मांजरी-शेवाळवाडी प्रभागात मांजरीच्या मतदारांचेच वर्चस्व
प्रभाग
क्र.22 मांजरी – शेवाळवाडी (पुणे महापालिका निवडणूक-2022)
पुरुष
मतदारसंख्या- 37960
महीला
मतदारसंख्या- 33564
तृतीयपंथी
मतदारसंख्या- 5
प्रभागाची
एकूण मतदारसंख्या- 71530
प्रभागातील
एकूण लोकसंख्या- 61878
अनुसूचित
जाती लोकसंख्या- 11494
अनुसूचित
जमाती लोकसंख्या- 1182
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2022 करिता प्रारूप प्रभाग रचना मध्ये प्रभाग क्र. 22 मांजरी – शेवाळवाडी हा नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील भाग आहे. यापूर्वी मांजरी - शेवाळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकीय लोकप्रतिनिधी कारभार करीत होते मात्र महापालिका क्षेत्रातील समाविष्ट मुळे महापालिकेच्या माध्यमातून कारभार स्थानिक लोकप्रतिनिधीना करावा लागणार आहे. यापूर्वी ग्रामपंचाय स्थानिक पातळीवर विभागून पदांचे वाटप करणे शक्य होते मात्र आता ती पद्धत येथे लागू होणार नाही. 15 ते 18 दरम्यानच्या सदस्य संख्येऐवजी केवळ 3 लोकप्रतिनिधीना निवडून येण्याची संधी मिळणार असल्याने 'जो जिता वही सिकंदर' म्हणून निवडून येणारा या भागाचा लोकप्रतिनिधी गणला जाणार आहे. यामध्ये 2 पुरुष 1 महीला अथवा 2 महीला 1 पुरुष असे आरक्षण असेल. त्यामुळे इच्छुकांना दोन्ही शक्यतेने उमेदवारीची तयार करावी लागणार आहे. शेवाळवाडी स्वतंत्रपणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीत्व म्हणून राखलेले वर्चस्व पालिकेतील समाविष्ट प्रभाग रचनेतून हद्दपार होणार आहे कारण संपूर्ण प्रभागातील तुलनात्मकदृष्ट्या मतदारांची संख्या पाहिल्यास शेवाळवाडीची नगण्य मतदार संख्या आहे. प्रभाग क्र. 22 मांजरी – शेवाळवाडी नवनिर्मित प्रभाग पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा अंशतः काही भाग आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मिळून हा प्रभाग तयार करण्यात आल्याने 2 आमदारांचे कार्यक्षेत्र आणि शिरूर व बारामती लोकसभा या 2 मतदारसंघाचे प्रतिनिधित्वांचे या प्रभागात भाग येत आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा शेवाळवाडी हा भाग येतो तर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा मुंढवा, केशवनगर, मांजरी या भागाचा समावेश प्रभागात आहे. सविस्तरपणे समाविष्ट भागामध्ये मांजरी, केशवनगर, लोणकरनगर, गोडबोले वस्ती, श्रीकृष्ण सोसायटी, शरदनगर, गोदरेज सोसायटी, मुंढवा जॅकवेल, इंद्रप्रस्थ लॉन्स, साईनाथ कॉलनी, रिव्हर पार्क सोसायटी, कामठे मळा, हरपळे लॉन्स इ. समावेश आहे. प्रभाग क्र. 22 मांजरी – शेवाळवाडी या प्रभागातील एकूण मतदारसंख्या (जानेवारी-2022 नुसार) 71 हजार 530 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 37 हजार 960 इतकी असून महीला मतदारांची संख्या 33 हजार 564 इतकी आहे. पुरुष मतदारांची संख्या महीला मतदारांच्या तुलनेत 4 हजार 396 इतकी जास्त आहे. तृतीयपंथी मतदारसंख्या केवळ 5 आहे. प्रामुख्याने मुंढवा, केशवनगर, मांजरी आणि शेवाळवाडी असे प्रमुख भाग या प्रभागात येत आहेत. मतदारसंख्येचा विचार केल्यास या प्रभागावर मांजरी गावाचे वर्चस्व राहणार असून त्याखालोखाल मुंढवा केशवनगरचे वर्चस्व असेल. एकूण मतदारसंख्येत सर्वाधिक 43 हजार 479 मतदारसंख्या मांजरी बु. या भागातील आहे तर मुंढवा आणि केशवनगर या भागाची मतदार संख्या 23 हजार 706 इतकी आहे यामध्ये मुंढवा येथील 7 हजार 938 मतदार तर केशवनगर मधील 15 हजार 768 मतदारांचा समावेश या प्रभागात आहे. सर्वाधिक नगण्य मतदारसंख्या शेवाळवाडी या भागाची असून केवळ 4 हजार 345 इतकी आहे. प्रारूप रचनेनुसार या प्रभागातील लोकसंख्या (जनगणना 2011 नुसार) 61 हजार 878 इतकी असून अनुसूचित जाती 11 हजार 494 व अनुसूचित जमातींची लोकसंख्या 1 हजार 182 इतकी आहे. नव्याने निर्मित झालेल्या प्रभाग क्र. 22 मांजरी – शेवाळवाडी या प्रभागात राजकीय लोकप्रतिनिधीचे सर्वेक्षणातून राजकीय मुल्यांकनाचे काम सुरु आहे. या प्रभागातील राजकीय स्थिती व प्रभागातील पक्षनिहाय प्रभाव, मतदारांचा कल आदी. सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल. पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. अन्य प्रभागांची स्थिती जाणून घेण्यासाठी व निवडणूक पूर्व तयारीसाठी पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेशी संपर्क करावा.
Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.