Friday, 26 May 2017

भिवंडी महापालिकेत काँग्रेसची सत्ता

भिवंडी महापालिकेत काँग्रेसची सत्ता


 भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज केली आहे. कारण 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे.  भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.  शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. तर  समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले आहेत.

मुस्लीम मतदारांची काँग्रेसला साथभिवंडीत समाजवादी पक्ष, शिवसेनेची पीछेहाट

मुस्लीम मतदारांची साथ, उमेदवारी वाटप करताना होणारा गोंधळ टाळण्याचा झालेला प्रयत्न आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात अल्पसंख्याक समाजाची नाराजी याचा फायदा भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला झाला आहे. भाजपने जोर लावूनही गतवेळच्या तुलनेत जागा वाढल्या असल्या तरी सत्तेजवळ पोहचता आलेले नाही. शिवसेना आणि समाजवादी पक्षाची मात्र या निवडणुकीत पीछेहाट झाली आहे.
भिवंडी हे अल्पसंख्याकबहुल शहर पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. बाबरी मशीद पडल्यावर मुस्लीम समाजात काँग्रेसबद्दलची नाराजी वाढत गेली. त्याचा फायदा समाजवादी पक्षाने उठविला. महापालिकेत समाजवादी पार्टीला मागे चांगले यश मिळाले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भिवंडीतून समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे निवडून आले होते. दोन मतदारसंघांतून निवडून आल्याने त्यांनी भिवंडीच्या जागेचा राजीनामा दिला होता. पुढे पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे विजयी झाले होते.
यंदा महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोर लावला होता. स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न केला. राज्यात भाजपच्या यशाचा आलेख लक्षात घेता, भिवंडीतही चमत्कार होणार, असे चित्र भाजपने रंगविले होते. पण मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही.
भिवंडी काँग्रेस गटातटात विभागली गेली आहे. निवडणुकीच्या आधी माजी मंत्री नसिम खान यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असता, स्थानिक नेत्यांनी खान यांना विरोध केला. त्यानंतर माजी आमदार मुझ्झफर हुसेन यांच्याकडे भिवंडीच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली. मुझ्झफर हुसेन यांनी तिकीट वाटपात आपल्याला मुक्तवाव असावा, अशी भूमिका मांडली होती. सर्व गटांना बरोबर घेऊन निवडून येण्याची क्षमता यावर भर दिला. हिंदू-मुस्लीम संमिश्र प्रभागांमध्ये उमेदवार निवडताना दोन्ही समाजांना उमेदवारी देण्यात आली. भिवंडीतील अल्पसंख्याक समाजाने पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास दाखविल्याची प्रतिक्रिया भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष गुरुनाथ टावरे यांनी व्यक्त केली.
देशात मोदी सरकारने अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसने प्रचारात भर दिला होता. त्याचा काँग्रेसला चांगलाच फायदा झाला. मुस्लीम समाजाची मते काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादीमध्ये विभागली जात असत. या वेळी मात्र मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसला मतदान झाले. गेल्या वेळी १६ नगरसेवक असलेल्या समाजवादी पक्षाची घसरण होऊन केवळ दोनच नगरसेवक निवडून आले. यावरून अल्पसंख्याक समाजाने समाजवादी पक्षाला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे संख्याबळ ८ वरून १९ वर गेले तर शिवसेनेचे संख्याबळ १६ वरून १२ वर घसरले आहे. हिंदूबहुल प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेतच लढत झाली आणि तेथे भाजपने शिवसेनेला मागे टाकले. गुजराती, मारवाडी, जैन समाजाच्या मतांबरोबरच मराठी मतांचे गणित जुळविण्यात भाजपला यश आले.
राहुल गांधी यांच्या खटल्याचा फायदा
रा. स्व. संघाच्या विरोधात भिवंडीतील जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडीच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याची सध्या सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत राहुल गांधी दोनदा भिवंडी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी आले होते. भाजप किंवा रा. स्व. संघाच्या विरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचा काँग्रेसला भिवंडीत फायदा झाला आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल
काँग्रेस –                 47 विजयी
भाजप –                 19 विजयी
शिवसेना –             12 विजयी
कोणार्क –                4 विजयी
समाजवादी –          2 विजयी
आरपीआय –          4 विजयी
राष्ट्रवादी –             0
अपक्ष –                   2

एकूण प्रभाग –  ९० (चार उमेदवारांचे २१ आणि ३ उमेदवारांचे २ प्रभाग)
 पक्षनिहाय उमेदवार :
काँग्रेस – ६५
भाजप + रिपाई – ५७
शिवसेना – ५५
समाजवादी पार्टी – ३६
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३३
कोणार्क विकास आघाडी – १६
भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट – १६
अपक्ष – १८०
एकूण उमेदवार – ४५८
-------------------------------------------------------------
२०१२ सालच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल
काँग्रेस – २६
समाजवादी पक्ष – १७
शिवसेना – १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ८
भाजपा – ८
कोणार्क विकास आघाडी – ६
रिपाई – २
पहिली अडीच वर्ष महापौर – प्रतिभा पाटील (कोणार्क विकास आघाडी) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठींब्याने) दुसरी अडीच वर्ष महापौर : तुषार चौधरी (शिवसेना) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्याने)
----------------------------------------------------------
  भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल

प्रभाग नं 1
विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी
प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी
सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी
नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी

प्रभाग  नं 2
अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस
मिसबा इमरान खान, काँग्रेस
इमरान वली मोहमद खान, काँग्रेस
अहमद सिद्दीकी, काँग्रेस

प्रभाग  नं 3
शरद धुळे, आरपीआय
धनश्री पाटील, आरपीआय
रिहाना सिद्दीकी, आरपीआय
विकास निकम, आरपीआय

प्रभाग 4     
अरशद अन्सारी, काँग्रेस
शबनम अन्सारी, काँग्रेस
अंझुम सिद्दीकी, काँग्रेस
अरुण राऊत, काँग्रेस

प्रभाग 5     
मोमीन मलिक, काँग्रेस
जरीना अन्सारी, काँग्रेस
शमीम अन्सारी, काँग्रेस
फराज बहाउद्दीन, काँग्रेस

प्रभाग 6
सायली शेटे, काँग्रेस
रसिका राका, काँग्रेस
परवेज मोमीन, काँग्रेस
जावेद दलवी, काँग्रेस

प्रभाग नं 7
1. मोमीन साजेदा बानो इश्तियाक, काँग्रेस
2. राबिया मकबुल हसन खान, काँग्रेस
3. मोमीन सिराज ताहीर, काँग्रेस
4. अन्सारी मोहमद वसीम मोहमद हुसेन, काँग्रेस

प्रभाग नं 8
1. मोमीन तल्हा शरीफ हसन, काँग्रेस
2. शेख शकिरा बानो इम्तियाज अहमद, काँग्रेस
3. शेख समिना सोहेल (लव्वा), काँग्रेस
4. मोमीन शाफ अलताफ, काँग्रेस

प्रभाग नं 9
1. लाड प्रशांत अशोक, काँग्रेस
2. फरजाना इस्माईल मिर्ची, काँग्रेस
3. अन्सारी राबिया मोहमद शमीम, काँग्रेस
4. अन्सारी तफज्जुल हुसैन मकसूद हुसैन, काँग्रेस

प्रभाग नं. 10
1. अन्सारी जुबैर अहमद मो. फारुक, काँग्रेस
2. अन्सारी शिफा अशफाक, काँग्रेस
3. खान खशाफ अशरफ, काँग्रेस
4. खान आरिफ मोह हानिफ, काँग्रेस

प्रभाग नं. 11
1. स्वाती भगत, सपा
2. अन्सारी रेश्माबानो मो हलीम, काँग्रेस
3. अन्सारी अब्बास जलीला अहमद, सपा
4. अन्सारी नसरुल्ला नूर मोहम्मद, काँग्रेस

प्रभाग नं. 12
1. खान नादिया इरशाद, काँग्रेस
2. खान रजिया नासीर, काँग्रेस
3. अन्सारी साजीद हुसैन ताफजजुल्लहुसेन, काँग्रेस
4. अन्सारी मो हलीम मो हरुन, काँग्रेस

प्रभाग नं. 13
1. मनिषा दांडेकर, शिवसेना
2. संजय म्हात्रे, शिवसेना
3. अस्मिता नाईक, शिवसेना
4. बाळाराम चौधरी, शिवसेना

प्रभाग नं. 14
1. फिरोजा शेख, काँग्रेस
2. एच मोह याकुब अन्सारी, काँग्रेस
3. मिर्झा जाकीर, काँग्रेस
4. खान मातलुब, काँग्रेस

प्रभाग नं. 15
1. मदन नाईक, शिवसेना
2. खान सुग्रबी हाजी शाह, शिवसेना
3. गुलाब नाईक, शिवेसना

प्रभाग नं. 16
1. पद्मा कल्याडप, भाजप
2. क्षमा ठाकूर, अपक्ष
3. दिलीप कोठारी, भाजप
4. नित्यानंद नाडर, भाजप

प्रभाग नं 17
1. नंदनी गायकवाड, भाजप
2. मिना कल्याडप, भाजप
3. संतोष शेट्टी, भाजप
4. सुमित पाटील, भाजप

प्रभाग नं 18
1. कामिनी पाटील, भाजप
2. दर्शना गायकर, भाजप
3. सिद्दीकी शाहीन फरहान, भाजप
4. सुहास नकाते, भाजप

प्रभाग नं 19
1. अन्सारी शकील, काँग्रेस
2. खान उजमा हाशिम, काँग्रेस
3. अन्सारी नाजेमा मो. हदीस, काँग्रेस
4. खान मुक्तार अहमद मोहमद अली, काँग्रेस

प्रभाग नं 20
1. साखरबाई बगाडे, भाजप
2. वैशाली म्हात्रे, काँग्रेस
3. प्रकाश टावरे, भाजप
4. यशवंत टावरे, भाजप

प्रभाग नं 21
1. अशोक भोसले, शिवसेना
2. वंदना काटेकर, शिवसेना
3. अलका चौधरी, शिवसेना
4. मनोज मोतिराम, शिवसेना

प्रभाग नं 22

1. दीपाली पाटील, अपक्ष
2. तुषार चौधरी, शिवसेना
3. श्याम अग्रवाल, भाजप

प्रभाग नं 23
1. हरिश्चंद्र, भाजप
2. चौधरी अस्मिता राजेश, भाजप
3. पाटील योगिता महेश, भाजप
4. चौधरी हनुमान रामू, भाजप
Chandrakant Bhujbal
Political Research and Analysis Bureau (PRAB)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.