Monday, 28 March 2022

सहकारातील अजब-गजब निवडणूक; मतदानानंतर तब्बल 4 वर्षांनी मतमोजणी; राज्य बाजार समिती महासंघाचा अखेर निकाल

राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडीची बाजी

सहकारातील अजब-गजब निवडणूक म्हणून ओळखली जाईल अशा बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर तब्बल 4 वर्षांनी मतमोजणीला मुहूर्त मिळाला आणि एकदाचा निवडणूक निकाल जाहीर झाला. असा सहकार खात्यातील ऐतिहासिक प्रकार केवळ 97 व्या घटना दुरुस्तीमुळे घडला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना 97 व्या घटना दुरुस्तीमध्ये वगळल्याने ही बाब न्यायप्रविष्ट होऊन मतमोजणीस स्थगिती देण्यात आली होती. सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने २०११ ला ९७ वी घटना दुरुस्ती केली ( 97th constitutional amendment ) होती. या घटना दुरुस्तीला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. २०१३ ला गुजरात हायकोर्टाने निर्णय देत ही घटना दुरुस्तीतील IX बी हा भाग रद्द केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील या निकालावर शिक्कामोर्तब केले होते त्यानंतर ही प्रलंबित याचिका निकाली निघाली आहे. बहुप्रतीक्षेतील निवडणूक निकालामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 4, शिवसेना 4 मिळून 21 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही ४ जागा जिंकत पूर्वीच्या तुलनेत आपले संख्याबळ वाढविले आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून एकूण ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच सर्वसाधारण गटात मतमोजणीत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून दोन संचालक विजयी झाले आहेत. त्यामध्ये मनिष दळवी-सिंधुदुर्ग आणि दामोदर नवपुते-औरंगाबाद या दोन संचालकांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी सन २०२२ ते २०२७ असा राहणार आहे असे सांगण्यात आलेले आहे मात्र मतदान झाले त्यावेळी कालावधी सन २०१८ ते २०२३ करिता असा होता. यावरून देखील आता वाद-विवाद चर्चेला सुरुवात झालेली आहे. बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालक मंडळाच्या अभूतपूर्व बहुप्रतीक्षेतील निवडणुकीची कहाणी अशी आहे कि, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ पुणेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जानेवारी २०१८ मध्ये जाहीर करण्यात आला होता. राज्यातील २१ संचालकांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन १८ मार्च २०१८ रोजी मतदान झाले होते. २१ मार्च २०१८ रोजी मतमोजणी होती. मात्र महाराष्ट्र सह संस्था अधिनियमातील सुधारित कलमांच्या आधारे आर्थिक दुर्बल घटकांना 97 व्या घटना दुरुस्तीमध्ये वगळल्याने ही बाब न्यायप्रविष्ट होऊन गोपीचंद पांडे उमरेड-नागपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका क्र. ७२८०/२०१८ मधील दि. २० मार्च २०१८ च्या आदेशान्वये याचिका दाखल करून मतमोजणीस स्थगिती मिळवली होती. संचालक व बाजार समिती संघाचे धुळे, नंदुरबार, जळगाव या मतदारसंघातून उमेदवारी करत असलेले पोपटराव सोनवणे यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशान्वे उच्च न्यायालयाने दि. १५ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये सदर स्थगिती उठवून निवडणूक मतमोजणी करण्यास परवानगी दिली होती. यामुळे आता तब्बल ४ वर्षांनंतर राज्य बाजार समिती महासंघाला कार्यकारिणी मिळाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारित कलमांना आव्हान देत काही याचिकाकर्त्यांनी २०१८ साली मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत नियोजित महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने अशा प्रकारची स्थगिती देण्यास नकार दिली. यामुळे याचिकाकर्त्यांनी स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती न देता निवडणुका घेऊन त्याचा निकाल बंद पाकिटामध्ये ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला. तसेच सर्व प्रकरणांचा अंतिम निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सूचना केली. मतमोजणी केली म्हणजे एक प्रकारे निकाल जाहीर होईल. यामुळे मतमोजणी करण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मतमोजणी पूर्ण करावी. याकरिता महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार आणि साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे या संस्थेची उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मतमोजणी काल २७ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ९ वाजता घेण्यात आली. सदर मतमोजणी संपल्यानंतर लगेचच निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला. कोकण विभागातील मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्गमधील जिल्हा बाजार समितीवरील प्रतिनिधीनींनी २३ मार्च रोजी मतदानाचा हक्क बजावला. कोकण विभाग मतदान संघासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे निवडणूक लढवत होते. साखर संकुल-पुणे येथे झालेल्या मतमोजणीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघ मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात उमेदवार मनिष प्रकाश दळवी आणि आम्रे अरविंद गोविंद यांच्यामध्ये झालेला लढतीत मनिष प्रकाश दळवी हे विजयी झाले असून त्यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीमध्ये संचालक म्हणून वर्णी लागली आहे.
बिनविरोध संचालक=
सर्वसाधारण मतदार संघ : ठाणे-रायगड : अनंतराव देशमुख (हातनोली, ता. खालापूर, जि. रायगड), अहमदनगर-नाशिक मतदार संघ – प्रविणकुमार नाहाटा (लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पुणे-सातारा मतदार संघ – रमेश शिंदे (कोपर्डे, ता. खंडाळा, जि. सातारा), सोलापूर-सांगली-कोल्हापूर मतदार संघ – जयवंतराव जगताप (टेभुर्णी, ता. करमाळा, जि. सोलापूर), बीड-उस्मानाबाद : अशोकराव डक (सोन्नाथडी, ता. माजलगांव, जि. बीड), अकोला-बुलढाणा : सेवकराम ताथोड (कसुरा, ता. बाळापुर, जि. अकोला), नागपूर-वर्धा : संजय कामनापुरे (दापोरी-पिंपळगांव लुटे, ता. देवळी, जि.वर्धा).
अन्य विजयी उमेदवार व मिळालेली मते=
सर्वसाधारण मतदारसंघ= मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ – चिठ्ठी काढून विजयी – मनिष दळवी (होडवडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), धुळे-जळगांव, नंदुरबार मतदारसंघ -पोपटराव सोनवणे ( ११ ) (इंदवे, ता. साखरी, जि. धुळे), औरंगाबाद-जालना- चिठ्ठी काढून विजयी– दामोधर नवपुते (सिडको-औरंगाबाद), परभणी-हिंगोली मतदारसंघ – अंकुश आहेर ( ६ ) (आजरसोंडा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), नांदेड-लातूर मतदारसंघ- संतोष सोमवंशी ( ५ ) (धानोरा, ता. औसा, जि. लातुर), अमरावती-वाशीम मतदार संघ- ज्ञानेश्वर नागमोते ( ९) (भातकुली, जि. अमरावती), यवतमाळ मतदारसंघ- आनंदराव जगताप-( ८)  (परसोडी, ता. कळंब, जि. यवतमाळ), भंडारा-गोंदिया- केशवराव मानकर ( ६) (आमगांव, जि. गोंदिया), गडचिरोली-चंदपूर-द दिनेश चोखारे ( ८) (ताडाळी, ता. जि. चंद्रपूर).
महिला राखीव मतदारसंघ (दोन जागा)-इंदुताई गुळवे- १५० मते (नाशिक), रंजना कांडेलकर १४१ मते (निमखेडी-मुक्ताईनगर, जि. जळगांव),
अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघ (एक जागा)-बाबाराव पाटील १४८ मते (तिष्टी, ता. कळमेश्वर, जि.नागपूर),
इतर मागासवर्गीय राखीव (एक जागा)-संदीप काळे १४५ मते (तळेगांव रोड, आर्वी, जि. वर्धा)
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (एक जागा)- पंढरीनाथ थोरे १६५ मते (मरळगोई, ता. निफाड, जि. नाशिक)

नागरी सहकारी बँकांच्या नोकरभरतीचे निकष जाहीर

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या नोकरभरतीसाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सुधारित शैक्षणिक व इतर पात्रतेचे निकष सोपे जाहीर केल्याने बँकांच्या नोकरभरतीमधील अडसर दूर झाला आहे. बँकांमधील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, ज्ञात भाषा, वयोमर्यादा आदींचा त्यात समावेश आहे. बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची (वयोमर्यादा किमान 35 ते 70 वर्षे) नेमणूक ही आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निकषांनुसार आणि आरबीआयच्या मान्यतेच्या अधीन राहून करता येईल.अन्य पदांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीसह एमएस सीआयटी, समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक आहे. त्यामध्ये सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सहायक सरव्यवस्थापक (वयोमर्यादा किमान 35 वर्षे), वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक (किमान 30 वर्षे), कनिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षक (किमान 25 वर्षे), कनिष्ठ लिपिक (किमान 22 ते कमाल 35 वर्षे), शिपाई (किमान 21 ते कमाल 33 वर्षे व किमान 10 वी उत्तीर्ण) या पदांसाठीचे पात्रता निकष जाहीर केले आहेत. स्पर्धेच्या काळात नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी या बँकांमध्ये काम करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणारे असणे आवश्यक असल्याने हा बदल करण्यात आला आहे.बँकांमधील तांत्रिक आणि परसेवेवरील पदांसाठी निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता लागू राहणार नाही. नागरी सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांची मूळ शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असली, तरी त्यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित निश्चित केल्यानुसार कोणतीही एक पदविका धारण करणे आवश्यक आहे. मात्र, या पदविकेची आवश्यकता प्रथम नेमणुकीच्या वेळी लागू राहणार नाही. संबंधित पदविका नागरी सहकारी बँकेमध्ये नेमणूक झाल्यानंतर मिळविता येईल. तथापि, सेवेत रुजू झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत संबंधिताने निश्चित केल्यापैकी कोणतीही एक पदविका संपादन करणे अनिवार्य असून, आणखी काही अटीही नमूद आहेत. सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदांसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता अधिकारी धारण करीत असल्यास पदोन्नती देताना त्यांनी सहकाराची पदवी संपादन करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीत संबंधिताने सहकाराची पदविका संपादन केली नाही, तर अशा अधिकार्‍यांना पुढील पदोन्नतीसाठी अपात्र ठरविण्यात यावे असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

Thursday, 24 March 2022

करूणा धनजंय मुंडे यांच्यासह 19 उमेदवारांचे अर्ज दाखल; १७ उमेदवारांचे अर्ज वैध

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील 2 उमेदवारांचे अर्ज बाद



Sr. No.

Name of Candidate

Party Affiliation

1

Jadhav Jayshri Chandrakant(Anna)

Indian National Congress

2

Satyajeet (Nana) Kadam

Bharatiya Janata Party

3

Seema Shahikant Kadam Rejected

Bharatiya Janata Party

4

Chavan Sachin Pralhad Rejected

Indian National Congress

5

Yashwant Krishna Shelke 

National Socialist Party (United)

6

Santosh Ganpati Bisure

Lokrajya Janata Party

7

Vijay Shamrao Kesarkar

Lokrajya Janata Party

8

Munde Karuna Dhanajay

Independent

9

Subhash Vaiju Desai

Independent

10

Bajirao Sadashiv Naik

Independent

11

Sanjay Bhikaji Magade

Independent

12

Mane Arvind Bhiva

Independent

13

Bhosale Bharat Sambhaji

Independent

14

Shahid Shahjehan Shaikh

Independent

15

Mustak Ajij Mulla

Independent

16

Aslam Badshahji Sayyed

Independent

17

Manisha Manohar Karande

Independent

18

Rajesh Sadashiv Kamble

Independent

19

Rajesh Alias Balawant Satyappa Naik

Independent

वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे पुढील प्रमाणे :

1) जाधव जयश्री चंद्रकांत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2) सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी)
3) यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी)
5) शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी)
6) आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष)
7) देसाई सुभाष वैजू (अपक्ष)
8) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष)
9) भोसले भारत संभाजी (अपक्ष)
10) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष)
11) माने अरविंद भिवा (अपक्ष)
12) मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष)
13) मुंडे करुणा धनंजय (अपक्ष)
14) राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष)
15) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष)
16) संजय भिकाजी मागाडे (अपक्ष)
17) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)

2 उमेदवारांचे अर्ज बाद

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली यामध्ये 2 उमेदवारांचे 3 अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत. तर उर्वरित 17 उमेदवारांचे 24 अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. उमेदवारी अर्ज बाद झाले यामध्ये काँग्रेसचे डमी उमेदवार यांचे 2 अर्ज आणि भाजपच्या डमी उमेदवार सीमा कदम यांचे अर्ज अवैध झाले. तसेच राष्ट्रीय समाजवादी पक्ष (यु)चे उमेदवार यशवंत शेळके यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे. छाननीनंतर आता उमेदवारी माघार घेण्याच्या दि.28 मार्चला माघारीनंतर या निवडणुकीतील रिंगणातील अंतिम उमेदवार निश्चित होतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांवर शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रतिज्ञापत्रावर विरोधी काँग्रेसचे उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कदम यांचा अर्ज वैध ठरविला. कदम समर्थकांची अस्वस्थता चांगलीच वाढली. छाननीत जयश्री जाधव यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. कदम यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवार जाधव यांचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी हरकत घेतली. कदम यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र नोटरीच्या कायद्यानुसार होत नाही. शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का गोल नसून अंडाकृती आहे. यामुळे कदम यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी हरकत घेतली.यावर कदम यांचे वकील विनायक रणखांबे व सुनील कदम यांनी शेटे यांच्या हरकतीस लेखी उत्तर दिले. हरकत निवडणूक अर्ज त्यातील माहिती संबंधित नाही. नोटरी कायद्याप्रमाणेच केली आहे. हरकतीसोबत कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाहीत. यामुळे कदम यांचा अर्ज वैध ठरवावा, असे उत्तर दिले.पक्षाचा एबी फार्म दोघांना दिल्याने सीमा कदम यांचा एक आणि काँग्रेसेचे सचिन चव्हाण यांचे दोन अर्ज, सूचक दुसऱ्या मतदारसंघातील असल्याने यशवंत शेळके यांचा एक अर्ज वैध ठरला. शेवटच्या दिवशी करुणा धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांनी अर्ज दाखल केले होते. एकूण 19 जणांनी अर्ज भरले होते. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी गुरुवारी आणखी दोन अर्ज दाखल केले. भाजपचे सत्यजित कदम यांनीही आणखी एक अर्ज दाखल केला.वंचित बहुजन आघाडीचे शाहीद शहाजान शेख, काँग्रेसकडून सचिन चव्हाण यांनी दोन अर्ज दाखल केले. करुणा मुंडे यांच्यासह बाजीराव नाईक, संजय माघाडे, अरविंद कांबळे, भारत भोसले, मुस्ताक मुल्ला, सुभाष देसाई, अस्लम सय्यद, मनीषा कारंडे, राजेश कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजताही काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर होते, त्यांना टोकन देण्यात आले होते. अहमदनगर येथून एक इच्छुक टोकन दिल्यानंतर कार्यालयात आला. त्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडे करूणा धनजंय या नावे अपक्ष उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेया प्रतिज्ञापत्रात अनेक खुलासे सार्वजनिक झालेले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक-2022 करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी करूणा धनजंय मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 4 व 2 असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सत्यजित नाना कदम, आढाव जयश्री चंद्रकांत (नाना), अस्लम बादशाहजी सय्यद, बाजीराव सदाशिव नाईक, भोसले भरत संभाजी, चव्हाण सचिन प्रल्हाद, जाधव जयश्री चंद्रकांत (नाना), माने अरविंद भिवा, मनिषा मनोहर करंदे, मुंडे करुणा धनंजय, मुस्ताक अजिज मुल्ला, राजेश उर्फ बळवंत सत्यप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागडे, संतोष गणपती बिसुरे, सीमा शाहिकांत कदम, शाहीद शहाजहान शेख, विजय शामरावकेसरकर, यशवंत कृष्णा शेळके यांचा समावेश आहे.  

जयश्री जाधव यांच्या नावे ८६ कोटीची मालमत्ता

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार रुपये किमतीची मालमत्ता आहे; तर २२ कोटी ६३ लाखांचे कर्ज आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जयश्री यांच्या नावे झाली आहे.जाधव यांच्याकडे १ लाख ५५ हजार ६८० रुपयांची रोकड असून एक कोटी २३ लाख ४१ हजार ९६५ रुपयांच्या बँक ठेवी आहेत. त्यांची शेअर्समधील गुंतवणूक एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची आहे; तर राष्ट्रीय बचत योजनेतील त्यांची गुंतवणूक २८ लाख ३६ हजारांची आहे. त्यांच्या वापरात असलेल्या दोन अलिशान कारसह उद्योग व्यवसायांत मिळून एकूण बारा वाहने आहेत.जाधव इंडस्ट्रीजसह अन्य कंपन्यांतील जाधव यांची गुंतवणूक ३१ कोटी ०४ लाख ९८ हजार ४१६ एवढी आहे. त्यांच्या नावावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य ५७ लाख ३३ हजार ५८२ इतके आहे. निवासी इमारतीचे मूल्य ४ कोटी ६० लाख ०४ हजार एवढे आहे. जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार इतकी स्थावर व जंगम मालमत्ता असून २२ कोटी ६३ लाख २४ हजार २८ रुपयांचे कर्जदेखील आहे.

सत्यजित कदम २१ कोटींचे मालक

भाजपचे ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम हे २१ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये आपल्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. तर त्यांच्यावर टोल, हद्दवाढ आणि कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या बाजूने केलेल्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल आहेत.कदम यांच्याकडे यांच्याकडे ४ लाख ३२ हजारांची रोकड असून, विविध बँकांमध्ये ६१ लाख १६ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी विविध कंपन्यांचे समभाग आणि म्युच्युअल फंडामध्ये १० लाख ७५ हजारांची गुंतवणूक केली आहे. तसेच १ कोटी पाच लाख रुपये संस्था, कंपनी किंवा वैयक्तिक कर्ज म्हणून दिले असून, सव्वा पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत. अशी सर्व गुंतवणूक २ कोटी ९८ लाख रुपयांची आहे.कदम यांच्याकडे शेती, भूखंड, फ्लॅट, इमारती, भागीदार असलेल्या कॅडसन फोटो कलर लॅब, कॅडसन डिझेल, केएम डेव्हलपर्स, केएम डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स या माध्यमातून १७ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

करूणा मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून अनेक खुलासे! 

करुणा शर्मा यांनी  शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली परंतु अद्याप मान्यता मिळालेली नाही अशी माहिती आहे. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिलेली आहे. कंपन्यातील शेअर्स, भागीदार संचालक असल्याची माहिती नमूद करण्यात आलेली नाही तसेच KDM TREXIM PVT कंपनीचा उत्पन्न म्हणून एका ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र अजून एका कंपनीत भागीदार व शेअर्सची माहिती लपविल्याचे दिसून येत आहे. LEVEL SET CONSTRUCTION PVT कंपनीत देखील त्या संचालिका आहेत. संगमनेर अहमदनगर येथील सदर कंपनी आहे. प्रतिज्ञापत्रात प्रारंभी मतदार संघातील मतदार म्हणून तपशील बरोबर दिलेला आहे मात्र अखेरीस मतदार असल्याचा तपशिलात चुकीचा यादी भाग क्र. नमूद केलेला आहे. आयकर संदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करताना देखील त्रुटी केल्या असून पती म्हणून मुंडे धनंजय पंडितराव यांचे आयकर विवरणपत्र तपशील पूर्ण चुकीचा नमूद केलेला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक-2019 मध्ये परळी मतदारसंघातील दाखल प्रतिज्ञापत्रातील त्यांनी पहिल्या पत्नी सौ. राजश्री धनंजय मुंडे यांचे आयकर विवरणपत्र तपशील आहे तो पती म्हणून मुंडे धनंजय पंडितराव यांचे विवरणपत्र तपशील म्हणून दर्शवलेला आहे. करुणा मुंडे यांनी विवरणपत्र तपशील भरताना चुकीचा, दिशाभूलकारक माहिती नमूद करून तफावत झाल्याचे दिसून येत आहे.या मतदारसंघाचे अधिक निवडणूक विश्लेषण लवकरच......

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   


Monday, 21 March 2022

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघावर राष्ट्रवादीचे पुन्हा वर्चस्व

पंचवार्षिक निवडणुकीत १६ पैकी १५ जागा राष्ट्रवादीकडे

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १६ पैकी १५ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत. जिल्हा दूध संघातील १६ पैकी ५ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक असून, पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनासुद्धा सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि.२०) मतदान झाले होते आणि आज सोमवारी (दि. २१) रोजी सकाळी कात्रज डेअरी मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मुळशी व हवेली या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ९ तालुक्यात पैकीच्या पैकी (१०० टक्के) मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. मुळशी तालुक्यात ६० टक्के तर हवेली तालुक्यात ९६.८८ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात एकूण ९९.०१ टक्के मतदान झाले आहे होते. जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या १६ जागा आहेत. यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकीतील उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीसाठी आंबेगाव, भोर, दौंड, खेड, जुन्नर, शिरूर, मावळ , पुरंदर आणि. वेल्हे या नऊ तालुक्यात १०० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील बारामती व इंदापूर हे दोन तालुके वगळता उर्वरित अकरा तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तालुकास्तरीय मतदारसंघ आहे. या तालुकास्तरीय मतदारसंघाच्या अकरा, महिलांसाठीच्या दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), भटक्या जाती, विमुक्त जमाती (व्ही. जे. एन. टी.) आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. मतदान झालेले मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत- तालुकास्तरीय मतदारसंघ- आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, मावळ, मुळशी आणि शिरूर (एकूण सात जागा)., महिला राखीव --- २ जागा., नागरिकांचा मागास प्रवर्ग --- १ जागा., भटक्या जाती-विमुक्त जमाती प्रवर्ग --- १ जागा असे आहेत.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :

आंबेगाव : एकूण मतदान ४८. राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे ३५ (विजयी) शिवसेनेचे अरुण गिरे १२ मते, १ अवैध
भोर : एकूण मतदान ७०. अपक्ष दिलीप थोपटे ३८ (विजयी) दीपक भेलके १९, काँग्रेसचे अशोक थोपटे १२, अवैध १.
खेड : एकूण मतदान १०६ : राष्ट्रवादीचे अरुण चांभारे ५५ (विजयी) अपक्ष चंद्रशेखर शेटे ५१ .
जुन्नर : एकूण मतदान १०९ : राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी ६१ (विजयी), अपक्ष देवेंद्र खिलारी ४७, अवैध १.
मावळ : एकूण मतदान २१ : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजपचे उमेदवार बाळासाहेब नेवाळे १९ (विजयी) लक्ष्मण ठाकर २ – सुनंदा कचरे शून्य मत.
मुळशी : एकूण मतदान १५ : राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे ९ (विजयी) रामचंद्र ठोंबरे शून्य मत.
शिरूर : एकूण मतदान १६८ : राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे १३० (विजयी) योगेश देशमुख ३६, अवैध २.
महिला प्रतिनिधी (2 जागा) ः केशरबाई पवार -शिरूर ५४८ (विजयी), लता गोपाळे – खेड ४३७ (विजयी), रोहिणी थोरात-दौंड ८५, संध्या फापाळे-जुन्नर २०४.
इतर मागास प्रवर्ग (1 जागा) राष्ट्रवादीचे भाऊ देवाडे- जुन्नर ४४८ (विजयी), वरूण भुजबळ- जुन्नर १९३, अरुण गिरे – आंबेगाव ३६.
भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा) : राष्ट्रवादीचे निखिल तांबे – रांजणगांव सांडस-शिरुर ४५० (विजयी), प्रदीप पिंगट – बेल्हे- जुन्नर २३४, अवैध १८.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

Monday, 14 March 2022

'ती' निवड त्यांच्याच कार्यकाळातील; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नवा पेनड्राईव्ह बॉम्ब बाऊन्स!

डॉ. मुद्दसीर लांबे यांची मतदानाने निवड; 29 ऑगस्टला मतदान तर 13 सप्टेंबर 2019 निवड अधिसूचना

आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवा पेनड्राईव्ह 'बॉम्ब' सादर केला. यात एक ऑडिओ रेकोर्ड क्लिप संभाषण असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचे त्यांनी सांगून डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्ड वरती घेतले आहे असा आरोप त्यांनी केला मात्र संबंधित डॉ. मुद्दस्सिर लांबे यांची निवड महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने केली नसून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कार्यरत असताना निवडणूक प्रक्रिया राबवून मतदानातून झालेली आहे. सदरील पदासाठी मतदान 29 ऑगस्ट 2019 रोजी मतदान झालेले असून मतमोजणीनंतर निवड झाल्याची अधिसूचना 13 सप्टेंबर 2019 रोजी झालेली आहे. सदरील निवडणूक प्रक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली होती तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते हे या निवडीच्या दिनांकावरून दिसून येत आहे. विधानसभेत केलेले अन्य आरोपांच्या तथाकथित संबंध आणि अन्य महीला अत्याचार प्रकरणी तक्रार यातील तथ्य तपासाअंती स्पष्ट होईल मात्र वक्फ बोर्ड वरील निवड महाविकास आघाडीनेच (अल्पसंख्याक मंत्री) यांनी केल्याचा आरोप प्रभावशाली ठरला नसून बूमरॅंग झाल्याची भावना राजकीय कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सलग 5 वर्षे आठ दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. त्यांचा कार्यकाळ ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ असा होता तसेच २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ असा देखील औटघटकेचा कार्यकाळ देखील आहे.   वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण 10 सदस्य कार्यरत  आहेत. वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम व नेमणुकीचा प्रकार अन्वये कलम १४(१) (ब) (चार) निवडणूक प्रक्रियेने १ वा २ अंतर्गत रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली या गटातून निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात मुत्तवल्ली या वर्गातून पुरूष गटातून डॉ. मुद्दस्सीर लांबे व महिला गटातून पैठण येथील रिजवाना शेख विजयी झाल्या होत्या. २९ ऑगस्ट २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते. या मतदानात प्रक्रियेत १२९ पैकी १२७ मतदारांनी मतदान केले होते. महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या दोन सदस्य मुतवल्ली गटातून निवडण्यात येतात. यासाठी एक लाख उत्पन्न असलेल्या दर्गाहच्या मुतवल्लींची नावनोंदणी करून त्यांच्यामधून दोन सदस्यांची निवड केली जाते. पुरूष गटातून डॉ. मुद्दस्सीर लांबे, हबीब फकीह आणि इब्राहिम भाईजान यांच्या लढत होती. महिला गटातून रिजवाना शेख मगरीबी, पुण्याच्या अस्मा पटेल, औरंगाबादच्या नय्यर जहां, आणि शमसुन्नीस्सा बेगम अशा चार उमेदवारांत लढत होती. 2 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये १२७ मतांपैकी चार मत अवैध ठरली. १२३ वैध मतदानापैकी पुरूष गटात डॉ. मुद्दस्सीर लांबे यांना पहिल्या पसंतीची ५७ मते मिळाली होती. शिवाय दुसऱ्या पसंतीची दोन मते अशी ५९ मते मिळाली होती. इब्राहिम भाईजान यांना ४५ आणि माजी वक्फ बोर्डाचे सदस्य हबीब फकीह यांना फक्त २१ मते मिळाली होती. सर्वाधिक मते डॉ. मुद्दस्सीर लांबे यांना मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात होते. महिला गटात रिजवाना शेख यांना ५२, अस्मा पटेल यांना १२, नय्यर जहां यांना ३६ मते मिळाली तर शमसुन्नीस्सा बेगम यांना १८ मते मिळाली होती. सर्वाधिक मते रिजवाना शेख यांना मिळाली होती त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. डॉ.मुद्दसीर लांबे यांची सदस्यपदी निवड झाल्याची वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4, दि.13 सप्टेंबर 2019 रोजी अधिसूचना काढण्यात आलेली होती त्या वेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते तर अल्पसंख्याक खात्याचा कारभार प्रारंभी श्री विनोद तावडे यांच्याकडे होता. भारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहे. वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण 10 सदस्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे-

https://mdd.maharashtra.gov.in/1167/महाराष्ट्र-राज्य-वक्फ-मंडळ या संकेतस्थळावरील माहीती खालीलप्रमाणे आहे.

अ . क्र .

निर्वाचक गण

वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम व नेमणुकीचा प्रकार

नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचे नाव

नियुक्तीच्या अधिसूचनेचा क्रमांक व दिनांक

सहसचिव पदापेक्षा कमी नाही असे पद धारण करणारा राज्य शासनाचा अधिकारी

कलम १४(१)(इ)
नामनिर्देशनाने १

  1. श्री.इ.मु. काझी, सह सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग

वक्फ 2016/ प्र.क्र.248/ का.4
दि.18 मे, 2017

राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य.

कलम14(1)(ब) (तीन);
निवडणूक प्रक्रियेने १ वा २

  1. अॅड.श्री.खालीद बाबू कुरेशी

वक्फ 2017/ प्र.क्र.82/ का.4,
दि.19 सप्टेंबर, 2017

  1. अॅड.अहेमदखान, उस्मानखान पठाण

वक्फ 2020/ प्र.क्र.105/ का.4,
दि.10 सप्टेंबर, 2021

रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली

कलम १४(१)(ब)(चार)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २

  1. डॉ.मुद्दसीर लांबे

वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4,
दि.13 सप्टेंबर,2019

राज्यातील मुस्लिम संसद सदस्य

कलम १४(१)(ब)(एक)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २

  1. मा.खा.श्रीम.डॉ. फौजिया तहसिन अहमद खान, राज्य सभा सदस्य
  2. मा.खा.श्री.सय्यद इम्तियाज जलील, लोक सभा सदस्य

वक्फ 2020/प्र.क्र.10 (भाग-१)/ का.4,
दि.05.फेब्रुवारी, 2021

राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य

कलम १४(१)(ब)(दोन)
निवडणूक प्रक्रियेने १ वा २

  1. डॉ वजाहत मिर्झा अथर मिर्झा, विधानपरिषद सदस्य

वक्फ 2020/प्र.क्र.10 / का.4,
दि.15 एप्रिल, 2021

नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती.

कलम14(1)(क);
नामनिर्देशनाने १

  1. श्री.समीर गुलामनबी काझी

वक्फ 2021/प्र.क्र.12 / का.4,
दि.26 ऑगस्ट, 2021

शिया व सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी

कलम14(1)(ड);
नामनिर्देशनाने २

  1. श्री.शेख हसनैन शाकीर
  2. मौलाना हाफीज सय्यद अतहर अली

वक्फ 2021/प्र.क्र.21 / का.4,
दि.9 सप्टेंबर, 2021

 

एकूण

 

१० सदस्य

 
==========

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================