Thursday 1 March 2018

पुणे जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची निवडणूक ; सरपंचपदासाठी 12 ठिकाणचे सरंपच बिनविरोध ; भाजपला प्रतिसाद

पुणे जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची निवडणूक ; सरपंचपदासाठी 12 ठिकाणचे सरंपच बिनविरोध


पुणे जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, 271 ग्रामपंचायतीमधील 273 सदस्यांसाठी तर पोटनिवडणूक होत असलेल्या 5 सरपंचपदासाठी मतदान घेण्यात आले होते. सार्वत्रिक निवडणुकीतील 36 ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या 40 जागा रिक्त असून, 56 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात होते.सरपंचपदासाठी पोटनिवडणुकीत 3 ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सलग दुसर्‍यांदा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्याबरोबरच खेड तालुक्यातील परसूल आणि आंंबेगावमधील तळकेरवाडी येथीलही निवडणुकीत सरपंचपदासाठी उमेदवारी आर्ज दाखल झाला नाही.  सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 36 ग्रामपंचायतींमधील 12 ठिकाणचे सरंपच हेे बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे 22 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 66 उमेदवार रिंगणात होते. सरपंचपदासाठी  खेड तालुक्यातील परसूल, आंबेगावातील तळकेरवाडी आणि जुन्नर तालुक्यातील पांगरीतर्फे मड ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. तर 168 ग्रामपंचायत सदस्यपदासाठीही अर्ज आले नाहीत. त्यामुळे येथे पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपने सरपंचपद मिळविले आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला मतदारांचा प्रतिसाद मिळाला आहे. 

मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीत कमळ फुलले

गेली 20 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस व समर्थकांची सत्ता असलेल्या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप – शिवसेना पुरस्कृत मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनलने थेट सरपंचपदासह तेरा जागांवर विजय मिळवित ग्रामपंचायतवर एकहाती भाजप सेनेचा झेंडा फडकविला.थेटसरपंच निवडणुकीत भाजपचे शिवराज बबनराव घुले यांनी मांजराईदेवी ग्रामविकास पॅनलचे कैलास घुले यांचा 447 मतांनी पराभव करत विजय संपादन केला.मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीची मंगळवारी पोटनिवडणूक होऊन बुधवारी निकाल जाहीर झाला. मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनलमधील भाजपचे सरपंच शिवराज घुले यांनी 9243 मते घेतली, तर मांजराईदेवी ग्रामविकास पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार कैलास घुले यांना 8796 मते मिळाली. यात 447 मतांची आघाडी घेत भाजपचे शिवराज घुले हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत.तसेच एकूण 17 पैकी 12 जागा जिंकत भाजप सेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राजकीयदृष्ट्‌या महत्त्वाच्या असलेल्या मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीत भाजपाने सत्ता मिळवित राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडले आहे. त्यामुळे 20-25 वर्षांची सत्ता कायम राखण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस अपयशी ठरली आहे.ग्रामपंचायतील एकूण 17 पैकी 12 जागा भाजप- सेनेने पटकाविल्या आहेत. तर सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला असून, हवेली तालुक्‍यात महत्त्वपूर्ण आणि पालिका हद्दीलगत असलेल्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला त्यामुळे धक्‍का बसला आहे. सरपंचपदी विजयी झालेले शिवराज घुले यांना 9243 मते मिळाली आहेत. ते 447 मतांनी विजयी झाले आहेत.मांजराईदेवी रयत परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते (कंसात) पुरुषोत्तम शिवाजी धारवाडकर (1831), संजय सोपान धारवाडकर (1528), सुनिता रामदास घुले (1126), अमित ज्ञानेश्वर घुले (1946), निर्मला विशाल म्हस्के (1745), सुमित अशोक घुले (1741), सुवर्णा विजय कामठे (1325), सीमा चंद्रकांत घुले (1283), समीर सत्यवान घुले (1242), उज्ज्वला शिवाजी टिळेकर (1195), नयना विजय बहिरट (1062), प्रमोद मोहन कोद्रे (1016), तर मांजराईदेवी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार- जयश्री संदीप खलसे (1729), नेहा सागर बत्ताले (1964), बालाजी सुदाम अंकुशराव (2399), आशा शिवाजी आदमाने (2622), निलेश दिलीप घुले (2218).

म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुर भांडे

म्हाळूंगे ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने घेण्यात  आलेल्या म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणूकीत सरपंचपदासाठी मयुर तुळशीराम भांडे हे उमेदवार निवडून आले आहेत. अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी भांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अजिंक्य रमेश कांबळे यांचा 84 मतांनी पराभव करत विजयी झाले.भांडे यांना एकूण 855 तर कांबळे यांना 771 मते पडली. थेट जनतेतून निवड झाल्याने सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. तर सदस्यपदासाठी झालेल्या निवडीत नागरीकांचा मागास प्रवर्गातून युवराज मोहन कोळेकर यांनी निनाद पाडाळे यांचा 172 मतांनी पराभव केला. युवराज कोळेकर यांना 387 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार निनाद अर्जून पाडाळे यांना 215 मते मिळाली.सर्वसाधारण जागेसाठी सुखदेव रामदास कोळेकर यांनी सतिश आनंदा पाडाळे यांचा 168 मतांनी पराभव केला, कोळेकर यांना 311 तर पाडाळे यांना 143 मते मिळाली. महिला सर्वसाधारण जागेसाठी बेबी पांडूरंग खैरे यांना 240 तर स्मिता ज्योतिबा पाडाळे यांना 214 मते मिळाली यात बेबी खैरे यांनी स्मिता पाडाळे यांचा 26 मतांनी पराभव केला. सर्वसाधारण महिला झालेल्या निवडीसाठी बेबी शांताराम पाडाळे यांना 256 तर त्रिवेणी अनिल कामठे यांना 251 मते मिळाली यात कामठे यांचा पाच मतांनी पराभव झाला.नागरीकांचा मागास प्रवर्ग मधून उज्वल विजय पाडाळे यांना 222 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार किरण रामदास पाडाळे यांना 208 मते मिळाली यात किरण पाडाळे यांचा 14 मतांनी पराभव झाला.विवेक गोविंद खैरे यांनी अविनाश पोपट पाडाळे यांचा 61 मतांनी पराभव केला.विवेक खैरे यांना 253 तर अविनाश पाडाळे यांना 192 मते मिळाली.रुपेश सुरेश पाडाळे यांनी मंगश मधुकर पाडाळे यांचा 21 मतांनी पराभव केला रुपेश यांना 218 तर मंगेश यांना 197 मते मिळाली.
आठ उमेदवार बिनविरोध-म्हाळूंगे ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत यापुर्वीच आठ उमेदवार बिनविरोध निवडण्यात आले होते. यात अर्चना सागर चिव्हे (अनुसुचित जमाती), सुजाता सुर्यकांत कोळेकर व स्मिता मनोज पाडाळे (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला), अजिंक्य विश्वनाथ कांबळे (अनुसुचित जाती), प्रियंका धनराज कांबळे (अनुसुचित जाती महिला), भाग्यश्री संजय पाडाळे (सर्वसाधारण महिला), पांडूरंग सहादू पाडाळे (सर्वसाधारण), संध्या शशिकांत कांबळे (अनुसुचित जाती महिला).

मावळात भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन सरपंच

मावळ तालुक्यात निवडणूक झालेल्या पाच ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपने, तर 2 ग्रामपंचायतींचे सरपंचपद राष्ट्रवादीने पटकावले असून बहुमतात मात्र भाजप व राष्ट्रवादीने संमिश्र तर शिवसेनेने एका ग्रामपंचायतींमध्ये बहुमत पटकावले आहे.तालुक्यातील भाजे, लोहगड, सांगिसे, वाकसई, मुंढावरे या पाच ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक मंगळवारी पार पडली. बुधवार (दि. 28) वडगाव मावळ येथील महसूल भवनमध्ये तहसीलदार रणजीत देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.निवडणूक निकालानुसार भाजे, लोहगड व सांगिसेचे सरपंचपद भाजपने तर वाकसई व मुंढावरेचे सरपंचपद राष्ट्रवादीने पटकावले आहे. तसेच, भाजे व लोहगड या दोन ठिकाणी भाजपने तर सांगिसे व मुंढावरे या दोन ठिकाणी राष्ट्रवादीने बहुमत मिळविले असून वाकसई येथे शिवसेनेने बहुमत मिळवले आहे.
ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार व मते पुढीलप्रमाणे :
मुंढावरे - सरपंच : नवनाथ हेलम(बिनविरोध), प्रभाग 1 : कैलास वाघमारे(123 मते), चंद्रभागा कदम(142 मते), पल्लवी थोरात(183 मते), प्रभाग 2 : सागर रणपिसे(173 मते), गोरख बांगर(177 मते), दिपाली गरवड(170 मते), प्रभाग 3 : राणी जाधव(171 मते), भारती थोरवे(153 मते)
लोहगड - सरपंच : नागेश मरगळे(103 मते), प्रभाग 1 : नितीन भोरडे(दोघे बिनविरोध), प्रभाग 2 : उषा बैकर(बिनविरोध), गणपत ढाकोळ(41 मते), प्रभाग 3. अरुण मरगळे(62 मते), स्वाती धानिवले व कविता विखार(दोघी बिनविरोध).
वाकसई - सरपंच : दिपक काशिकर(1416 मते), प्रभाग 1 : अनिता रोकडे(399 मते), पुनम येवले(376 मते), मनोज जगताप(बिनविरो), प्रभाग 2 : पुष्पा देसाई(358 मते), आरती कारके(386 मते), प्रदिप येवले(367 मते), प्रभाग 3 : महेंद्र शिंदे(378 मते), उषा देशमुख(386 मते), गणेश देशमुख(409 मते) प्रभाग 4 : कैलास काशिकर व निलम शेलार(दोघे बिनविरोध).
सांगिसे - सरपंच : बबन टाकळकर(314 मते), प्रभाग 1 : विष्णू जाधव(बिनविरोध), शोभा गरुड(186 मते), श्रध्दा दळवी(बिनविरोध), ज्ञानेश्‍वर भांगरे(173 मते), प्रभाग 3.विलास मानकर(बिनविरोध), चंदा पिंगळे(बिनविरोध),संगिता टाकळकर(बिनविरोध).
भाजे - सरपंच : चेतन मानकर(792 मते), प्रभाग 1 : मच्छिंद्रनाथ विखार(225), गोरक्षनाथ दळवी(228 मते), सुनिता दळवी(234 मते), प्रभाग 2: दिलीप भालेराव(239 मते), अश्‍विनी खाटपे(235), सविता शिवेकर(233), प्रभाग 3 : लताबाई कुंभार(212 मते), निता काकरे(158 मते), दिनेश ढगे(224 मते).

कळंबच्या पोटनिवडणूकीमध्ये आशा नलवडे विजयी

कळंब (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीमध्ये  आशा विठ्ठल नलवडे यांचा २५ मतांनी विजय झाला. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याच्या कारणावरुन दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे दोन जागेची निवडणूक झाली.यामध्ये श्रीकांत विजय वाघमारे यांची प्रभाग - १ मधून बिनविरोध निवड झाली होती. तर प्रभाग ६ मधील एका जागेसाठी  तिरंगी निवडणूक झाली. निवडणूकीमध्ये आशा विठ्ठल नलवडे यांनी बाजी मारुन २५ मतांनी विजय मिळवला. नलवडे यांना ३४६ मते पडली. त्यांनी संगिता शिवाजी जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना ३२१ मते पडली व कविता कुंडलिक जगताप यांना ६१ मते पडली. आशा नलवडे व श्रीकांत वाघमारे हे  राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पक्षाचे उमेदवार आहेत.

पारूंडे ग्रामपंचायत निवडणुक सरपंचपदी सुमित्रा पवार

पांरुडे ता. जुन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ब्रम्हनाथ ग्राम विकास पॅनेलच्या सुमित्रा पवार 884 मते मिळवून विजयी झाल्या.या निवडणुकीत माजी सभापती दशरथ पवार यांच्या पॅनेलने पारूंडे ग्रामपंचायतीवर एक हाती विजय मिळवला असून त्यांच्या पत्नीकडे सरपंच पदाची धुरा आली आहे. तर विरोधकांच्या ब्रम्हनाथ विकास आघाडीस एकही जागा मिळाली नाही. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते.ब्रम्हनाथ ग्राम विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते - सुमित्रा दशरथ पवार -  884 सरपंच, मेघनाथ मारूती जाधव -203 सदस्य, प्रियंका जयवंत पवार -249 सदस्य, राजश्री किसन पुंडे -248 सदस्य, रोहीदास नामदेव जाधव -331 सदस्य, प्रविण तुकाराम पवार -309 सदस्य, आशा पंकज साबळे - 302 सदस्य, रहेमान अहमद शेख - 318 सदस्य, सुनिता अजित खोंड -342, सदस्य,अर्चना अशोक पवार -327

वाडा पुर्नवसन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी तांबोळी

वाडा पुर्नवसन (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सहारा इरफान तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिरूर तालुक्यातील वाडा हे गाव पुर्नवसन केलेले गाव आहे. या ग्रामपंचायतची 7 सदस्य संख्या आहे. सरपंच उज्वला सुनील पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. सरपंचपदाची निवडणूक जाहिर झाल्यावर सहारा इरफान तांबोळी यांचा एकमेव अर्ज आला होता, त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. यासाठी उपसरपंच बाळासाहेब दत्तात्रेय वाडेकर यांनी सुचक म्हणून काम केले.

सासू-सून झाल्या ग्रामपंचायत सदस्या


चांदे (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत एकाच घरातील दोन महिलांनी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांनी मिळविला आहे.चांदे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना जीवन खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्पना खानेकर यांच्या सूनबाई कोमल प्रसाद खानेकर या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता एकाच घरातील सासू व सून सदस्य म्हणून निवडून येण्याचा मान खानेकर परिवाराने मिळवला आहे. नवनिर्वाचित सदस्या कल्पना खानेकर या मुळशी तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष जीवन खानेकर यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे युवकनेते व चांदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रसाद खानेकर यांच्या त्या मातोश्री होत.सन २०१५ मध्ये चांदे ग्रामपंचायत निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली होती. या वेळी ठरल्याप्रमाणे कोमल खानेकर यांना एक वर्षानंतर उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, परंतु अडीच वर्षे झाली तरी त्यास त्यांना ठरल्याप्रमाणे संधी मिळाली नाही. त्याचदरम्यान काही कारणाने एका सदस्याने मध्येच राजीनामा दिल्याने सदस्यपदाची एक जागा रिक्त झाली. पूर्वी ठरले असूनही उपसरपंच होण्याची संधी न मिळाल्याने प्रसाद खानेकर यांनी या नाराजीतून आपल्या मातोश्रींना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले. त्यामुळे या ठिकाणी एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना खानेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी कल्पना खानेकर आणि कोमल खानेकर यांचे चांदे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.