमा मो. हदीस, काँग्रेस
4. खान मुक्तार अहमद मोहमद अली, काँग्रेस
प्रभाग नं 20
1. साखरबाई बगाडे, भाजप
2. वैशाली म्हात्रे, काँग्रेस
3. प्रकाश टावरे, भाजप
4. यशवंत टावरे, भाजप
प्रभाग नं 21
1. अशोक भोसले, शिवसेना
2. वंदना काटेकर, शिवसेना
3. अलका चौधरी, शिवसेना
4. मनोज मोतिराम, शिवसेना
प्रभाग नं 22
1. दीपाली पाटील, अपक्ष
2. तुषार चौधरी, शिवसेना
3. श्याम अग्रवाल, भाजप
प्रभाग नं 23
1. हरिश्चंद्र, भाजप
2. चौधरी अस्मिता राजेश, भाजप
3. पाटील योगिता महेश, भाजप
4. चौधरी हनुमान रामू, भाजप
Chandrakant Bhujbal
Political Research and Analysis Bureau (PRAB)
Subscribe to:
Posts (Atom)