Sunday 19 July 2020

एक प्रामाणिक राजकारणी... देवराव तिजारे

एक प्रामाणिक राजकारणी... देवराव तिजारे

राजकारणाची सध्याची लोकप्रतिनिधीची परिस्थिती पाहता, साधे नगरसेवक ही म्हटले तरी मोठी फॉर्च्युनरसारखी गाडी असते. हातात दोन चार महागडे फोन आणि प्रशस्त घर आणि कार्यालय अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यांपुढे येते. मात्र, नागपुरात दोन टर्म नगरसेवक, एक टर्म महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर ‘सुधार प्रन्यास’चे ट्रस्टी असे अनेकविध पद भूषविणारे देवराव तिजारे आज हलाखीचे जीवन जगत आहेत. प्रामाणिकपणे केलेल्या राजकारणातून एक दमडीही न कमावणारे देवराव तिजारे आज वयाच्या 72 व्या वर्षी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चौकीदार म्हणून काम करीत आहेत. कितीही मोठा नेता असू द्या. त्याच्या राजकीय प्रवासाची पहिली पायरी म्हणजे स्थनिक पातळीवरील नगरसेवक हे पद असते आणि याच पदावरून गडगंज संपत्ती जमा करून राजकारणात उंचीवर जाणारे हजारो लोकप्रतिनिधी आपण आजवर पाहिले आहेत अथवा पाहत आहोत. मात्र, नागपूरचे देवराव तिजारे राजकारणातून पैसा आणि पैसातून पुन्हा राजकारण या समीकरणाला अपवाद ठरलेले राजकारणी आहेत. 19 वर्षे नागपूर महापालिकेचे नगरसेवक. एक वेळ स्थायी समितीचे अध्यक्ष. नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी असलेले देवराव तिजारे आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायला मजबूर आहेत. महापालिकेची तिजोरी सांभाळल्यानंतर शहर विकासासाठी कोट्यवधीची तरतूद करणारे हात आज सुरक्षा रक्षकाची नोकरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करीत आहे. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवराव तिजारे यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी कुटुंबाच्या जबाबदारीमुळे नोकरी करावी लागत आहे. परिस्थिती कशा कलाटणी घेईल, कुणीही सांगू शकत नाही. एकेकाळी महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेले देवराव तिजारे यांनाही परिस्थितीपुढे नमते घेत वयाच्या सत्ताराव्या वर्षी नोकरी करावी लागत आहे. स्थायी समिती अध्यक्ष असल्यामुळे ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्तही होते. आज त्यांच गोकुळपेठ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे. फारच साधे असलेले तिजारे यांचे आजही दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी या दिग्गज नेत्यांशी संबंध आहे. परंतु त्यांनी संबंधाचा फायदा घेत पुढे जाण्याऐवजी स्वतःच्या हिमतीवर विश्‍वास दाखवला. या नेत्यांकडे परिस्थितीबाबत वाच्यताही केली नाही. आपण भले आणि आपले काम भले, या साध्या विचारणीने त्यांना वयाच्या सत्तराव्या वर्षीही उर्जा मिळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक दशकांपूर्वी घेतलेले एक प्लॉट आणि त्यावर बांधलेले अवघ्या दोन खोल्यांचे एक घर, मोडकडीस आलेले फर्निचर, एक नादुरुस्त असलेली मोपेड एवढीच त्यांची संपत्ती आहे. कर्ज काढून बनवलेल्या या घरावर रंगरंगोटी करायला ही आज देवराव यांच्याकडे पैसे नाहीत. आयुष्यात पैसा कमावला नाही, याची थोडीही खंत त्यांना नाही. मात्र, लोकांमध्ये राहण्याची सवय असल्याने ते रात्रभर ड्युटी केल्यानंतरही दिवसा गरजवंतांच्या मदतीसाठी कधी महापालिका तर कधी नासुप्रमध्ये जातात. गरजवंतांची कामे केल्यानेही उर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमुद केले. त्यांच्या बघितल्यानंतर प्रामाणिकपणाचे चेहरा देवराव तिजारे यांच्यापेक्षा वेगळा नसेल, असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. देवराव तिजारे पत्नी, दोन मुली व एका मुलासह राहतात. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लहान प्राची पॉलिटेक्‍निक करीत आहे तर मुलगा ज्ञानेश बीकॉमचे शिक्षण घेत आहे. एका मुलीची जबाबदारी पार पाडली असली तर महागाईच्या काळात दोघांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागत आहे. 1985 मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून ते सर्वप्रथम निवडून आले. याच पंचवार्षिकमध्ये 1990-91 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक म्हणून जनतेने त्यांना निवडून दिले. सध्या ते शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान घर चालविण्यासाठी नोकरी करावी लागत आहे. परंतु याबाबत कुठलीही खंत नाही किंवा नाराजी नाही. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची अजूनही ताकद आहे. पैसा नाही, परंतु आरोग्य सांभाळले. त्यामुळेच रात्रीला ड्युटी केल्यानंतरही कुणी मदतीसाठी हाक दिली तर जात असतो असे मत एकेकाळी नागपूर महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेले देवराव तिजारे यांनी व्यक्त केले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.