Friday 11 March 2022

पाच राज्यांच्या निवडणुक निकालाचा परिणाम; आगामी राष्ट्रपती निवडणूक भाजपसाठी सुकर

राज्यसभेतील भाजपची सदस्य संख्या पहिल्यांदाच शंभरी पार होणार

राज्यसभेमध्ये दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य सेवानिवृत्त होत असतात. यंदाच्या वर्षी राज्यसभेतील 75 सदस्य निवृत्त होत आहेत. यावर्षी या जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभेमध्ये 245 खासदार असतात. यापैकी 233 निवडून येतात, तर 12 जणांची निवड राष्ट्रपतींतर्फे करण्यात येते. त्यामुळे राज्यसभेतील बहुमताचा आकडा 123 इतका आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यसभेत 243 जागांपैकी 122 पर्यंत संख्याबळ मिळून बहुमत मिळवता येणार आहे.  उत्तर प्रदेशमधील राज्यसभेत एकूण 34 सदस्य आहेत. मणिपूर, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा इ. प्रत्येक छोट्या राज्यांतून फक्त एकच सभासद येतो. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 154 नुसार राज्यसभेच्या सदस्याची मुदत 6 वर्षे असते. त्याचवेळी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य सेवानिवृत्त होतात. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पाचपैकी ४ राज्यांत भाजपला आपली सत्ता कायमं ठेवण्यात यश आल्यामुळे आता संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतही भाजपचे वर्चस्व वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ही शंभरी पार होण्याची शक्यता असून, राज्यसभेतही भाजप सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे. तर पंजाबमध्ये सत्ता स्थापन करणा-या आम आदमी पार्टीला सुद्धा अच्छे दिन येणार असून, राज्यसभेत ‘आप’ पाचवा सर्वात मोठा पक्ष होणार आहे. सध्या राज्यसभेत भाजपकडे एकूण 97 जागा आहेत. भाजपची राज्यसभेतील ही सदस्य संख्या पहिल्यांदाच शंभरी पार होणार आहे. भाजपला 104 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यसभेत 243 जागांपैकी 122 पर्यंत संख्याबळ मिळून बहुमत मिळवता येणार आहे. यामुळेच भाजपवर सातत्याने टीका करणा-या बिजू जनता दल सारख्या पक्षांवरील भाजपचे अवलंबित्व कमी होणार असून, त्यांच्या बाहेरील पाठिंब्याची मोदी सरकारला आवश्यकता कमी भासणार आहे. उत्तर प्रदेशातून 31, उत्तराखंडमधून 3, पंजाबमधून 7, तर गोवा आणि मणिपूरमधून प्रत्येकी 1 उमेदवार राज्यसभेवर निवडले जातात. या पाचपैकी 4 राज्यांत भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. आता राज्यसभेतील 1/3 सदस्यांसाठी नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातून 3, तर आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून काँग्रेसच्या चार जागांवर विजय मिळवण्यात, भाजपला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षअखेरीस काँग्रेसच्या राज्यसभेतील 34 जागा कमी होऊन त्यांची संख्या 27 होणार आहे. यावर्षी राज्यसभेच्या एकूण 75 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेचे खासदार हे राज्य विधानसभांतील आमदारांद्वारे निवडून दिले जातात व ते केंद्रात राज्याचं प्रतिनिधीत्व करत असतात. राज्यसभेत एनडीए सरकार सुरुवातीला अल्पमतात होते. त्यामुळे पहिल्या पाच वर्षांत दोन्ही सभागृहांत कायदे मंजूर होण्यासाठी विलंब होत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मोदी सरकारने राज्यसभेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. आपला पंजाबमधील विजयाचा मोठा फायदा होणार आहे. पंजाबमधून एकूण सात उमेदवार हे राज्यसभेवर निवडून जातात. त्यामुळे यावर्षी होणा-या निवडणुकांमध्ये या सात जागांपैकी किमान सहा जागांवर आपला यश मिळवता येईल. सध्या आपचे राज्यसभेवर दिल्लीतून तीन खासदार आहेत. पंजाबमधील विजयानंतर भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम नंतर आप हा राज्यसभेतील पाचवा मोठा पक्ष ठरेल.

राष्ट्रपती निवडणूक भाजपसाठी सुकर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यांत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आल्याने राष्ट्रपतिपदाची निवडणूक सत्ताधारी भाजपला सुकर जाणार आहे. विशेष करून उत्तर प्रदेश विधानसभेतील मोठ्या विजयामुळे मित्रपक्षांच्या मदतीशिवाय भाजपला ही निवडणूक जिंकता येऊ शकेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपुष्टात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निश्चित करण्याचे बळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विजयाने दिले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला कमी प्रमाणात यश मिळाले असते तर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी त्यांना बिजू जनता दल, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस या पक्षांवर अवलंबून राहावे लागले असते. या पक्षांकडे लक्षणीय मते असल्याने त्यांचा पाठिंबा घेणे भाजपसाठी अनिवार्य ठरले असते. लोकसभा, राज्यसभेतील खासदार; तसेच राज्य विधानसभांतील आमदार, दिल्ली व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांतील लोकप्रतिनिधी यांचे संख्याबळ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मतदानात विचारात घेतले जाते. विधानसभेचे हे निकाल भाजपसाठी अनुकूल असून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला त्याचा लाभ होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०८, तर प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य २०८ असते. निकाल जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या विधानसभेतील सर्व आमदारांचे एकूण मतमूल्य हे अनुक्रमे ८३,८२४, १३,५७२, ४४८०, ८०० व १०८० असे आहे. यातील चार राज्यांत भाजप बहुमतात आल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी हा भाजपच्या पसंतीचा असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी देशातील सर्व आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधींची मिळून ४८९६ मते असून त्यांचे एकूण मतमूल्य १०,९८,९०३ आहे. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी या मतमूल्याच्या किमान ५० टक्के मते अधिक एक मत याप्रकारे मताधिक्य मिळवावे लागते.

पुढील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपला उत्साहवर्धक वातावरण!

या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेशातील 68 आणि गुजरातमधील 182 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. याठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून पक्षाला कडवी टक्कर मिळाली होती. मात्र, यावेळी मोदींना काँग्रेसला एकही संधी द्यायची नाही. त्यामुळे पाच राज्यांतील निवडणुका संपताच भाजपने गुजरातमध्ये मिशन सुरु केले आहे. यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपला या राज्यांमध्ये आक्रमक प्रचार करण्याची संधी मिळेल. 2023 मध्ये कर्नाटकात 225, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि तेलंगणा येथे 200 ठिकाणी निवडणुका होणार आहेत. पंजाब वगळता चार राज्यांतील विजयामुळे लोकसभा निवडणुकीतही भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. निवडणुकीमुळे केंद्र सरकारला अनेक मुद्द्यांवर कठोर निर्णय घेणे शक्य होत नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे निर्गुंतवणुकीचा वेग वाढू शकतो. विरोधक राष्ट्रीय मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात, हे लोकांच्या गळी उतरवण्यातही भाजपला यश येत आहे.एप्रिल आणि ऑगस्टदरम्यान राज्यसभेच्या 70 जागांची निवडणूक होणार आहे. आता उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याने भाजपच्या राज्यसभेत जागा वाढणार आहेत. यादरम्यान यूपीतून 11 पंजाबमधून सात आणि उत्तराखंडमधून एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. यूपी आणि उत्तराखंडमधून भाजपला दोन ते तीन जागा मिळू शकतात. दुसरीकडे पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन झाल्याने आपलाही राज्यसभेत 6 जागा मिळू शकतात. सध्या 'आप'कडे राज्यसभेत 3 जागा आहेत.

असे आहेत निकाल 

अखेर पाच राज्यांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, भाजपला सर्वधीक जागा मिळाल्या आहे. पाचपैकी चार राज्यात भाजप सरकर स्थापन करणार आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्ता स्थापन करेल. 






* पंजाब विधानसभा निवडणूक-2022 एकूण जागा : 117 आहेत यामध्ये राजकीय पक्ष नुसार अनुक्रमे आम आदमी पार्टी-92, बहुजन समाज पक्ष-1, भारतीय जनता पक्ष-2,अपक्ष-1,काँग्रेस-18,शिरोमणी अकाली दल-3,

* गोवा विधानसभा निवडणूक-2022 एकूण जागा : 40 आहेत यामध्ये राजकीय पक्ष नुसार अनुक्रमे भारतीय जनता पक्ष-20,काँग्रेस-11,आम आदमी पार्टी-2 ,महाराष्ट्र गोमंतक-2,गोवा फॉरवर्ड पार्टी-1,क्रांतिकारी गोवा पक्ष-1,अपक्ष-3,

* मणिपूर विधानसभा निवडणूक-2022 एकूण 60 जागा आहेत यामध्ये राजकीय पक्ष नुसार अनुक्रमे भारतीय जनता पक्ष-32,अपक्ष-3,काँग्रेस-5,जनता दल (संयुक्त)-6,कुकी पीपल्स अलायन्स-2,नागा पीपल्स फ्रंट-5,राष्ट्रवादी पीपल्स पार्टी-7,

* उत्तराखंड विधानसभा निवडणूक-2022 एकूण जागा : 70 आहेत यामध्ये राजकीय पक्ष नुसार अनुक्रमे भारतीय जनता पक्ष-47, काँग्रेस-19, अपक्ष-2, बहुजन समाज पक्ष-2,

* उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक-2022 एकूण जागा 403 आहेत यामध्ये राजकीय पक्ष नुसार अनुक्रमे भारतीय जनता पक्ष- 255, समाजवादी पक्ष-111, अपना दल (सोनेलाल)-12, राष्ट्रीय लोकदल-8, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष-6, निर्बल भारतीय शोषित हमारा आम दल-6, काँग्रेस-2, जनसत्ता दल लोकशाही-2, बहुजन समाज पक्ष-1.

Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.