Monday, 7 March 2022

संकटासह अपंगात्वावर मात करून उभारले ज्ञानाचे मंदिर; डॉ. एस. बी. इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्घाटन

धीर आणि धैर्यशीलतेच्या संगमातील "मित्रत्व"; प्रा राज पाटील आणि डॉ. संदीप भाजीभाकरे सच्चा मित्र ईश्वर का वरदान...


पुणे- प्रा राज पाटील यांच्या उतुंग कर्तृत्वाचे कौतुक करण्यासाठी शब्दांचे सामर्थ्य देखील कमी पडेल अशा दुर्दम्य.. इच्छाशक्तीच्या जोरावर संकल्प कार्यसिद्धी पूर्णत्वास नेणा-या जिवलग मित्राने ज्ञानाचे मंदिर उभारले आहे. असे कर्तृत्ववान जीवन माझ्या आयुष्यात कधीही वाचण्यात व पाहण्यात देखील आले नाही. समाजाला नेहमीच प्रा राज पाटील यांचे प्रेरणादायी जीवन मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन मा. पोलिस अधिक्षक (रेल्वे) मुंबई, डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले. ते मोशी डूडूळगाव येथील डॉ. एस. बी. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 
         याप्रसंगी जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, संदीप काळे, पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)चे संचालक चंद्रकांत भुजबळ, ज्ञान मंदीराला भूदान करणारे दानशूर व्यक्तिमत्व व जेष्ठ समाजसेवक श्री.ज्ञानेश्वर वहिले व नामदेव वहिले, शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राज पाटील, कार्याध्यक्ष सौ. संपदा पाटील, चाणक्य गुरुकुल अकॅॅडमीचे प्रा. काशिनाथ भतगुणकी सर, शिव व्याख्याते शिवश्री विशाल गुंड, संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विध्यार्थी व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. 
       डॉ.संदीप भाजीभाकरे यांच्या प्रेरणेतून प्रा. राज पाटील यांनी संकटांवर मात करत शैक्षणिक संस्था उभी केली आणि 3 ठिकाणी या शैक्षणिक संस्थेचा विस्तार केला. पिंपरी- चिंचवड या विकसनशील शहराच्या मोशी डूडूळगाव या उपनगर भागातील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे उद्याची नवीन पिढी आदर्श ठरावी या उद्दात्त हेतूने माफक शुल्कात डॉ. एस. बी. इंग्लिश मिडीयम स्कूल सुरु करण्यात येत असून त्याचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 6 मार्च 2022 रोजी संपन्न झाला. महाविद्यालयीन मित्रत्व नाते संकटाच्या काळात कृतीतून व्यक्त होऊन सच्चा मित्र ईश्वर का वरदान असतात याची प्रचिती प्रा. राज पाटील आणि डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या मैत्रीतून दिसून येते. अपंगावर मात करण्याची प्रेरणा ज्या मित्राने दिली त्याच्याच नावाने मैत्रीची आठवण स्मरणात कायम राहून इतरांना प्रेरणादायी ठरेल म्हणून आज इंग्लिश मिडीयम स्कूलला डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. डॉ. संदीप भाजीभाकरे यांचे प्रेरणेतून मला पुनर्जन्म मिळाला असून माझे जीवन ही मित्राने दिलेली देन आहे अशी भावना 'श्रेया मल्टीपर्पोज सोसायटीज' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. राज पाटील यांनी व्यक्त केली. प्रा. राज पाटील यांच्या कर्तुत्ववान कहाणी सकाळ वर्तमानपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात जनसामान्यांच्यात पोहोचवली आणि असंख्य मदतीचे हात पुढे आले याबाबत जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, व स्तंभलेखक संदीप काळे यांचे ऋण व्यक्त केले. 
       या प्रसंगी मा.पोलिस अधिक्षक (रेल्वे) मुंबई, डॉ. संदीप भाजीभाकरे पुढे म्हणाले कि, कितीही संकटे आली तरी आशा सोडू नयेत, संकटे ही जाण्यासाठीच आलेली असतात.जीवनात अचानक झालेल्या गंभीर अपघातातून आलेले अपंगात्व आणि काही क्षणात जीवनाचे, संसाराचे होत्याचे नव्हते झाले अशा स्थितीत मित्र म्हणून मी धीर देवून आशा पल्लवित राहतील इतकच काम केले त्याचे फळ आज आपणाला दिसत आहे. म्हणून जीवनात कधी संकटे आली आणि मन खचले असे वाटले तर प्रा राज पाटील यांची आठवण काढा, आपोआप तुमच्यात स्पुर्ती येईल व संकटावर मात करण्याची ताकद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. खर तर राज पाटील यांच्या कठीण काळात मी त्याला भावनिक मानसिक आधार दिला मात्र मी देखील कधी निराश झालो तर मी प्रा. राज पाटील यांना आठवतो. माझ्यातील मरगळ क्षणात दूर होते. हात आणि पायाने अपंग असलेला माणूस 4 ठिकाणी शाळा उत्तमरीत्या चालवीत असतील तर निश्चितच गौरवास्पद काम आहे. प्रारंभी काळात खाजगी शिकवणी घेतल्या 2 विध्यार्थ्यांचे 100 विद्यार्थी काही महिनाभरात झाले आणि नंतर वाढता आलेख दिसून आला केवळ शिकवण हाच राज पाटील यांचा प्राण आहे, ते प्रामाणिक शिकवण्याचे काम करीत आहेत असे सांगून डॉ. संदीप भाजीभाकरे पुढे म्हणाले कि, शिक्षण तर सर्वच शैक्षणिक संकुलातून शिकवले जाते मात्र प्रा. राज पाटील यांच्या शाळेतून घडणारा विद्यार्थी वेगळे व्यक्तीमत्व व आयुष्यात धाडसी साहस करण्याची ताकद घेवूनच बाहेर पडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अत्याधुनिक सामुग्री संगणक प्रणाली, साहित्य उपलब्ध या स्कूलमध्ये केले आहे तसेच उत्तम व्यवस्थापनातील हातखंड प्रा.राज पाटील यांच्याकडे आहे आणि त्यांच्या मनातील शाळेची स्वप्नपूर्ती आज होत असल्याचा मला खूप मनस्वी आनंद होत आहे. जेष्ठ पत्रकार व स्तंभलेखक संदीप काळे यांनी प्रा. राज पाटील हे व्यक्तिमत्व म्हणजे वेगळेच प्रेरणास्तोत्र आहे आज त्यांच्या प्रयत्नातून अल्पावधीतच 4 स्कूल उभारले आहेत या वेगानेच कार्य राहिले तर प्रा. राज पाटील या नावाचे भविष्यात विद्यापीठ निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला. तर जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार यांनी प्रा. राज पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून संकटावर मात कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.राज पाटील हे आहेत असे मत व्यक्त करून डॉ. संदीप भाजीभाकरे आणि प्रा. राज पाटील यांच्या मैत्रीचे नाते उलगडून सांगितले. या प्रसंगी शिव व्याख्याते शिवश्री विशाल गुंड यांनी शिक्षणाचे महत्व आणि राज पाटील यांच्या कर्तुत्वाचे अनेक प्रसंग व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत प्रा. काशिनाथ भतगुणकी सर यांनी केले तर संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.संपदा पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.
Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.