फुटीमुळे बारामतीसह राष्ट्रवादीच्या सर्व लोकसभेच्या जागा धोक्यात!
सर्वाधिक आमदार अजित दादांकडेच
राष्ट्रवादीचे नेते व युतीच्या सरकारमधील नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पक्षात पडलेल्या उभ्या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या हक्काच्या जागांवर विपरीत राजकीयदृष्ट्या परिणाम होणार आहे. फुटीमुळे बारामतीसह राष्ट्रवादीच्या सर्व 4 लोकसभेच्या मतदारसंघातील जागा धोक्यात आल्या असून बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचे स्थान डळमळीत झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना जिंकणे सहज शक्य होणार नाही. अजित दादा पवार यांच्या शिवाय लोकसभा निवडणूक अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया मतदारसंघात व्यक्त केल्या जात आहेत. ८३ व्या वर्षीचा तरुण योद्धा वगेरे भूषणें देवून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची दर्शवित असलेली सक्रियता जनसामान्यांना कितपत पचनी पडेल याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिले असल्याने जिल्ह्यातच खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा महाराष्ट्रभर जो झंझावात दौरा आखणी केली जात आहे त्यामध्ये विरोधात गेलेल्यांवर आकस ठेवून ठिकाणे निश्चीत करण्यापेक्षा आपला गड शाबूत ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात झंझावात दौरा आखणी महत्वाची असल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या 4 लोकसभेच्या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे अजित पवार यांना समर्थन दिले आहे तर शपथविधी समारंभाला हजेरी लावून पुन्हा साहेबांकडे परतेलेले शिरूर लोकसभा खासदार डॉ अमोल कोल्हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील पवार साहेबांच्या बाजूने असले तरी पुन्हा सातारा लोकसभा निवडणूक जिंकणे सद्यस्थिती वरून कठीण आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर व हडपसर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार अजूनही संभ्रमात असले तरी अजितदादाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार तूर्तास साहेबांना समर्थन देत असले तरी स्थानिक पातळीवरील आगामी राजकीय समीकरण पाहून त्यांच्या वाटचाल दिसून येत आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसेपाटील यांच्याकडे अभ्येदपणे असून खेद मधील आमदार मोहिते पाटील दोन्हीकडे समर्थन करून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा राजकीय स्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघात साहेबांच्या पक्षाला सहज जागा जिंकणे अशक्य असल्यानेच फुटीमुळे बारामतीसह राष्ट्रवादीच्या सर्व लोकसभेच्या जागा धोक्यात आलेल्या आहेत.
पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुकाध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुणे जिल्हाध्यक्षांसह दहाही तालुकाध्यक्ष अजित पवार यांच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील मुळशी, पुरंदर आणि दौंडचे तालुकाध्यक्ष मात्र शरद पवार यांच्यासोबत जात आहे. परंतु इतर दहा तालुक्यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, अजित पवार यांचा ग्रामीण भागात प्रचंड दबदबा आहे. जिल्ह्यातील काही आमदारांनीही अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदारांचा पाठिंबा असल्याने तालुका संघटना पदाधिकाऱ्यांकडूनही अजित पवार यांना समर्थन दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी ते अजित पवार यांच्यासमवेतच असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र ते अजित पवार यांच्यासमवेतच असतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्थानिक पातळीवरील राजकारण स्थिती पाहूनच विद्यमान आमदार अजित पवार यांचे समर्थन करीत आहेत. जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती पाहूनच अजित पवार यांच्या गटाकडे समर्थन देत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघापैकी २ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत त्यांच्यावर देखील अजित पवार यांचा प्रभाव आहे. इंदापूर वगळता अन्य दौंड, खडकवासला या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात स्वतः अजित पवार नेतृत्व करीत आहेत या ठिकाणी जरी लोकसभेला विद्यमान खासदार सुप्रियाताई पवार यांना मतदारांनी साथ दिली तरी अन्य इंदापूर, दौंड, पुरंधर, भोर, खडकवासला या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील संघटनात्मक पदाधिकारी यांच्यावर अजित पवार यांचा प्रभाव आहे.
खडकवासला मतदारसंघातून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर या तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी विद्यमान खासदार सुप्रियाताई यांची साथ सोडून अजित दादा यांना समर्थन देवून महिला अध्यक्षा झालेल्या आहेत. नेहमीच बारामती लोकसभा निवडणुकीत खडकवासला या मतदारसंघातून पक्षाची ताकद असूनही कमी मतदान मिळते अशा परिस्थितीत मताधिक्याची अपेक्षा पूर्ती निश्चित होणार नाही त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा धोक्यात आलेली आहे. अशी राजकीयदृष्ट्या स्थिती निर्माण करूनच भाजपला सर्वाधिक समर्थनीय जागा जिंकण्याची रणनीतीचा लाभ होताना भविष्यात दिसेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
जीवनात कोठेतरी केव्हातरी थांबायला पाहिजे असे म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मत व्यक्त करून मध्यंतरी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा दर्शवलेली होती मात्र काही पदाधिकारी यांच्या भवितव्याचा लाभासाठी विरोध झाला. युती सरकारला पाठींबा देवून सत्तेत सहभागी होऊन अजित दादा पवार यांनी वेगळी भूमिका घेतेली त्याला विरोध करून विचारांशी गद्दारी केल्याचा दावा केला जात आहे मात्र अजितदादा गटाकडून सदर दावा खोडून काढला जात असून राष्ट्रवादी पक्षाने यापूर्वीच नागालँड येथील भाजप सरकारला ७ आमदारांनी पाठींबा दर्शवलेला आहे तसेच २०१४ मध्ये ही भाजपला बाहेरून पाठींबा दर्शवण्याचा निर्णय झालेला होता त्यामुळे विचारांशी गद्दारी होऊ शकत नसून काही नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी विरोधाला विरोध केला जात आहे असे अजितदादा समर्थकांचे म्हणणे आहे.
शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा, पुणे शहरातील आठ आणि पिंपरी चिंचवडमधील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात आमदार असून त्यापैकी सहा, पुणे शहरातील दोनपैकी एक आणि पिंपरी चिंचवडमधील एक असे एकूण आठ आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत.
अजित पवार समर्थक सभा उपस्थिती 32 आमदार
|
अ.क्र
|
अजित पवार समर्थक आमदार
|
मतदारसंघ
|
1
|
श्री. अजित अनंतराव पवार
|
बारामती
|
2
|
श्री. छगन भुजबळ
|
येवला
|
3
|
श्री. मुश्रीफ हसन मियालाल
|
कागल
|
4
|
श्री. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
|
आंबेगाव
|
5
|
श्री. धनजय पंडितराव मुंडे
|
परळी
|
6
|
श्री. दिलीप मोहिते
|
खेड आळंदी
|
7
|
श्री. अनिल भाईदास पाटील
|
अमळनेर
|
8
|
श्री. झिरवाळ नरहरी सीताराम
|
दिंडोरी
|
9
|
श्री. आत्राम धरमरावबाबा भगवंत ...
|
अहेरी
|
10
|
अॅड. कोकाटे माणिकराव शिवाजीराव
|
सिन्नर
|
11
|
श्री. निलेश ज्ञानदेव लंके
|
पारनेर
|
12
|
कुमारी आदिती सुनील तटकरे
|
श्रीवर्धन
|
13
|
श्री. बनसोडे संजय बाबुराव
|
उदगीर
|
14
|
श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
|
इंदापूर
|
15
|
श्री. प्रकाश (दादा) सुंदरराव सोळंके
|
माजलगाव
|
16
|
श्री. सुनील शंकरराव शेळके
|
मावळ
|
17
|
श्री. माने यशवंत विठ्ठल
|
मोहोळ
|
18
|
श्री. शिंदे बबनराव विठ्ठलराव
|
माढा
|
19
|
श्री. दिपक प्रल्हाद चव्हाण
|
फलटण
|
20
|
श्री. बनकर दिलीपराव शंकरराव
|
निफाड
|
21
|
श्री. नाईक इंद्रनील मनोहर
|
पुसद
|
22
|
श्री. आजबे बाळासाहेब भाऊसाहेब
|
आष्टी
|
23
|
श्री. संग्राम अरुणकाका जगताप
|
अहमदनगर
|
24
|
श्री. सुनील विजय टिंगरे
|
वडगाव शेरी
|
25
|
श्री. अण्णा दादू बनसोडे
|
पिंपरी
|
26
|
श्री. कारेमोरे राजू माणिकराव
|
तुमसर
|
27
|
श्री. राजेश नरसिंगराव पाटील
|
चंदगड
|
28
|
श्री. शेखर गोविंदराव निकम
|
चिपळूण
|
29
|
श्री. नितीन अर्जुन (ए. टी.) पवार
|
कळवण
|
30
|
श्री. चंद्रिकापुरे मनोहर गोवर्धन...
|
अर्जुनी-मोरगाव
|
31
|
श्री. बाबासाहेब मोहनराव पाटील
|
अहमदपूर
|
32
|
श्री. अतुल वल्लभ बेनके
|
जुन्नर
|
शरद पवार समर्थक सभा उपस्थिती 18 आमदार
|
अ.क्र
|
शरद पवार समर्थक आमदार
|
मतदारसंघ
|
1
|
श्री. जयंत राजाराम पाटील
|
इस्लामपूर
|
2
|
श्री. आवाड जितेंद्र सतीश
|
मुंब्रा-कळवा
|
3
|
डॉ. किरण यमाजी लहामटे
|
अकोले
|
4
|
श्री. अशोक रावसाहेब पवार
|
शिरूर
|
5
|
श्री. रोहित पवार
|
कर्जत जामखेड
|
6
|
श्री. अनिल देशमुख
|
काटोल
|
7
|
श्री. राजेंद्र भास्करराव शिंगणे
|
सिंदखेड राजा
|
8
|
श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
|
राहुरी
|
9
|
श्रीमती सुमन आर.आर पाटील
|
तासगाव-कवठे महांकाळ
|
10
|
श्री. मकरंद जाधव पाटील
|
वाई
|
11
|
श्री. राजेश टोपे
|
घनसावंगी
|
12
|
श्री.राज नवघरे
|
बसमत
|
13
|
श्री. भुसारा सुनील चंद्रकांत
|
विक्रमगड
|
14
|
श्री. संदीप रवींद्र क्षीरसागर
|
बीड
|
15
|
श्री. चेतन विठ्ठल तुपे
|
हडपसर
|
16
|
श्री. बाळासाहेब पाटील
|
कराड उत्तर
|
17
|
श्री. मानसिंग फत्तेसिंगराव नाईक
|
शिराळा
|
18
|
श्री. दौलत भिका दरोडा
|
शहापूर
|
अ.क्र
|
भूमिका
अस्पष्ट
असणारे आमदार
|
मतदारसंघ
|
1
|
श्रीमती. सरोज बाबुलाल अहिरे
|
देवलाली
|
2
|
श्री. आशुतोष अशोकराव काळे
|
कोपरगाव
|
3
|
श्री. नवाब मलिक
|
अणुशक्ती नगर
|
पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात अध्यक्ष असलेल्या आणि सध्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असलेल्या निर्मला पानसरे या खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थक आहेत. मोहिते यांच्यामुळेच त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. आता मोहिते हेच अजित पवार यांच्याबरोबर गेल्याने पानसरे यासुद्धा आपोआप अजित पवार यांच्या गोटात सामील होणार आहेत. अशीच स्थिती आंबेगाव तालुक्यात निर्माण झाली आहे. येथील आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर गेल्याने, त्यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे, माजी उपाध्यक्ष असलेले रणजित शिवतरे (भोर) हे खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थक मानले जातात. परंतु अजित पवार यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. त्यामुळे शिवतरे यांनी अद्याप तरी कोणत्या गटाबरोबर आहे हे स्पष्ट केलेले नाही. तसेच माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे (ता. हवेली), माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, पांडुरंग पवार (दोघेही ता. जुन्नर), बांधकाम समितीचे माजी सभापती संभाजी होळकर, भाऊसाहेब करे (दोघेही ता.बारामती), प्रवीण माने (ता. इंदापूर), माजी कृषी सभापती दशरथ माने (ता. इंदापूर), अरुण चांभारे (ता. खेड), बाबूराव वायकर (ता. मावळ), महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे (ता. हवेली), वंदना धुमाळ (ता. भोर), राणी शेळके (ता. दौंड), माजी अध्यक्षा सविता दगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), उपाध्यक्ष सुनील चांदेरे (मुळशी), माजी सदस्य वीरधवल जगदाळे (दौंड) आदी अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण १० पैकी ८ आमदार अजित पवार यांच्या गोटात गेले असून केवळ दोन आमदार हे शरद पवार यांच्याबरोबर शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यातील अजित पवार यांच्या गोटात गेलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये स्वतः अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), दत्तात्रेय भरणे (इंदापूर), दिलीप मोहिते पाटील (खेड), सुनील शेळके (मावळ),अतुल बेनके (जुन्नर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी) आणि अण्णा बनसोडे (पिंपरी) यांचा समावेश आहे. चेतन तुपे (हडपसर) आणि अशोक पवार (शिरूर) हे दोन आमदार शरद पवार यांच्याबरोबर आहेत.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=============================
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
पुस्तक किंमत-750/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-500/-रु.
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.