Wednesday 12 February 2020

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत; ६२ जागांवर विजय

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत


दिल्लीकरांनी विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षालाच विजयी केले. दुहेरी आकडा न गाठता येणाऱ्या भाजपला दुहेरी आठ ठिकाणी विजय मिळाला, तर काँग्रेसला यंदाही भोपळाही फोडता आला नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून १९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. तेच तिस-यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर तासाभरताच दिल्लीत आपची सत्ता येण्यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या २२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला यंदाही सुरूंग लागला आहे. गेल्या महिनाभराच्या विखारी प्रचारामुळे दिल्लीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. या प्रचाराला केजरीवाल यांनी अत्यंत संयत उत्तर दिल्याने मतदारांचा विश्वास जिंकण्यात अखेर आपचे उमेदवार यशस्वी ठरले.दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोलमधून ‘आप’ला बहुमत मिळेल, असेच भाकित वर्तविण्यात आले होते. तसाच कौल जनतेने दिला. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. गेल्या वेळेपेक्षा ही संख्या फक्त पाचने कमी असून पाच वर्षांनंतर पुन्हा ‘आप’ने साठीपार झेंडा फडकावल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक मानला जातो. निवडणुकीत ५५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपला केवळ आठच जागा जिंकता आल्या. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पराभूत मन:स्थितीत वावरणाऱ्या काँग्रेसला पुन्हा खातेही उघडता आले नाही. दरम्यान दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ५५ जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र, भाजपला गेल्या वेळेपेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळाल्या. भाजपचे प्राधान्य विकासालाच असून द्वेषाचे राजकारण भाजप करत नाही, असा दावा तिवारी यांनी केला आहे. दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश भिडुरी यांनी मात्र ‘निवडणूक प्रचार’ कायम ठेवत, देशद्रोहींना गोळी मारा असे म्हटले तर काय चुकीचे आहे, असा प्रतिप्रश्न केला. कपिल मिश्रा, तेजिंदर सिंह बग्गा यांच्यासारखे भाजपचे वाचाळ उमेदवारही पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असून, या पक्षाला पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाला झारखंडमध्ये स्थानिक नेते हेमंत सोरेन यांच्या शक्तीचा अंदाज लावता आला नाही. तर, दुसरीकडे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने आखलेली रणनीती काही काम करू शकली नाही. तथापि, दिल्लीत भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली ही जमेची बाजू मानली जाते. सन २०१५ मध्ये भाजपला दिल्लीत ३२.३ टक्के मते मिळाली. तर यात वाढ होऊन या वेळी ती ३८.४३ टक्क्यांवर पोहोचली. मात्र, लोकसभा निवडणुकीत दिल्लीत मिळालेल्या ५६.५८ टक्के मतांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. आता पुढील दोन विधानसभांसाठी भारतीय जनता पक्षाला आपली रणनीती बदलावी लागेल याचेच हे संकेत आहेत. बिहारमध्ये नोव्हेंबर, तर पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. आम आदमी पक्षाने आपला निवडणूक प्रचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका न करता स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. याचा फायदा आपला मिळाला. भाजपने देखील या निवडणुकीला मोदी विरुद्ध केजरीवाल असे स्वरुप दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केवळ दोनच सभा घेतल्या. मात्र, भाजपच्या इतर नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. पक्षाच्या फक्त तीनच उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections 2020 ) मिळालेल्या दमदार विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचीही तयारी पक्षाने केली आहे. रविवार १६ फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांचा नव्या मंत्रिमंडळासह शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये ४३,१०८ नागरिकांनी नोटा (कोणालाही नाही) चा पर्याय निवडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण ०.५ टक्के आहे. गेल्या म्हणजे २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत ०.४ टक्के मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला होता.
दोन वर्षात सहा राज्यांमध्ये मोठे पराभव- दिल्लीकर मतदारांनी भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भाजपचा धुव्वा उडाला तर काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा आला आहे. या पराभवामुळे मागील दोन वर्षांमध्ये भाजपाचा पराभव झालेल्या राज्यांच्या यादीत दिल्लीचाही समावेश झाला आहे. दोन वर्षात एक दोन नाही तर तब्बल सहा राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा निवडणूक विजयाचा करिष्मा ओसरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दिल्लीमध्ये भाजपाला २०१५ मध्ये अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे यंदा भाजपाला दिल्लीमध्ये चांगले यश मिळेल अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांना होती. दिल्लीचे भाजपाचे प्रमुख मनोज तिवारी यांनी तर भाजपाला ४८ जागांवर विजय मिळेल असं भाकित वर्तवलं होतं. मात्र मतदारांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या केजरीवाल यांच्या हाती दिल्या. या पराभवामध्ये आता भाजपाविरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांची संख्या १२ झाली आहे. देशात १६ राज्यांमध्ये भाजपा आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहेत. देशातील ४२ टक्के लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. सात राज्यांमध्ये काँग्रेस-सध्या देशामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, पॉण्डेचेरी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एकहाती किंवा मित्रपक्षांबरोबर युतीमध्ये सत्ता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये काँग्रेसने मित्रपक्षाच्या मदतीने झारखंडमध्येही सत्ता स्थापन केली आहे. झारखंडमधील सत्ता स्थापनेनंतर देशातील काँग्रेसशासित राज्यांची संख्या सात झाली आहे.

दिल्ली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार खालीलप्रमाणे-

संघ क्र.
मतदारसंघ
नवनिर्वाचित आमदार
पक्ष
मताधिक्य
1
NARELA
SHARAD KUMAR
AAP
17429
2
BURARI
SANJEEV JHA
AAP
88158
3
TIMARPUR
DILIP PANDEY
AAP
24144
4
ADARSH NAGAR
PAWAN SHARMA
AAP
1589
5
BADLI
AJESH YADAV
AAP
29123
6
RITHALA
MOHINDER GOYAL
AAP
13873
7
BAWANA(SC)
JAI BHAGWAN
AAP
11526
8
MUNDKA
DHARAMPAL LAKRA
AAP
19158
9
KIRARI
RITURAJ GOVIND
AAP
5654
10
SULTANPUR MAJRA(SC)
Mukesh Kumar Ahlawat
AAP
48052
11
NANGLOI JAT
RAGHUVINDER SHOKEEN
AAP
11624
12
MANGOL PURI(SC)
RAKHI BIRLA
AAP
30116
13
ROHINI
VIJENDER KUMAR
BJP
12648
14
SHALIMAR BAGH
BANDANA KUMARI
AAP
3440
15
SHAKUR BASTI
SATYENDAR JAIN
AAP
7592
16
TRI NAGAR
PREETI TOMAR
AAP
10710
17
WAZIRPUR
RAJESH GUPTA
AAP
11690
18
MODEL TOWN
AKHILESH PATI TRIPATHI
AAP
11133
19
SADAR BAZAR
SOM DUTT
AAP
25644
20
CHANDNI CHOWK
PARLAD SINGH SAWHNEY
AAP
29584
21
MATIA MAHAL
SHOAIB IQBAL
AAP
50241
22
BALLIMARAN
IMRAN HUSSAIN
AAP
36172
23
KAROL BAGH(SC)
VISHESH RAVI
AAP
31760
24
PATEL NAGAR(SC)
RAAJ KUMAR ANAND
AAP
30935
25
MOTI NAGAR
SHIV CHARAN GOEL
AAP
14072
26
MADIPUR(SC)
Girish Soni
AAP
22719
27
RAJOURI GARDEN
A DHANWATI CHANDELA A
AAP
22972
28
HARI NAGAR
RAJ KUMARI DHILLON
AAP
20131
29
TILAK NAGAR
JARNAIL SINGH
AAP
28029
30
JANAKPURI
RAJESH RISHI
AAP
14917
31
VIKASPURI
MAHINDER YADAV
AAP
42058
32
UTTAM NAGAR
NARESH BALYAN
AAP
19759
33
DWARKA
VINAY MISHRA
AAP
14387
34
MATIALA
GULAB SINGH
AAP
28075
35
NAJAFGARH
KAILASH GAHLOT
AAP
6231
36
BIJWASAN
BHUPINDER SINGH JOON
AAP
753
37
PALAM
BHAVNA GAUR
AAP
32765
38
DELHI CANTT
Virender Singh Kadian
AAP
10590
39
RAJINDER NAGAR
RAGHAV CHADHA
AAP
20058
40
NEW DELHI
ARVIND KEJRIWAL
AAP
21697
41
JANGPURA
PRAVEEN KUMAR
AAP
16063
42
KASTURBA NAGAR
MADAN LAL
AAP
3165
43
MALVIYA NAGAR
SOMNATH BHARTI
AAP
18144
44
R K PURAM
PRAMILA TOKAS
AAP
10369
45
MEHRAULI
NARESH YADAV
AAP
18161
46
CHHATARPUR
KARTAR SINGH TANWAR
AAP
3720
47
DEOLI(SC)
PRAKASH @ PRAKASH JARWAL
AAP
40173
48
AMBEDKAR NAGAR(SC)
AJAY DUTT
AAP
28327
49
SANGAM VIHAR
DINESH MOHANIYA
AAP
42522
50
GREATER KAILASH
SAURABH BHARADWAJ
AAP
16809
51
KALKAJI
ATISHI
AAP
11393
52
TUGHLAKABAD
SAHIRAM
AAP
13758
53
BADARPUR
RAMVIR SINGH BIDHURI
BJP
3719
54
OKHLA
AMANATULLAH KHAN
AAP
71827
55
TRILOKPURI(SC)
ROHIT KUMAR
AAP
12486
56
KONDLI(SC)
KULDEEP KUMAR
AAP
17907
57
PATPARGANJ
Manish Sisodia
AAP
3207
58
LAXMI NAGAR
ABHAY VERMA
BJP
880
59
VISHWAS NAGAR
OM PRAKASH SHARMA
BJP
16457
60
KRISHNA NAGAR
S. K. Bagga (Advocate)
AAP
3995
61
GANDHI NAGAR
ANIL KUMAR BAJPAI
BJP
6079
62
SHAHDARA
RAM NIWAS GOEL
AAP
5294
63
SEEMA PURI(SC)
RAJENDRA PAL GAUTAM
AAP
56108
64
ROHTAS NAGAR
Jitender Mahajan
BJP
13241
65
SEELAMPUR
ABDUL REHMAN
AAP
36920
66
GHONDA
AJAY MAHAWAR
BJP
28370
67
BABARPUR
GOPAL RAI
AAP
33062
68
GOKALPUR(SC)
SURENDRA KUMAR
AAP
19488
69
MUSTAFABAD
HAJI YUNUS
AAP
20704
70
KARAWAL NAGAR
MOHAN SINGH BISHT
BJP
8223

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.