‘ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा
ईव्हीएमशी छेडछाड अशक्य, निवडणूक आयोगाचा डेमोसह दावा
अलीकडच्या अनेक निवडणुकांनंतर वादात सापडलेल्या EVM मशीन्स हॅक करून दाखवाच असं आव्हान भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त डाॅ. नसीम झैदी यांनी राजकीय पक्षांना केलंय तसंच यापुढच्या सर्व निवडणुका EVM आणि VVPAT मशीन्सनेच होतील.अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी आल्याचं त्यांनी म्हटलं होतं पण या घटनांमध्ये ईव्हीएम मशीन हॅक झाल्याची सज्जड पुरावे मिळालेले नाहीत.आपल्याकडे वापर करण्यात येणारी ईव्हीएम ही सुरक्षित असून त्यांच्यामधलं इलेक्ट्रिकल सर्किट बदलता येत नाही. तसंच या मशीन्समध्ये फेरफार करता येत नाही आणि ते हॅक करता येत नाहीत.
ईव्हीएम हॅक करून दाखवायचं निवडणूक आयोगाने दिलेलं आव्हान ३ जून २०१७ पासून राजकीय पक्षांना स्वीकारता येईल. त्यासाठी २६ मेपर्यंत राज्यपातळी किंवा देशपातळीवरच्या राजकीय पक्षांना त्यांची इच्छा निवडणूक आयोगाला कळवावी लागेल. राजकीय पक्ष त्यांच्यातर्फे ३ अधिकृत प्रतिनिधी पाठवू शकतात आणि या तीन प्रतिनिधींना ईव्हीएम मशीन हॅत करायचा प्रयत्न करता येईल. पण निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अधीन राहूनच या प्रतिनिधींना ईव्हीएम हॅक कराय करायचा प्रयत्न करता येईल. हे नियम जर राजकीय पक्षांनी भंग केले तर त्यांचा हा प्रयत्न बाद ठरवला जाईल.
ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीटी (मतदानाची पावती) जोडल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल, त्यानंतर सगळ्या शंका दूर होतील, मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. झैदी यांनी सांगितलं. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या दोन भारतीय कंपन्या ईव्हीएम तयार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.