मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल
मालेगाव महापालिका निवडणूक निकालांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादीचा क्रमांक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागांवर विजय मिळाला आहे.
शिवसेनेनेच्या उमेदवारांनी 13 जागांवर विजय मिळवला आहे. मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत.
मात्र मालेगावात भाजपला ऐतिहासिक यश मिळालं आहे. एकही जागा नसलेल्या भाजपला नऊ जागांवर विजय मिळाला आहे. याशिवाय इतरांच्या खात्यात एक जागा गेल्या आहेत.
मालेगाव महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही याची चिन्हे होतीच, पण सत्तेचा दावेदार काँग्रेस व विरोधी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीला मिळालेल्या जवळपास समसमान जागा आणि सेना, भाजप व एमआयएम या पक्षांना आलेले विशेष महत्व यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी सत्ता स्थापण्याचे गणित अवघड झाले आहे. एकूण ८४ जागांच्या सभागृहात बहुमतासाठी ४३ जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २८ जागा मिळाल्या असून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीला २६ जागा मिळाल्या आहेत. या युतीत जनता दलाच्या सहा जागांचा समावेश असून निवडणुकीत एकमेव विजयी झालेला अपक्षही जनता दल पुरस्कृत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल युतीचे संख्याबळ हे त्या अर्थाने २७ पर्यंत जाते. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी जवळपास या दोन्ही पक्षांना समान संधी असल्याचे स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक २५ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला १९ जागा जिंकणाऱ्या ‘तिसरा महाज’ने पाठिंबा दिल्यानंतर सत्ता स्थापन झाली होती. दरम्यानच्या काळात ‘तिसरा महाज’चे तत्कालिन आमदार मौलाना मुफ्ती यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी व शिवसेनेच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याची यशस्वी खेळी केली होती. गेल्या काही दिवसात एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत परस्परांचे प्रमुख विरोधक असलेली काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी अडचण लक्षात घेता आता दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता फारच धूसर दिसते.गेल्यावेळी ११ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने यावेळी १३ जागांपर्यंत मजल मारली तर भाजपने नऊ जागा जिंकल्या. हिंदूबहुल भागात कोण जास्त जागा मिळवतो, याविषयी या दोन्ही पक्षामंध्ये मोठी रस्सीखेच होती. त्यात सेना वरचढ ठरली असे म्हणता येईल. असे असले तरी गेल्यावेळी एकही जागा न जिंकणाऱ्या भाजपने यावेळी नऊ जागा मिळवत सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेत नक्कीच महत्व प्राप्त केले आहे. तेरा जागा जिंकणारी सेना व नऊ जागा जिंकणारा भाजप हे परस्परविरोधी पक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या आणखी परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या दोघा पक्षांपैकी कुणाला पाठिंबा देतात, याबद्दलही निकालानंतर उत्सुकता वाढली आहे. सात जागा जिंकणाऱ्या एमआयएम या पक्षाची मदत घेण्यात कोण यशस्वी होतो, हे बघणेही रंजक ठरणार आहे. स्थानिक नेत्यांचे संबंध लक्षात घेता सध्याच्या घडीला काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात. तसे झाले तरी संख्याबळ हे ३७ पर्यंत जाते. बहुमताचा जादुई आकडा गाठणे तरी शक्य होत नाही. अशावेळी एमआयएम या पक्षाची काँग्रेसला मदत घ्यावी लागेल. परंतु, देशपातळीवर काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी निघालेल्या भाजपची त्यामुळे अडचण होईल. शिवाय परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणाऱ्या एमआयएम सोबत जाणे हेही भाजपला अवघडल्यासारखे होईल.जर राष्ट्रवादी काँग्रेस व सेना यांची आघाडी झाली तर त्यांचे संख्याबळ हे ४० पर्यंत जाते. त्यांनाही बहुमत गाठणे अवघड होईल. त्यामुळे या आघाडीलाही एमआयएमवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. परंतु, एमआयएममुळे पुन्हा सेनेची अडचण होऊ शकते. अशावेळी एमआयएमला दूर ठेवत सेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस अशी आघाडीदेखील उदयास येऊ शकते. किंवा एमआयएमसारख्या पक्षाला तटस्थ ठेवण्याची खेळी करत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी सत्ता समीकरण मांडण्याची शक्यता दिसत आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या कौलामुळे सत्तेचा पट मांडताना आता सर्वाची कसोटी लागेल, एवढे मात्र निश्चित.
भाजपचे सर्व मुस्लीम उमेदवार पराभूत
भाजपने यावेळी उभ्या केलेल्या ५६ उमेदवारांमध्ये २७ मुस्लीम उमेदवारांचा समावेश होता. तिहेरी तलाक या मुद्यांमुळे सद्य:स्थितीत मुस्लीम महिला तसेच या समाजातील सुधारणावादी मंडळी भाजपकडे आकृष्ट होत असल्याचा या पक्षाचा दावा आहे. मुस्लीम उमेदवार विजयी झाले तर अन्यत्र देशात आगामी काळात भाजपला राजकीय लाभ होऊ शकतो, असे त्यामागे पक्षाचे गणित होते. मात्र, या २७ पैकी एकही मुस्लीम उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
मालेगाव महापालिका : 84 जागा
मॅजिक फिगर : 43
पक्ष जागा
काँग्रेस 28
राष्ट्रवादी (20)+जनता दल (6) 26
शिवसेना 13
भाजप 09
एमआयएम 07
इतर 01
मालेगाव महापालिका विजयी उमेदवार
वॉर्ड क्र. 1
कविता बच्छाव, शिवसेना
जिजाबाई पवार, शिवसेना
प्रतिभा पवार, शिवसेना
विजय देवरे, भाजप
वॉर्ड क्र. 2
विठ्ठल बर्वे, काँग्रेस
छाया शिंदे, भाजप
हमिदाबी शे. जब्बार, काँग्रेस
नारायण शिंदे, शिवसेना
वॉर्ड क्र. 3
अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अह, अपक्ष
जाकिया बी नजरुद्दीन, राष्ट्रवादी
मोमिन सायरा बानू शाहिद अहमद, राष्ट्रवादी
शेख जाहिद शेख जाकीर, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र. 4
मंगलाबाई भामरे, काँग्रेस
रजिया बेगम अब्दुल मजिद, काँग्रेस
नंदकुमार सावंत, काँग्रेस
अब्दुल अजिज अब्दुल सत्तार, काँग्रेस
वॉर्ड क्र. 5
नजीर अहमद इरशाद, काँग्रेस
जैबुन्सी नुरुल्लान नुरुल्ला, काँग्रेस
मो. कमरुन्नीसा रिजवान, काँग्रेस
फकीर मोह. शेख सादिक, काँग्रेस
वॉर्ड क्र. 6
अन्सारी तन्वीर मोह. जुल्फीकर, जनता दल (सेक्युलर)
सय्यद शबानाबानो सय्यद अकील, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी साजेदा बानो मोह. याकूब, जनता दल (सेक्युलर)
अ. बाकी मोह. ईस्माईल, जनता दल (सेक्युलर)
वॉर्ड क्र. 7
शबाना शेख सलीम, काँग्रेस
शे. राजीयाबी शे. इस्माईल, काँग्रेस
निहाल अह. मोह. सुलेमान, काँग्रेस
सलीम अन्वर, काँग्रेस
वॉर्ड क्र. 8
पुष्पा गंगावणे, शिवसेना
दीपाली घारुळे, भाजप
सखाराम घोडके, शिवसेना
राजाराम जाधव, शिवसेना
वॉर्ड क्र. 9
तुळसाबाई साबणे, भाजप
संजय काळे, भाजप
ज्योती भोसले, शिवसेना
सुनील गायकवाड, भाजप
वॉर्ड क्र. 10
आशा अहिरे, शिवसेना
जिजाबाई बच्छाव, शिवसेना
जयप्रकाश पाटील, शिवसेना
निलेश आहेर, शिवसेना
वॉर्ड क्र. 11
भारत बागुल, भाजप
कल्पना वाघ, शिवसेना
सुवर्णा शेलार, भाजप
मदन गायकवाड, भाजप
वॉर्ड क्र. 12
शेख कलीम दिलावर, राष्ट्रवादी
अन्सारी आसफा मो. राशिद, राष्ट्रवादी
अन्सारी साजेदा रशिद, राष्ट्रवादी
बुलंद इक्बाल निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)
वॉर्ड क्र. 13
जफर अह. अहमदुल्ला, काँग्रेस
नूरजहाँ मो. मुस्तफा, काँग्रेस
सलीमा बी सय्यद सलीम, काँग्रेस
फारुख खान फैजुल्लाह खान, काँग्रेस
वॉर्ड क्र. 14
जैबुन्निसा शमसुद्दोहा, राष्ट्रवादी
अफसरुन्निसा मोह. आरीफ सलोटी, राष्ट्रवादी
नाबी अह. अहमदुल्ला, राष्ट्रवादी
अन्सारी अमानतुल्ला पीर मोहम्मद, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र. 15
शाने हिंद निहाल अहमद, जनता दल (सेक्युलर)
अन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मील, राष्ट्रवादी
मोहम्मद सुहान मोहम्मद अय्युब, राष्ट्रवादी
अन्सारी अतिक अह. कमाल अह, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र. 16
यास्मिन बानो एजाज बेग, राष्ट्रवादी
शेख नसरीन अल्ताफ, राष्ट्रवादी
एजाज बेग अजीज बेग, राष्ट्रवादी
अन्सारी अबाज अह. मो. सुलतान, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र. 17
अन्सारी शफीफ अह. निसार अह, राष्ट्रवादी
सादीया लईक हाजी, एमआयएम
अन्सारी अख्तरुन्निसा मो. सादीक, राष्ट्रवादी
अन्सारी मो. साजिद अ. रशीद, राष्ट्रवादी
वॉर्ड क्र. 18
माजिद हाजी, एमआयएम
शेख कुलसुम बी शे. रफिक, एमआयएम
हमिदाबी साहेब अली, काँग्रेस
इस्माईल खा इस्माईल, काँग्रेस
वॉर्ड क्र. 19
मोहम्मद अस्लम खालील अह, काँग्रेस
रेहाना बानो ताजुद्दीन, काँग्रेस
किशवरी अशरफ कुरेश, काँग्रेस (बिनविरोध)
शेख नईम शेख इब्राहिम, काँग्रेस
वॉर्ड क्र. 20
मोह. सुलतान मोह. हारुन, काँग्रेस
शेख ताहेरा शेख रशीद, काँग्रेस
रशिदाबी अ. मनबान, काँग्रेस
शेख रशिद शेख शफी, काँग्रेस
वॉर्ड क्र. 20
शेख मोहम्मद युनुस शेख ईसा, एमआयएम
मोमीन रजिया शाहीद अहमद, एमआयएम
शेख रहिमाबी शेख इस्माईल, एमआयएम
शेख खालिद परवेज मो. युनुस, एमआयएम
मालेगाव महानगरपालिकेतील मागील पक्षीय बलाबल
शिवसेना-11
काँग्रेस-25
शहर विकास आघाडी- 8
तिसरा महाज-19
मालेगाव विकास आघाडी- 4
समाजवादी पार्टी- 1
जनता दल- 4
मनसे- 2
जनराज्य आघाडी- 1
अपक्ष- 5
एकूण 80 नगर सेवक होते.
पक्षनिहाय उमेदवार :
काँग्रेस- 73
राष्ट्रवादी- 52
जनता दल-10
भाजपा- 55
शिवसेना- 26
एमआयएम- 35
इतर व अपक्ष- 101
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.