Wednesday 7 March 2018

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोकसभेत प्रतिनिधीत्व केलेल्या ८१८ महिलांना सलाम!

भारतीय राजकारणातील लोकप्रतिनिधी महिलांना सलाम!

सर्व क्षेत्रातील महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!

गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदारांमध्ये सर्वाधिक उत्तरप्रदेशमधून १२१ महिला लोकसभेत प्रतिनिधीत्व 

संसदेत आतापर्यंत महाराष्ट्रातील ४६ महिलांचे प्रतिनिधीत्व 


८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय लोकशाहीतील सक्रिय सहभाग दर्शवून गेल्या ६६ वर्षात ८१८ महिलांनी संसदेचे सदस्य म्हणून कामगिरी केली. त्यांच्या या लोकप्रतिनिधित्व कर्तृत्वाला पॉलिटीकल ऍनालिसेस ऍण्ड रिसर्च ब्युरो (प्राब) च्या वतीने सलाम!जागतिक महिला दिनानिमित्त संसदेतील कामकाजातील महिलांनी दर्शविलेल्या सहभागाबाबत माहिती देत आहोत ती पूढील प्रमाणे गेल्या ६६ वर्षात संसदेत ८१८ महिला खासदारांनी प्रतिनिधीत्व केले. महाराष्ट्रातून गेल्या ६६ वर्षात आत्तापर्यंत ४६ महिला खासदार लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते आजपर्यंत महाराष्ट्रातून ६८७ खासदार लोकसभेवर निवडून गेले आहेत, यामध्ये ४६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेवर आजतागायत निवडल्या गेलेल्या २११५ खासदारांपैकी महाराष्ट्रातून १५१ खासदार निवडले गेले, यामध्ये महाराष्ट्रातील १४ महिला खासदारांचा समावेश आहे. संसदेत गेल्या ६६ वर्षात ८१८ महिला खासदार निवडून आल्या आहेत, यामध्ये लोकसभेच्या ६३२ तर राज्यसभेच्या १८६ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेत गेल्या ६६ वर्षात २१ महिला खासदारांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे.  सन १९५२ पासून आजतागायत देशात १० हजार ९७० खासदार निवडले गेले आहेत, यामध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ही ८८५५ इतकी आहे तर  २११५ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रपतींनी आजपर्यंत देशातील १३३ खासदारांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले, यामध्ये २१ महिला खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून आजपर्यंत ७ महिलांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केले आहे. सोळाव्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदार प्रतिनिधीत्व करीत आहेत. सध्याच्या १६ व्या लोकसभेत सर्वाधिक ६५ महिला खासदारांची नोंद झाली आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ६ महिला खासदारांचा समावेश आहे. पंधराव्या लोकसभेतील एकूण ५६० खासदारांपैकी ६४ महिला खासदार होत्या. पहिल्या लोकसभेत ५४३ खासदार होते,यामध्ये २४ महिला खासदार होत्या. दुसर्‍या लोकसभेतही २४ महिला खासदारांचा समावेश होता.  उत्तर प्रदेशातून सर्वाधिक १२१ महिला खासदार प्रतिनिधीत्व केले. पहिल्या लोकसभेपासून ते आजपर्यंत उत्तर प्रदेश या राज्याने १३९४ खासदार लोकसभेवर निवडून दिले ,यामध्ये  १२१ महिला खासदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालने ६५, मध्यप्रदेश- ६२, बिहार- ५९, महाराष्ट्र- ४६, आंध्रप्रदेश- ४५, राजस्थान- ३०, गुजरात -२७, पंजाब- २४ ,तामिळनाडू- २३,ओडिशा- १६,  कर्नाटक १५, आसाम - १५, तर दिल्लीतून १३ महिला खासदार आजपर्यंत लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. राज्यसभेवर सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या खासदारांमध्ये श्रीमती नजमा हेपतुल्ला या ६ वेळा राज्यसभेवर निवडून आल्या आहेत, यापैकी त्या चार वेळा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. याबरोबरच श्रीमती अंबिका सोनी (५ वेळ), श्रीमती जया बच्चन (३ वेळ), श्रीमती रेणुका चौधरी (३ वेळ) श्रीमती झरणा दास, श्रीमती कनिमोझी, श्रीमती निर्मला सीतारामन, श्रीमती वानसुक, श्रीमती विप्लव्वा ठाकूर (२ वेळ) यांचा समावेश आहे. या कर्तृत्वान महिला लोकप्रतिनिधींचे स्मरण करून त्यांचा सन्मान करुया!

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.