Tuesday 4 February 2020

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यवतमाळ विधानपरिषद पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या पसंतीची २९८ मते मिळाली. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना १८५ मते मिळाली तर ६ मते बाद ठरली होती. विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भारतीय जनता पक्षाचे सुमित बाजोरिया यांच्यात ही थेट लढत झाली होती. यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. चतुर्वेदींनी अवघ्या ६ महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. या निवडणुकीपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने मतदारांना सहलीही घडविण्यात आल्या होत्या. तसेच महाविकास आघाडीने आपल्या मतदारांकडून एकजुटीची शपथ घेतली होती. तसेच अवैध मतदान टाळण्याच्या दृष्टीने गुरुवारी नागपुरात मतदारांकडून प्रत्यक्ष मतदानाचे प्रात्यक्षिकही महाविकास आघाडीने करून घेतले होते. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी विजयी झाले आहेत, तर भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी पहिल्या फेरीत 298 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी आघाडी घेतली होती. भाजपच्या सुमित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मते मिळाली होती, तर 6 मते बाद ठरली होती. दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झाले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे आधीपासूनच जड मानलं जात होते. यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. यवतमाळ विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार, भाजपच्या उमेदवारासह आणखी चार अपक्ष उमेदवार रिंगणात होते. नंतर चारही अपक्षांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि १६ पंचायत समित्यांचे सभापती मिळून एकूण ४८९ मतदारांनी या निवडणूक मतदान केलं. या निवडणुकीचा आज निकाल लागला.
कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी?- दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत. सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात. वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल-
भाजप – 147
शिवसेना – 97
काँग्रेस – 92
राष्ट्रवादी काँग्रेस- 51
प्रहार – 18
इतर – 72
बसपा – 4
एमआयएम – 8
एकूण – 489
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.