डॉ. मुद्दसीर लांबे यांची मतदानाने निवड; 29 ऑगस्टला मतदान तर 13 सप्टेंबर 2019 निवड अधिसूचना
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवा पेनड्राईव्ह 'बॉम्ब' सादर केला. यात एक ऑडिओ रेकोर्ड क्लिप संभाषण असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचे त्यांनी सांगून डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्ड वरती घेतले आहे असा आरोप त्यांनी केला मात्र संबंधित डॉ. मुद्दस्सिर लांबे यांची निवड महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने केली नसून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस कार्यरत असताना निवडणूक प्रक्रिया राबवून मतदानातून झालेली आहे. सदरील पदासाठी मतदान 29 ऑगस्ट 2019 रोजी मतदान झालेले असून मतमोजणीनंतर निवड झाल्याची अधिसूचना 13 सप्टेंबर 2019 रोजी झालेली आहे. सदरील निवडणूक प्रक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली होती तेव्हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते हे या निवडीच्या दिनांकावरून दिसून येत आहे. विधानसभेत केलेले अन्य आरोपांच्या तथाकथित संबंध आणि अन्य महीला अत्याचार प्रकरणी तक्रार यातील तथ्य तपासाअंती स्पष्ट होईल मात्र वक्फ बोर्ड वरील निवड महाविकास आघाडीनेच (अल्पसंख्याक मंत्री) यांनी केल्याचा आरोप प्रभावशाली ठरला नसून बूमरॅंग झाल्याची भावना राजकीय कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सलग 5 वर्षे आठ दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. त्यांचा कार्यकाळ ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ असा होता तसेच २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ असा देखील औटघटकेचा कार्यकाळ देखील आहे. वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण 10 सदस्य कार्यरत आहेत. वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम व नेमणुकीचा प्रकार अन्वये कलम १४(१) (ब) (चार) निवडणूक प्रक्रियेने १ वा २ अंतर्गत रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली या गटातून निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात मुत्तवल्ली या वर्गातून पुरूष गटातून डॉ. मुद्दस्सीर लांबे व महिला गटातून पैठण येथील रिजवाना शेख विजयी झाल्या होत्या. २९ ऑगस्ट २०१९ रोजी मतदान घेण्यात आले होते. या मतदानात प्रक्रियेत १२९ पैकी १२७ मतदारांनी मतदान केले होते. महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या दोन सदस्य मुतवल्ली गटातून निवडण्यात येतात. यासाठी एक लाख उत्पन्न असलेल्या दर्गाहच्या मुतवल्लींची नावनोंदणी करून त्यांच्यामधून दोन सदस्यांची निवड केली जाते. पुरूष गटातून डॉ. मुद्दस्सीर लांबे, हबीब फकीह आणि इब्राहिम भाईजान यांच्या लढत होती. महिला गटातून रिजवाना शेख मगरीबी, पुण्याच्या अस्मा पटेल, औरंगाबादच्या नय्यर जहां, आणि शमसुन्नीस्सा बेगम अशा चार उमेदवारांत लढत होती. 2 सप्टेंबर 2019 दरम्यान मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या मतमोजणीमध्ये १२७ मतांपैकी चार मत अवैध ठरली. १२३ वैध मतदानापैकी पुरूष गटात डॉ. मुद्दस्सीर लांबे यांना पहिल्या पसंतीची ५७ मते मिळाली होती. शिवाय दुसऱ्या पसंतीची दोन मते अशी ५९ मते मिळाली होती. इब्राहिम भाईजान यांना ४५ आणि माजी वक्फ बोर्डाचे सदस्य हबीब फकीह यांना फक्त २१ मते मिळाली होती. सर्वाधिक मते डॉ. मुद्दस्सीर लांबे यांना मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात होते. महिला गटात रिजवाना शेख यांना ५२, अस्मा पटेल यांना १२, नय्यर जहां यांना ३६ मते मिळाली तर शमसुन्नीस्सा बेगम यांना १८ मते मिळाली होती. सर्वाधिक मते रिजवाना शेख यांना मिळाली होती त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते. डॉ.मुद्दसीर लांबे यांची सदस्यपदी निवड झाल्याची वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4, दि.13 सप्टेंबर 2019 रोजी अधिसूचना काढण्यात आलेली होती त्या वेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते तर अल्पसंख्याक खात्याचा कारभार प्रारंभी श्री विनोद तावडे यांच्याकडे होता. भारत सरकारने वक्फ अधिनियम, १९९५ हा कायदा पारीत करुन संपूर्ण देशात लागू केला. सदर कायदा महाराष्ट्र राज्यात दि.०१/०१/१९९६ पासून लागू करण्यात आलेला असून या कायद्यातील तरतुदींनुसार शासन अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्र.वक्फ-१०/२००१/प्र.क्र.१५४/ल-३, दि.४ जानेवारी, २००२ अन्वये पनचक्की, औरंगाबाद येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील वक्फांची संख्या सुमारे २७,००० इतकी असून या सर्व वक्फांची मिळून एकूण सुमारे १,००,००० एकर इतकी जमीन आहे. यापैकी सुमारे ७० टक्के वक्फ जमिनी अतिक्रमणाखाली आहेत. सुमारे ११५ भूखंडावर शासकीय/निमशासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालय असल्याचा वक्फ मंडळाचा अहवाल आहे. स्थानिक वक्फ मालमत्तेचे संरक्षण करणे, विकास करणे तसेच हजारो वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, इ. कामे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापनेकडे सोपविण्यात आलेली आहे. वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम १४ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्य नियुक्ती करण्याकरिता तरतुदी विहित करण्यात आलेल्या आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर एकूण 10 सदस्य कार्यरत असून या सदस्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे-
https://mdd.maharashtra.gov.in/1167/महाराष्ट्र-राज्य-वक्फ-मंडळ या संकेतस्थळावरील माहीती खालीलप्रमाणे आहे.
अ . क्र . | निर्वाचक गण | वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम व नेमणुकीचा प्रकार | नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचे नाव | नियुक्तीच्या अधिसूचनेचा क्रमांक व दिनांक |
---|
१ | सहसचिव पदापेक्षा कमी नाही असे पद धारण करणारा राज्य शासनाचा अधिकारी | कलम १४(१)(इ) नामनिर्देशनाने १ | - श्री.इ.मु. काझी, सह सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग
| वक्फ 2016/ प्र.क्र.248/ का.4 दि.18 मे, 2017 |
२ | राज्य बार कौन्सिलचे मुस्लिम सदस्य. | कलम14(1)(ब) (तीन); निवडणूक प्रक्रियेने १ वा २ | - अॅड.श्री.खालीद बाबू कुरेशी
| वक्फ 2017/ प्र.क्र.82/ का.4, दि.19 सप्टेंबर, 2017 |
- अॅड.अहेमदखान, उस्मानखान पठाण
| वक्फ 2020/ प्र.क्र.105/ का.4, दि.10 सप्टेंबर, 2021 |
३ | रु.१ लाख किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांचे मुतवल्ली | कलम १४(१)(ब)(चार) निवडणूक प्रक्रियेने १ वा २ | - डॉ.मुद्दसीर लांबे
| वक्फ 2018/ प्र.क्र.122/ का.4, दि.13 सप्टेंबर,2019 |
४ | राज्यातील मुस्लिम संसद सदस्य | कलम १४(१)(ब)(एक) निवडणूक प्रक्रियेने १ वा २ | - मा.खा.श्रीम.डॉ. फौजिया तहसिन अहमद खान, राज्य सभा सदस्य
- मा.खा.श्री.सय्यद इम्तियाज जलील, लोक सभा सदस्य
| वक्फ 2020/प्र.क्र.10 (भाग-१)/ का.4, दि.05.फेब्रुवारी, 2021 |
५ | राज्य विधान मंडळाचे मुस्लिम सदस्य | कलम १४(१)(ब)(दोन) निवडणूक प्रक्रियेने १ वा २ | - डॉ वजाहत मिर्झा अथर मिर्झा, विधानपरिषद सदस्य
| वक्फ 2020/प्र.क्र.10 / का.4, दि.15 एप्रिल, 2021 |
६ | नगर रचना किंवा व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक कार्य, वित्तीय किंवा महसूल, कृषि आणि विकास कार्य या मध्ये व्यवसायिक अनुभव असलेली व्यक्ती. | कलम14(1)(क); नामनिर्देशनाने १ | - श्री.समीर गुलामनबी काझी
| वक्फ 2021/प्र.क्र.12 / का.4, दि.26 ऑगस्ट, 2021 |
७ | शिया व सुन्नी इस्लामी ईश्वरशास्त्रातील प्रत्येकी एक, मान्यता प्राप्त विद्याव्यासंगी | कलम14(1)(ड); नामनिर्देशनाने २ | - श्री.शेख हसनैन शाकीर
- मौलाना हाफीज सय्यद अतहर अली
| वक्फ 2021/प्र.क्र.21 / का.4, दि.9 सप्टेंबर, 2021 |
| एकूण | | १० सदस्य | |
==========
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.