Friday 26 May 2017

महापालिका निवडणूक २०१७ निकाल; पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेस तर मालेगावात त्रिशंकू स्थिती

पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेस तर मालेगावात त्रिशंकू स्थिती



 लोकसभा निवडणुकीपासून पराभवाचा सामना करणाऱ्या कॉंग्रेसला आज महापालिका निवडणुकांतून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी-निजामपूरमध्ये या पक्षाने एकहाती सत्ता खेचली, तर मालेगावात 28 जागा जिंकून कॉंग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पनवेलमध्ये मात्र भाजपने बाजी मारली असून, तेथे केवळ दोन जागा मिळवणाऱ्या कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.
या तिन्ही महापालिकांच्या एकूण 252 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 79 जागा पटकावत पहिला क्रमांक कायम ठेवला, तर कॉंग्रेसने 77 जागा जिंकत भाजप व इतर पक्षांना अचंबित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 22 जागा मिळाल्या असून, त्यात मालेगावच्या 20 जागांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर पनवेलमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला मात्र तीनही महापालिकांत पराभवाचा सामना करावा लागला.
अल्पसंख्याकबहुल भिवंडी व मालेगाव महानगरपालिका निवडणुकांत मतदारांनी कॉंग्रेसला झुकते माप दिल्याने राज्यातील नेत्यांना दिलासा मिळाला आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांपैकी कॉंग्रेसने सर्वाधिक 47 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले, तर भाजपने 19 जागा जिंकत मुसंडी मारली आहे. शिवसेनेला बारा जागांवर समाधान मानावे लागले आहे. मालेगावमध्ये 84 जागांपैकी सर्वाधिक 28 जागा कॉंग्रेसने, त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने 20 जागा, तर शिवसेनेने 13 जागा जिंकल्या आहेत. भाजपने नऊ जागा जिंकल्या आहेत. "एमआयएम'ला सात जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे मालेगावचा महापौर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा होणार की, कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस "एमआयएम', जनता दलाची मदत घेणार याची उत्सुकता लागली आहे.
पनवेलमध्ये भाजपने 78 जागापैकी सर्वाधिक 51 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. शेतकरी कामगार पक्षाला केवळ 23 जागा मिळाल्या आहेत. या तीन महापालिकांच्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या पाहता, भाजप 79 जागांसह पहिल्या, कॉंग्रेस 77 जागांसह दुसऱ्या आणि शिवसेना 25 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पालिकानिहाय  स्थिती असे -
- भिवंडी-निजामपूर - एकूण जागा 90 - कॉंग्रेस-47, भाजप-19, शिवसेना-12, राष्ट्रवादी कॉंग्रेस-0
- मालेगाव - एकूण जागा - 84 - कॉंग्रेस-28, राष्ट्रवादी कॉंग्रेस-20, शिवसेना-13, भाजप-9, "एमआयएम'-7, जनता दल-6
- पनवेल - एकूण जागा - 78 - भाजप- 51, शेतकरी कामगार पक्ष-23, कॉंग्रेस-2, राष्ट्रवादी कॉंग्रेस-2, शिवसेना-0

राज्यनिहाय स्थिती असे  (एकूण जागा व पक्ष)
- एकूण जागा : 252
- भाजप : 79
- कॉंग्रेस : 77
- शिवसेना : 25
- राष्ट्रवादी कॉंग्रेस : 22
- शेकाप : 23
- "एमआयएम' : 07
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) : 06
- रिपब्लिकन पक्ष : 04
- समाजवादी पक्ष : 02
- अपक्ष : 03
- कोणार्क आघाडी : 04

महापालिका निकाल
मालेगाव : 84 जागा
कॉंग्रेस : 28
राष्ट्रवादी : 20
शिवसेना : 13
भाजप : 09
एमआयएम : 07
जनता दल : 06
अपक्ष : 01

राष्ट्रवादी कॉंग्रेस व जनता दल युती एकत्रित 26 जागा + 1 पुरस्कृत
पनवेल : 78 जागा
भाजप : 51
शेकाप : 23
कॉंग्रेस : 02
राष्ट्रवादी : 02
शिवसेना/स्वाभिमानी : 00
मनसे : 00

शेकाप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाआघाडी
भिवंडी : 90 जागा
कॉंग्रेस : 47
भाजप : 19
शिवसेना : 12
अपक्ष/इतर : 10
समाजवादी पक्ष : 02
राष्ट्रवादी : 00

मालेगावात प्रयोग फसला
देशभरात गाजत असलेल्या तीन तलाकच्या मुद्याच्या पार्श्‍वभूमीवर मालेगावात भाजपने एकूण 55 जागा लढविल्या. त्यामध्ये 29 उमेदवारांना त्यातही 16 मुस्लिम महिला उमेदवारांना त्यांनी रिंगणात उतरविले होते. दुसरीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार अपूर्व हिरे, युवा नेते अद्वय हिरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, डॉ. नदीम शेख अशा बड्या नेत्यांची फौज पक्षाच्या विजयासाठी भाजपने कामाला लावली होती. मात्र पूर्व भागात भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी न झाल्याने तीन तलाकच्या मुद्यावर मुस्लिम मते मिळविण्याचा हा प्रयोग फसला. भाजपच्या बहुसंख्य उमेदवारांना 500 मतांचाही पल्लाही गाठता आला नाही.

हिशेब चुकता

शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा कॅम्प-संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत व भायगाव परिसरातील करिश्‍मा निकालातून दिसला. शिवसेनेने फक्त 26 जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात दोन जागांची भर पडली आहे. भाजपला रोखत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाची भुसे यांनी महापालिकेत परतफेड केली. मात्र भुसे यांचे शालक जयराज बच्छाव व शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने यांना पराभव पत्करावा लागला.


पालिकानिहाय तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
एकूण जागा
महिला राखीव
सर्वसाधारण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पनवेल
5,09,901
4,25,453
78
39
49
6
2
21
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
45
62
3
1
24
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
42
55
4
2
23
एकूण
18,10,564
12,96,026
252
126
166
13
5
68

महानगरपालिका निवडणुकांबाबत तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
जागा
उमेदवार
मतदान केंद्रे
कर्मचारी
पनवेल
5,09,901
4,25,453
78
418
570
3,242
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
460
644
4,028
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
373
516
3,425
एकूण
18,10,564
12,96,026
252
1,251
1,730
10,695

पनवेल महापालिकेवर भाजपचं कमळ पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पनवेल महानगरपालिकेवर भाजपचं कमळ उमललं. रायगड जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या शेकापचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. मात्र शेकाप महाआघाडीची धुळदाण करत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी सपशेल नाकारत भाजपला स्पष्ट बहुमत दिल्याचं चित्र आहे. तसंच शिवसेनेने मोठा जोर लावल्यानंतरही शिवसेनेच्या पदरी निराशा पडली आहे.

पनवेल महापालिका : 78 जागा

मॅजिक फिगर :  40

पक्ष                         जागा

भाजप                       51

शेकाप                       23

काँग्रेस                      02

राष्ट्रवादी                   02


पनवेल महापालिकेचा विभायनिहाय निकाल

http://prabindia.blogspot.in/2017/05/blog-post_26.html

-------------------------------------------

भिवंडीच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे

भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसने पुन्हा एकदा काबीज केली आहे. 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपने भिवंडी महापालिका खेचण्यासाठी विशेष जोर लावला होता. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथे शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले.

भिवंडी महापालिका : 90 जागा

मॅजिक फिगर : 46

पक्ष                  जागा

काँग्रेस                47

भाजप                19

शिवसेना              12

कोणार्क विकास आघाडी   04

समाजवादी पक्ष         02

आरपीआय             04

राष्ट्रवादी काँग्रेस         00

अपक्ष                 02


 विभायनिहाय निकाल

http://prabindia.blogspot.in/2017/05/blog-post_94.html

----------------------------------------------

मालेगावात काँग्रेस-राष्ट्रवादीत काँटे की टक्कर

 मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटामध्ये छोट्या पक्षांना महत्त्व प्राप्त झालं आहे.काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा मिळवल्या आहेत. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला 26 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय शिवसेनेला 13 जागांवर यश मिळालं. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत.

मालेगाव महापालिका  : 84 जागा

मॅजिक फिगर : 43

पक्ष                                                जागा

काँग्रेस                                            28

राष्ट्रवादी (20)+जनता दल (6)       26

शिवसेना                                        13

भाजप                                            09

एमआयएम                                   07

इतर                                              01


मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निहाय

http://prabindia.blogspot.in/2017/05/2017.html

-------------------------------------------------------

Political Research and Analysis Bureau (PRAB)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.