Monday 24 February 2020

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक; राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला बहुमत

अजित पवारांचे माळेगाव कारखान्यावर वर्चस्व

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता खेचून आणली आहे. कारखान्याच्या निकाल जाहीर झालेल्या 18 जागांपैकी राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलने १3 जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी सहकार  पॅनलचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे आणि विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांच्यासह पाच जणांचा विजय झाला. मात्र कारखान्याची सत्ता टिकवण्यात त्यांना यश आले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल झाल्यावर २०१५ मध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे  यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव केला होता. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची रसद त्यांना मिळाली होती. त्यामुळे या वेळी पवार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. या पराभवाचा वचपा पवार यांनी काढला. पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील महत्वाच्या सहकारी संस्थेवर वर्चस्व मिळविण्यात अजित पवार यशस्वी झाले आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ५ गटातून १३ हजार ८७२ सभासद मतदारांपैकी १२ हजार ७०१ सभासदांनी ९१.५५ टक्के मतदान केले. कारखान्याच्या मात्र, पहिल्या गटातील मतमोजणीपासूनच प्रचंड चुरस पाहायला मिळाली. माळेगाव गटात राष्टवादीचा उमेदवार अवघ्या १४१ मतांनी विजयी झाला.  या गटातून  निळकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब तावरे आणि संजय काटे विजयी झाले. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे ६,४११ मते मिळवून विजयी झाले. बाळासाहेब तावरे  यांना ६,१८४,   संजय काटे ५,७४४ मते मिळवून विजयी झाले. सत्ताधारी पॅनलला माळेगांव गटात १७ हजार ३८७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला १७ हजार ५३१ मते मिळाली. पणदरे गटात निळकंठेश्वर पॅनलचे योगेश जगताप, केशवराव जगताप आणि तानाजी कोकरे विजयी झाले. ब वर्ग प्रतिनिधी संघातून निळकंठेश्वर पॅनेलचे स्वप्नील शिवाजीराव जगताप यांनी ७७ मते मिळवुन  विजय मिळवत राष्ट्रवादीला खाते उघडून दिले.   सत्ताधारी गटाचे   चतुर्भुज जगन्नाथ  मुळीक यांना २० मते मिळाली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनल’विरोधात सत्ताधारी चंद्रराव तावरे यांच्या समर्थकांचा ‘सहकार बचाव पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात होता. साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरील 21 जागांसाठी निवडणूक रिंगणात एकूण 56 उमेदवार होते. यामध्ये 14 अपक्ष उमेदवारांचाही समावेश होता.

विजयी उमेदवारांची यादी

गट नंबर 1 (माळेगाव)
संजय काटे- निळकंठेश्वर पॅनल

बाळासाहेब भाऊ तावरे- निळकंठेश्वर पॅनल
रंजन काका तावरे- सहकार बचाव
गट नंबर 2 (पणदरे)
तानाजी कोकरे- निळकंठेश्वर पॅनल

केशवराव जगताप- निळकंठेश्वर पॅनल
योगेश जगताप- निळकंठेश्वर पॅनल
गट नंबर 3 (सांगवी)
सुरेश खलाटे- निळकंठेश्वर पॅनल

चंद्रराव  तावरे- सहकार बचाव
अनिल तावरे- निळकंठेश्वर पॅनल
गट नंबर 4 (निरावागज)
मदनराव देवकाते- निळकंठेश्वर पॅनल

बन्सीलाल आटोळे- निळकंठेश्वर पॅनल
प्रताप आटोळे- सहकार बचाव
गट नंबर 5 (बारामती)
नितीन सातव- निळकंठेश्वर पॅनल

राजेंद्र ढवाण- निळकंठेश्वर पॅनल
गुलाबराव गावडे- सहकार बचाव
ब वर्ग
स्वप्नील जगताप – निळकंठेश्वर पॅनल

सौ. संगीता कोकरे – निळकंठेश्वर पॅनल
सौ. अलका पोंदकुले – निळकंठेश्वर पॅनल
=================================

राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर निवडणूक जिंकल्याचा 

सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. मात्र विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर निवडणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला. “त्याचबरोबर अजित पवारांनी घेतलेल्या गोपनीय शपथेचा भंग केला. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली. या निवडणुकीत 50 कोटी वाटप झाले, असा आरोप रंजन तावरे यांनी केला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर केला. कारखान्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवडणूक लादली. या निवडणुकीत प्रचंड पैशाचा,  सत्तेचा गैरवापर, दमदाटी आणि दहशत केली” असे गंभीर आरोप रंजन तावरे यांनी केले. “राज्याचे उपमुख्यमंत्री दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतात. मात्र कारखान्यासाठी तब्बल सहा दिवस उपमुख्यमंत्री बारामतीत ठाण मांडून होते. त्यांनी मतदारांना दमदाटी केली. कोणाला नोकरीवरून काढू, कोणाचं पाणी बंद करू, अशा धमक्या दिल्या, असाही आरोप तावरे यांनी केले. “सत्तेच्या माध्यमातून नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याच्या मुद्द्याचा निवडणुकीत वापर केला. त्याचबरोबर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमचा परिसर नॉन मॅन झोन असताना, चार संशयित लोक आढळून आले. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही असा दावा तावरे यांनी केला. या संशयित व्यक्तींना 12 तासांपेक्षा जास्त काळ मिळाला आहे.  त्यामुळे संशयाची सुई निश्चित असून, गडबड घोटाळा झाल्याचा संशय आहे, या निवडणुकीत मतदारांना मागेल तेवढे पैसे वाटले. राज्यात आम्ही ऊसाला सर्वाधिक भाव दिला आहे. त्यामुळं अजित पवारांना स्वतःच्या खासगी कारखान्याला जास्त भाव द्यावा लागत होता.  पाच वर्षात त्यांना 600 कोटी पेक्षा जास्त तोटा येत होता. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत 50 कोटी वाटल्याने काय फरक पडणार, असा विचार केल्याचा” आरोप रंजन तावरे यांनी केला आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

HTTPS://IMOJO.IN/1GDBY2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
ONLINE E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/COOPEBOOK
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-BOOK मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
ONLINE 200/- रुपये भरा आणि E-BOOK DOWNLOAD करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

HTTPS://IMOJO.IN/PRABINDIAEBOOK
====================================
 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.