Sunday 23 February 2020

जातीचा दाखला रद्द झाल्याने जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात

भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकी धोक्यात



Solapur SC Parliamentary Constituency (General) Election Results 2019

CandidatePartyTotal Votes% of VotesStatus
Shri. Sha. Bra. Dr. Jai Sidheshwar Shivachary MahaswamijiBharatiya Janata Party52498548.41Winner
Shinde Sushilkumar SambhajiraoIndian National Congress36637733.781st Runner-up
Ambedkar Prakash YashvantVanchit Bahujan Aaghadi17000715.682nd Runner-up

भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सांगत तो रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर या राखीव मतदारसंघाचे खासदार आहेत. जातीचा दाखलाच रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी आता धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. १५ फेब्रुवारी रोजीच यावर सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणी नियुक्त दक्षता समितीने तपास करुन आपला अहवाल सादर केला. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचे समितीने म्हटले. दरम्यान, दक्षता समिती तक्रारदाराच्या दबावात काम करत असून त्रयस्थ समितीमार्फत तपास व्हावा, अशी मागणी जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वकिलाने केली होती. पण जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचेही जयसिद्धेश्वर स्वामी यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी म्हटले होते. सोलापूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इतर जातीच्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवल्यास त्यांची खासदारकीही जाऊ शकते. पण याविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचाही अधिकार त्यांच्याकडे असेल. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर स्वामींनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र दिले होते. पण त्यांचे मूळ प्रमाणपत्र हिंदू लिंगायत असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. २०१४ मध्ये निवडून आलेल्या शरद बनसोडेंना उमेदवारी न देता यावेळी भाजपने लिंगायत समाजातील आध्यात्मिक गुरू जयसिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसनेही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली होती. शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय गृहमंत्रिपदही भूषवले आहे. तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यासोबत सोलापूरहूनही निवडणुकीस उभे राहिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात चांगलाच जोर लावला होता. मोठ्या प्रमाणात प्रचारही वंचितच्या नेत्यांनी या मतदारसंघात केला होता. पण मतविभाजनात भाजपचा विजय झाला होता. सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ‘बेडा जंगम’ या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी पूर्ण झाली असून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याच्यावतीने दाखल केलेले म्हणणे फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात येऊन भाजपालाही धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आता टपालाद्वारे निकाल पोहोच करणार होते. सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार तथा गौडगावच्या वीरशैव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या दोघा दिग्गजांना पराभूत केले होते. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यास आक्षेप घेत विनायक कंदकुरे, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड व मिलिंद मुळे या तिघांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्राची पडताळणी होऊन तक्रारदारांच्या आक्षेपावर सुनावणी झाली होती. या प्रकरणात सुरुवातीला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्यावतीने गौडगाव येथील जातीचा पुरावा दाखल केला असता तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर उस्मानबाद जिल्ह्य़ात उमरगा तालुक्यातील तडमोड गावात १९३४ साली डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याचे वडील एका शेतक ऱ्याची जमीन कसत होते. त्यासंदर्भात महसुली पुराव्याचा दावा म्हणून बेडा जंगम या जातीचा पुरावा सांगणारी कागदपत्रे दाखल केली असता दक्षता समितीने त्याची तपासणी केली. त्यात तो पुरावा संशयास्पद आणि असमाधानकारक आढळून आला. त्यानंतर तिसऱ्यांदा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्यावतीने जातीचा पुरावा म्हणून १८७ पानांची कागदपत्रे दाखल केली असता त्यावरही सुनावणी झाली. तसेच त्याची दक्षता समितीमार्फत गृहचौकशी झाली असता त्यात जातीचा पुरावा आढळून आला नाही. शनिवारी दुपारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सूळ यांच्यासमोर झालेल्या सुनवणीअंती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्याचे म्हणणे फेटाळण्यात आले. दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्यावतीने यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्राच्या संदर्भात याचिका दाखल करताना संबंधित मूळ कागदपत्रे जोडली आहेत. त्यामुळे मूळ कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करता आली नाहीत. दक्षता समितीने दिलेले तिन्ही अहवाल अविश्वसनीय आहेत. सध्याची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तक्रारदारांच्या दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे नव्या समितीसमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आम्ही पुरावे देऊन म्हणणे मांडण्यासाठी मुदतीचा अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. मात्र पडताळणी समितीने तो फेटाळल्याने त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत असे डॉ. महास्वामीजींचे वकील अॅ्ड. संतोष न्हावकर यांनी म्हंटले आहे. तर तक्रारदार विनायक कंदकुरे यांनी महास्वामीजीं यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचे बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र अवैध असून भक्कम कायदेशीर पुरावा असलेली कागदपत्रे त्यांना वेळोवेळी संधी देऊनसुद्धा सादर करता आली नाहीत. यापूर्वी त्यांनी कोणत्या आधारे जात प्रमाणपत्र मिळविले, त्याची कोणतीही कागदपत्रे दाखल करता आली नाहीत. महसुली पुरावा म्हणून सादर केलेली कागदपत्रेही अस्सल पुरावा म्हणून सिद्ध करता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी असे विनायक कंदकुरे यांनी म्हंटले आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

HTTPS://IMOJO.IN/1GDBY2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
ONLINE E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/COOPEBOOK
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
ONLINE 200/- रुपये भरा आणि E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/PRABINDIAEBOOK
====================================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.