राज्यसभेच्या १० जागांची निवडणूक ऐनवेळी रद्द
गोवा, गुजरात आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांतून राज्यसभेवर पाठवायच्या १० सदस्यांची निवड करण्यासाठी येत्या ८ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा आधी जाहीर केलेला कार्यक्रम निवडणूक आयोगाने सोमवारी अचानक रद्द केला.
गोव्यातील एक राज्यसभा सदस्य येत्या २८ जुलै रोजी तर गुजरातचे तीन व प. बंगालचे सहा राज्यसभा सदस्य येत्या १८ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या जागा भरण्यासाठी ८ जूनला मतदान घेण्याचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने १६ मे रोजी जाहीर केला होता. त्यानुसार आज २२ मे रोजी या निवडणुकांची अधिसूचना जारी व्हायची होती. परंतु त्याआधीच आयोगाने आधीचा कार्यक्रम जाहीर करणारे प्रसिद्धी पत्रक मागे घेतले.हा नवा निर्णय घेण्याचे कोणतेही कारण अद्याप निवडणूक आयोगाने दिलेले नाही. मात्र नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आयोगाने म्हटले.
दुसरीकडे, देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप केला आहे. यावर भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने शनिवारी दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर 'या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,' असे खुले आव्हान राजकीय पक्षांना दिले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
राज्यसभेच्या रिक्त होणार्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यसभेच्या रिक्त होणार्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
गोवा,गुजरात,प.बंगाल मधील राज्यसभेच्या १० सदस्यांची मुदत संपत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल तारीख २२ मे २०१७ ते २९ मे २०१७ असून ८ जून ला मतदान घेण्यात येईल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.