Wednesday 15 July 2020

राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

कोरोनाचा विळखा देशभरात वाढू लागला आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकानी प्राण गमावले आहेत. दरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी नीला सत्यनारायण यांचे कोव्हिड19 (COVID-19) मुळे निधन झाले आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात त्यांना या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे सत्यनारायण यांचे निधन झाले. 2009 मध्ये त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त (First Woman State Election Commissioner) होण्याचा बहुमान मिळाला होता. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नीला सत्यनारायण या 1972 च्या सनदी अधिकारी होत्या. एक शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचं काम वाखाणण्याजोगे होते. 05 जुलै 2014 रोजी त्यांनी निवृत्ती स्विकारली. सनदी अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होतीच, मात्र साहित्य क्षेत्रातही त्यांची मुशाफिरी होती. संवेदनशील कवयित्री, स्तंभलेखिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय 150 हून अधिक कविता लिहिल्या. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं होतं. ‘कोरोना’ने आणखी एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं. कर्तव्यकठोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला सत्यनारायण तितक्याच संवेदनशील होत्या. प्रशासकीय कामाच्या धबडग्यातून वेळात वेळ काढून त्या लेखनाचा छंद जोपासत होत्या. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच लोकप्रिय ठरले होते. उद्योजक व्यवसायाशी संबंधित त्यांनी लिहिलेले ‘सत्यकथा’ आणि वनविभागाच्या सचिव म्हणून आलेल्या अनुभवांवरील ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही गाजले होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलं होतं. कविता लेखन हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या होत्या. काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शनही केलं होतं. सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. नीला सत्यनारायण यांची साहित्यसंपदा- आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर); आयुष्य जगताना; एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन); एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर); ओळखीची वाट (कवितासंग्रह); जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव); टाकीचे घाव; डेल्टा १५ (प्रवासवर्णन); तिढा (कादंबरी); तुझ्याविना (कादंबरी); पुनर्भेट (अनुभवकथन); मी क्रांतिज्योती (अनुभवकथन); मैत्र (ललित लेख); रात्र वणव्याची (कादंबरी); सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन).

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.