Thursday 15 March 2018

बिल्डरकडून 2 कोटींची खंडणी घेताना पुण्यातील शिवसेनेचा ZP सदस्य अटकेत

बिल्डरकडून 2 कोटींची खंडणी घेताना पुण्यातील शिवसेनेचा झेडपी सदस्य अटकेत


मुंबईतील पवई भागातील एका नामांकित बिल्डरला 20 कोटींची खंडणी मागणा-या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यला 2 कोटींची खंडणी घेताना बुधवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज त्यांना कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुलाब विठ्ठल पारखे (ता. जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सदस्याचे नाव नाव आहे. पारखे शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. पवई पोलिसांनी भादवि कलम 384 (खंडणी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================
पवईमधील (मुंबई) हिरनंदानी बिल्डर्सकडे २० कोटी रूपयांची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाब पारखे यांना पोलिसांना अटक केली. हे शिवसेनेचा सदस्य आहे. अर्थात पाखरे हे केवळ प्यादे असून या प्रकारामागे शिवसेनेचा या क्षेत्रातील अनुभवी बडा नेता असल्याची चर्चा आहे. पाखरे हे जुन्नर तालुक्यातील सावरगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहे. पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून पारखे याना अटक केली अाहे. पवईतील मोक्याच्या ठिकाणी कार्यालय असणाऱ्या या विकासकाच्या प्रकल्पाबाबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून, माहिती मिळवून, माहिती लपवण्यासाठी विकासकाकडे सतत खंडणीच्या पैशांची मागणी केली जात होती. पैसे दिले नाही तर सगळी माहिती उघड करून विकासकाला अडचणीत आणण्याची धमकी सुद्धा दिली जात होती.
काही महिन्यांपूर्वीच १० लाख रुपये देण्यात आले होते, मात्र तेवढ्यावर त्याचे समाधान होत नव्हते. त्याच्याकडे असणारी माहिती उघड न-करण्यासाठी विकासकाकडे २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करत, मान्य करण्यास नकार दिल्यास मिडियाकडे जाण्याची धमकी दिली होती” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.या बिल्डरकडील संबंधित व्यक्तीने याबाबत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्ह्याची नोंद केली होती. सोबतच त्याने खंडणीची मागणी करणारे ऑडिओ सुद्धा पवई पोलीस ठाण्यात पुरावा म्हणून सादर केले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांच्या नेतृत्वात एक टिम बनवून, सापळा रचून खंडणीखोर गुलाब पारखे यास मुलुंड येथील एका हॉटेलमधून खंडणीची दोन कोटींची रक्कम स्वीकारताना  पकडण्यात आल्याचे सांगितले.पारखे हा पूर्वी याच बिल्डरकडे लायजनिंग एजेंट म्हणून बरीच वर्ष कामकाज पाहत होता. गेल्या वर्षी त्याने येथून नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ज्यानंतर विविध सरकारी कार्यालयात विकासकाविरोधात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली होती. ती माहिती लपवण्यासाठी तो २० करोडच्या खंडणीची मागणी करत होता’ असे याबाबत बोलताना अजून एका अधिकाऱ्याने सांगितले.पारखे याने वापरलेली फाॅर्च्यूनर कार सुद्धा पवई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पारखे याने विकासक याच्याकडील नोकरी का सोडली? त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते का? विकासकाबद्दल काही कारणाने त्याच्या मनात काही राग होता का? विकासकाच्या आर्थिक स्थितीची माहिती असल्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठीच त्याने हे कृत्य केले आहे का? या सर्व दृष्टीने सुद्धा तपास करत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.जुन्नरमधील शिवसेनेच्या एक ज्येष्ठ महिला नेत्यावर अशाच प्रकारचे या आधी आरोप झाले होते. या महिलेचा पारखे हा कट्टर समर्थक आहे. या महिलेचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस तपास घेत आहेत.


पूर्वी याच बिल्डकरकडे नोकरीला होते गुलाब पारखे-
अटक झालेला आरोपी गुलाब पारखे हे जुन्नर, पुणे येथून जिल्हा परिषद सदस्य आहे. पारखे हे पूर्वी या बिल्डरकडे लायजनिंग एजंट म्हणून अनेक वर्षे नोकरी करत होता. गेल्या वर्षी त्याने येथून नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर तो झेपी सदस्यही झाले, राजकारणात स्थिर होताच त्यानी विविध सरकारी कार्यालयातून या बिल्डरविरोधात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवली. ती माहिती लपवण्यासाठी ते बिल्डरकडे 20 कोटी रूपयांची खंडणी मागत होते.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.