Sunday 11 March 2018

शेतकऱ्यांचा मोर्चा आणि राजकारण! ... आगामी निवडणुकावर त्याचा कितपत परिणाम होणार? जाणून घ्या!....prabindia.blogspot.in हा ब्लॉग, FOLLOW करा...

मागण्या मान्य करून आंदोलक शेतकऱ्यांन्या परतण्यासाठी सरकारकडून वाहतूक व्यवस्था 



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश, लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे

तब्बल 200 किलोमीटरची पायपीट करुन नाशिकवरुन मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळालं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिष्टमंडळात झालेल्या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. लेखी आश्वासनानंतर किसान लाँग मार्च मागे घेण्यात आला.
किसान मोर्चाच्या 12 जणांच्या शिष्टमंडळासह राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्री समिती गटासोबत तब्बल चार तास चर्चा झाली. यानंतर सरकारने आंदोलक शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे घोषित केले. तसेच या मागण्यांची पुढील सहा महिन्यांत संपूर्ण कार्यवाही व अंमलबजावणी केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. याबाबतचा ड्राफ्ट आमदार जे पी गावित यांनी आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या हजारो समुदायांसमोर वाचून दाखवला. त्यानंतर किसान सभा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आंदोलन संपल्याचे जाहीर केले. यानंतर सरकारच्या वतीने आंदोलकाला नाशिककडे परत जाण्यासाठी रात्री 11 वाजता दोन विशेष रेल्वेची सोय करण्यात आली. किसान लाँग मार्चच्या आंदोलकांच्या 12 जणांच्या शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील वाटाघाटीची बैठक आज दुपारी तब्बल चार तास चालली. ही बैठक विधानभवनातील सचिवालयात पार पडली. आंदोलक मोर्चेकरांकडून आमदार जे पी गावित, अजित नवले, अशोक ढवळे यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, अजित पवार, राधाकष्ण विखे पाटील आदींचे 12 जणांचे शिष्टमंडळ उपस्थित होते तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्री समिती गटातील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख आदी वरिष्ठ सहा मंत्र्यांसह सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रलंबित दावे/अपील यांचा 6 महिन्यात जलदगतीने निपटारा करण्यात येईल.वरील प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.नार-पार, दमणगंगा, वाघ व पिंजाळ नद्यांचे अरबी समुदाला जाणारे पाणी अडवून गिरणा व गोदावरील खोऱ्यात वळविणे आणि महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देणे.नार-पार दमणगंगा, वाघ व पिंजाळ या नदी खोऱ्यातील अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून गिरणा-गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल विकास अभिकरणाकडून तयार करण्यात आला आहे.  या अनुषंगाने करावयाच्या सामंजस्य कराराचा मसुदा 22 सप्टेंबर 2017 रोजी केंद्र सरकारला सादर करण्यात आला. या करारानुसार खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी महाराष्ट्रातच अडवण्यात येऊन त्याचा वापर करण्यात येईल. वरील प्रकल्प कालबध्द पध्दतीने पूर्ण करण्यात येईल. कळवण-मुरगांव भागातील 31 लघु पाटबंधारे प्रकल्प/कोल्हापुरी बंधारे यांची व्यवहार्यता तपासून समावेश करण्यात येईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना शक्यतो आदिवासी गावांचे विस्थापन होणार नाही असा प्रयत्न केला जाईल.देवस्थान इनाम वर्ग-3 च्या जमिनी संदर्भात शासनाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल एप्रिल-2018 पर्यंत प्राप्त करुन पुढील 2 महिन्यांच्या कालावधीत त्या आधारे धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. आकारी-पड व वरकस जमिनी मूळ मालकांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला असून त्याला अनुसरुन कायद्यात आणि नियमांत तरतूद केलेली आहे. ज्या आकारी-पड जमिनीवर अन्य व्यक्तींचे अतिक्रमण आहे त्यांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.बेनामी जमिनीसंदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करुन या समस्येचा अभ्यास करण्यात येईल आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पुढील धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. गायरान जमिनीवर बेघरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईत; शिवसेनेसह सर्व विरोधकांचा मोर्चाला पाठिंबा

पाच दिवसाच्या पायी प्रवासानंतर किसान मोर्चा राजधानीत




शेतकरी मोर्चाला मनसे, शिवसेनेसह काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला आहे. या महामाेर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी भोजनासाठी लागणारा आपला शिदा स्वत: सोबत आणला आहे. अन्न शिजविण्याची व्यवस्थाही शेतकऱ्यांनी आपसात गट करून स्वत: च केली अाहे. दररोज 30 ते 35 किलोमीटर चालून नाशिक ते मुंबई असा प्रवास करून पाच दिवसानंतर किसान मोर्चा राजधानीत पोहचला आहे. नाशिकहुन 180 किमी अंतर पार करून शेतकऱ्यांचा अखिल किसान महामोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला आहे. हा मोर्चा विधानभवनाला घेराव घालणार आहे. शेतकऱ्यांनी हा मोर्चा ज्यासाठी काढल्या त्यासाठी आठ प्रमुख मागण्या केल्या आहेत. शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य नाही झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या या आहेत प्रमुख मागण्या-

* कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा

* कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी.

* शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

* स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

* वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा- बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई द्या

* वीजबिल माफ करा

* दुधाला किमान 40 रु. लीटर भाव हवा

* पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिमवाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी द्यावे.



घरी सडून मरण्या पेक्षा मुंबईत लढून मरु. कालच्या चॅनेल वरील कार्यक्रमात एका शेतकरी महिलाचे हे वाक्य अंगावर काटा आणणारे होते . ती ना चळवळीची नेता होती ना तिला कुठे निवडणूक लढवायचं होतं पण कुठून शिकली असेल ती हे तत्त्वज्ञान हा प्रश्न नक्की सतावेल. किती सहन केलं असेल तेव्हा ही भावना झाली असेल त्यांची. खूप छोट्या छोट्या मागण्या घेऊन हे शेतकरी ऊन , तहान कशाचीही तमा न करता , राहण्याचे - खाण्याचे - आरोग्याचे प्रचंड हाल होत असतांना , त्यांचा निर्धार ठाम आहे. हे पैसे देऊन भाडोत्री आणलेले कार्यकर्ते नाहीत. हे स्वतःचा शिधा सोबत बांधून घेऊन आलेले सैनिक आहेत. त्यांना विचारलं किती दिवस आले आहात तर म्हटले जोवर मागण्या मान्य होत नाही, तुम्हाला भीती नाही वाटतं का सरकारची तर म्हटले जास्तीत जास्त काय होईल मरू , आता तरी कुठे जगतोय?  आवाक होऊन पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. दिवस भर दमून भागूनही रात्री आपली संस्कृती जपताना हि मंडळी नाचण्यागण्यात गुंग होत आहे आणि उजडणाऱ्या दिवसाबरोबर पुन्हा नव्या जोमाने मुंबईची वाट धरत आहे. डोळ्यात आग आहे मनात चीड आहे  हातात बावटा आहे... पायात रग आहे.. पोटात भूक आहे .पण तरी ही मार्ग संयमाचा आहे. पक्ष, राजकारण, जाती, धर्म, विचारधारा यापलीकडे या लॉंग मार्च कडे बघण्याची गरज आहे. जगाचा पोशिंदा संकटात आहे ,
 तरीही त्याने त्याची जबाबदारी इतरांवर न टाकता स्वतःच्याच खांद्यावर घेतली आहे. आपण साथ दिली पाहिजे.

मागण्या मान्य करून आंदोलक शेतकऱ्यांन्या परतण्यासाठी सरकारकडून वाहतूक व्यवस्था 
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून काही तांत्रिकदृष्ट्या समस्या आहेत, तर बहुतांश मागण्या अज्ञानातून केल्या जात आहेत. त्याचे पुरेसे प्रबोधन करण्यात येईल. बहुतांश ३ तालुक्यातील शेतकरी आहेत. आंदोलक सुखरूप परत जावेत अशी व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे असे  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. 


सरकारकडून समिती स्थापन

मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाला साथ देऊया- हुमा कुरेशीट्विट करत शेतकरी मोर्चाला हुमाने दर्शवला पाठिंबा


विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज (सोमवार) मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सेलिब्रिटीसुद्धा मागे राहिले नाहीत. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाचे समर्थन करत ट्विट केले आहे.शेतकरी मोर्चाचा फोटो शेअर करत तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘या शांततापूर्ण आंदोलनाला आपलाही पाठिंबा दर्शवूया. क्षुल्लक राजकारणाला बाजूला ठेवूया. यावर तोडगा काय आहे, याचा विचार करूयात.


शेतकऱ्यांच्या लढ्यात त्यांनी उचलला खारीचा वाटा, मोहम्मद अली रोडवर मुस्लीम समुदायाकडून सामाजिक सलोख्याचं दर्शन


मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांनीही शेतकरी बांधवाचं मोठ्या मनाने स्वागत केलं आहे. ज्या मागणीसाठी शेतकरी लढत आहेत, त्यात आपलाही हातभार लावावा यासाठी जागोजागी मुंबईतल्या सामाजिक संस्था पुढे सरसावताना दिसत आहेत. काल रात्री सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे जाताना मोहम्मद अली रोडवर शेतकरी बांधवांना मुंबईकरांच्या पाहुणचाराची प्रचिती आली. मोहम्मद अली रोडवर काही स्थानिक मुस्लीम समाजातील लोकांनी शेतकरी बांधवांसाठी केळी, खाण्याचं सामान, पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींची सोय केली होती. आमच्या अन्नदात्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी हा सोपा मार्ग असल्याचं सांगत मुंबईत अनेक समुदायांनी शेतकरी बांधवांचं स्वागत केलं. कोणत्याही सामाजिक प्रश्नांमध्ये मुंबईकर आपली जात-पात, धर्म विसरुन रस्त्यावर उतरतो हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.नाशिक ते मुंबई प्रवासादरम्यान अनेक शेतकरी बांधवांच्या पायाला दुखापत झाली. मात्र अनवाणी पायाने चालत असताना दुखापतींचा विचार न करता आपल्या मागण्यांसाठी शेतकरी बांधव मुंबईकडे मार्गक्रमण करत राहिला. अशा काही शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी काल रात्री विशेष मेडीकल कॅम्पचंही आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबईकर आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे शेतकरी रात्रभर पायपीट करत सोमय्या मैदानातून आझाद मैदानात पोहोचले. एकीकडे मोर्चा काढताना सर्वसामान्यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत असताना शेतकऱ्यांमधील या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


बळीराजाची भूक पनवेलकर शमवणार; 1 लाख भाकऱ्यादेशातील जनतेचं पोट भरण्यासाठी रात्रंदिवस राबणारा शेतकरी बांधव आज स्वत:च्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. शेतकरी बांधवांसाठी पनवेल आणि आसपासच्या गावांमधून तब्बल १ लाख भाकऱ्या आणि ५०० किलो सुकट असं भोजन ग्रामस्थांनी बनवून मुंबईकडे रवाना केलं आहे. शेतकरी कामगार पक्षानं (शेकाप) शेतकऱ्यांच्या या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्थानिक सरपंचांना सांगून भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत. प्रत्येक सरपंचाला भाकऱ्यांचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि त्यांनीही ते आनंदानं स्वीकारलं. त्यानुसार १ लाख भाकऱ्या बनविण्यात आल्या आहेत. त्याचं संकलन करण्यात आलं आहे. तसेच कर्नाळा स्पोर्टस क्लबजवळ सुकटीचे कालवण बनवून ते मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. 



 शेतकरी नेते बैठकीसाठी विधानभवनात दाखल,शिष्टमंडळ-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात. शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा.विविध मागण्यांवर होणार चर्चा. शिष्टमंडळात अजित नवलेंसह, डॉ अशोक ढवळे आणि किसान सभेच्या नेत्यांचा समावेश.



आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भसरे यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहका-यांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून देत आहे. अजूनही तीन-चार शेतक-यांनी असा ‘प्रयोग’ केला आहे. पॅनेल डोक्यावर असल्याने उन्हाचा त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
-----

सरकारने दगाबाजी केल्यास अन्नत्याग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्यास आंदोलनही मागे घेण्यास तयार आहोत. पण चर्चेदरम्यान सरकारने दगाबाजी केल्यास अन्नत्याग करू, असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

 शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, खासदार पूनम महाजन यांची मुक्ताफळं
दरम्यान तब्बल 200 किलोमीटर पायी चालत येऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या शेतकऱ्यांना आता माओवादाचं लेबल भाजप खासदारानं लावलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यच आहेत, मात्र यानिमित्तानं आंदोलनातून शहरी माओवाद डोकावतो आहे का? हे पाहावं लागेल, अशी मुक्ताफळं उत्तरमध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी उधळली आहेत. सुमारे 200 किलोमीटरचा रस्ता उन्हातान्हातून पायी कापत शेतकरी नाशिकहून मुंबईत पोहोचले आहेत. आपल्या न्याय्य हक्कांसाठी शेतकऱ्यांनी पायातून येणाऱ्या रक्ताची पर्वा केली नाही. अशा स्थिती लोकांना सहानुभूती देत, आधार देण्याऐवजी सत्ताधारी पक्षातील खासदारच माओवादाचं लेबल लावून शेतकऱ्यांची हेटाळणी करताना दिसत आहे.खासदार पूनम महाजन यांच्या वक्तव्याचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.




या तीन व्यक्तींनी केले शेतकरी मोर्चाचे नेतृत्व

सरकारला जागं करणाऱ्या या शेतकरी वादळामागे तीन प्रमुख नेत्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचा शांततापूर्ण मोर्चा मुंबईत आणण्यामागे या त्रिकूटाने मोलाची कामगिरी केली. जाणून घेऊयात हे तीन जण नेमके आहेत




जीवा पांडू गावित (जेपी गावित)

नाशिकच्या कळवण येथे सात वेळा निवडून आलेले आमदार जीवा पांडू गावित भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) नेते आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील विधानसभेत डाव्या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव नाव म्हणून आमदार गावित यांच्याकडे पाहिले जाते. साधं राहणीमान असणारे गावित हे या शेतकरी मोर्चामागील मुख्य सूत्रधार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी हजारो आदिवासींना संघटित करण्यामागे त्यांनी मुख्य भूमिका बजावली आहे.


अशोक ढवळे

डॉ. अशोक ढवळ हे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. १९९३ सालापासून गोदावरी परुळेकर यांच्या प्रेरणेतून डॉ. ढवळे यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यात किसान सभेचे काम करण्यास सुरुवात केली. कर्जमुक्ती, रास्त भाव, स्वामिनाथन आयोग, वनाधिकार, दुष्काळ, पीक विमा, सिंचन, वीज, अन्याय्य भूमी अधिग्रहण, महामुंबई एसईझेड, बुलेट ट्रेन अशा प्रश्नांवर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य किसान सभेने जोरदार स्वतंत्र आणि संयुक्त लढे दिले आहेत.


अजित नवले

जून २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनामागे महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित नवले अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव आहेत. २०१७ मधील या आंदोलनाने मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दिडपट हमीभाव मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. शहरी भागात होणाऱ्या भाज्या आणि फळांचा पुरवठा आम्ही बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. बऱ्याच चर्चांनंतर सरकारने सुकाणू समितीची स्थापना करत नवले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र सरकारी योजनांच्या आराखड्यांनी समाधानी नसल्याने नवले हे तेव्हापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरील शेतकरी आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

===================================================

चर्चा सकारात्मक
शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारचं प्रतिनिधी मंडळ यांच्या सुमारे तीन तास चर्चा झाली. सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवास विकास मंत्री विष्णू सावरा, आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.तर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात किसान सभेचे सचिव अजित नवले यांच्यासह  12 जणांचा समावेश होता. सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेतून शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे. त्यामुळे हे आंदोलन लवकरच मागे घेतलं जाईल. शेतकऱ्यांच्या जवळपास 80 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


सरकार - शेतकऱ्यांमधील बैठकीत काय झालं?


* वन जमिनीबाबत सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणार

* जीर्ण झालेले रेशन कार्ड तीन ते सहा महिन्यात बदलून देणार

* आदिवासी भागात रेशन कार्ड 3 महिन्यात बदलून मिळणार

* अन्य भागत सहा महिन्यात मिळणार

* वन हक्क कायद्याखलील अपात्र दावे पुढच्या 6 महिन्यात निकाली करणार

* अपात्र प्रकरणे पुन्हा तपासणार

* 2006 पूर्वी जितकी जागा असेल ती परत देऊ

* गहाळ झाल्याचा पुरावा असेल तर तो ही ग्राह्य मानणार

* संजय गांधी, श्रावणबाळ लाभार्थीचे मानधन सकारात्मक निर्णय घेणार


विरोधी पक्षांनी व पक्षाच्या गटनेत्यांनी लाँग मार्चबाबत आपले म्हणणे मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शेतक-यांचे मागण्या योग्य आहेत. ज्या भावना विरोधी नेत्यांनी मांडल्या त्याशी मी स्वत: सहमत आहे. सर्वपक्षीयांनी या मोर्चाला पाठिंबा दिला तो योग्य आहे. आम्ही स्वत: सत्तेत असल्याने पाठिंबा देता येत नाही. पण त्यांच्या मागण्या, म्हणणे याशी मी व माझे सरकार पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्याशी चर्चा करू व सरकार योग्य कार्यवाही करेल अशी सभागृहाला खात्री देतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


…अन्यथा वणवा देशभर पसरेल: शरद पवार


भाजपा सरकारने घोषणा खूप केल्या, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच उपेक्षित वर्ग आज मुंबईत चालत आला. आता राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा हा संघर्ष पुढे राज्य व देशात वणव्यासारखा पसरत जाईल, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.



..तर मोर्चाचे 'संकट' टाळता आले असते : एकनाथ खडसे

राज्य सरकारवर  कठोर प्रहार करणारे माजी मंत्री  एकनाथ खडसेंनी 'किसान लॉंग मार्च'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. किसान लॉंग मार्चला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सरकारदरबारी प्रचंड दबाव वाढला आहे.विधिमंडळाच्या सोमवारच्या  कामकाजावर मोर्चाचा प्रभाव होता. मंत्रिपद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवरुन खडसे अस्वस्थ आहेत. त्यामळे ते सरकारवरील टीकेची एकही संधी सोडत नाही.यांसदर्भात 'सकाळ'शी बोलताना खडसे म्हणाले, 'नाशिकचे असल्यामुळे जीवा गावित हे सगळे ओळखीचे नेते आहेत. एकमेकांच्या घरी जेवण होतं, चर्चा होतात. शेतकरी मोर्चाबाबत कळलं तेव्हा मी मोर्चेकरी नेत्यांशी बोललो होतो. मोर्चकरी म्हणाले होते सरकारने लिहून द्यावं मागण्यांबाबत काय कारवाई करणार. आम्ही आंदोलन मागे घेतो.''मी इथे चार पाच दिवस आधी सरकारशी बोललो होतो. चर्चा करा त्यांच्याशी त्यांना लिखित हवे; परंतु सरकारच्या वतीने काहीच केले नाही,'' असा खडसेंचा आरोप आहे.नाशिकचे पालकमंत्री आणि संबंधितांनी आधीच प्रयत्न केले असते तर कदाचित  आज ही वेळ आली नसती, अशा शब्दात खडसेंनी खंत  व्यक्त करुन  मंत्री गिरीष महाजन यांना लक्ष केले.


अभिनेत्री सायली संजीवने दिला किसान लाँग मार्चला पाठिंबा


माकपच्या लाल बावट्याखाली नाशिकहून मुंबईच्या आझाद मैदानात धडकलेल्या किसान लाँग मार्चला अभिनेत्री सायली संजीवने पाठिंबा दर्शवला आहे. 


पंतप्रधान मोदी, फडणवीस अहंकार बाजूला ठेवा : राहुल गांधी 

आज या शेतकऱ्यांच्या मोर्चासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अणि मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अशी मागणी केली. मुंबईतील शेतकऱ्यांचा महामोर्चा हे लोकांच्या ताकदीचे उदाहरण आहे. काँग्रेस पक्ष या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून त्यांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात.

शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस लाल बावट्यासोबत

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. या लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या लढ्यात काँग्रेस लाल बावट्यासोबत आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. 




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.