Monday 24 February 2020

१७ राज्यांमधील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

महाराष्ट्रातील राज्यसभेचे सात उमेदवार बिनविरोध

 महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतर्फे चार उमेदवार, तर भाजपने तीन जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. विधानसभेच्या संख्याबळानुसार आघाडीचे चार, तर भाजपचे तीन जण निवडून येऊ शकतात. निवडणूक रिंगणात सातच उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे तिसरे उमेदवार डॉ. भागवत कराड यांनी, काँग्रेसकडून राजीव सातव, तर शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला होता. महाविकास आघाडीत चौथ्या जागेवर काँग्रेसने आपला दावा केला होता. मात्र काँग्रेसवर मुत्सद्दीपणाने मात करून शरद पवारांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. काँग्रेसला चौथी जागा न मिळता ती जागा राष्ट्रवादीनेच आपल्या पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. भाजपकडून उदयनराजे भोसले, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, फौजिया खान; शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रसचे राजीव सातव हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. महाराष्ट्रात सात जागांसाठी आठ जणांचे अर्ज दाखल झाले होते, पण अपक्षाच्या अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने हा अर्ज बाद झाला. शरद पवार व फौजिया खान (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले व डॉ. भागवत कराड (भाजप), रामदास आठवले (रिपब्लिकन), राजीव सातव (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली. या संदर्भातील औपचारिक घोषणा आज करण्यात आली.

महाराष्ट्रातील 7 जागांसह राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. १७ राज्यांमधील राज्यसभेच्या ५५ सदस्यांच्या जागा भरण्यासाठी २६ मार्च रोजी द्विवार्षिक निवडणुका होणार आहे. राज्यसभेच्या या जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपणार आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली.राज्यसभेतील ६८  जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यात काँग्रेस आणखी काही जागा गमावणार असल्याने सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे. रिकाम्या होणाऱ्या १९ पैकी सुमारे ९ जागा काँग्रेस गमावू शकते. प्रियंका गांधी वढेरा, ज्योतिरादित्य शिंदे आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह काही बडय़ा नेत्यांना वरिष्ठ सभागृहात आणण्याचा काँग्रेस विचार करत असल्याची चर्चा आहे. स्वबळावर ९ जागा जिंकण्याचा आणि मित्रपक्षांच्या मदतीने एखादीदुसरी जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे. हा पक्ष जेथे सत्तेवर आहे, त्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पक्षाच्या जागा काही प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे. यावर्षी एप्रिल, जून व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील ५१ जागा यावर्षी एप्रिलमध्ये, आणखी ५ जागा जूनमध्ये, तर ११ जागा नोव्हेंबरमध्ये रिक्त होणार आहेत.  राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील 55 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. त्यामुळे 7 पैकी 5 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून राज्यसभेवर 7 जण निवडून जाणार असून त्यात 5 जागा अपक्षांच्या मदतीनं महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मतं गरजेची आहेत. त्यामुळं आघाडीचे 4 तर भाजपचे 2 उमेदवार निवडून येतील. राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा प्रयत्न असणार आहे. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शरद पवार वगळता या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या भाजपाप्रणित एनडीए आणि अन्य मित्रपक्षांची संख्या राज्यसभेत 106 आहे. मात्र एकट्या भाजपकडे 82 जागा आहेत. 425 सदस्यीय सभेत बहुमतासाठी 123 मतांची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे 2018 आणि 2019 मध्ये काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 245-सदस्य असलेल्या राज्यसभेत कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांची स्थिती सुधारेल. राज्यसभेत सध्या भाजपाचे 83 आणि कॉंग्रेसचे 45 सदस्य आहेत. या समीकरणानुसार, राज्यसभेत भाजप 83 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सभागृहात बहुमत सध्या करण्यासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. कॉंग्रेस छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांना राज्यसभेत जागा वाढवण्याची संधी मिळणार आहे.

संख्याबळाचे असे आहे गणित

भाजपकडे ११० मते, गरज १११ मतांची राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ३७ मतांची गरज आहे. भाजपकडे १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ व काँग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपला आपल्या कोट्यातील ३ जागा जिंकण्यासाठी एकूण १११ मतांची गरज आहे. परंतु भाजपकडे ५ अपक्ष मिळून ११० चे संख्याबळ आहे. त्यांना तिसऱ्या जागेसाठी एका मताची कमतरता आहे. दरम्यान महाआघाडीकडे १७८ मते आहेत. महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ १५४ असून त्यांना अपक्ष आणि अन्य पक्षांच्या आमदारांचे समर्थन मिळालेले आहे. त्यांची एकूण संख्या १७८ च्या आसपास जाते. ४ जागांसाठी आवश्यक १४८ मते त्यांच्याकडे आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - शुक्रवार, 13 मार्च 2020

उमेदवारी अर्ज पडताळण्याची अंतिम तारीख - सोमवार, 16 मार्च 2020

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - बुधवार, 18 मार्च 2020

निवडणुकीची तारीख - गुरुवार, 26 मार्च 2020

मतदानाची वेळ - सकाळी 9 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत

मतमोजणीची तारीख आणि वेळ - 26 मार्च 2020, दुपारी 5 वाजता

या राज्यातील रिक्त होणाऱ्या जागांवर निवडणूक-

महाराष्ट्र - 7
ओदिशा - 4
तामिळनाडू - 6
पश्चिम बंगाल - 5
आंध्र प्रदेश - 4
तेलंगणा - 2
आसाम - 3
बिहार - 5
छत्तीसगड - 2
गुजरात - 4
हरियाणा - 2
हिमाचल प्रदेश - 1
झारखंड -2
मध्य प्रदेश 3
मणिपूर - 1
राजस्थान - 3
मेघालय - 1

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

HTTPS://IMOJO.IN/1GDBY2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
ONLINE E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/COOPEBOOK
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
ONLINE 200/- रुपये भरा आणि E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/PRABINDIAEBOOK
====================================
 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.