सोशल मीडियावर माहितीची चोरी होत आहे?
* आपण कोणतेही सोशल मीडिया अॅप सारखे अॅप्लिकेशन वापरतो ते मोफत असल्याने कंपनी स्वतःच्या लाभासाठी आपली माहिती एकत्रितपणे करून विश्लेषित माहितीची विक्री केली जाते त्यामधून मिळालेल्या आर्थिक लाभातून हि (सोशल मीडिया अॅपयंत्रणा) चालवली जाते. अॅप डाऊनलोड करतानाच आपण सर्व अटीना (माहिती शेअर करण्याची) मान्यता देत असतो त्यामुळे डेटा चोरी होतेच, यासाठी सोशल मीडिया अॅप आपल्या दैनंदिन वापराच्या मोबाईलवर वापरू नये. किवां खासगी कोणतीही माहिती नसलेल्या डेस्कटॉपवर वापरावे.
* GOOGLE देखील आपल्या सर्व माहितीची टेहळणी करीत आहे. आपली माहिती एकत्रितपणे करून विश्लेषित माहितीची विक्री केली जाते.
* GOOGLE GPS सुविधा देखील आपल्या सर्व माहितीची टेहळणी करीत आहे. आपली माहिती एकत्रितपणे करून विश्लेषित माहितीची विक्री केली जाते. अशा स्वरुपाच्या गुगलच्या अनेक सुविधा आहेत.
* कोणत्याही कंपनीचे मेल सुरक्षित नाहीत, मोफत वापराच्या सर्व इमेल सेवा देणाऱ्या कंपनी आपल्या सर्व माहितीची टेहळणी करीत आहे. आपली माहिती एकत्रितपणे करून विश्लेषित माहितीची विक्री केली जाते.
* आपल्या सरकारची सामान्य नागरिकांना इमेल सेवा उपलब्धता करीत नाही तो पर्यंत अशा मोफत वापराच्या सर्व इमेल सेवा देणाऱ्या कंपनी डेटा चोरी करीतच राहणार आहेत. ( डेटा चोरी असे म्हणता येत नाही कारण आपणच अॅप डाऊनलोड करतानाच आपण सर्व अटीना (माहिती शेअर करण्याची) मान्यता देत असतो )
* FACEBOOK च्या व्यावसायिक सेवा आहेत कि, हव्या तेवढ्या LIKE आर्थिक मोबदला देऊन वाढवू शकतो.
* FACEBOOK प्रमाणे इतरही सोशल मीडिया अॅप सारखे अॅप्लिकेशन अशा स्वरूपाच्या व्यावसायिक सेवा मार्केटमध्ये कंपन्याकरिता उपलब्ध करीत आहेतच.
* केवळ भाजप - काँग्रेस हे राजकीय पक्ष नाहीत कि, सोशल मीडिया अॅप सारखे अॅप्लिकेशनच्या माध्यमातून माहिती एकत्रितपणे करून विश्लेषित माहितीचा उपयोग करतात, सर्वच राजकीय पक्ष या सेवेचा लाभ घेत आहेत. राजकीय पक्षाबरोबर देशातील/परदेशातील व्यावसायिक कंपन्या या विश्लेषित माहितीचे ग्राहक आहेत.
* संबंधितांची परवानगी घेऊन अशा स्वरुपाची माहिती संकलित करून विश्लेषित करण्याचे अधिकार माहिती तंत्रज्ञान कायद्याने दिले आहेतच.
* इंटरनेट ही संकल्पना व निर्मिती अमेरिकेची आहे, सर्व कंट्रोल अमेरिकन कंपन्याचा असून जगभर हे जाळे पद्धतशीरपणे पसरविले आहे. केवळ चीन अपवाद आहे. चीनने स्वताची सरकारी इंटरनेट सुविधा निर्माण केली आहे.
* इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती आपल्या कवेत आली आहे त्याप्रमाणेच जगभरातील माहिती अमेरिका रोज आपल्या कवेत घेत आहे.
* इंटरनेट, सोशल मीडिया अॅप सारखे अॅप्लिकेशन द्वारे मुलभूत हक्कांची माहिती शेअर होत आहे. याबाबत भारताने चीन सारखी स्वताची इंटरनेट प्रणालीची भूमिका व धोरण स्वीकारले पाहिजे. अन्यथा इंटरनेट, सोशल मीडिया अॅप सारखे अॅप्लिकेशन द्वारे आपण गुलाम बनतच राहणार आहोत.
गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅपस्टोअरवर कोणतेही अॅप उपलब्ध करून द्यायचे झाल्यास डेव्हलपर किंवा पब्लिशरला त्या अॅपसंबंधी एक प्रायव्हसी पॉलिसी द्यावी लागते. या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये वापरकर्त्यांचा कोणता डेटा घेतला जातो, कुठे स्टोर करणार, प्रोसेस कशाप्रकारे करणार, त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेला डेटा देताना काय धोरणे असणार, डेटा डिलीट करण्याबाबतीतचे नियम अशी विस्तृत माहिती असते. अॅपच्या index.js या फाईलमधील सोर्स कोड नुसार त्यानुसार वापरकर्त्यांच्या सोशल मीडियाच्या तब्बल १० अकाउंटचा ID घेण्यात येतो. त्यामध्ये WhatsApp, Facebook, LinkedIn, Twitter, Instagram, YouTube, SnapChat, Telegram, Hangout आणि Hike यांचा समावेश आहे. भारत हे पाश्चात्त्यांसाठी जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन मार्केट आहे. भारतापेक्षा चीनची लोकसंख्या अधिक असली, तरी त्या देशाने पश्चिमेकडून येणारी ऑनलाइन व्यवस्था सीमेवरच रोखून धरली आहे. व्हर्च्युअल पोलादी भिंतीच्या रूपाने ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘गुगल’ला प्रवेश नाकारला आहे. ‘वुईचॅट’ हा चीनचा स्वतःचा सर्वाधिक लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म आहे, तर ‘वायबो’ हा ‘ट्विटर’चा, ‘टोऊडोऊ युकू’ हा ‘यूट्यूब’चा, ‘बायडू तायबा’ हा गुगल सर्च इंजिनचा, ‘मैपेई’ हा ‘इन्स्टाग्राम’चा चायनीज अवतार आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येएवढे, म्हणजे एक अब्ज ३० कोटी स्मार्टफोन चीनमध्ये आहेत. ५३ कोटी स्मार्टफोनचा भारत दुसऱ्या, तर २२ कोटी ९० लाख स्मार्टफोनसह अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या जूनपर्यंत इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांची संख्या ५० कोटींवर पोचेल. गेल्या डिसेंबरमध्ये ती ४८.१ कोटी होती. गेल्या वर्षी हे प्रमाण ११.३४ टक्क्यांनी वाढले. ४५.५ कोटी शहरी भारतीयांपैकी २९.५ कोटी इंटरनेट वापरतात. ९१.८ कोटींपैकी १८.६ कोटी इंटरनेट यूझर्सचा ग्रामीण भाग मात्र पिछाडीवर आहे. जगभरातल्या जवळपास दोनशे निवडणुकांची कामं ‘केंब्रिज अनालिटिका’ व तिच्या देशोदेशीच्या फ्रॅंचाइझींनी केल्याचं उघड झालं आहे.. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रशियाचा हस्तक्षेप व ‘फेसबुक’च्या डेटाचोरीमुळं वादात अडकली आहे.. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या, ‘ब्रेक्झिट’च्या प्रक्रियेत कंपनी होती. ख्रिस्तोफर वायलीच्या आरोपांचा धागा पकडून इंग्लंडमधल्या ‘चॅनेल फोर’नं स्टिंग ऑपरेशन केलं. ‘केंब्रिज अनालिटिका’चा ‘सीईओ’ अलेक्झांडर निक्स याने दिलेल्या कबुलीत, राजकीय पक्षांसाठी काम करताना कंपनी पैसा वापरते, लाच देते, मुली पुरवते, विरोधकांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवते वगैरे गौप्यस्फोट केला. त्या बातम्यांनी जग हादरलं आहे.
चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=======================
इंटरनेट ही संकल्पना व निर्मिती इतिहास
इंटरनेट युगाची खर्या अर्थाने सुरुवात इ.स. १९६९ पासून झाली. तेव्हा अर्पानेट (Arpanet)मुळे अशा जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमची सुरुवात झाली. ही सिस्टिम आजदेखील वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणार्या रे टॉमलिन्सन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मुळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या गेल्या.
पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नवीन प्रकल्प आले. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरूपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४ च्या सुरुवातीला टीसीपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्न. हा पुढे टिसीपी/आयपी ने यशस्वी झाला.
१९७५ मध्ये जॉन विटल (John Vittal) याने ई-मेलमध्ये नवीन सुधारणा आणल्या. त्यामुळे ई-मेलला प्रतिउत्तर (Reply) देणे व आलेल्या ई-मेलला दुसर्याला (Forward) पाठविणे हे महत्त्वाच्या गोष्टी शक्य झाल्या. १९७७ मध्ये डेनिस हायेस आणि डेल हेदरिंगटन (Dennis Hayes and Dale Heatherington) यांनी मॉडेमचा शोध लावला. तर १९७८ मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला. या अनावश्यक ई-मेलला नंतर स्पॅम (spam) असे नाव मिळाले..
१७७९ मध्ये यूज़नेट (Usenet)चा वापर सुरू झाला. पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या यूज़नेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करू शकतात. १९८२त पहिल्यांदा चिन्हाद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरून झाली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी ते :-) हे हसण्याची चिन्ह वापरत होते. या आणि अशा अनेक चिन्हांना आता इमोटिकॉन (emoticon) असे म्हणतात. ही चिन्हेआता ई-मेल आणि चॅटींगमध्ये सरआस वापरली जातात.
१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्याप्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पूर्वीच्या आयपी ****मधील क्रमांकाएवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रूपांतर आपोआप आयपी ****मधील क्रमांकामध्ये होते.. १९८५ मध्ये काल्पनिक (व्हर्चुअल) समूह स्थापन झाले. तेव्हाची द वेल (The Well) का समूह आजदेखील इंटरनेटवरील एक प्रभावशाली समूह (community) आहे.
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील गप्पागोष्टींचे पहिल्यांदा सहक्षेपण (Internet Relay Chat) केले गेले. आज त्याला चॅटिंग म्हणतात. तेव्हाच म्हणजे १९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणी निर्माण केल्या.
१९८९ मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच AOL (America Online) ची निर्मिती झाली. AOLमुळे पुढील काळात इंटरनेट लोकप्रिय होण्यास मदत झाली. त्याच साली म्हणजे १९८९ मध्ये वर्ल्ड वाईड वेब (World Wide Web) ही संकल्पना टीम बर्नर-ली (Tim Berners-Lee) यांनी अस्तित्वात आणली. मात्र ती खर्या अर्थाने १९९० पासून सुरू झाली.
१९९० च्या सालामध्ये इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बर्याच प्रकारे प्रगती झाली. त्यासाली द वर्ल्ड (The World) या पहिल्या व्यावसायिक डायल-अप इंटरनेट सेवा पुरविण्याची (dial-up Internet provider) सुरुवात झाली. १९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले. १९९० मध्येच गोफर (Gopher) या पहिल्या शोध प्रणालीची देखील निर्मिती झाली. ती फक्त फाईलचे नावच नाही तर त्यातील मजकूरदेखील शोधत असे. याच साली एमपीथ्री (MP3) या प्रकाराला सर्वमान्यता मिळाली. हा फाईलचा प्रकार आजदेखील आवाजाच्या आणि गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध आहे. १९९१ मध्येच इंटरनेटवरील अतिमहत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेर्याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला.
पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल (graphical) इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरे तर सर्वात पहिला इंटरनेट ब्राऊझर नव्हता. पण तो जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नव्हता आणि त्यामुळे वापरायला अतिशय सोपा होता. लगेचच तो सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर बनला. १९९३ मध्येच अमेरिकेतील व्हाईट हाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. त्यामुळे तेव्हाच्या वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .gov आणि .org या दोन वेबसाईटच्या नामप्रकारांची निर्मिती झाली. १९९४ मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला.
१९९५ मध्ये बँकेचे तसेच क्रेडिट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिक दृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागला. या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा SSL (Secure Sockets Layer) प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली Echo Bay या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणार्या वेबसाइटची निर्मिती झाली. ती आज eBay नावाने ओळखली जाते. याच साली Amazon.com या वेबसाइटची देखील निघाली. असे असले तरी जवळपास ६ वर्षांपर्यंत म्हणजेच २००१ पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नव्हता. १९९५ मध्येच सर्वसामान्यांना देखील इंटरनेटवर आपली मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी Geocities या वेबसाइट निर्माण झाली. मात्र ती २००९ च्या वर्षात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे बंद करावी लागली. याच साली नेटस्केप नॅव्हिगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच सर्वप्रथम जावा आणि नंतर जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणालीं ब्रेंडन ईच (Brendan Eich) याने नेटस्केप नॅव्हिगेटरचा एक भाग म्हणून बनवल्या..
१९९६ मध्ये सर्वप्रथम हॉटमेल (HoTMaiL) या ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरू झाली. १९९७ मध्ये "weblog" या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली.
१९९८ मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी वेबसाइट सुरू झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला. १९९९ मध्ये सेटी (SETI) हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटरना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोपमध्ये जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटीद्वारे केले जात होते.
२००१ मध्ये विकिपीडिया (Wikipedia) या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. २००३ मध्ये तयार झालेल्या स्काईप (Skype) द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला म्हणजेच Voice over IP calling ला सुरुवात झाली. याच साली MySpace आणि Linkedin या वेबसाइट सुरू झाल्या आणि खर्या अर्थाने सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली.
२००४ मध्ये वेब २.० (Web 2.0) या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नवीन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली म्हणजे २००४ मध्ये द फेसबुक ("The" Facebook) ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाले. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे २००५ मध्ये यूट्यूब (YouTube) या व्हिडिओ म्हणजेचे चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरू झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्विटर (Twitter) ने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्विटर या वेबसाईटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश/माहिती ठेवू शकतो.
========================================================
केम्ब्रिज अॅनालिटिकासाठी भारतात काम करणाऱ्या व्यक्तीवर विष प्रयोगाची शक्यता- माजी कर्मचारी
Cambridge Analytica whistleblower: My predecessor was poisoned, police bribed
केम्ब्रिज अॅनालिटिकाच्या एका माजी कर्मचाऱ्याची विष देऊन हत्या केल्याचा दावा एका माजी कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीसाठी भारतात काम करत असलेला डॅन मुरेसॅन याच्यावर विषप्रयोग झाल्याचे म्हटले जात आहे. केम्ब्रिज अॅनालिटिकासोबत काम केलेला डेटा प्रोटेक्शन एक्सपर्ट पॉल ऑलिव्हर डेहाए याने ब्रिटीश संसदेच्या डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट कमिटीसमोर साक्ष दिली. त्यांनी सांगितले, 'डॅन मुरेसॅन एका भारतीय प्रोजेक्टवर काम करत होता. 2013 मध्ये एक डील फसकटल्यामुळे त्याची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. तो केनियातील एका हॉटेलमध्ये थांबला होता तेव्हाच त्याच्यावर विष प्रयोग झाला असण्याची शक्यता आहे.' पॉलसह फेसबुक डेटा लीक प्रकरणाचा खुलासा करणारा क्रिस्टोफर वायलीही बुधवारी कमिटीसमोर हजर झाला होता.पॉल यांनी आरोप केला की, 'डॅन मुरेसॅन काँग्रेससाठी काम करत होता. मात्र एका अब्जाधीशाने त्याला पैसे दिले, त्याची इच्छा होती की काँग्रेस पराभूत झाली पाहिजे. भारतातून ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स येत आहेत. त्यावरुन असे लक्षात येते की मुरेसॅन फक्त असे दाखवत होता की तो काँग्रेससाठी काम करत आहे. मात्र तो दुसऱ्याच कोणाकडून पैसे घेत होता.' पॉल डेहाए पर्सनल डॉट डेटा डॉट आयओचे सहसंस्थापक आहेत.वायली वेबच्या माध्यमातून कमिटीसमोर हजर झाला. तो म्हणाला, 'मुरेसॅन प्रकरणात सत्यता काय आहे हे मी सांगू शकत नाही. मलाही हेच सांगण्यात आले होते आणि लोकांमध्येही हिच चर्चा होती की मुरेसॅनला हॉटेलमध्ये विष देऊन मारण्यात आले. मी हे देखील ऐकले होते की पोलिसांनी 24 तासांच्या आत हॉटेलच्या रुममध्ये दाखल होऊ नये यासाठी त्यांना लाच देण्यात आली होती.वायलीने मुरेसॅनच्या मृत्यूला भारताशी जोडले नाही. तो म्हणाला, 'जर तो केनियामधील राजकारणावर काम करत होता, तर अफ्रिकी राजकारणाच्या डीलमध्ये गडबड झाली असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागली असती. जेव्हा मी केम्ब्रिज अॅनालिटिका मध्ये आलो तेव्हा मलाही मुरेसॅनचे काही प्रोजेक्ट मिळाले होते. मात्र त्यांच्या मृत्यूबद्दल मला माहिती नव्हती.'रोमानिया इनसायडर डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मुरेसॅन रोमानियाचे माजी कृषी मंत्री इओन अवराम मुरेसॅन यांचे चिरंजीव होते. ओलीव्हर म्हणाले, मुरेसॅन केनिया आणि भारत या दोन्ही प्रोजेक्ट्सवर एकाचेवेळी काम करत होते.
भारतातील जिहादी कारवाया रोखण्यासाठीही केंब्रिज अॅनालिटिकाने घेतला सहभाग
काँग्रेस पक्षही केंब्रिज अॅनालिटिकाचा ग्राहक होता असा खळबळजनक खुलासा व्हिसल ब्लोअर क्रिस्तोफर वाइलीने केल्यानंतर आता या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. केंब्रिज अॅनालिटिका या राजकीय डेटा विश्लेषक कंपनीची भारतातील भूमिका फक्त निवडणुकीपुरता मर्यादीत नव्हती तर अन्य सामाजिक प्रकल्पांमध्येही या कंपनीने सहभाग घेतला होता. केंब्रिज अॅनालिटिकाने भारतात निवडणूक रिसर्चपलीकडे केरळसह अन्य राज्यांमध्ये जिहादी कारवाया रोखण्यासाठी मोहिम राबवली होती.केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जिहादी विचारसरणीला पाठिंबा रोखण्यासाठी २००७ साली एससीएलला रिसर्च मोहिम हाती घेण्यास सांगण्यात आले होते. एससीएल केंब्रिज अॅनालिटिकाची उपकंपनी असून त्यांच्याकडे भारतातील ६०० जिल्ह्यातील सात लाख गावांचा डेटा आहे. तो सतत अपडेट होत असतो असे वाइलीने म्हटले आहे.२०१२ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी एका राष्ट्रीय पक्षासाठी एससीएलने जातीनिहाय जनगणनाही केली होती तसेच २००७ सालच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी बूथस्तरीय राजकीय सर्वेक्षणही केले होते अशी माहिती वाइलीने दिली आहे. वाइलीने काँग्रेसबरोबर जनता दल युनायटेडचेही नाव घेतले आहे. २०१० सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल युनायटेडला राजकीय रिसर्च करुन माहिती पुरवली होती असे वाइलीने म्हटले आहे.
काय आहे ‘केंब्रिज अॅनालिटिका’ प्रकरण?
संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत आहे. २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचं समोर आलं. केंब्रिज अॅनालिटिकाने ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय वापरला असा आरोप आहे. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचं उघड झालं आहे.केम्ब्रिज अॅनालिटिकाकडे भारतातील 10 लाख गावांची जातीआधारित माहिती असल्याची बाब आता समोर आली आहे. ही माहिती त्यांनी 10 राज्यातील राजकीय पक्षांना विकल्याचे सांगण्यात येत आहे.लोकसभा निवडणूकीबरोबरच उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठीही ही माहिती विकण्यात आली.