खाते बदलण्याच्या भीतीने सहकार मंत्र्यांकडून कार्यतत्परता
महाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षितपणे उलथापालथ होत असताना राज्यातील भाजप सेना युती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने धास्तावलेल्या विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाच्या भीतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु ठेवल्याचे चित्र प्रशासनात दिसून येत आहे. अनेक विभागांमध्ये बदल्यांचे पेव फुटले असून मंत्र्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची लगबग आढळून येत आहे. अपेक्षित ठिकाणी बदली व्हावी असा सर्वच अधिकाऱ्यांचा अट्टाहास असतो त्यामुळे हात ओले केल्याशिवाय मनाप्रमाणे बदलीचे ठिकाण मिळत नाही त्यामुळे अर्थपूर्ण बोलण्याला फार महत्व प्राप्त झालेले आहे. सत्ताधारी कोणताही पक्ष असो बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बोलण्याला फार महत्व असते ते अजूनही कायम आहे. सहकार मंत्र्यांकडून खाते बदलण्याच्या भीतीने कार्यतत्परता दर्शवून दोन महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दर 5 ते 10 दिवसांच्या फरकाने काढण्यात आलेले आहेत. सहकार विभागात बदल्यांचा धडाका सुरूच आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.
सहकार विभागाकडून गेल्या दोन महिन्यात बदल्यांचे आदेश काढले त्याचा तपशील पाहता पदस्थापनाबाबत १ आदेश व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाचे दिनांक 23/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबत दिनांक 24/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे दिनांक 26/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले.
उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 26/05/2023 रोजी 23 आदेश काढण्यात आले. असे एकूण एकाच दिवशी 34 बदल्यांचे आदेश काढण्यात आले. रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-2, गट-ब (अराजपत्रित) पदावरून रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1 या पदावरील पदोन्नतीबाबत दिनांक 31/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवशीच दिनांक 01/06/2023 रोजी रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या पदावरून उप संचालक, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नतीचा १ आदेश काढण्यात आला. सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 16/06/2023 रोजी 8 आदेश काढण्यात आले. त्यानंतर ६ दिवसांनी पुन्हा 3 आदेश दिनांक 22/06/2023 रोजी काढले. त्यानंतर 13 दिवसांनी सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या सवंर्गातून अपर निबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबतचे दिनांक 05/07/2023 रोजी 5 बदल्यांचे आदेश काढण्यात आले.
अशाप्रकारे २ महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत. गेल्या 3 वर्षाचा विचार केला तर सन 2021 ला 94 आणि सन 2022 ला 44 बदल्यांचे आदेश काढलेले आहेत. सन 2023 ला मे, जून या दोन महिन्यातच 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत.
========0================0================0========
साखर संचालकपदी डॉ. संजयकुमार भोसले
पुणे : सहकार खात्याचे पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांची साखर संचालकपदी (प्रशासन) पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तम इंदलकर यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते.
राज्य सरकारच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने ५ जुलै रोजी भोसले यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. श्री. भोसले हे पुणे विभागीय सहनिबंधक पदावर (गट अ) कार्यरत होते. त्यांची अपर निबंधक (सहकारी संस्था) या पदावर पदोन्नती करण्यात येऊन त्यांची साखर आयुक्तालयात संचालकपदी बदली करण्यात आली. यापूर्वी या पदावर उत्तम इंदलकर कार्यरत होते ते 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने सदर जागा रिक्त झालेली होती.
भोसले यांच्या जागी औरंगाबाद विभागीय सहनिबंधक पदी कार्यरत असलेले योगीराज सुर्वे यांची बदलीने नियुक्ती झालेली आहे.सहकार विभागाने काढलेल्या अन्य आदेशांमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे या रिक्त पदावर संतोष पाटील यांची नियुक्ती झाली असून अप्पर निबंधक, सहकारी संस्था (तपासणी व निवडणुका) या बदलीने रिक्त झालेल्या पदावर लातूर विभागीय निबंधक डॉ. ज्योती लाटकर यांची नियुक्तीचे आदेश काढलेले आहेत.
तसेच अप्पर निबंधक, सहकारी संस्था (पतसंस्था) मुख्यालय, पुणे या रिक्त पदावर श्रीकृष्ण वाडेकर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि अप्पर निबंधक तथा कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे या रिक्त पदावर नागपूर विभागीय निबंधक संजय कदम यांची पदोन्नतीने नियुक्ती झाल्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. यापूर्वीच सहकार विभागातील १६ जूनला देखील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाने पारित केले आहेत.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी-
पुस्तक किंमत-750/-रु.
प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत-500/-रु.
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.